< Mezmurlar 139 >

1 Müzik şefi için - Davut'un mezmuru Ya RAB, sınayıp tanıdın beni.
दाविदाचे स्तोत्र हे परमेश्वरा, तू माझी परीक्षा केली आहेस, आणि तू मला जाणतोस;
2 Oturup kalkışımı bilirsin, Niyetimi uzaktan anlarsın.
मी केव्हा बसतो आणि केव्हा उठतो ते तुला माहित आहे; तुला माझे विचार खूप दुरुनही समजतात.
3 Gittiğim yolu, yattığım yeri inceden inceye elersin, Bütün yaptıklarımdan haberin var.
तू माझे चालने आणि माझे झोपणे बारकाईने पाहतो; तू माझ्या मार्गांशी परिचित आहेस.
4 Daha sözü ağzıma almadan, Söyleyeceğim her şeyi bilirsin, ya RAB.
हे परमेश्वरा, माझ्या मुखातून निघणारा एकही शब्द तुला पूर्णपणे माहित नाही असे मुळीच नाही.
5 Beni çepeçevre kuşattın, Elini üzerime koydun.
तू मागून व पुढून मला घेरले आहेस, आणि माझ्यावर तू आपला हात ठेवला आहेस.
6 Kaldıramam böylesi bir bilgiyi, Başa çıkamam, erişemem.
हे ज्ञान माझ्या कल्पनेपलीकडचे आहे; ते खूप अगम्य आहे, ते मी समजू शकत नाही.
7 Nereye gidebilirim senin Ruhun'dan, Nereye kaçabilirim huzurundan?
मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निसटून जाऊ शकतो? मी तुझ्या सान्निध्यापासून कोठे पळून जाऊ शकतो?
8 Göklere çıksam, oradasın, Ölüler diyarına yatak sersem, yine oradasın. (Sheol h7585)
मी जर वर आकाशात चढलो तर तिथे तू आहेस; जर मी खाली मृत्यूलोकात अंथरूण केले तरी, पाहा, तेथे तू आहेस. (Sheol h7585)
9 Seherin kanatlarını alıp uçsam, Denizin ötesine konsam,
जर मी पहाटेचे पंख धारण करून आणि समुद्राच्या अगदी पलीकडच्या तीरावर जाऊन राहिलो तरी तेथे तू आहेस.
10 Orada bile elin yol gösterir bana, Sağ elin tutar beni.
१०तरी तिथे ही तुझा उजवा हात मला धरतो. आणि तू मला हाताने धरून नेतोस.
11 Desem ki, “Karanlık beni kaplasın, Çevremdeki aydınlık geceye dönsün.”
११जरी मी म्हणालो, खचित अंधार मला लपविल, आणि तरीही रात्र माझ्याभोवती प्रकाशच होईल.
12 Karanlık bile karanlık sayılmaz senin için, Gece, gündüz gibi ışıldar, Karanlıkla aydınlık birdir senin için.
१२काळोख देखील तुझ्यापासून काहीच लपवित नाही. रात्रही दिवसासारखीच प्रकाशते, कारण तुला काळोख आणि प्रकाश दोन्ही सारखेच आहेत.
13 İç varlığımı sen yarattın, Annemin rahminde beni sen ördün.
१३तू माझे अंतर्याम निर्माण केलेस; तूच माझ्या आईच्या गर्भात मला घडवले.
14 Sana övgüler sunarım, Çünkü müthiş ve harika yaratılmışım. Ne harika işlerin var! Bunu çok iyi bilirim.
१४मी तुला धन्यवाद देतो, कारण तुझी कृत्ये भयचकीत आणि आश्चर्यकारक आहेत, हे तर माझा जीव पूर्णपणे जाणतो.
15 Gizli yerde yaratıldığımda, Yerin derinliklerinde örüldüğümde, Bedenim senden gizli değildi.
१५मी गुप्तस्थळी निर्माण होत असता, आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती.
16 Henüz döl yatağındayken gözlerin gördü beni; Bana ayrılan günlerin hiçbiri gelmeden, Hepsi senin kitabına yazılmıştı.
१६तू मला गर्भात पिंडरूपाने असताना पाहिलेस; माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या पुस्तकात नमूद करून ठेवले होते.
17 Hakkımdaki düşüncelerin ne değerli, ey Tanrı, Sayıları ne çok!
१७हे देवा, तुझे विचार मला किती मोलवान आहेत, त्यांची संख्या किती मोठी आहे.
18 Kum tanelerinden fazladır saymaya kalksam. Uyanıyorum, hâlâ seninleyim.
१८मी जर ती मोजू लागलो तर ती वाळूच्या कणांपेक्षाही जास्त ठरतील. जेव्हा मी जागा होतो, तेव्हाही मी तुझ्याजवळच असतो.
19 Ey Tanrı, keşke kötüleri öldürsen! Ey eli kanlı insanlar, uzaklaşın benden!
१९हे देवा! जर तू दुष्टांना मारुन टाकशील; अहो हिंसाचारी मनुष्यांनो! माझ्यापासून दूर व्हा.
20 Çünkü senin için kötü konuşuyorlar, Adını kötüye kullanıyor düşmanların.
२०ते तुझ्याविरूद्ध बंड आणि कपटाने कृती करतात; तुझे वैरी तुझे नाव व्यर्थ घेतात.
21 Ya RAB, nasıl tiksinmem senden tiksinenlerden? Nasıl iğrenmem sana başkaldıranlardan?
२१परमेश्वरा! तुझा द्वेष करणाऱ्यांचा मी का द्वेष करू नये? तुझ्याविरुध्द उठणाऱ्यांचा मी का तिरस्कार करू नये?
22 Onlardan tümüyle nefret ediyor, Onları düşman sayıyorum.
२२मी त्यांच्या पराकाष्ठेचा पूर्ण द्वेष करतो; ते माझे शत्रू झाले आहेत.
23 Ey Tanrı, yokla beni, tanı yüreğimi, Sına beni, öğren kaygılarımı.
२३हे देवा, माझे परीक्षण कर आणि माझे मन जाण; माझी परीक्षा घे आणि माझे विचार जाणून घे.
24 Bak, seni gücendiren bir yönüm var mı, Öncülük et bana sonsuz yaşam yolunda!
२४माझ्या मनात जर काही दुष्ट मार्ग असतील तर पाहा, आणि मला सनातन मार्गाने चालीव.

< Mezmurlar 139 >