< Дії 11 >

1 Почули ж апостоли та брати, котрі були в Юдеї, що й погане прийняли слово Боже.
यहूदी नसलेल्या लोकांनीसुद्धा देवाच्या वचनाचा स्वीकार केला आहे हे यहूदीया प्रांतातील प्रेषितांनी व बंधूनी ऐकले.
2 І як прийшов Петр у Єрусалим, змагались із ним ті, що від обрізання,
पण जेव्हा पेत्र यरूशलेम शहरास आला, तेव्हा सुंता झालेला यहूदी विश्वासी गट त्याच्यावर टिका करू लागले.
3 кажучи: Що до людей, обрізання немаючих, ходив єси і їв з ними.
ते म्हणाले, “जे सुंता न झालेले व परराष्ट्रीय आहेत अशा विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या घरी तुम्ही गेला, एवढेच नव्हे तर तुम्ही त्यांच्यासह जेवणही केले.”
4 Почавши ж Петр, виложив їм рядом, говорячи:
म्हणून पेत्राने त्यांना सर्व घटना सविस्तर स्पष्ट करून सांगितल्या.
5 Був я в городі, Йоппиї, і молячись бачив у захопленню видїннє: посудину якусь, що сходила, наче обрус великий, по чотирох кінцях спусканий з неба; і прийшов аж до мене.
पेत्र म्हणाला, मी यापो शहरात प्रार्थना करीत असताना मला तंद्री लागल्यासारखे झाले व मी एक दृष्टांत पाहिला की, मोठ्या चांदव्यासारखे चार कोपरे धरून सोडलेली एक चादर माझ्यापर्यंत आली.
6 Зазирнувши в него і розглянувши, бачив чотироногих землі, і зьвірів, і повзючих, і птиць небесних.
मी त्याच्याकडे न्याहाळून पाहून विचार करीत होतो, मी त्यामध्ये पृथ्वीवरील चार पायाचे प्राणी, जंगली पशू, सरपटणारे प्राणी आणि आकाशात उडणारे पक्षी मी त्यामध्ये पाहिले.
7 І чув я голос, що глаголав до мене: Встань, Петре, заколи та й їж.
एक वाणी माझ्याशी बोलताना मी ऐकली, “पेत्रा, ऊठ, मारून खा!”
8 Я ж сказав: Нї, Господи, бо ніщо погане або нечисте ніколи не входило в уста мої.
पण मी म्हणालो, “प्रभू, मी असे कधीही करणार नाही, मी अपवित्र किंवा अशुद्ध असे कधीच खाल्ले नाही.”
9 Відказав же мені голос удруге з неба: Що Бог очистив, ти не погань,
आकाशातून त्या वाणीने पुन्हा उत्तर दिले, “देवाने या गोष्टी शुद्ध केल्या आहेत, त्यांना अशुद्ध म्हणू नकोस.”
10 Се сталось тричі, і знов потягнено було все на небо.
१०असे तीन वेळा घडले, मग ते सर्व पुन्हा वर आकाशात घेतले गेले.
11 І ось зараз три чоловіки прийшли в господу, де я був, послані з Кесариї до мене.
११इतक्यात पाहा, तीन माणसे ज्या घरामध्ये आम्ही होतो त्यापुढे कैसरीयाहून माझ्याकडे पाठवलेली तीन माणसे येऊन उभी राहिली.
12 Сказав же мені Дух ійти з ними, нічого не розбираючи. Пішли яе зо мною і шість братів, і ввійшли ми в господу до чоловіка;
१२आत्म्याने मला कोणत्याही प्रकारचा संशय न धरिता त्यांच्याबरोबर जाण्यास सांगितले, हे सहा बंधू जे येथे आहेत, तेही माझ्याबरोबर होते, आम्ही कर्नेल्याच्या घरी गेलो.
13 і звістив нам, як видїв ангела в господі своїй, що став і глаголав йому: Пішли в Йоппию людей, та поклич Симона, званого Петром.
१३कर्नेल्याने आपल्या घरात देवदूत उभा असलेला कसा दिसला हे आम्हास सांगितले, देवदूत कर्नेल्याला म्हणाला, “काही माणसे यापोस पाठव, शिमोन पेत्राला बोलावून घे.
14 Він глаголати ме слова до тебе котрими спасеш ся ти й увесь дім твій.
१४तो तुझ्याशी बोलेल, तो ज्या गोष्टी तुला सांगेल, त्यामुळे तुझे व तुझ्या कुटुंबाचे तारण होईल.”
15 Як же став я говорити, найшов Дух сьвятий на них, як і на нас у починї.
१५त्यानंतर मी माझ्या भाषणाला सुरुवात केली, सुरुवातीला ज्याप्रमाणे पवित्र आत्मा आपल्यावर आला तसाच तो त्यांच्यावरही आला.
16 Згадав я тоді слово Господнє, як глаголав він: Йоан хрестив водою, а ви будете хреститись Духом сьвятим.
१६तेव्हा मला प्रभूचे शब्द आठवले, प्रभू म्हणाला होता, “योहान लोकांचा बाप्तिस्मा पाण्याने करीत असे हे खरे, पण तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल.”
17 Коли ж рівний дар дав їм Бог, як і нам, що увірували в Господа Ісуса Христа, то хто ж я такий, щоб міг заборонити Богові?
१७आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तेव्हा जसे आपणांस तसे त्यांसही देवाने सारखेच दान दिले, मग देवाला अडविणारा असा मी कोण?
18 Вислухавши се, замовкли, і славили Бога, говорячи: То й поганам дав Бог покаяннє в життє!
