< ᏉᎳ ᎶᎻ ᎠᏁᎯ ᏧᏬᏪᎳᏁᎸᎯ 7 >

1 ᏝᏍᎪ ᏱᏥᎦᏔᎭ, ᎠᏓᎵᏅᏟ, ( ᏗᎧᎿᎭᏩᏛᏍᏗᏰᏃ ᎠᏂᎦᏔᎯ ᎦᏥᏬᏁᏗᎭ, ) ᎾᏍᎩ ᏗᎧᎿᎭᏩᏛᏍᏗ ᎤᎾᏝᎥ ᏴᏫ ᏂᎪᎯᎸ ᎡᎲᎢ?
बंधूंनो, (नियमशास्त्राची माहीती असणार्‍यांशी मी बोलत आहे) मनुष्य जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याच्यावर नियमशास्त्राची सत्ता आहे हे तुम्ही जाणत नाही काय?
2 ᎠᎨᏴᏰᏃ ᏥᏓᏤᎰᎢ, ᏗᎧᎿᎭᏩᏛᏍᏗ ᎤᏚᏓᎸᏙ ᎤᏰᎯ ᎤᎾᏁᎳᏗᏍᏗᏱ ᎢᎪᎯᏛ ᎠᎴᏂᏙᎲ ᎤᏰᎯ; ᎤᏰᎯᏍᎩᏂ ᎤᏲᎱᏒᎯ ᏱᎩ, ᎤᏚᏓᎴᏛ ᎨᏐ ᏗᎧᎿᎭᏩᏛᏍᏗ ᎤᏚᏓᎸᏛ ᎤᏰᎯ ᎤᎾᏁᎳᏗᏍᏗᏱ.
कारण ज्या स्त्रीला पती आहे, ती पती जिवंत आहे तोपर्यंत त्यास नियमशास्त्राने बांधलेली असते; पण तिचा पती मरण पावला, तर पतीच्या नियमातून ती मुक्त होते.
3 ᎾᏍᎩ ᎢᏳᏍᏗ, ᎢᏳᏃ ᎠᏏᏉ ᎡᎲ ᎤᏰᎯ, ᏅᏩᏓᎴ ᎠᏍᎦᏯ ᏱᏚᎾᏤᏅ, ᎠᏓᏲᏁᎯ ᎠᎪᏎᎮᏍᏗ; ᎢᏳᏍᎩᏂ ᎤᏰᎯ ᎤᏲᎱᏒᎯ ᏱᎩ, ᎤᏚᏓᎴᏛ ᎨᏐ ᏗᎧᎿᎭᏩᏛᏍᏗ ᎤᏚᏓᎸᏛᎢ; ᎾᏍᎩᏃ ᎥᏝ ᎠᏓᏲᏁᎯ ᏱᎩ, ᎤᏁᎳᎩ ᏅᏩᏓᎴ ᎠᏍᎦᏯ ᏱᏓᎾᏤᎭ.
म्हणून पती जिवंत असताना, जर ती दुसर्‍या पुरुषाची झाली तर तिला व्यभिचारिणी हे नाव मिळेल. पण तिचा पती मरण पावला तर ती त्या नियमातून मुक्त होते. मग ती दुसर्‍या पुरुषाची झाली तरी ती व्यभिचारिणी होत नाही.
4 ᎾᏍᎩ ᎢᏳᏍᏗ ᎢᏓᎵᏅᏟ ᏂᎯ ᎾᏍᏉ ᏗᏥᏲᎱᏒᎯ ᏂᏣᎵᏍᏔᏅ ᏗᎧᎿᎭᏩᏛᏍᏗ ᎤᎬᏩᎵ, ᎦᎶᏁᏛ ᎠᏰᎸ ᎢᏳᏩᏂᏌᏛ; ᎾᏍᎩ ᏅᏩᏓᎴ ᏗᏣᏨᏍᏗᏱ ᎠᏰᎸᏒᎩ, ᎾᏍᎩ ᎠᏲᎱᏒ ᏣᎦᎴᏔᏅᎯ ᎨᏒᎢ, ᎾᏍᎩ ᎤᎦᏔᏔᏅᎯ ᎡᏗᎾᏄᎪᏫᏎᏗᏱ ᎤᏁᎳᏅᎯ.
