< До євреїв 10 >

1 Бо Зако́н, мавши тільки тінь майбутнього добра́, а не самий о́браз речей, тими самими жертвами, що за́вжди щороку прино́сяться, не може ніко́ли вдоскона́лити тих, хто приступає.
अशाप्रकारे, पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांची नियमशास्त्रात छाया आहे. त्या सत्याचे ते खरे स्वरूप नाही, म्हणून ते प्रतिवर्षी नित्य अर्पील्या जाणाऱ्या त्याच त्याच यज्ञांनी जवळ येणाऱ्यांना पूर्ण करण्यास केव्हाही समर्थ नाही.
2 Інакше вони перестали б прино́ситись, бо ті, хто служить, очищені раз, уже б не мали жодної свідо́мости гріхів.
जर नियमशास्त्र लोकांस परिपूर्ण करू शकले असते तर यज्ञ अर्पण करण्याचे थांबले नसते का? कारण उपासना करणारे कायमचेच शुद्ध झाले असते आणि त्यानंतर पापांची भावना नसल्याने दोषी ठरले नसते.
3 Але в них спо́мин про гріхи буває щороку,
परंतु त्याऐवजी ते यज्ञ वर्षानुवर्षे पापांची आठवण करून देतात.
4 бо тож неможливе, щоб кров биків та козлів здіймала гріхи!
कारण बैलांच्या किंवा बकऱ्याच्या रक्ताने पाप नाहीसे होणे अशक्य आहे.
5 Тому́ то, вхо́дячи в світ, Він говорить: „Жертви й прино́шення Ти не схотів, але тіло Мені приготува́в.
म्हणून ख्रिस्त जेव्हा या जगात आला, तेव्हा तो देवाला म्हणाला, “तुला यज्ञ व अर्पणे याची इच्छा नव्हती, त्याऐवजी तू माझ्यासाठी शरीर तयार केले.
6 Цілопа́лення й жертви поку́тної Ти не жадав.
होमार्पणांनी व पापाबद्दलच्या अर्पणांनी तुला आनंद वाटला नाही.
7 Тоді Я сказав: Ось іду́, — в звої книжки про Мене написано, щоб волю чини́ти Твою, Боже“!
ह्यावरून मी म्हणालो, हे देवा, ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे.”
8 Він вище сказав, що „жертви й при́носу, та цілопа́лення й жертви поку́тної, — які за Зако́ном прино́сяться, — Ти не жадав і Собі не вподо́бав“.
वर उल्लेखल्याप्रमाणे तो म्हणाला, “यज्ञ, अन्नार्पणे, होमार्पणे व पापाबद्दलची अर्पणे, ह्यांची इच्छा तुला नव्हती व त्यामध्ये तुला संतोष नव्हता.” (जरी नियमशास्त्रानुसार ही अर्पणे करण्यात येतात.)
9 Пото́му сказав: „Ось іду, щоб волю Твою чини́ти, Боже“. Відміняє Він перше, щоб друге поставити.
मग तो म्हणाला, “हा मी आहे! तुझी इच्छा पूर्ण करण्यास मी आलो आहे.” दुसरे स्थापावे म्हणून तो पहिले काढून टाकतो.
10 У цій волі ми освячені жертвоприно́шенням тіла Ісуса Христа один раз.
१०देवाच्या इच्छेनुसार येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देह अर्पणाद्वारे आपण पवित्र करण्यात आलो आहोत.
11 І кожен священик щоденно стоїть, слу́жачи, і часто приносить жертви ті самі, що ніко́ли не можуть зняти гріхів.
११प्रत्येक याजक तर दररोज सेवा करत आणि ज्यामुळे पाप नाहीसे होत नाही असे यज्ञ तो वारंवार अर्पण करतो.
12 А Він за гріхи світу приніс жертву один раз, і наза́вжди „по Божій правиці засів“,
१२परंतु आपल्या पापांबद्दल सर्वकाळासाठी एकदाच ख्रिस्ताने अर्पण केले व तो आता देवाच्या उजवीकडे बसला आहे.
13 далі чекаючи, „аж вороги Його бу́дуть покладені за підніжка Його ніг“.
