< Mezmurlar 38 >

1 Anma sunusu için Davut'un mezmuru Ya RAB, öfkelenip azarlama beni, Gazapla yola getirme!
आठवण देण्यासाठी, दाविदाचे स्तोत्र. परमेश्वरा, तुझ्या क्रोधात मला ताडना करू नकोस, आणि तुझ्या कोपात मला शिक्षा करू नकोस.
2 Okların içime saplandı, Elin üzerime indi.
कारण तुझे बाण मला छेदतात, आणि तुझा हात मला खाली दाबतो आहे.
3 Öfken yüzünden sağlığım bozuldu, Günahım yüzünden rahatım kaçtı.
माझे सर्व शरीर तुझ्या क्रोधाने आजारी झाले आहे. आणि माझ्या अपराधांमुळे माझ्या हाडांत स्वस्थता नाही.
4 Çünkü suçlarım başımdan aştı, Taşınmaz bir yük gibi sırtımda ağırlaştı.
कारण माझ्या वाईट गोष्टींनी मला दडपून टाकले आहे. ते माझ्याकरिता फार जड असे ओझे झाले आहे.
5 Akılsızlığım yüzünden Yaralarım iğrenç, irinli.
माझ्या पापाच्या मूर्खपणामुळे, माझ्या जखमा संसर्गजन्य आणि दुर्गंधित झाल्या आहेत.
6 Eğildim, iki büklüm oldum, Gün boyu yaslı dolaşıyorum.
मी वाकलो आहे आणि प्रत्येक दिवशी मानहानी होते; दिवसभर मी शोक करतो.
7 Çünkü belim ateş içinde, Sağlığım bozuk.
कारण लज्जेने मला गाठले आहे, आणि माझे सर्व शरीर आजारी आहे.
8 Tükendim, ezildim alabildiğine, İnliyorum yüreğimin acısından.
मी बधिर आणि पूर्णपणे ठेचला गेलो आहे. आपल्या हृदयाच्या तळमळीने मी कण्हतो.
9 Ya Rab, bütün özlemlerimi bilirsin, İniltilerim senden gizli değil.
हे प्रभू, तू माझ्या हृदयाची खोल उत्कंठ इच्छा समजतोस, आणि माझे कण्हणे तुझ्यापासून लपले नाही.
10 Yüreğim çarpıyor, gücüm tükeniyor, Gözlerimin feri bile söndü.
१०माझे हृदय धडधडत आहे, माझी शक्ती क्षीण झाली आहे आणि माझी दृष्टीही अंधुक झाली आहे.
11 Eşim dostum kaçar oldu derdimden, Yakınlarım uzak duruyor benden.
११माझ्या परिस्थितीमुळे माझे मित्र आणि माझे सोबती मला टाळतात, माझे शेजारी माझ्यापासून लांब उभे राहतात.
12 Canıma susayanlar bana tuzak kuruyor, Zararımı isteyenler kuyumu kazıyor, Gün boyu hileler düşünüyorlar.
१२जे माझा जीव घेऊ पाहतात ते माझ्यासाठी पाश मांडतात. जे माझी हानी करू पाहतात ते दिवसभर विध्वंसक आणि कपटाचे शब्द बोलतात.
13 Ama ben bir sağır gibi duymuyorum, Bir dilsiz gibi ağzımı açmıyorum;
१३मी तर बहिर्‍यासारखा होऊन ऐकत नाही; मुक्यासारखा मी आपले तोंड उघडत नाही.
14 Duymaz, Ağzında yanıt bulunmaz bir adama döndüm.
१४ऐकू न येणाऱ्या माणसासारखा मी आहे, ज्याच्याकडे काही उत्तर नाही.
15 Umudum sende, ya RAB, Sen yanıtlayacaksın, ya Rab, Tanrım benim!
१५परमेश्वरा, खचित मी तुझी वाट पाहीन. प्रभू माझ्या देवा, तू मला उत्तर देशील.
16 Çünkü dua ediyorum: “Halime sevinmesinler, Ayağım kayınca böbürlenmesinler!”
१६कारण मी जर म्हणालो तू उत्तर दिले नाही, तर माझे शत्रू माझ्यावर आनंद करतील. जर माझा पाय घसरला, तर ते भयानक गोष्टी करतील.
17 Düşmek üzereyim, Acım hep içimde.
१७कारण मी अडखळून पडण्याच्या बेतास आलो आहे, आणि मी सतत यातनेत आहे.
18 Suçumu itiraf ediyorum, Günahım yüzünden kaygılanıyorum.
१८मी माझा अपराध कबूल करतो; मी माझ्या पापासंबंधी चिंताकुल आहे.
19 Ama düşmanlarım güçlü ve dinç, Yok yere benden nefret edenler çok.
१९परंतु माझे शत्रू असंख्य आहेत; जे माझा वाईटाने द्वेष करतात ते पुष्कळ आहेत.
20 İyiliğe karşı kötülük yapanlar bana karşı çıkar, İyiliğin peşinde olduğum için.
२०माझ्या चांगल्याची परतफेड ते वाईटाने करतात. जरी मी चांगले अनुसरलो. तरी माझ्यावर ते दोषारोपण करतात.
21 Beni terk etme, ya RAB! Ey Tanrım, benden uzak durma!
२१हे परमेश्वरा, मला सोडू नकोस; माझ्या देवा, माझ्यापासून दूर राहू नकोस.
22 Yardımıma koş, Ya Rab, kurtuluşum benim!
२२हे प्रभू, माझ्या तारणाऱ्या, माझे साहाय्य करण्यास त्वरा कर.

< Mezmurlar 38 >