आणि म्हणून, माझ्या बंधूंनो, तुम्हीपण ख्रिस्ताच्या शरीराद्वारे नियमशास्त्राला मरण पावलेले झाला आहात; म्हणजे तुम्ही दुसर्‍याचे, जो मरण पावलेल्यातून उठवला गेला त्याचे व्हावे; म्हणजे आपण देवाला फळ द्यावे.
5 ᎤᏇᏓᎸᏉᏰᏃ ᎠᏏ ᏥᏕᎲᎢ, ᎠᏍᎦᏅᎢᏍᏗ ᎨᏒ ᎤᏚᎸᏅᎥᏍᎬᎢ, ᎾᏍᎩ ᏗᎧᎿᎭᏩᏛᏍᏗ ᎢᏳᏩᏂᏌᏛ ᎨᏒᎢ, ᎾᏍᎩ ᏚᎸᏫᏍᏓᏁᎲᎩ ᏗᏗᏰᎸ ᎤᏚᏓᏕᏫᏒᎢ ᎤᎦᏔᏔᏅᎯ ᎠᏲᎱᎯᏍᏗ ᎨᏒ ᎡᏗᎾᏄᎪᏫᏎᏗᏱ.
कारण आपण देहाधीन असताना नियमशास्त्रामुळे उद्भवलेल्या आपल्या पापांच्या भावना आपल्या अवयवात, मरणाला फळ देण्यास कार्य करीत होत्या.
6 ᎪᎯᏍᎩᏂ ᎨᏒ ᏗᎧᎿᎭᏩᏛᏍᏗ ᎡᏓᏚᏓᎳᎡᎸ, ᏅᏗᎦᎵᏍᏙᏗᎭ ᎤᏲᎱᏒᎯ ᎨᏒ ᏗᎩᎾᏢᏅᎯ ᎨᏒᎢ; ᎾᏍᎩ ᎢᏤ ᎠᏓᏅᏙ ᎢᎬᏙᏗᏱ ᎪᎱᏍᏗ ᎡᏓᏛᏁᏗᏱ, ᎥᏝᏃ ᎪᏪᎸᏉ ᎢᎬᏙᏗᏱ ᎾᏍᎩᏯ ᏂᎦᏛᏁᎸ ᏧᏩᎫᏔᏅᏒᎢ.
पण आपण ज्याच्या बंधनात होतो त्यास आपण मरण पावलो असल्यामुळे आपण आता नियमशास्त्रापासून मुक्त झालो आहोत, ते ह्यासाठी की, आपण आत्म्याच्या नवेपणाने सेवा करावी, शास्त्रलेखाच्या जुनेपणाने नाही.
7 ᎦᏙᎨᏃ ᏓᏓᏛᏂ? ᏥᎪ ᏗᎧᎿᎭᏩᏛᏍᏗ ᎠᏍᎦᏂᏉ? ᎬᏩᏟᏍᏗ. ᎥᏝᏍᎩᏂ ᎠᏍᎦᏂ ᏱᎬᎩᎦᏙᎥᏎ ᎥᏝ ᏗᎧᎿᎭᏩᏛᏍᏗ; ᎥᏝᏰᏃ ᏱᎦᏥᎦᏔᎮ ᎤᏲ ᎠᏚᎸᏅᏗ ᎨᏒᎢ, ᎢᏳᏃ ᏗᎧᎿᎭᏩᏛᏍᏗ ᎯᎠ ᏄᏪᏒᎾ ᏱᎨᏎᎢ, ᏞᏍᏗ ᏣᏓᏚᎸᎡᎸᎩ.
मग काय म्हणावे? नियमशास्त्र पाप आहे काय? कधीच नाही. पण मला नियमशास्त्राशिवाय पाप समजले नसते कारण ‘लोभ धरू नको’ असे नियमशास्त्राने सांगितल्याशिवाय मला लोभ कळला नसता.
8 ᎠᏍᎦᏂᏍᎩᏂ ᎤᎵᏁᏨ ᎬᏗᏍᎬᎢ ᏄᏓᎴᏒ ᎤᏲ ᎠᏆᏚᎸᏅᏗᏱ ᎾᏋᏁᎸᎩ. ᎥᏝᏰᏃ ᏗᎧᎿᎭᏩᏛᏍᏗ ᎠᏍᎦᏂ ᎤᏲᎱᏒᎯ ᏱᎩ.
