< ᏉᎳ ᎶᎻ ᎠᏁᎯ ᏧᏬᏪᎳᏁᎸᎯ 9 >

1 ᎤᏙᎯᏳᎯᏯ ᏥᏁᎦ ᎦᎶᏁᏛ ᎠᎦᏔᎲᎢ, ᎥᏝ ᏱᎦᏥᎪᎥᏍᎦ, ᎠᏆᏓᏅᏛ ᎾᏍᏉ ᎠᏉᎯᏳᏓᏁᎯ ᏂᎦᎵᏍᏗᎭ ᎦᎸᏉᏗᏳ ᎠᏓᏅᏙ ᎢᏳᏩᏂᏌᏛ,
मी ख्रिस्तात खरे सांगतो, मी खोटे बोलत नाही आणि माझा विवेक पवित्र आत्म्यात, साक्ष देत आहे
2 ᎾᏍᎩ ᎤᏣᏘ ᎡᎯᏍᏗ ᎠᏆᏓᏅᏔᏩᏕᎬ ᎠᎴ ᏂᎪᎯᎸ ᎤᏲ ᎠᎩᏰᎸᏒ ᎠᎩᎾᏫᏱ.
की, मला मोठे दुःख होत आहे आणि माझ्या अंतःकरणात सतत राहणारी यातना आहे.
3 ᎬᏆᏚᎸᏗᏉᏰᏃ ᎠᏋᏒ ᎨᏒ ᎥᎩᏍᎦᏨᎯ ᎢᏳᎵᏍᏙᏗᏱ ᎥᏆᏓᏓᎴᏙᏗᏱ ᎦᎶᏁᏛ ᎡᎲᎢ ᎦᏥᏍᏕᎵᏍᎬ ᎣᏣᏓᏅᏟ, ᎪᎱᏍᏗ ᏗᏋᏅ Ꭰ ᎤᏇᏓᎵ ᎨᏒᎢ;
कारण दैहिक दृष्ट्या जे माझे नातेवाईक आहेत त्या माझ्या बांधवांकरता मी स्वतः ख्रिस्ताकडून शापित व्हावे असे मी इच्छीन.
4 ᎾᏍᎩ ᎢᏏᎵ ᏧᏁᏢᏔᏅᏛ ᏥᎩ; ᎾᏍᎩ ᎤᎾᏤᎵᎦ ᏥᎩ [ ᎤᏁᎳᏅᎯ ] ᏧᏪᏥ ᎢᎨᎬᏁᏗ ᎨᏒᎢ, ᎠᎴ ᎦᎸᏉᏗᏳ ᎨᏒᎢ, ᎠᎴ ᎧᏃᎮᏛ ᏓᏠᎯᏍᏛᎢ, ᎠᎴ ᏗᎧᎿᎭᏩᏛᏍᏗ ᎨᏥᏁᏗ ᎨᏒᎢ, ᎠᎴ ᎤᏁᎳᏅᎯ ᎤᏤᎵ ᏗᎦᎸᏫᏍᏓᏁᏗ ᎨᏒᎢ, ᎠᎴ ᎠᏚᎢᏍᏙᏗ ᎨᏒᎢ;
ते इस्राएली आहेत; त्यांच्यासाठी दत्तकपण, गौरव, करार, नियमशास्त्र, उपासना आणि वचने आहेत.
5 ᎾᏍᎩ ᏧᏂᏙᏓ ᏥᎩ ᎠᏂᎦᏴᎵᎨᎢ, ᎠᎴ ᎾᏍᎩ ᎠᏁᎲᎢ, Ꭰ ᎠᏇᏓᎵ ᎨᏒ ᏧᎷᏤ ᎦᎶᏁᏛ, ᎾᏍᎩ ᎤᏁᎳᏅᎯ ᏥᎩ, ᏄᏓᎴᏒ ᎤᎬᏫᏳᏌᏕᎩ, ᏫᎾᏍᏛᎾ ᎦᎸᏉᏙᏗ. ᎡᎹᏅ. (aiōn g165)
पूर्वज त्यांचे आहेत; त्यांच्यापासून दैहिक दृष्ट्या ख्रिस्त आला; तो सर्वांवर असलेला देव युगानुयुग धन्यवादित असो; आमेन. (aiōn g165)
6 ᎥᏝ ᎠᏗᎾ ᎤᏁᎳᏅᎯ ᎤᏁᏨ ᎠᏎᏉᏉ ᏥᏄᎵᏍᏔᏃ ᎾᏍᎩᏯ [ ᏱᏥᏁᎦ, ] ᎥᏝᏰᏃ ᏂᎦᏛ ᎢᏏᎵ ᏱᎩ ᎾᏍᎩ ᎢᏏᎵ ᏧᏁᏢᏔᏅᏛ ᏥᎩ.
