< Yeşaya 15 >

1 Moav'la ilgili bildiri: Moav'ın Ar Kenti bir gecede viraneye döndü, yok oldu, Moav'ın Kîr Kenti bir gecede viraneye döndü, yok oldu.
मवाबाबद्दलची घोषणा. खरोखर, एका रात्रीत मवाबाचे आर वैराण आणि नाश करण्यात आले; खरोखर एका रात्रीत मवाबाचे कीर वैराण आणि नाश करण्यात आले.
2 Bu yüzden Divon halkı ağlamak için tapınağa, Tapınma yerlerine çıktı. Moav halkı, Nevo ve Medeva için feryat ediyor. İnsanlar saçlarını sakallarını kesiyor.
दीबोनाचे लोक मंदिरापर्यंत, उच्चस्थानावर रडण्यास चढून गेले; नबो व मेदबा यांच्यासाठी मवाब विलाप करत आहे. त्यांच्या सर्वांची डोकी मुंडिलेली आहेत व त्यांच्या सर्वांच्या दाढ्या कापलेल्या आहेत.
3 Çul giyiyorlar sokaklarda, Damlarda, meydanlarda herkes feryat ediyor, Gözyaşları sel gibi.
ते आपल्या रस्त्यात गोणताट पांघरून आहेत; आपल्या घराच्या धाब्यावर आणि आपल्या चौकात प्रत्येकजण आक्रोश करीत आहेत, अश्रू गाळीत आहेत
4 Heşbon ve Elale'nin haykırışları Yahas'a ulaşıyor. Moav askerleri bu yüzden feryat ediyor, Yürekleri korku içinde.
हेशबोन व एलाले आरोळी मारत आहेत; त्यांचा आवाज याहसापर्यंत ऐकू जात आहे. यामुळे मवाबाचे शस्त्रधारी माणसे आरोळ्या देत आहेत; त्यांचा जीव त्यांच्यात थरथरत आहे.
5 Yüreğim sızlıyor Moav için. Kaçanlar Soar'a, Eglat-Şelişiya'ya ulaştı, Ağlaya ağlaya çıkıyorlar Luhit Yokuşu'ndan, Horonayim yolunda yıkımlarına ağıt yakıyorlar.
मवाबाकरता माझे हृदय ओरडते; तिचे शरणार्थी सोअर आणि एगलाथ-शलिशीया येथवर पळून गेले आहेत. लूहीथच्या चढणीवर ते रडत रडत चढत आहेत; होरोनाईमाच्या वाटेवर त्यांच्या नाशासाठी मोठ्याने आक्रोश करीत आहेत.
6 Nimrim suları kuruduğu için otlar sararıp soldu. Taze ot kalmadı, yeşillik yok artık.
पण निम्रीमाचे पाणी आटले आहे; गवत सुकून गेले आहे आणि नवीन गवत नाहीसे झाले आहे; काहीच हिरवे नाही.
7 Bu yüzden halk kazanıp biriktirdiği ne varsa, Kavak Vadisi üzerinden taşıyacak.
यास्तव त्यांनी वाढवलेली विपुलता आणि साठवलेले आहे ते, वाळुंजाच्या ओढ्यापलीकडे घेऊन जात आहेत.
8 Haykırışları Moav topraklarında yankılanıyor, Feryatları Eglayim'e, Beer-Elim'e dek ulaştı.
मवाबाच्या प्रदेशामध्ये सगळीकडे रडणे चालले आहे; त्यांचा आकांत एग्लाइमापर्यंत आणि बैर-एलीमापर्यंत त्यांचा आक्रोश पोहचला आहे.
9 Çünkü Dimon suları kan dolu, Ama başına daha beterini getireceğim. Moav'dan kaçıp kurtulanların, Ülkede sağ kalanların üzerine aslan salacağım.
दीमोनाचे पाणी रक्ताने भरले आहेत; पण मी दीमोनावर अधिक जास्त संकटे आणीन. जे मवाबापासून निसटले आहेत आणि जे देशात बाकी आहेत त्यांच्यावर सिंह हल्ला करतील.

< Yeşaya 15 >