< Від Марка 15 >

1 І зараз уранці, порадившись архнєреї з старшими та письменниками, і вся рада, звязавши Ісуса, повели та й видали Пилатові.
पहाट होताच मुख्य याजक लोक, वडीलजन, नियमशास्त्राचे शिक्षक व सर्व यहूदी सभा यांनी मसलत करून येशूला बांधून पिलाताच्या ताब्यात दिले.
2 І спитав Його Пилат: Чи ти єси цар Жидівський? Він же озвавшись, рече йому: Ти кажеш.
पिलाताने त्यास विचारले, तू यहूद्यांचा राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले, “तू म्हणतोस तसेच.”
3 І винуватили Його архиєреї багато.
मुख्य याजकांनी पुष्कळ बाबतीत येशूवर आरोप ठेवले.
4 Пилат же знов спитав Його, кажучи: Не відказуєш нїчого? Он, скільки на Тебе сьвідкують;
मग पिलाताने त्यास पुन्हा प्रश्न विचारला, तू उत्तर देणार नाहीस काय? पाहा, ते कितीतरी गोष्टींविषयी तुझ्यावर आरोप करत आहेत!
5 Ісус же більш нічого не відказав, так що дивував ся Пилат.
पण तरीही येशूने उत्तर दिले नाही म्हणून पिलाताला आश्चर्य वाटले.
6 На сьвято ж відпускав він їм одного вязника, про которого просили.
वल्हांडण सणाच्या वेळी ते कोणत्याही एका कैद्याच्या सुटकेची मागणी करीत असत. त्यास पिलात रिवाजाप्रमाणे लोकांसाठी सोडत असे.
7 Був же названий Варава з своїми затязцями увязнений, котрі під бунт убийство зробили.
बरब्बा नावाचा एक मनुष्य, बंडखोरांबरोबर तुरुंगात होता. त्याने दंगलीमध्ये खून केल्याबद्दल त्यास पकडण्यात आले होते.
8 І гукаючи народ, почав просити, щоб, як щоразу, зробив їм.
लोक आले आणि पिलाताला तो नेहमी त्यांच्यासाठी करीत असे तसे करायला लावले.
9 Пилат же відказав їм, говорячи: Чи хочете, щоб випустив вам царя Жидівського?
पिलाताने विचारले, तुमच्यासाठी यहूद्यांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय?
10 Знав бо, що через зависть видали Його архиєреї.
१०पिलात असे म्हणाला कारण त्यास माहीत होते की, द्वेषामुळे मुख्य याजकांनी येशूला धरुन दिले होते.
11 Архиєреї ж напустили народ, щоб лучче Вараву відпустив їм.
११परंतु पिलाताने त्याच्याऐवजी बरब्बाला सोडावे असे मुख्य याजकांनी लोकांस चिथवले.
12 Пилат же, озвавшись ізнов, сказав їм: Що ж оце хочете, щоб зробив із тим, кого звете царем Жидівським?
१२परंतु पिलात त्यांना पुन्हा म्हणाला, तर मग तुम्ही ज्याला यहूद्यांचा राजा म्हणता त्याचे मी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?
13 Вони ж знов закричали: Розпни Його,
१३ते पुन्हा मोठ्याने ओरडले, त्यास वधस्तंभावर खिळा!
14 Пилат же каже їм: Яке ж бо зло зробив? Вони ж ще гірш кричали: Розпни Його.
१४पिलाताने पुन्हा विचारले, का? त्याने कोणता गुन्हा केला आहे? ते सर्व अधिकच मोठ्याने ओरडले, त्यास वधस्तंभावर खिळा!
15 Пилат же, хотівши народові догодити, відпустив їм Вараву, й передав Ісуса, побивши, щоб рознято Його.
१५पिलाताला लोकांस खूश करायचे होते म्हणून त्याने त्यांच्यासाठी बरब्बाला सोडले आणि येशूला फटके मारून वधस्तंभावर खिळण्यासाठी शिपायांच्या स्वाधीन केले.
16 Воїни ж повели Його в середину двору, чи то в Претор, і скликали всю роту.
१६शिपायांनी येशूला राज्यपालाच्या वाड्यात, प्रयतोर्यमात म्हणजे कचेरीत नेले आणि त्यांनी सैनिकांची एक तुकडीच एकत्र बोलावली.
17 І одягли Ного в багряницю, і положили на Него, сплівши з тернини, вінець,
१७त्यांनी त्याच्या अंगावर जांभळा झगा घातला व काटयाचा मुकुट करून त्यास घातला.
18 та й почали витати Його: Радуй ся, царю Жидівський!
