< Mezmurlar 18 >

1 Müzik şefi için - RAB'bin kulu Davut'un mezmuru - RAB kendisini bütün düşmanlarının pençesinden ve Saul'un elinden kurtardığı gün Davut RAB'be şu ezgiyi okudu: Seni seviyorum, gücüm sensin, ya RAB!
मुख्य गायकासाठी, परमेश्वराचा सेवक दावीद याचे स्तोत्र. परमेश्वराने त्यास त्याच्या सर्व शत्रूंच्या हातातून आणि शौलाच्या हातातून सोडवले, त्या दिवशी तो या गीताची वचने परमेश्वरापाशी बोलला, आणि तो म्हणाला. “हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करतो.”
2 RAB benim kayam, sığınağım, kurtarıcımdır, Tanrım, kayam, sığınacak yerimdir, Kalkanım, güçlü kurtarıcım, korunağımdır!
परमेश्वर माझा खडक माझा गढ आहे, जो मला सुरक्षा देतो, तो माझा देव, माझा खडक आहे, त्याच्यात मी आश्रय घेतो. तो माझी ढाल आहे, माझ्या तारणाचे शिंग आणि माझा बळकट दुर्ग आहे.
3 Övgüye değer RAB'be seslenir, Kurtulurum düşmanlarımdan.
जो स्तुतीच्या योग्य आहे, त्या परमेश्वरास मी हाक मारीन, आणि मी माझ्या शत्रूंपासून वाचवला जाईन.
4 Ölüm iplerine dolanmıştım, Yıkım selleri basmıştı beni,
मृत्यूच्या दोऱ्यांनी मला घेरीले, आणि नाशाच्या पुरांनी मला घाबरे केले आहे.
5 Ölüler diyarının bağları sarmıştı, Ölüm tuzakları çıkmıştı karşıma. (Sheol h7585)
अधोलोकांच्या बंधनांनी मला घेरीले, मृत्यूच्या सापळ्याने मला अडकवले. (Sheol h7585)
6 Sıkıntı içinde RAB'be yakardım, Yardıma çağırdım Tanrım'ı. Tapınağından sesimi duydu, Haykırışım kulaklarına ulaştı.
मी संकटात असता, मी परमेश्वरास हाक मारली; मी देवाला माझ्या मदतीसाठी हाक मारली. त्याने त्याच्या पवित्र मंदिरातून माझी वाणी ऐकली.
7 O zaman yeryüzü sarsılıp sallandı, Titreyip sarsıldı dağların temelleri, Çünkü RAB öfkelenmişti.
तेव्हा पृथ्वी हादरली आणि कंपित झाली. डोंगरांचे पाये थरथर कापले आणि हादरले, कारण देव क्रोधित झाला होता.
8 Burnundan duman yükseldi, Ağzından kavurucu ateş Ve korlar fışkırdı.
त्याच्या नाकातून धूर वर चढला, आणि त्याच्या तोंडातून अग्नीच्या ज्वाला निघाल्या, ज्याने कोळसे पेटले गेले.
9 Kara buluta basarak Gökleri yarıp indi.
त्याने आकाश उघडले आणि तो खाली आला, आणि निबिड अंधार त्याच्या पाया खाली होता.
10 Bir Keruv'a binip uçtu, Rüzgar kanatlar takarak hızla geldi.
१०तो करुबावर स्वार झाला आणि वाऱ्याच्या पंखांनी वर उडत गेला.
11 Karanlığı örtündü, Kara bulutları kendine çardak yaptı.
११पावसाचे मोठे काळोख असे मेघ त्याने त्याच्याभोवती तंबू असे केले,
12 Varlığının parıltısından, Bulutlardan dolu ve korlar savruluyordu.
१२त्याच्या समोरील तेजामुळे, गारा आणि जळते कोळसे बाहेर पडले.
13 RAB göklerden gürledi, Duyurdu sesini Yüceler Yücesi, Dolu ve alevli korlarla.
१३परमेश्वराने आकाशात गडगडाट केला! परात्पराने आवाज उंच केला, गारा आणि विजा बाहेर पडल्या.
14 Savurup oklarını düşmanlarını dağıttı, Şimşek çaktırarak onları şaşkına çevirdi.
१४परमेश्वराने त्याचे बाण सोडले आणि शत्रूंची दाणादाण उडाली, पुष्कळ विजांनी त्यांना छेदून टाकले.
15 Denizin dibi göründü, Yeryüzünün temelleri açığa çıktı, ya RAB, Senin azarlamandan, Burnundan çıkan güçlü soluktan.
१५तेव्हा जलाशयाचे तळ दिसू लागले, तुझ्या युद्धाच्या गदारोळाने आणि तुझ्या नाकपुड्याच्या श्वासाच्या सोसाट्याने हे परमेश्वरा, जगाचे पाये उघडे पडले.