पण देवाचे वचन, जणू व्यर्थ झाले असे नाही; कारण जे इस्राएलातले आहेत ते सर्वच इस्राएली नाहीत,
7 ᎥᏝ ᎠᎴ ᎡᏆᎭᎻ ᏧᏁᏢᏔᏅᏛ ᏥᎩ ᎾᏍᎩ ᏱᏅᏗᎦᎵᏍᏙᏗᎭ ᏂᎦᏛ ᏧᏪᏥ ᏱᎩ; ᎡᏏᎩᏉᏍᎩᏂ ᏚᏙᎥ ᎨᏥᏯᏅᏗᏍᎨᏍᏗ ᏣᏁᏢᏔᏅᎯ.
आणि ते अब्राहामाचे संतान आहेत म्हणून सर्व मुले आहेत असे नाही; तर ‘इसहाकालाच तुझे संतान म्हणले जाईल’ असे वचन आहे;
8 ᎾᏍᎩ ᏯᏛᏅ, ᎤᏇᏓᎵ ᎨᏒ ᎤᎾᏕᏔᏅᎯ ᎨᏒᎢ, ᎾᏍᎩ ᎯᎠ ᎥᏝ ᎤᏁᎳᏅᎯ ᏧᏪᏥ ᏱᎩ; ᎠᏚᎢᏍᏛᏍᎩᏂ ᎤᎾᏕᏔᏅᎯ ᎨᏒ ᎾᏍᎩ ᏧᏪᏥ ᏧᏰᎸᏗ.
म्हणजे देहाची मुले ही देवाची मुले नाहीत, पण वचनाची मुले ही संतान म्हणून गणलेली आहेत.
9 ᎯᎠᏰᏃ ᏄᏍᏗ ᎤᎵᏁᏨ ᎠᏚᎢᏍᏛᎢ. ᎯᎠᏉ ᎢᏳ ᏓᏥᎷᏥ, ᎠᎴ ᏎᎵ ᏓᎦᎾᏄᎪᏫᏏ ᎠᏧᏣ.
कारण वचनाचा शब्द असा आहे की, ‘मी या ऋतूप्रमाणे येईन आणि सारेला मुलगा असेल.’
10 ᎥᏝ ᎠᎴ ᎾᏍᎩᏉ ᏱᏄᏍᏗ; ᎵᏇᎩᏍᎩᏂ ᎾᏍᏉ ᎤᏁᎵᏨ, ᎾᏍᎩ ᎠᏏᏴᏫ ᎠᏥᏁᎵᏤᎸ, ᎾᏍᎩ ᎢᎩᏙᏓ ᎡᏏᎩ;
१०आणि इतकेच नाही; पण ज्या एकापासून, म्हणजे आपला पूर्वज इसहाक ह्याच्यापासून रिबेका गरोदर असतेवेळी,
11 ᏗᏂᏲᎵᏰᏃ ᎠᏏ ᎾᎾᏕᎲᏍᎬᎾ ᎨᏎᎢ, ᎠᎴ ᎠᏏ ᎪᎱᏍᏗ ᎣᏍᏛ ᎠᎴ ᎤᏲᎢ ᎾᎾᏛᏁᎲᎾ ᎨᏎᎢ, ᎾᏍᎩ ᎤᏓᏅᏖᎸ ᎤᏁᎳᏅᎯ ᎾᏍᎩᏯ ᏧᏑᏰᏍᏗ ᎨᏒ ᎤᏲᎢᏍᏗ ᏂᎨᏒᎾ ᎢᏳᎵᏍᏙᏗᏱ, ᎥᏝ ᏚᏂᎸᏫᏍᏓᏁᎲ ᏅᏗᎦᎵᏍᏙᏗᏍᎬᎢ, ᎾᏍᎩᏯᏍᎩᏂ ᏗᏯᏂᏍᎩ ᎤᏓᏅᏖᎸᎢ;
११आणि मुलांचा जन्म झाला नसल्यामुळे काही चांगले किंवा वाईट कोणी केले नसताना निवडीप्रमाणे देवाची योजना कायम रहावी म्हणून कृतीप्रमाणे नाही पण बोलावणार्‍याच्या इच्छेप्रमाणे,
12 ᎯᎠ ᎾᏥᏪᏎᎴᎢ, ᎤᏓᏂᎵᎨ ᏚᏁᎶᏕᏍᏗ ᎣᏂ ᎡᎯ;
१२तिला सांगण्यात आले होते की, ‘मोठा धाकट्याची सेवा करील.’