१८जेव्हा त्यांनी या गोष्टी ऐकल्या, तेव्हा ते शांत राहिले, त्यांनी देवाची स्तुती केली आणि म्हणाले, “तर मग देवाने परराष्ट्रीयांसही जीवन मिळावे म्हणून पश्चात्तापबुद्धी दिली आहे.”
19 Ті ж, що порозсипались від гонення, що сталось на Стефана, пійшли аж у Финикию, Кипр і Антиохию, нікому не проповідуючи слова, тільки одним Жидам.
१९स्तेफन मारला गेल्यानंतरच्या काळात जो छळ झाला, त्यामुळे विश्वास ठेवणारे यरूशलेम शहरापासून दूर ठिकाणी फेनीके प्रांत, कुप्र बेट व अंत्युखिया शहरापर्यंत पांगले गेले, विश्वास ठेवणाऱ्यांनी या ठिकाणी फक्त यहूदी लोकांसच सुवार्ता सांगितली.
20 Були ж деякі з них люде з Кипру і Киринеї, котрі, прийшовши в Антиохию, говорили до Єленян, благовіствуючи Господа Ісуса.
२०यातील काही विश्वास ठेवणारे कुप्र व कुरेने येथे राहणारे होते, जेव्हा हे लोक अंत्युखियात आले, तेव्हा त्यांनी या ग्रीक लोकांस येशूविषयीची सुवार्ता सांगितली.
21 І була рука Господня з ними; і велике число увірувавши, навернулись до Господа.
२१प्रभू विश्वास ठेवणाऱ्यांना मदत करीत होता आणि बऱ्याच मोठ्या गटाने विश्वास ठेवला व ते प्रभूला अनुसरू लागले.
22 Дійшло ж про них слово до ушей церкви, що в Єрусалимі, і післали Варнаву, щоб пійшов аж до Антиохиї;
२२याविषयीची बातमी यरूशलेम शहरातील विश्वास ठेवणाऱ्या मंडळीच्या कानावर आली, म्हणून यरूशलेम शहरातील विश्वास ठेवणाऱ्यांनी बर्णबाला अंत्युखियाला पाठवले.
23 котрий прийшовши і видївши ласку Божу, зрадїв, і молив усїх, щоб у постановленню серця пробували в Господї.
२३बर्णबा चांगला मनुष्य होता, तो पवित्र आत्म्याने आणि विश्वासाने पूर्णपणे भरलेला होता, जेव्हा बर्णबा अंत्युखियाला गेला, तेव्हा त्याने पाहिले की, देवाने या लोकांवर खूप कृपा केली आहे, त्यामुळे बर्णबाला खूप आनंद झाला, अंत्युखियातील सर्व विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने उत्तेजन दिले, त्याने त्यांना सांगितले, कधीही तुमचा विश्वास गमावू नका, नेहमी प्रभूची आज्ञा अंतःकरणापासून पाळा.
24 Бо був чоловік добрий, повний Духа сьвятого й віри; і прихилилось доволї народу до Господа.
२४तो चागंला मनुष्य होता आणि पवित्र आत्म्याने व विश्वासाने पूर्ण होता; तेव्हा प्रभूला पुष्कळजण मिळाले.
25 Вийшов же Варнава в Тарс шукати Павла,
२५जेव्हा बर्णबा तार्सास गेला तेव्हा तो शौलाचा शोध घेत होता.
26 і, знайшовши його, привів його в Антиохию. Стало ся ж, що вони цїлий рік збирались у церкві, і навчали багато народу, і ученики в Антиохиї стали найперш звати ся Християнами.
२६जेव्हा बर्णबाने त्यास शोधले तेव्हा त्याने शौलाला आपल्यासह अंत्युखियाला आणले, शौलाने व बर्णबाने वर्षभर तेथे मंडळीत राहून पुष्कळ लोकांस शिकवले, अंत्युखियामध्ये येशूच्या अनुयायांना ‘ख्रिस्ती’ हे नाव पहिल्यांदा मिळाले.
27 Тих же днів прийшли з Єрусалиму пророки в Антиохию.
२७याच काळात काही संदेष्टे यरूशलेम शहराहून अंत्युखियास आले.
28 Ставши ж один з них, на ймя Агав, віщував духом, що велика голоднеча мав бути по всій вселеннїй, яка й постала за Кдавдия кесаря.
२८यांच्यापैकी एकाचे नाव अगब होते, अंत्युखियात तो उभा राहिला आणि बोलू लागला, पवित्र आत्म्याच्या साहाय्याने तो म्हणाला, फार वाईट काळ सर्व पृथ्वीवर येत आहे, लोकांस खायला अन्न मिळणार नाही, क्लौदिया राजा राज्य करीत होता तेव्हा त्याच्या काळात हे घडले.
29 З учеників же, скільки хто міг, постановив кожен з них післати на допомогу братам, що жили в Юдеї.
२९विश्वास ठेवणाऱ्यांनी ठरवले की, यहूदीया येथील आपल्या बंधू व भगिनींना जास्तीत जास्त मदत पाठविण्याचा प्रयत्न करावा प्रत्येक शिष्याने जास्तीत जास्त मदत पाठवण्याचे ठरवले.
30 Що й зробили, піславши до старших через руки Варнави та Савла.
३०त्यांनी पैसे गोळा करून बर्णबा व शौल यांच्याकडे दिले, मग बर्णबा व शौल यांनी ते पैसे यहूदीयातील वडीलजनांकडे पाठवून दिले.

< Дії 11 >