पण पापाने आज्ञेची संधी घेऊन माझ्यात सर्व प्रकारचा लोभ उत्पन्न केला कारण नियमशास्त्राशिवाय पाप निर्जीव होते.
9 ᎢᎸᎯᏳᏰᏃ ᏥᎨᏒ ᏗᎧᎿᎭᏩᏛᏍᏗ ᏂᏓᏆᏁᎶᏛᎾ ᎨᏒ ᎢᏳᎢ ᎬᏃᏛ ᎨᏒᎩ; ᎤᎵᏁᏨᏍᎩᏂ ᎤᎷᏨ, ᎠᏍᎦᏂ ᎤᏛᏂᏛᎩ, ᎠᏴᏃ ᎠᎩᏲᎱᏒᎩ.
कारण मी एकदा नियमशास्त्राशिवाय जगत होतो, पण जेव्हा आज्ञा आली तेव्हा पाप सजीव झाले व मी मरण पावलो.
10 ᎠᎴ ᎾᏍᎩ ᎤᎵᏁᏨ ᎬᏂᏛ ᎠᏓᏁᎯ ᎨᏒ ᎠᏓᎯᎯᏉ ᎾᏆᎵᏍᏓᏁᎸᎩ ᎠᏴ.
१०आणि जीवनासाठी दिलेली आज्ञा मरणाला कारण झाली, हे मला दिसले.
11 ᎠᏍᎦᏂᏰᏃ ᎤᎵᏁᏨ ᎬᏗᏍᎬ ᎠᎩᎶᏄᎮᎸᎩ, ᎠᎴ ᎾᏍᎩ ᎠᎩᎯᏍᏔᏅᎩ.
११पण पापाने आज्ञेची संधी घेतली आणि मला फसवले व तिच्या योगे ठार मारले.
12 ᎾᏍᎩ ᎢᏳᏍᏗ ᏗᎧᎿᎭᏩᏛᏍᏗ ᎾᏍᎦᏅᎾ; ᎠᎴ ᎾᏍᎩ ᎤᎵᏁᏨ ᎾᏍᎦᏅᎾ, ᎠᎴ ᏚᏳᎪᏛᎢ, ᎠᎴ ᎣᏏᏳ.
१२म्हणून नियमशास्त्र पवित्र आहे, तशीच आज्ञा पवित्र, न्याय्य आणि चांगली आहे.
13 ᏥᎪᏃ ᎾᏍᎩ Ꮎ ᎣᏍᏛ ᎨᏒ ᎠᎩᎯᎯᏉ ᏄᎵᏍᏔᏁᎢ? ᎬᏩᏟᏍᏗ. ᎠᏍᎦᏂᏍᎩᏂ, ᎾᏍᎩ ᎬᏂᎨᏒ ᎢᏳᎵᏍᏙᏗᏱ ᎾᏍᎩ ᏄᏍᏛ ᎠᏍᎦᏂ, ᏚᎸᏫᏍᏓᏁᎲᎩ ᎠᎩᎯᏍᏗᏱ ᎬᏗᏍᎬᎩ ᎾᏍᎩ Ꮎ ᎣᏍᏛ ᎨᏒᎢ; ᎾᏍᎩ ᎠᏍᎦᏂ ᎤᎵᏁᏨ ᎢᏳᏩᏂᏌᏛ ᎤᏣᏘ ᎠᏍᎦᎾᎯᏳ ᎢᏳᎵᏍᏙᏗᏱ.
१३मग जी चांगली आहे ती मला मरण झाली काय? तसे न होवो. पण जी चांगली आहे, तिच्या योगे, पाप हे पाप असे प्रकट व्हावे, म्हणून माझ्यात, ती मरण हा परिणाम घडविते; म्हणजे पाप हे आज्ञेमुळे पराकोटीचे पापिष्ट झाले.
14 ᎢᏗᎦᏔᎭᏰᏃ ᎾᏍᎩ ᏗᎧᎿᎭᏩᏛᏍᏗ ᎠᏓᏅᏙ ᎤᏠᏱ ᎨᏒᎢ; ᎠᏴᏍᎩᏂ ᎤᏇᏓᎵ ᎠᏆᏘᏂᏙᎯ, ᎥᎩᎾᏗᏅᏛ ᎠᏍᎦᏂ ᎠᎩᎾᏢᏗᏱ.