१३आणि तेव्हापासून आपले वैरी नमवून आपले पादासन होईपर्यंत वाट पाहत आहे.
14 Бо жертвоприно́шенням одним вдоскона́лив Він тих, хто освячується.
१४कारण जे पवित्र केले जात आहेत त्यांना त्याने एकाच अर्पणाने सर्वकाळासाठी पूर्ण केले.
15 Свідкує ж і Дух Святий нам, як говорить:
१५पवित्र आत्माही याबाबत आपल्याला साक्ष देतो. पहिल्यांदा तो असे म्हणतो,
16 „Оце заповіт, що його по цих днях встановля́ю Я з ними, говорить Господь, — Закони Свої Я дам в їхні серця́, і в їхніх думка́х напишу́ їх.
१६परमेश्वर म्हणतो, “त्या दिवसानंतर त्यांच्याशी मी करार करीन तो हा; मी माझे नियम त्यांच्या मनात घालीन आणि ते त्यांच्या हृदयपटांवर लिहीन.”
17 А їхніх гріхів та несправедливостей їхніх Я більш не згадаю“!
१७“आणि मी त्यांची पापे व अधर्म कृत्ये कधीही आठवणारच नाही.”
18 А де їхнє відпущення, там нема вже жертвоприно́шення за гріхи.
१८जेथे या पापांची क्षमा झाली आहे, तेथे पापाबद्दल अर्पण व्हायचे नाही.
19 Отож, браття, ми маємо відвагу вхо́дити до святині кров'ю Ісусовою,
१९म्हणून बंधूनो, येशूच्या रक्ताद्वारे आपल्याला परमपवित्रस्थानात जाण्याचे धैर्य आहे.
20 ново́ю й живою дорогою, яку нам обнови́в Він через завісу, цебто через тіло Своє,
२०त्याने पडद्यामधून म्हणजे आपल्या स्वतःच्या देहातून, आपल्यासाठी ती नवीन व जिवंत वाट स्थापित केली आहे.
21 маємо й Великого Священика над домом Божим, —
२१कारण देवाच्या घरावर आपल्याला महान असा मुख्य याजक मिळाला आहे.
22 то приступі́мо з щирим серцем, у повноті́ віри, окропи́вши серця́ від сумління лукавого та обмивши тіла́ чистою водою!
२२म्हणून आपली हृदये दुष्ट विवेकभावापासून मुक्त होण्यासाठी शिंपडलेली आणि आपले शरीर निर्मळ पाण्याने धुतलेले असे आपण खऱ्या अंतःकरणाने विश्वासाच्या पूर्ण खात्रीने जवळ यावे.
23 Трима́ймо непохи́тне визна́ння надії, вірний бо Той, Хто обіцяв.
२३आपल्याला जी आशा आहे तिला आपण घट्ट धरुन राहू कारण ज्याने आपल्याला अभिवचन दिले, तो विश्वासू आहे.
24 І уважаймо один за одни́м для заохо́ти до любови й до добрих учинків.
२४आपण एकमेकांस समजून घेऊ व प्रीती आणि चांगली कामे करण्याकरिता एकमेकांना उत्तेजन देऊ.
25 Не кидаймо збору свого, як то зви́чай у деяких, але заохочуймося, і тим більше, скільки більше ви бачите, що зближається день той.
२५आपण कित्येकाच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकास बोध करावा आणि देवाचा दिवस जवळ येत असताना अधीकाधीक उत्तेजन द्यावे.
26 Бо як ми грішимо́ самові́льно, одержавши пізна́ння правди, то вже за гріхи не знахо́диться жертви,
२६सत्याचे ज्ञान प्राप्त झाल्यानंतरसुद्धा जर आपण जाणूनबुजून पाप करीत राहिलो, तर मग पापांसाठी यापुढे आणखी अर्पण करण्याचे बाकी राहिले नाही.
27 а страшливе якесь сподіва́ння су́ду та гнів палю́чий, що має пожерти противників.
२७पण जे देवाला विरोध करतात त्यांना भयंकर अशा न्यायनिवाड्याशिवाय व भयंकर अशा भस्म करणाऱ्या अग्नीशिवाय दुसरे काही शिल्लक राहिले नाही.