16 RAB yukarıdan elini uzatıp tuttu, Çıkardı beni derin sulardan.
१६तो उंचावरून खाली आला आणि त्याने मला पकडले! त्याने मला उसळत्या पाण्यातून बाहेर काढले.
17 Beni zorlu düşmanımdan, Benden nefret edenlerden kurtardı, Çünkü onlar benden güçlüydü.
१७माझ्या शक्तीशाली शत्रूंपासून आणि माझा तिरस्कार करणाऱ्यांपासून त्याने मला सोडवले. कारण ते माझ्यापेक्षा अधिक बलवान होते.
18 Felaket günümde karşıma dikildiler, Ama RAB bana destek oldu.
१८माझ्या दु: खाच्या दिवशी ते माझ्याविरूद्ध आले; परंतु परमेश्वर मला उचलून धरणारा होता.
19 Beni huzura kavuşturdu, Kurtardı, çünkü benden hoşnut kaldı.
१९त्याने मला विस्तृत खुल्या जागेमध्ये मोकळे केले! त्याने मला तारले कारण तो माझ्यामुळे संतुष्ट होता.
20 RAB doğruluğumun karşılığını verdi, Beni temiz ellerime göre ödüllendirdi.
२०माझ्या न्यायीपणाप्रमाणे परमेश्वराने मला पुरस्कृत केले आहे, त्याने मला पुनसंचयित केले कारण माझे हात निर्मळ होते.
21 Çünkü RAB'bin yolunda yürüdüm, Tanrım'dan uzaklaşarak kötülük yapmadım.
२१कारण मी परमेश्वराच्या मार्गात राहिलो आणि दुष्टाईने देवापासून दूर फिरलो नाही.
22 O'nun bütün ilkelerini göz önünde tuttum, Kurallarından ayrılmadım.
२२कारण त्याचे धार्मिक नियम माझ्यापुढे होते आणि त्याचे नियम मी आपणापासून दूर केले नाहीत.
23 O'nun gözünde kusursuzdum, Suç işlemekten sakındım.
२३मी त्याच्यासमोर निर्दोष असा होतो, आणि मी स्वत: ला पापापासून दूर राखले.
24 Bu yüzden RAB beni doğruluğuma Ve gözünde pak olan ellerime göre ödüllendirdi.
२४माझ्या न्यायीपणाप्रमाणे परमेश्वराने पुनसंचयित केले. कारण त्याच्या डोळ्यासमोर माझे हात निर्मळ होते.
25 Sadık kuluna sadakat gösterir, Kusursuz olana kusursuz davranırsın.
२५जो विश्वासयोग्य आहे, त्याच्याशी तू विश्वास दाखवतोस, निर्दोष मनुष्याशी तू सात्विकतेने वागतोस.
26 Pak olanla pak olur, Eğriye eğri davranırsın.
२६जे शुद्ध असतात त्यांच्याशी तू शुद्ध असतोस, परंतु जे कुटील त्यांच्याशी तू कुटीलतेने वागतोस.
27 Alçakgönüllüleri kurtarır, Gururluların başını eğersin.
२७कारण तू पीडित लोकांस वाचविले आहेस. परंतु गर्वाने उंचावलेल्या डोळ्यांना तू खाली करतोस.
28 Işığımın kaynağı sensin, ya RAB, Tanrım! Karanlığımı aydınlatırsın.
२८कारण तू माझा दिवा लावशील, परमेश्वर माझा देव माझ्या अंधाराचा प्रकाश करितो.
29 Desteğinle akıncılara saldırır, Seninle surları aşarım, Tanrım.
२९कारण तुझ्या मदतीने मी फौजेविरूद्ध जाऊ शकतो, माझ्या देवाच्या योगे मी तटावरुन उडी मारून जाऊ शकतो.
30 Tanrı'nın yolu kusursuzdur, RAB'bin sözü arıdır. O kendisine sığınan herkesin kalkanıdır.
३०देवाचा मार्ग परिपूर्ण आहे. परमेश्वराचे वचन शुद्ध आहे. जे त्याच्यात आश्रय घेतात, त्यांच्यासाठी तो ढाल असा आहे.
31 Var mı RAB'den başka tanrı? Tanrımız'dan başka kaya var mı?
३१कारण परमेश्वराखेरीज कोण देव आहे? आमच्या देवाशिवाय कोण खडक आहे?
32 Tanrı beni güçle donatır, Yolumu kusursuz kılar.
३२तोच देव बलाने माझी कंबर बांधतो, जो माझे मार्ग सुरक्षित ठेवतो.
33 Ayaklar verdi bana, geyiklerinki gibi, Doruklarda tutar beni.
३३तो माझे पाय हरिणीसारखे चपळ करतो आणि मला डोंगरावर ठेवतो!
34 Bana savaşmayı öğretti, Kollarımla tunç bir yayı gereyim diye.
३४तो माझ्या हाताला युद्ध करावयाला आणि माझे भुज पितळी धनुष्य वाकवायला शिकवतो.