१८ते त्यास मुजरा करू लागले आणि म्हणू लागले, यहूद्यांच्या राजाचा जयजयकार असो.
19 І били Його по голові тростиною, і плювали на Него, й, кидаючись на колїна, кланялись Йому.
१९त्यांनी वेताच्या काठीने वारंवार त्याच्या डोक्यावर मारले. त्याच्यावर थुंकले आणि गुडघे टेकून त्यास वंदन केले.
20 І, як насьміялись із Него, роздягнули Його з багряниці, і одягнули Його в одежу Його, та й виводять Його, щоб розняти Його.
२०त्यांनी त्याची थट्टा केल्यावर त्याच्या अंगावरून जांभळा झगा काढून घेतला व त्याचे स्वतःचे कपडे त्यास घातले. नंतर वधस्तंभावर खिळणे शक्य व्हावे म्हणून ते त्यास बाहेर घेऊन गेले.
21 І заставили мимойдучого якогось Симона Киринея, ідучого з поля, батька Александра та Руфа, щоб ніс хрест Його.
२१वाटेत त्यांना कुरेनेकर शिमोन नावाचा एक मनुष्य दिसला. तो आलेक्सांद्र व रूफ यांचा पिता होता व आपल्या रानातून घरी परत चालला होता. मग सैनिकांनी त्यास जबरदस्तीने येशूचा वधस्तंभ वहावयास लावले.
22 І приводять Його на Голготу місце, що прозване Черепове місце.
२२आणि त्यांनी येशूला गुलगुथा म्हणजे कवटीची जागा म्हटलेल्या ठिकाणी आणले.
23 І дали Йому пити вина з смирною; Він же не прийняв.
२३त्यांनी त्यास बोळ मिसळलेला द्राक्षरस दिला परंतु त्याने तो घेतला नाही.
24 І розпинателї Його поділили одежу Його, кинувши жереб на неї, що кому впаде.
२४त्यांनी त्यास वधस्तंभावर खिळले, कोणी कोणते कपडे घ्यावे यासाठी त्यांनी चिठठ्या टाकल्या व त्याचे कपडे वाटून घेतले.
25 Була ж година третя, і розняли Його.
२५त्यांनी त्यास वधस्तंभावर खिळले तेव्हा दिवसाचा तिसरा तास झाला होता.
26 І була надпись вини Його надписана: Цар Жидівський.
२६आणि त्याच्यावर त्याच्या दोषारोपाचा लेख, “यहूद्यांचा राजा” असा लिहिला होता.
27 І розняли з Ним двох розбійників, одного по правицї, а одного по лївицї в Него.
२७त्यांनी त्याच्याबरोबर दोन लुटारूंना एकाला त्याच्या उजवीकडे व दुसऱ्याला त्याच्या डावीकडे वधस्तंभावर खिळले होते.
28 І справдилось писаннє, що глаголе: І з беззаконними полічено Його.
२८
29 І мимоходячі хулили Його, киваючи головами своїми та говорячи: Овва! Ти, що руйнуєш церкву і в три днї будуєш,
२९जवळून जाणारे लोक त्याची निंदा करीत होते. ते आपली डोकी हलवून म्हणाले, अरे! परमेश्वराचे भवन पाडून ते तीन दिवासात बांधणारा तो तूच ना!
30 спаси себе й зійди з хреста.
३०वधस्तंभावरुन खाली ये आणि स्वतःला वाचव.
31 Так само й архиєреї, насьміхаючись один до одного з письменниками, казали: Інших спасав, себе не може спасти.
३१तसेच मुख्य याजकांनी, नियमशास्त्राच्या शिक्षकांनी येशूची थट्टा केली आणि एकमेकास म्हणाले, त्याने दुसऱ्यांचे तारण केले पण त्यास स्वतःचा बचाव करता येत नाही!
32 Христос, цар Жидівський, нехай зійде тепер з хреста, щоб побачили ми, й ввіруємо. І розпяті з Ним зневажали Його.
३२या इस्राएलाचा राजा ख्रिस्त याला वधस्तंभावरुन खाली येऊ द्या मग आम्ही ते पाहू आणि त्याच्यावर विश्वास ठेवू आणि जे त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळले होते त्यांनी देखील त्याचा अपमान केला.
33 Як же настала година шоста, темрява стала по всїй землі аж до години девятої.
३३दुपारची वेळ झाली. सगळ्या देशभर अंधार पडला, तो अंधार दुपारी तीन वाजेपर्यंत राहिला.
34 А години девятої покликнув Ісус голосом великим: Елоі, Елоі, лама саватани? що єсть перекладом: Боже мій, Боже мій, на що мене покинув єси?
