< До Тита 1 >

1 Павел, слуга Божий, апостол же Ісуса Христа, по вірі вибраних Божих і зрозумінню правди, що по благочестю,
देवाच्या निवडलेल्यांच्या विश्वासासाठी आणि सुभक्तीनुसार असलेल्या सत्याच्या पूर्ण ज्ञानासाठी नेमलेला येशू ख्रिस्ताचा प्रेषित आणि देवाचा दास पौल, ह्याच्याकडूनः
2 в надїї вічнього життя, котре обітував Бог, що не обманює, перед вічними часами, (aiōnios g166)
जे सर्वकाळचे जीवन ज्याला असत्य बोलवत नाही त्या देवाने युगाच्या काळापूर्वी देऊ केले, (aiōnios g166)
3 явив же часу свого слово своє проповіданнєм, котре менї доручено по повелінню Спасителя нашого Бога.
त्या जीवनाची आशा बाळगणाऱ्या, देवाच्या निवडलेल्या लोकांच्या विश्वासासाठी आणि सुभक्तीदायक सत्याच्या ज्ञानासाठी, त्याविषयीचे वचन त्याच आपल्या तारणाऱ्या देवाच्या आज्ञेने मला सोपवलेल्या घोषणेत यथाकाळी त्याने प्रकट केले.
4 Титу, правдивому синові по спільній вірі: Благодать, милость, мир од Бога Отця і Господа Ісуса Христа, Спаса нашого.
आपल्या सामाईक असलेल्या विश्वासाप्रमाणे माझे खरे लेकरू तीत यास; देवपित्यापासून व आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्यापासून कृपा, दया व शांती असो.
5 На те зоставив я тебе в Критї, щоб остальне довів до ладу і настановив до всїх городах пресвитерів, як я тобі повелїв.
मी तुला क्रेत बेटावर ह्यासाठी ठेवून आलो की, तू पूर्ण न झालेल्या गोष्टींची व्यवस्था करावी आणि मी तुला आज्ञा केल्याप्रमाणे तू प्रत्येक नगरांत वडील नेमावे.
6 Коли хто непорочен, однієї жінки муж, мав вірних дітей, недокорених за розврат, або непокірних.
ज्याला नेमावयाचे तो निर्दोष असावा, एका स्त्रीचा पती असावा, त्याची मुले विश्वास ठेवणारी असून त्यांच्यावर बेतालपणा केल्याचा आरोप आलेला नसून ती अनावर नसावी.
7 Треба бо єпископу без пороку бути, яко Божому доморядникові, щоб не собі годив, не був гнївливий, не пяниця, не сварливий, не жадний поганого надбання,
अध्यक्ष हा देवाचा कारभारी आहे म्हणून तो निर्दोष असावा, तो स्वच्छंदी, रागीट, मद्यपी, मारका अनीतीने पैसे मिळविणारा नसावा;
8 а був гостинний, любив добре, (у всьому) мірний, праведний, преподобний, вдержливий,
तर अतिथिप्रिय, चांगुलपणाची आवड धरणारा; मर्यादशील, नीतिमान, पवित्र, संयमी,
9 щоб державсь вірного слова по науцї, щоб умів і напоминати здоровою наукою і докоряти противних.
आणि दिलेल्या शिक्षणाप्रमाणे जे विश्वसनीय वचन त्यास धरुन राहणारा असा असावा; यासाठी की त्याने सुशिक्षणाने बोध करावयास व उलट बोलणाऱ्यास कुंठित करावयासही शक्तीमान व्हावे.
10 Багато бо непокірних, марномовцїв і обманщиків, найбільше ж которі з обрізання,
१०हे महत्त्वाचे आहे कारण पुष्कळ लोक बंड करणारे आहेत. जे व्यर्थ गोष्टीविषयी बडबड करतात व लोकांस फसवितात. मी विशेषेकरून, जे सुंता झालेले आहेत त्यांना संबोधून बोलत आहे.
11 їм треба роти позатуляти; вони всі доми розвертають, навчаючи чого не треба, ради скверного надбання.
११त्यांची तोंडे बंद केली पाहिजेत; त्यांनी शिकवू नयेत त्या गोष्टी ते अयोग्य लाभासाठी शिकवतात आणि संपूर्ण घराची उलथापालथ करतात.
12 Сказав же один о них, власний їх пророк: Критяне завсїди брехуни, люті зьвіри, черева лїниві.
१२त्यांच्यामधील एका संदेष्ट्याने म्हणले आहे की, ‘क्रेती लोक हे नेहमीच लबाड, पशुंसारखे खतरनाक, आळशी व खादाड आहेत.’
13 Вірне се сьвідченнє. З сієї ж то причини докоряй їх нещадно, щоб здорові були в вірі,
१३ही साक्ष खरी आहे. तर त्यांनी विश्वासात स्थिर व्हावे म्हणून तू त्यांचा निषेध कर.
14 не вважаючи на жидівські байки, нї на заповіді людей, що одвертають ся од правди.
१४यासाठी की, त्यांनी यहूदी कहाण्यांकडे आणि सत्याकडून वळविणार्‍या, मनुष्यांच्या आज्ञांकडे लक्ष देऊ नये. विश्वासात खंबीर व्हावे.
15 Все чисте чистим; опоганеним же та невірним нїщо не чисте, а опоганив ся і розум їх і совість.
१५जे शुद्ध आहेत अशा लोकांस सर्व गोष्टी शुद्ध आहेत पण जे विटाळलेले आहेत आणि विश्वास ठेवत नाहीत अशांना काहीच शुद्ध नाही पण त्यांचे मन आणि विवेक हेही मलीन आहेत.
16 Визнають, що знають Бога, а дїлами одрікають ся від Него, бувши гидкими і непокірними і до всякого діла доброго неспосібними.
१६ते लोक ‘आम्ही देवाला ओळखतो’ असे उघड सांगतात, पण ते कृतीत त्यास नाकारतात. ते अमंगळ व अवमान करणारे आणि कोणत्याही चांगल्या कामात कसोटीस न उतरलेले आढळतात.

< До Тита 1 >