13 ᎾᏍᎩᏯ ᎯᎠ ᏥᏂᎬᏅ ᏥᎪᏪᎳ, ᏤᎦᏈ ᎣᏏᏳ ᏥᏰᎸᏅ, ᎢᏐᏍᎩᏂ ᏥᏂᏆᏘᎸ.
१३कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘याकोबावर मी प्रीती केली पण एसावाचा द्वेष केला.’
14 ᎾᏍᎩᏃ ᏥᏄᏍᏗ ᎦᏙ ᏓᏓᏛᏂ? ᏥᎪ ᏂᏚᏳᎪᏛᎾ ᎨᏒ ᎤᏪᎭ ᎤᏁᎳᏅᎯ? ᎬᏩᏟᏍᏗ.
१४मग आपण काय म्हणावे? देवाजवळ अनीती आहे काय? तसे न होवो.
15 ᎣᏏᏰᏃ ᎯᎠ ᎾᏥᏪᏎᎭ, ᏥᏯᏙᎵᏍᏗ ᎨᏎᏍᏗ ᎾᏍᎩ Ꮎ ᏥᏯᏙᎵᎩ ᎨᎵᏍᎨᏍᏗ, ᎠᎴ ᎤᏪᏙᎵᏍᏗ ᏥᏯᏓᏅᏓᏗᏍᏗ ᎨᏎᏍᏗ ᎾᏍᎩ Ꮎ ᎤᏪᏙᎵᏍᏗ ᏥᏯᏓᏅᏓᏓ ᎨᎵᏍᎨᏍᏗ.
१५कारण तो मोशेला म्हणतो, ‘मी ज्याच्यावर दया करतो त्याच्यावर दया करीन आणि मी ज्याच्यावर उपकार करतो त्याच्यावर उपकार करीन.’
16 ᎾᏍᎩᏃ ᏥᏄᏍᏗ ᎥᏝ ᎩᎶ ᎤᏚᎸᎲ ᏱᏅᏗᎦᎵᏍᏙᏗᎭ, ᎥᏝ ᎠᎴ ᏚᏍᏆᎸᏔᏅ ᏱᏅᏗᎦᎵᏍᏙᏗᎭ, ᎤᎾᎳᏅᎯᏍᎩᏂ ᎤᏓᏅᏖᎸᎢ ᎾᏍᎩ ᏗᎦᏙᎵᎩ ᏥᎩ.
१६तर मग जो इच्छा धरतो त्याच्यामुळे नाही किंवा जो धावतो त्याच्यामुळे नाही, पण जो देव दया करतो त्याच्यामुळे हे आहे.
17 ᎪᏪᎵᎯᏰᏃ ᎯᎠ ᎾᏥᏪᏎ ᏇᏓᏲ, ᎾᏍᎩ ᎯᎠ ᏅᏗᎦᎵᏍᏙᏗᎭ ᏕᎬᏯᎴᏔᏅ, ᎾᏍᎩ ᎠᎩᎾᏄᎪᏫᏍᏗᏱ ᎠᏆᎵᏂᎩᏗᏳ ᎨᏒ ᏂᎯ ᎬᏴᏗᏍᎬᎢ, ᎠᎴ ᎾᏍᎩ ᎠᏴ ᏓᏆᏙᎥ ᏧᏃᏣᎶᎢᏍᏗᏱ ᎡᎶᎯ ᏂᎬᎾᏛᎢ.
१७म्हणून शास्त्रलेख फारोला म्हणतो, ‘मी तुला ह्यासाठी मोठे केले की, तुझ्याद्वारे मी माझे सामर्थ्य प्रकट करावे आणि सर्व पृथ्वीवर माझे नाव गाजविले जावे.’
18 ᎾᏍᎩ ᎢᏳᏍᏗ ᎦᏙᎵᎪ ᎾᏍᎩ Ꮎ ᏥᏯᏙᎵᎩ ᎡᎳ, ᎠᎴ ᎩᎶ ᏥᏍᏓᏱᏓ ᎡᎳ ᎠᏍᏓᏱᏗᏍᎪᎢ.