३४मग तीन वाजता येशू मोठ्याने आरोळी मारून म्हणाला, “एलोई, एलोई, लमा सबकथनी, म्हणजे, माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?”
35 І деякі з тих, що тут стояли, почувши казали: Ось Ілию кличе.
३५जवळ उभे असलेल्या काहीजणांनी हे ऐकले तेव्हा ते म्हणाले, ऐका, तो एलीयाला बोलवत आहे.
36 Побігши ж один, і сповнивши губку оцтом і настромивши на тростину, поїв Його, кажучи: Стривайте, побачимо, чи прийде Ілия знята Його.
३६एकजण धावत गेला. त्याने स्पंज आंबेत बुडवून भरला. वेताच्या काठीवर ठेवला व तो येशूला पिण्यास दिला आणि म्हणाला, थांबा! एलीया येऊन त्यास खाली उतरवायला येतो की काय हे आपण पाहू.
37 Ісус же, пустивши голос великий, зітхнув.
३७मग मोठ्याने आरोळी मारून येशूने प्राण सोडला.
38 І завіса церковня роздерлась надвоє з верху аж до низу.
३८तेव्हा परमेश्वराच्या भवनातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटला व त्याचे दोन भाग झाले.
39 Бачивши ж сотник, що там стояв проти Него, що, так закричавши зітхнув, каже: Справді чоловік сей Син був Божий.
३९येशूच्या पुढे उभे आलेल्या अधिकाऱ्याने जेव्हा त्याची आरोळी ऐकली आणि तो कसा मरण पावला हे पाहिले तेव्हा तो म्हणाला, खरोखर हा मनुष्य देवाचा पुत्र होता.
40 Були ж і жінки, оддалеки дивлячись, між котрими була й Мария Магдалина, й Мария, Якова меншого та Йосиї мати, й Саломия,
४०तेथे असलेल्या काही स्त्रिया दुरून पाहत होत्या. त्यांच्यामध्ये मग्दालीया नगराची मरीया, याकोब व योसेफ यांची आई मरीया व सलोमी या होत्या.
41 що, й як був у Галилеї, ходили слїдом за Ним, і послугували Йому, і инших багато, що поприходили з Ним у Єрусалим.
४१येशू जेव्हा गालील प्रांतात होता तेव्हा या स्त्रिया त्याच्यामागे जात व त्याची सेवा करीत असत. याशिवाय त्याच्याबरोबर यरूशलेम शहरापर्यंत आलेल्या इतर अनेक स्त्रियाही होत्या.
42 А як уже настав вечір, бо була пятниця, чи то перед суботою,
४२त्या सुमारास संध्याकाळ झाली होती आणि तो तयारीचा म्हणजे शब्बाथाच्या आधीचा दिवस होता.
43 прийшов Иосиф з Ариматеї, поважний радник, що також сподївавсь царства Божого, й зосьмілившись, увійшов до Пилата й просив тіла Ісусового.
४३योसेफ अरिमथाईकर न्यायसभेचा माननीय सभासद होता व तो सुद्धा देवाचे राज्य येण्याची वाट पाहत होता. तो योसेफ धैर्याने पिलाताकडे गेला आणि त्याने येशूचे शरीर मागितले.
44 Пилат же дивувавсь, що вже вмер би; й покликавши сотника, спитав його, чи давно вмер.
४४येशू इतक्या लवकर कसा मरण पावला याचे पिलाताला आश्चर्य वाटले. मग त्याने सेनाधिकारी बोलावले आणि त्यांना विचारले. येशूला मरून बराच वेळ झाला की काय?
45 А довідавшись од сотника, дав тіло Йосифові,
४५सेनाधिकाऱ्याकडून ते कळाल्यावर, तेव्हा त्याने ते शरीर योसेफाला दिले.
46 і, купивши плащеницю і знявши Його, обгорнув Його плащеницею, та й положив Його у гробі, що був висічений із скелї, та й прикотив каменя до дверей гробу.
४६मग योसेफाने तागाचे वस्त्र विकत आणले आणि येशूला वधस्तंभावरुन खाली काढले व त्यास तागाच्या वस्त्रात गुंडाळून ते त्याने खडकात खोदलेल्या कबरेत ठेवले. नंतर त्याने कबरेच्या तोंडावर दगड बसविला.
47 Мария ж Магдалина й Мария Иосиїна дивились, де Його положено.
४७येशूला कोठे ठेवले हे मग्दालीया नगराची मरीया आणि याकोब व योसेफ यांची आई मरीया पाहत होत्या.

< Від Марка 15 >