35 Bana zafer kalkanını bağışlarsın, Sağ elin destekler, Alçakgönüllülüğün yüceltir beni.
३५तू मला तुझ्या तारणाची ढाल दिली आहेस, तुझा उजवा हात मला आधार देतो आणि तुझ्या अनुग्रहाने मला थोर केले आहे.
36 Bastığım yerleri genişletirsin, Burkulmaz bileklerim.
३६तू माझ्या पायांखाली विस्तीर्ण असे स्थान केले आहे, म्हणजे माझे पाय कधीही घसरणार नाहीत.
37 Kovalayıp yetiştim düşmanlarıma, Hepsi yok olmadan geri dönmedim.
३७मी माझ्या शत्रूंचा पाठलाग करीन आणि त्यांना पकडीन. ते नाश होईपर्यंत मी मागे फिरणार नाही.
38 Ezdim onları, kalkamaz oldular, Ayaklarımın altına serildiler.
३८मी माझ्या शत्रूंना असे मारीन की, ते पुन्हा उभे राहू शकणार नाहीत, ते सगळे माझ्या पायाखाली असतील.
39 Savaş için beni güçle donattın, Bana başkaldıranları önümde yere serdin.
३९कारण युद्धाकरिता तू सामर्थ्याने माझी कंबर बांधली आहे, जे माझ्याविरूद्ध उठले होते त्यांना तू खाली पाडले आहे.
40 Düşmanlarımı kaçmak zorunda bıraktın, Benden nefret edenleri yok ettim.
४०तू मला माझ्या शत्रूंनाही त्यांची पाठ फिरवायला लावली आहे, ज्यांनी माझा द्वेष केला, त्यांचा मी नाश केला.
41 Feryat ettiler, ama kurtaran çıkmadı; RAB'bi çağırdılar, ama O yanıt vermedi.
४१ते मदतीसाठी ओरडले, पण कोणीही त्यांना वाचवले नाही, त्यांनी परमेश्वरास आरोळी केली, पण त्याने उत्तर दिले नाही.
42 Ezdim onları, rüzgarın savurduğu toza döndüler, Sokak çamuru gibi savurup attım.
४२मी माझ्या शत्रूंचे वाऱ्यावर उडणाऱ्या धुळीप्रमाणे चूर्ण केले, रस्त्यावरील चिखलाप्रमाणे मी त्यांना काढून टाकले.
43 Halkımın çekişmelerinden beni kurtardın, Ulusların önderi yaptın, Tanımadığım halklar bana kulluk ediyor.
४३मी त्यांना असे मारले की धुळीसारखा त्यांचा भुगा केला, तू मला राष्ट्रांवर मस्तक असे केले आहे. जे लोक मला माहित नाहीत ते माझी सेवा करतील.
44 Duyar duymaz sözümü dinlediler, Yabancılar bana yaltaklandılar.
४४ते लोक माझ्याविषयी ऐकतील आणि लगेच माझ्या आज्ञांचे पालन करतील, ते परदेशी माझ्यापुढे शरण येतील.
45 Yabancıların betleri benizleri attı, Titreyerek çıktılar kalelerinden.
४५ते परदेशी त्यांच्या लपण्याच्या जागेतून भीतीने थरथर कापत बाहेर येतील.
46 RAB yaşıyor! Kayam'a övgüler olsun! Yücelsin kurtarıcım Tanrı!
४६परमेश्वर जिवंत आहे, माझा खडक धन्यवादित असो. माझ्या तारणाचा देव उंचावला जावो.
47 O'dur öcümü alan, Halkları bana bağımlı kılan.
४७हाच तो देव आहे जो माझ्यासाठी सूड घेतो, तो त्या राष्ट्रांना माझ्या सत्तेखाली देतो.
48 Düşmanlarımdan kurtarır, Başkaldıranlardan üstün kılar beni, Zorbaların elinden alır.
४८मी माझ्या शत्रूंपासून मुक्त झालो आहे, खचित, जे माझ्याविरूद्ध उठले आहेत, त्यांच्यावर तू मला उंच केले आहे. तू मला क्रूर मनुष्यांपासून वाचवले.
49 Bunun için uluslar arasında sana şükredeceğim, ya RAB, Adını ilahilerle öveceğim.
४९यास्तव परमेश्वरा, राष्ट्रांमध्ये मी तुला धन्यवाद देईन, मी तुझ्या नावाची स्तुती गाईन.
50 RAB kralını büyük zaferlere ulaştırır, Meshettiği krala, Davut'a ve soyuna Sonsuza dek sevgi gösterir.
५०देव आपल्या राजाला मोठा विजय देतो, आणि तो आपल्या अभिषिक्तावर, दाविदावर व त्याच्या संतानावर सदासर्वकाळ कृपा करतो.

< Mezmurlar 18 >