१८म्हणजे परमेश्वराची इच्छा असेल त्याच्यावर तो दया करतो आणि त्याची इच्छा असेल त्यास तो कठिण करतो.
19 ᎯᎠ Ꭷ ᎨᎵ ᏅᏛᏍᎩᏪᏎᎵ, ᎦᏙᏃ ᎠᏏᏉ ᎡᏍᎦ ᎠᏰᎸᏍᎦ? ᎦᎪᏰᏃ ᏚᎦᏘᎴᏅ ᏄᏍᏛ ᎠᏓᏅᏖᏍᎬᎢ?
१९तू ह्यावर म्हणशील की, तो तरीही दोष का लावतो? त्याच्या योजनेला कोणी विरोध केला आहे?
20 ᎠᏎᏃ ᏂᎯ ᏴᏫᏉ ᎦᎪ ᎢᏣᏍᏗ ᏥᏁᏤᎭ ᏕᎯᎦᏘᎴᎬ ᎤᏁᎳᏅᎯ? ᏥᎪ ᎪᎱᏍᏗ ᎠᏢᏅᎯ ᎯᎠ ᏅᏓᎦᏪᏎᎵ ᎾᏍᎩ ᎤᏬᏢᏅᎯ, ᎦᏙᏃ ᎾᏍᎩ ᎯᎠ ᏂᏍᏋᏁᎸ ᎢᏍᏉᏢᏅ?
२०पण उलट अरे बंधू, तू जो देवाला उलटून बोलतोस तो तू कोण आहेस? तू मला असे का केलेस, अशी कोणती वस्तू करणार्‍याला म्हणू शकेल?
21 ᏝᏍᎪ ᏗᏩᎵ ᏗᎪᏢᏍᎩ ᏳᎭ ᎠᏓᏅᏖᏍᎬ ᎢᏳᏩᏁᎵᏓᏍᏗᏱ ᎦᏓᏆᎳ, ᎾᏍᎩᏉ ᎦᎾᏆᎸᏒ ᎠᎬᎭᎸᏛ ᏌᏉ ᎠᏖᎵᏙ ᎤᏬᏢᏗᏱ ᎦᎸᏉᏙᏗ, ᏅᏩᏓᎴᏃ ᎦᎸᏉᏙᏗ ᏂᎨᏒᎾ?
२१कुंभाराने एकाच गोळ्यामधून एक पात्र मानासाठी तर दुसरे अपमानासाठी करायला मातीवर अधिकार नाही काय?
22 [ ᎦᏙᏃ ᏳᏍᏗ, ] ᎢᏳᏃ ᎤᏁᎳᏅᎯ ᎤᏚᎵᏍᎬ ᎬᏂᎨᏒ ᎢᏳᏩᏁᏗᏱ ᎤᏔᎳᏬᎯᏍᏗ ᎨᏒᎢ, ᎠᎴ ᎤᎵᏂᎬᎬ ᎤᎾᏄᎪᏫᏍᏗᏱ, ᎬᏂᏗᏳ ᎨᏒ ᎬᏗᏍᎬ ᎪᎯᏗᏳ ᎤᏁᎳᎩ ᏱᏚᏪᎵᏎᎸ ᏗᏖᎵᏙ ᎤᏔᎳᏬᎯᏍᏗ ᎨᏒ ᏗᏟᏍᏗ, ᏗᏛᏅᎢᏍᏔᏅᎯ ᏗᏛᏙᏗᏱ;
२२मग आपण आपला क्रोध व्यक्त करावा आणि आपले सामर्थ्य प्रकट करावे असे जरी देव इच्छीत असला, तरी त्याने जर नाशासाठी तयार केलेल्या क्रोधाच्या पात्रांना मोठ्या सहनशीलतेने वागविले,
23 ᎠᎴ ᎾᏍᎩ [ ᎤᏚᎵᏍᎬ ] ᎬᏂᎨᏒ ᎢᏳᏩᏁᏗᏱ ᎤᏤᎵ ᎤᏣᏔᏅᎯ ᎦᎸᏉᏗᏳ ᎨᏒ ᏕᎬᏗᏍᎬ ᏗᏖᎵᏙ ᎤᏓᏙᎵᏍᏗ ᎨᏒ ᏗᏟᏍᏗ, ᎾᏍᎩ ᏧᏛᏅᎢᏍᏔᏅᎯ ᏥᏂᎨᏎ ᎦᎸᏉᏗᏳ ᏗᎨᏒ ᏭᎾᏕᏗᏱ,
२३आणि गौरवासाठी आधी योजलेल्या दयेच्या पात्रांवर आपल्या गौरवाच धन प्रकट करावे म्हणून त्याने असे केले तर काय?
