< रोम. 6 >

1 तर आता आपण काय म्हणावे? कृपा अधिक व्हावी म्हणून आपण पापात रहावे काय?
Then what shall we say? must we abide in sin, in order that grace may abound?
2 कधीच नाही! आपण जे पापाला मरण पावलो आहोत ते त्यामध्ये ह्यापुढे कसे राहणार?
It could not be so. How shall we, who are dead unto sin, live any longer in it?
3 किंवा आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला, त्या आपण त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला हे तुम्ही जाणत नाही काय?
Whether do you not know, that so many of us as were baptized unto Jesus Christ were baptized into His death?
4 म्हणून आपण त्याच्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो, ते ह्यासाठी की जसा ख्रिस्त पित्याच्या गौरवामुळे मरण पावलेल्यांमधून उठवला गेला तसेच आपणही जीवनाच्या नवेपणात चालले पाहिजे.
Therefore we were buried with him by baptism into death: in order that as Christ was raised from the dead by the glory of the Father, so must we also walk in newness of life.
5 कारण जर त्याच्या मरणाच्या रूपात आपण त्याच्याशी जोडलेले आहोत तर त्याच्या पुन्हा उठण्याच्या रूपात आपण त्याच्याशी जोडलेले होऊ.
For if we have grown together in the likeness of His death, we shall also be in the likeness of his resurrection:
6 आपण जाणतो की आपल्यामधील जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळला गेला आहे, म्हणजे पापाचे शरीर नष्ट होऊन आपण पुढे पापाचे दास्य करू नये.
knowing this, that our old man is crucified along with him, in order that the body of sin may be destroyed, that we may no longer serve sin;
7 कारण जो मरण पावला आहे तो पापापासून मुक्त होऊन न्यायी ठरवलेला आहे.
for the one having died has been made free from sin.
8 पण आपण जर ख्रिस्ताबरोबर मरण पावलो असलो, तर आपण त्याच्याबरोबर जिवंतही राहू असा आपण विश्वास ठेवतो.
But if we died along with Christ, we believe that we will also live with him:
9 कारण आपण हे जाणतो की, मरण पावलेल्यांमधून उठलेला ख्रिस्त पुन्हा मरणार नाही. त्याच्यावर मरणाची सत्ता अजिबात राहिली नाही.
knowing that Christ having risen from the dead dies no more; death no longer has dominion over him.
10 १० कारण तो मरण पावला तो पापासाठी एकदाच मरण पावला, पण जिवंत आहे तो देवासाठी जिवंत आहे.
For the death that he died, he died unto sin once: but the life that he lives, he lives unto God.
11 ११ तसेच आपण ख्रिस्त येशूमध्ये खरोखर पापाला मरण पावलेले पण देवाला जिवंत आहोत असे तुम्ही स्वतःला माना.
So you also thus reckon yourselves dead unto sin, but alive unto God through Jesus Christ.
12 १२ म्हणून तुम्ही आपल्या मरणाधीन शरीरात त्याच्या वासनांच्या अधीन होण्यास पापाला राज्य चालवू देऊ नका.
Let not sin therefore reign in your mortal body that you should obey the lusts of it:
13 १३ आणि तुम्ही आपले अवयव अनीतीची साधने म्हणून पापाला समर्पण करू नका. पण तुम्ही आपल्या स्वतःला मरण पावलेल्यातून जिवंत झालेले असे देवाला समर्पण करा आणि आपले स्वतःचे अवयव नीतिमत्त्वाची साधने म्हणून तुम्ही देवाला समर्पण करा.
neither present your members arms of iniquity unto sin; but present yourselves to God, as alive from the dead, and your members arms of righteousness unto God.
14 १४ तुमच्यावर पापाची सत्ता चालणार नाही कारण तुम्ही नियमशास्त्राधीन नाही, पण कृपेखाली आणले गेला आहात.
For sin shall not have dominion over you: for you are not under the law, but under grace.
15 १५ मग काय? मग आपण नियमशास्त्राखाली नसून कृपेखाली आणले गेलो आहोत, म्हणून आपण पाप करावे काय? कधीच नाही.
What then? can we commit sin, because we are not under the law, but under grace? it could not be so.
16 १६ तुम्ही ज्याला आपल्या स्वतःला दास म्हणून आज्ञा पाळण्यास समर्पण करता, तुम्ही ज्याच्या आज्ञा पाळता त्याचे तुम्ही दास आहात. ते मरणासाठी पापाचे किंवा नीतिमत्त्वासाठी आज्ञापालनाचे, हे तुम्ही जाणत नाही काय?
Do you not know, that to whom you present yourselves servants unto obedience, ye are servants to whom you obey; whether of sin unto death, or obedience unto righteousness?
17 १७ पण देवाला धन्यवाद कारण तुम्ही पापाचे दास असतानाही तुम्ही ज्या शिक्षणाच्या शिस्तीखाली ठेवला गेला त्याच्या तुम्ही मनापासून आज्ञा पाळल्या.
But thanks be unto God, that whereas ye were servants of sin, but you have obeyed from the heart the type of teaching into which ye were delivered:
18 १८ आणि पापापासून मुक्त केले जाऊन नीतिमत्त्वाचे दास झाला.
but having been made free from sin, ye became servants unto righteousness.
19 १९ मी तुमच्या देहाच्या अशक्तपणामुळे मनुष्यांच्या व्यवहारास अनुसरून बोलतो कारण जसे तुमचे अवयव अमंगळपणाला व अनाचाराला अनाचारासाठी दास होण्यास समर्पित केलेत तसेच आता तुमचे अवयव नीतिमत्त्वाला पवित्रीकरणासाठी दास होण्यास समर्पण करा.
I speak after the manner of a man on account of the weakness of your carnality. For as ye presented your members as servants unto impurity and lawlessness pursuant to lawlessness, so now present your members servants unto righteousness pursuant to sanctification.
20 २० कारण तुम्ही पापाचे दास होता, तेव्हा तुम्ही नीतिमत्त्वाच्या बाबतीत स्वतंत्र होता.
For when you were the servants of sin, you were free from righteousness.
21 २१ आता तुम्हास ज्यांची लाज वाटते त्या गोष्टींपासून तेव्हा तुम्हास काय फळ मिळत होते? कारण त्या गोष्टींचा शेवट मरण आहे.
What fruit then had you at that time in those things in which you are now ashamed? for the end of these things is death.
22 २२ पण आता तुम्ही पापापासून मुक्त केले जाऊन देवाचे दास झाला असल्यामुळे, आता तुम्हास पवित्रीकरण हे फळ आहे आणि शेवटी सार्वकालिक जीवन आहे. (aiōnios g166)
But now having been made free from sin, and having become servants unto God, you have your fruit unto sanctification, and the end eternal life. (aiōnios g166)
23 २३ कारण पापाचे वेतन मरण आहे, पण आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे सार्वकालिक जीवन हे देवाचे कृपादान आहे. (aiōnios g166)
For the wages of sin is death; but the free gift of God is eternal life through Jesus Christ our Lord, (aiōnios g166)

< रोम. 6 >