१४कारण आपण हे जाणतो की, नियमशास्त्र हे आत्मिक आहे, पण मी दैहिक आहे; पापाला विकलेला आहे.
15 ᏄᏍᏛᏰᏃ ᏓᎩᎸᏫᏍᏓᏁᎲᎢ, ᎥᏝ ᎣᏏᏳ ᏯᎩᏰᎸᎭ; ᏄᏍᏛᏍᎩᏂ ᎠᏆᏚᎵᏍᎬᎢ ᎥᏝ ᎾᏍᎩ ᏱᏂᎦᏛᏁᎰᎢ; ᎾᏍᎩᏍᎩᏂ ᏥᏂᏆᏘᎲᎢ, ᎾᏍᎩ ᏂᎦᏛᏁᎰᎢ.
१५कारण मी काय करीत आहे ते मला कळत नाही; कारण मी ज्याची इच्छा करतो ते मी करीत नाही पण मी ज्याचा द्वेष करतो ते मी करतो.
16 ᎾᏍᎩᏃ ᎢᏳ ᎾᏆᏚᎵᏍᎬᎾ ᎨᏒ ᎾᏍᎩ ᏱᏂᎦᏛᏁᎭ, ᏗᎧᎿᎭᏩᏛᏍᏗ ᎣᏏᏳ ᎨᏒ ᎪᎢᏳᎲᏍᎦ.
१६मग मी जे इच्छीत नाही ते जर मी करतो, तर नियमशास्त्र चांगले आहे हे मी कबूल करतो.
17 ᎾᏍᎩᏃ ᏥᏄᏍᏗ ᎥᏝ ᎿᎭᏉ ᎠᏴ ᎾᏍᎩ ᏱᏂᎦᏛᏁᎭ, ᎠᏍᎦᏂᏍᎩᏂ ᎾᏍᎩ ᏣᎩᏯᎠ.
१७मग आता मी ते करीत नसून माझ्यात राहणारे पाप ते करते.
18 ᏥᎦᏔᎭᏰᏃ ᎾᏍᎩ ᎠᏴ ᎨᏒᎢ, ( ᎾᏍᎩ ᎠᎩᏇᏓᎸ ᏯᏛᏅ, ) ᎪᎱᏍᏗ ᎣᏍᏛ ᏄᎵᏠᏯᏍᏛᎾ ᎨᏒᎢ; ᎠᏚᎸᏗᏱᏰᏃ ᎠᎩᎭ; ᎾᏍᎩᏍᎩᏂ Ꮎ ᎣᏍᏛ ᎨᏒ ᎢᏯᏛᏁᏗᏱ ᎥᏝ ᏱᏥᏩᏘᎭ.
१८कारण मी जाणतो की, माझ्यात, म्हणजे माझ्या देहात काहीच चांगले वसत नाही कारण इच्छा करणे माझ्याजवळ आहे, पण चांगले करीत राहणे नाही.
19 ᎣᏍᏛᏰᏃ ᎢᏯᏛᏁᏗᏱ ᎠᏆᏚᎵᏍᎬᎢ, ᎥᏝ ᎾᏍᎩ ᏱᏂᎦᏛᏁᎰᎢ; ᎤᏲᏍᎩᏂ ᎾᏍᎩ ᎾᏆᏚᎵᏍᎬᎾ ᎨᏒᎢ, ᎾᏍᎩ ᏂᎦᏛᏁᎰᎢ.
१९कारण मी जे चांगले करण्याची इच्छा करतो ते मी करीत नाही, पण मी ज्याची इच्छा करीत नाही ते वाईट मी करतो.
20 ᎾᏍᎩᏃ ᎢᏳᏃ ᎠᏴ ᎾᏆᏚᎵᏍᎬᎾ ᎨᏒ ᎾᏍᎩ ᏱᏂᎦᏛᏁᎭ, ᎥᏝ ᎠᏴ ᎿᎭᏉ ᎾᏍᎩ ᏱᏂᎦᎦᏛᏁᎭ, ᎠᏍᎦᏂᏍᎩᏂ ᎾᏍᎩ ᏣᎩᏯᎠ.