24 ᎾᏍᎩ ᎠᏴ, ᎢᎩᏯᏅᏛ ᏥᎩ, ᎥᏝ ᎠᏂᏧᏏᏉ ᎤᏅᏒ ᎠᏁᎲᎢ, ᎾᏍᏉᏍᎩᏂ ᏧᎾᏓᎴᏅᏛ ᏴᏫ ᎠᏁᎲᎢ;
२४त्याने ज्यांना केवळ यहूद्यांमधून नाही, पण परराष्ट्रीयामधूनही बोलावले आहे ते आपण ती दयेची पात्रे आहोत.
25 ᎾᏍᎩᏯ ᎾᏍᏉ ᎯᎠ ᏥᏂᎦᏪ ᎰᏏᎠ ᎤᏬᏪᎸᎢ; ᏗᏆᏤᎵ ᏴᏫ ᎦᏥᏲᏎᎮᏍᏗ ᎾᏍᎩ Ꮎ ᏗᏆᏤᎵ ᏴᏫ ᏂᎨᏒᎾ ᏥᎨᏒᎩ; ᎠᎴ ᏥᎨᏳᎢ ( ᏥᏲᏎᎮᏍᏗ, ) ᎾᏍᎩ Ꮎ ᏥᎨᏳᎢ ᏂᎨᏒᎾ ᏥᎨᏒᎩ.
२५कारण तो होशेयाच्या ग्रंथात असेही म्हणतो की, ‘जे माझी प्रजा नव्हते त्यांना मी माझी प्रजा म्हणेन, आणि जी माझी आवडती नव्हती, तिला मी माझी आवडती म्हणेन.
26 ᎠᎴ ᎯᎠ ᏅᏓᎦᎵᏍᏔᏂ, ᎾᎿᎭᏂ ᎯᎠ ᏂᎨᏥᏪᏎᎸᎢ, ᏂᎯ ᎥᏝ ᎠᏴ ᏗᏆᏤᎵ ᏴᏫ ᏱᎩ; ᎾᎿᎭᏂ ᎬᏂᏛ ᎤᏁᎳᏅᎯ ᏧᏪᏥ ᎨᎪᏎᎮᏍᏗ.
२६आणि असे होईल की त्यांना ज्याठिकाणी, तुम्ही माझी प्रजा नाही, असे म्हणले होते, तेथे त्यांना जिवंत देवाचे पुत्र म्हणले जाईल.’
27 ᎢᏌᏯ ᎾᏍᏉ ᎯᎠ ᏂᎦᏪᎭ ᎢᏏᎵ ᏕᎧᏁᎢᏍᏗᏍᎬᎢ; ᎢᏏᎵ ᏧᏪᏥ ᎾᏍᏉ ᏃᏳ ᎠᎺᏉᎯ ᎦᎳᎨᏴ ᎾᏍᎩᏯ ᏱᏄᎾᏧᏈᏍᏗ, ᎤᎾᎵᏃᎯᏴᎯ ᎠᏎ ᎨᏥᏍᏕᎸᏗ ᎨᏎᏍᏗ.
२७यशयादेखील इस्राएलाविषयी ओरडून म्हणतो की, ‘इस्राएलाच्या पुत्रांची संख्या जरी समुद्राच्या वाळूसारखी झाली, तरी एक अवशेष वाचवला जाईल.
28 ᏛᏍᏆᏗᏰᏃ ᏗᎦᎸᏫᏍᏓᏁᏗ ᎨᏒᎢ, ᎠᎴ ᏚᏳᎪᏛ ᎬᏗ ᎤᎵᏍᏗᏳ ᎾᏍᎩ ᏅᏛᏛᏁᎵ; ᎤᎵᏍᏗᏰᏃ ᏅᏛᏛᏁᎵ ᏄᏍᏛ ᏚᏭᎪᏔᏅ ᎡᎶᎯ.
२८कारण सर्व संपवून थांबविल्याप्रमाणे प्रभू पृथ्वीवर आपले वचन पूर्ण करील.’