28 Хто відкидає Зако́на Мойсея, такий немилосердно вмирає „при двох чи трьох свідках“, —
२८जो कोणी मोशेचे नियमशास्त्र नाकारतो त्यास दोघा किंवा तिघांच्या साक्षीच्या आधारे कसलीही दया न दाखविता मरणदंड होतो.
29 скільки ж більшої му́ки, — доду́муєтеся? — заслуговує той, хто потоптав Сина Божого, і хто кров заповіту, що нею освячений, за звичайну вважав, і хто Духа благодаті зневажив!
२९तर मग ज्याने देवाच्या पुत्राला पायाखाली तुडवले, कराराच्या ज्या रक्ताने त्यास पवित्र केले त्या रक्ताला अपवित्र ठरवले आणि ज्याने कृपेच्या आत्म्याचा अपमान केला, तो मनुष्य किती अधिक दंडास पात्र ठरेल म्हणून तुम्हास वाटते?
30 Бо знаємо Того, Хто сказав: „Мені помста належить, Я відплачу́, говорить Господь“. І ще: „Господь буде судити наро́да Свого“!
३०कारण त्यास ओळखतो तो म्हणतो, “सूड घेणे माझ्या हाती आहे; मी परतफेड करीन.” पुन्हा तो असे म्हणतो, “प्रभू आपल्या लोकांचा न्याय करील.”
31 Страшна́ річ — упасти в руки Бога Живого!
३१जिवंत देवाच्या हाती सापडणे किती भयंकर गोष्ट आहे.
32 Згадайте ж про перші дні ваші, як ви просвітилися й витерпіли запеклу боротьбу стражда́нь.
३२ते पूर्व काळचे दिवस आठवा, जेव्हा नुकताच तुम्हास सुवार्तेचा प्रकाश प्राप्त होत असता, तेव्हा तुम्ही भयंकर दुःखे सोसली.
33 Ви були́ то видо́вищем зневаги й знуща́ння, то були́ учасниками тих, що жили́ так.
३३काही वेळा जाहीरपणे तुमचा अपमान करण्यात आला आणि वाईट शब्द वापरण्यात आले, तर काही वेळा ज्यांना अशा रीतीने वागणूक मिळाली त्यांचे सहभागी व्हावे लागले.
34 Ви бо страждали й з ув'язненими, і грабу́нок свого майна́ прийняли́ з потіхою, відаючи, що маєте в небі для себе майно немину́ще та краще.
३४जे तुरूंगात होते त्यांना तुम्ही समदुःखी झाला आणि जे तुमच्याकडे होते ते तुमच्याकडून घेण्यात आले तरी तुम्ही आनंदी होता कारण तुमच्याजवळ अधिक चांगली व सर्वकाळ टिकणारी संपत्ती आहे, हे तुम्ही जाणून होता.
35 Тож не відкидайте відваги своєї, бо має велику нагоро́ду вона.
३५म्हणून धैर्य सोडू नका, त्याचे प्रतिफळ मोठे आहे.
36 Бо вам терпеливість потрібна, щоб Божу волю вчинити й прийняти обітницю.
३६तुम्ही धीर धरणे जरूरीचे आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही देवाची इच्छा पूर्ण करून त्याने तुम्हास दिलेल्या त्याच्या वचनाप्रमाणे तुम्हास प्रतिफळ मिळावे.
37 Бо ще „мало, дуже мало, і Той, хто має прийти, при́йде й бари́тись не бу́де!“
३७पवित्र शास्त्र असे म्हणते; कारण अगदी थोडा वेळ राहीला आहे; “जो येणारा आहे, तो येईल, तो उशीर लावणार नाही.
38 А „праведний житиме вірою“. І: „Коли захитається він, то душа Моя його не вподо́бає“.
३८माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल; आणि जर तो माघार घेईल, तर त्याच्याविषयी माझ्या जीवाला संतोष होणार नाही.”
39 Ми ж не з тих, хто хитається на заги́біль, але віруємо на спасі́ння душі.
३९परंतु ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्यापैकी आपण नाही; तर जीवाच्या तारणासाठी विश्वास ठेवणाऱ्यापैकी आहोत.

< До євреїв 10 >