२०मग आता मी जे इच्छीत नाही ते जर मी करतो, तर मी ते करीत नसून माझ्यात राहणारे पाप ते करते.
21 ᎾᏍᎩᏃ ᎾᏉ ᏥᏩᏘᎭ ᎯᎠ ᏗᎧᎿᎭᏩᏛᏍᏗ, ᎾᏍᎩ ᎣᏍᏛ ᎢᏯᏆᏛᏁᏗᏱ ᎠᏆᏚᎸ, ᎤᏲ ᎨᏒ ᏓᎩᎧᎿᎭᏩᏗᏙᎰᎢ.
२१मग मी चांगले करू इच्छीत असता वाईट माझ्याजवळ हाताशी असते, हा नियम आढळतो.
22 ᎣᏏᏳᏰᏃ ᎠᎩᏰᎸᎭ ᏗᎧᎿᎭᏩᏛᏍᏗ ᎤᏁᎳᏅᎯ ᎤᏤᎵᎦ ᎬᏗᎭ ᎭᏫᏂ ᎠᏇᎲ ᏴᏫ.
२२कारण मी माझ्या अंतर्यामी देवाच्या नियमाने आनंदित होतो;
23 ᎠᏎᏃ ᎢᏥᎪᏩᏘᎭ ᏅᏩᏓᎴ ᏗᎧᎿᎭᏩᏛᏍᏗ ᏥᏰᎸ ᎠᏆᏚᏓᏕᏫᏒᎢ, ᎾᏍᎩ ᏗᎦᏘᎴᎩ ᏗᎧᎿᎭᏩᏛᏍᏗ ᎠᏆᏓᏅᏙᎩᎯ ᎠᎲᎢ, ᎠᎴ ᏥᏴᎩ ᎢᏯᏋᏁᎯ ᎠᏊᏓᎸᎥᏍᎩ ᏗᎧᎿᎭᏩᏛᏍᏗᏱ ᎠᏍᎦᏂ ᎤᏤᎵᎦ, ᎾᏍᎩ ᏥᏰᎸ ᎠᏆᏚᏓᏕᏫᏒ ᎠᎲᎢ.
२३पण मला माझ्या अवयवात दुसरा एक असा नियम दिसतो; तो माझ्या मनातील नियमाशी लढून, मला माझ्या अवयवात असलेल्या पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो.
24 ᎤᏲᏍᏛᏉ ᎾᏆᏍᏗ ᎠᏴ! ᎦᎪ ᏛᏊᏓᎴᏏ ᎯᎠ ᎾᏍᎩ ᏥᏰᎸ ᎠᏓᎯᎯ ᎠᏆᏚᏓᎸᏛᎢ.
२४मी किती कष्टी मनुष्य! मला या मरणाच्या शरीरात कोण सोडवील?
25 ᎤᏁᎳᏅᎯ ᏥᏯᎵᎡᎵᏤᎭ ᏥᏌ ᎦᎶᏁᏛ ᎤᎬᏫᏳᎯ ᎢᎦᏤᎵᎦ ᎢᏳᏩᏂᏌᏛ. ᎾᏍᎩᏃ ᎠᏆᏓᏅᏖᏗᏱ ᎬᏗᎭ, ᎠᏴᏉ ᎾᏍᎩ ᏗᎧᎿᎭᏩᏛᏍᏗ ᎤᏁᎳᏅᎯ ᎤᏤᎵ ᏕᏥᎦᎾᏩᏕᎦ, ᎠᎩᏇᏓᎸᏍᎩᏂ ᎨᏒ ᎬᏗ ᏗᎧᎿᎭᏩᏛᏍᏗ ᎠᏍᎦᏂ ᎤᏤᎵ ᏕᏥᎦᎿᎭᏩᏕᎦ.
२५मी आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे देवाचे उपकार मानतो. म्हणजे मग मी स्वतः मनाने देवाच्या नियमाचे दास्य करतो पण देहाने पापाच्या नियमाचे दास्य करतो.

< ᏉᎳ ᎶᎻ ᎠᏁᎯ ᏧᏬᏪᎳᏁᎸᎯ 7 >