29 ᎠᎴ ᎾᏍᎩᏯ ᎢᏌᏯ ᎦᏳᎳ ᎯᎠ ᏥᏄᏪᏐᎢ, ᎢᏳᏃ ᏱᎰᏩ ᎤᏂᏣᏘ ᏧᏓᏘᎾᎢ ᏂᎩᏃᎯᏰᎸᎾ ᏱᎨᏎ ᎤᎵᏃᎯᏴᎯ, ᏐᏓᎻᏉ ᏱᏗᏓᏤᎴᎢ, ᎠᎴ ᎪᎹᎵ ᏄᏍᏛ ᎾᏍᎩᏯ ᏱᏂᎦᏍᏕᎢ.
२९आणि यशयाने पूर्वी सांगितल्याप्रमाणे, सैन्यांच्या प्रभूने जर आपल्यासाठी बीज ठेवले नसते तर आम्ही सदोमासारखे असतो आणि गमोरासारखे झालो असतो.
30 ᎾᏍᎩᏃ ᏥᏄᏍᏗ ᎦᏙ ᏓᏓᏛᏂ? ᎾᏍᎩ Ꮎ ᏧᎾᏓᎴᏅᏛ ᏴᏫ, ᎾᏍᎩ ᎠᏚᏓᎴᏍᏗ ᎨᏒ ᏄᏂᏍᏓᏩᏛᏒᎾ ᎨᏒ, ᎾᏍᎩ ᎠᏚᏓᎴᏍᏗ ᎨᏒ ᎤᏂᏩᏛᎲ, ᎾᏍᎩ ᎪᎯᏳᏗ ᎨᏒ ᎠᏚᏓᎴᏍᏙᏗ ᏥᎩ.
३०मग आपण काय म्हणावे? तर जे परराष्ट्रीय नीतिमत्त्वाच्या मागे लागले नाहीत त्यांनी नीतिमत्त्व मिळविले आहे, म्हणजे विश्वासाने मिळणारे नीतिमत्त्व मिळविले आहे.
31 ᎢᏏᎵᏍᎩᏂ ᎤᏂᏍᏓᏩᏛᏛ ᏗᎧᎿᎭᏩᏛᏍᏗ ᎠᏚᏓᎴᏍᏙᏗ ᎨᏒᎢ, ᎾᏍᎩ ᎥᏝ ᏳᏂᏩᏛᎲ ᏗᎧᎿᎭᏩᏛᏍᏗ ᎠᏚᏓᎴᏍᏙᏗ ᎨᏒᎢ.
३१पण जे इस्राएल नीतिमत्त्वाच्या नियमाच्या मागे लागले ते त्या नियमापर्यंत पोहोचले नाहीत.
32 ᎦᏙᏃ? ᏅᏗᎦᎵᏍᏙᏗᎭ ᎾᏍᎩ ᎪᎯᏳᏗ ᎨᏒ ᏄᏅᏔᏅᎾ ᎨᏒᎢ, ᏗᎧᎿᎭᏩᏛᏍᏗᏍᎩᏂ ᏂᎦᏪᏍᎬ ᎢᏯᏛᏁᏗ ᎨᏒ ᎤᏅᏔᏅᎢ; ᏚᏃᏕᏍᏔᏁᏰᏃ ᎾᏍᎩ Ꮎ ᏅᏯ ᏗᏓᏙᏕᎯᎯ ᎨᏒᎢ;
३२आणि का? कारण ते विश्वासाने नाही, पण कृतींनी त्याच्यामागे लागले कारण ते अडखळणाच्या दगडावर अडखळले.
33 ᎾᏍᎩᏯ ᎯᎠ ᏥᏂᎬᏅ ᏥᎦᏪᎳ, ᎬᏂᏳᏉ ᏌᏯᏂ ᏓᏥᏂ ᏅᏯ ᏗᏓᏙᏕᎯᎯ, ᎠᎴ ᏅᏯ ᎠᏓᎿᎭᏍᏆᎶᏍᏗᏍᎩ; ᎠᎴ ᎩᎶ ᎪᎯᏳᎲᏍᎨᏍᏗ ᎾᏍᎩ ᎥᏝ ᎤᏕᎰᎯᏍᏗ ᏱᎨᏎᏍᏗ.
३३कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘बघा, मी सियोनात एक अडखळण्याचा दगड, एक अडथळ्याचा खडक ठेवतो. आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लज्जित होणार नाही.’

< ᏉᎳ ᎶᎻ ᎠᏁᎯ ᏧᏬᏪᎳᏁᎸᎯ 9 >