< लूकः 6 >

1 अचरञ्च पर्व्वणो द्वितीयदिनात् परं प्रथमविश्रामवारे शस्यक्षेत्रेण यीशोर्गमनकाले तस्य शिष्याः कणिशं छित्त्वा करेषु मर्द्दयित्वा खादितुमारेभिरे।
नंतर असे झाले की, एका शब्बाथ दिवशी येशू शेतामधून जात होता आणि त्याचे शिष्य कणसे मोडून हातावर चोळून खात होते.
2 तस्मात् कियन्तः फिरूशिनस्तानवदन् विश्रामवारे यत् कर्म्म न कर्त्तव्यं तत् कुतः कुरुथ?
मग परूश्यांपैकी काही म्हणाले, “शब्बाथ दिवशी जे करण्यास योग्य नाही, ते तुम्ही का करता?”
3 यीशुः प्रत्युवाच दायूद् तस्य सङ्गिनश्च क्षुधार्त्ताः किं चक्रुः स कथम् ईश्वरस्य मन्दिरं प्रविश्य
येशूने त्यांना म्हटले, “जेव्हा दावीद व त्याच्याबरोबरच्या मनुष्यांना भूक लागली तेव्हा त्यांनी काय केले हे तुम्ही कधी वाचले नाही काय?
4 ये दर्शनीयाः पूपा याजकान् विनान्यस्य कस्याप्यभोजनीयास्तानानीय स्वयं बुभजे सङ्गिभ्योपि ददौ तत् किं युष्माभिः कदापि नापाठि?
तो देवाच्या घरात गेला आणि ज्या समर्पित भाकरी याजकांशिवाय कोणीच खाणे योग्य नाही त्या त्याने कशा घेऊन खाल्ल्या व आपल्याबरोबर जे होते त्यांनाही दिल्या.”
5 पश्चात् स तानवदत् मनुजसुतो विश्रामवारस्यापि प्रभु र्भवति।
आणखी येशू त्यांना म्हणाला, “मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा प्रभू आहे.”
6 अनन्तरम् अन्यविश्रामवारे स भजनगेहं प्रविश्य समुपदिशति। तदा तत्स्थाने शुष्कदक्षिणकर एकः पुमान् उपतस्थिवान्।
असे झाले की, दुसऱ्या एका शब्बाथ दिवशी येशू सभास्थानात गेला आणि शिकवू लागला. ज्याचा उजवा हात वाळलेला होता असा एक मनुष्य तेथे होता.
7 तस्माद् अध्यापकाः फिरूशिनश्च तस्मिन् दोषमारोपयितुं स विश्रामवारे तस्य स्वास्थ्यं करोति नवेति प्रतीक्षितुमारेभिरे।
येशू शब्बाथ दिवशी कोणाला बरे करतो की काय हे पाहण्यासाठी नियमशास्त्राचे शिक्षक व परूशी त्याच्यावर लक्ष ठेवून होते. यासाठी की त्यांना आरोप ठेवण्यासाठी काहीतरी कारण मिळावे.
8 तदा यीशुस्तेषां चिन्तां विदित्वा तं शुष्ककरं पुमांसं प्रोवाच, त्वमुत्थाय मध्यस्थाने तिष्ठ।
परंतु तो त्यांचे विचार जाणून वाळलेल्या हाताच्या मनुष्यास म्हणाला, “ऊठ आणि सर्वांसमोर उभा राहा,” आणि तो मनुष्य उठून तेथे उभा राहिला.
9 तस्मात् तस्मिन् उत्थितवति यीशुस्तान् व्याजहार, युष्मान् इमां कथां पृच्छामि, विश्रामवारे हितम् अहितं वा, प्राणरक्षणं प्राणनाशनं वा, एतेषां किं कर्म्मकरणीयम्?
येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हास विचारतो, शब्बाथ दिवशी कोणत्या गोष्टी करायला परवानगी आहे? चांगले करणे की वाईट करणे? कोणते कायदेशीर आहे, एखाद्याचा जीव वाचवणे का त्याचा नाश करणे?”
10 पश्चात् चतुर्दिक्षु सर्व्वान् विलोक्य तं मानवं बभाषे, निजकरं प्रसारय; ततस्तेन तथा कृत इतरकरवत् तस्य हस्तः स्वस्थोभवत्।
१०मग त्याने सभोवती त्या सर्वांकडे पाहीले आणि म्हणाला, “तू आपला हात लांब कर.” तेव्हा त्याने तसे केले आणि त्याचा हात बरा झाला.
11 तस्मात् ते प्रचण्डकोपान्विता यीशुं किं करिष्यन्तीति परस्परं प्रमन्त्रिताः।
११पण परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक खूप रागावले व येशूविषयी काय करता येईल याविषयी आपसात चर्चा करू लागले.
12 ततः परं स पर्व्वतमारुह्येश्वरमुद्दिश्य प्रार्थयमानः कृत्स्नां रात्रिं यापितवान्।
१२त्या दिवसात असे झाले की, येशू प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेला. त्याने ती रात्र देवाची प्रार्थना करण्यात घालवली.
13 अथ दिने सति स सर्व्वान् शिष्यान् आहूतवान् तेषां मध्ये
१३जेव्हा दिवस उगवला, तेव्हा त्याने शिष्यांना आपणाकडे बोलावले. त्याने त्यांच्यातील बाराजणांना निवडले व त्यांना ‘प्रेषित’ असे नाव दिले.
14 पितरनाम्ना ख्यातः शिमोन् तस्य भ्राता आन्द्रियश्च याकूब् योहन् च फिलिप् बर्थलमयश्च
१४शिमोन ज्याला पेत्र हे सुद्धा नाव दिले तो अंद्रिया (पेत्राचा भाऊ), याकोब आणि योहान, फिलिप्प, बर्थलमय,
15 मथिः थोमा आल्फीयस्य पुत्रो याकूब् ज्वलन्तनाम्ना ख्यातः शिमोन्
१५मत्तय, थोमा, अल्फीचा पुत्र याकोब, शिमोन ज्याला जिलोत म्हणत,
16 च याकूबो भ्राता यिहूदाश्च तं यः परकरेषु समर्पयिष्यति स ईष्करीयोतीययिहूदाश्चैतान् द्वादश जनान् मनोनीतान् कृत्वा स जग्राह तथा प्रेरित इति तेषां नाम चकार।
१६याकोबचा पुत्र यहूदा व यहूदा इस्कर्योत, जो पुढे विश्वासघात करणारा निघाला.
17 ततः परं स तैः सह पर्व्वतादवरुह्य उपत्यकायां तस्थौ ततस्तस्य शिष्यसङ्घो यिहूदादेशाद् यिरूशालमश्च सोरः सीदोनश्च जलधे रोधसो जननिहाश्च एत्य तस्य कथाश्रवणार्थं रोगमुक्त्यर्थञ्च तस्य समीपे तस्थुः।
१७तो त्यांच्याबरोबर डोंगरावरून खाली उतरला व सपाट जागेवर उभा राहिला आणि त्याच्या अनुयायांचा मोठा समुदाय तेथे आला व यहूदीया प्रांत, यरूशलेम शहर, सोर आणि सिदोनच्या समुद्रकिनाऱ्याकडचे असे पुष्कळसे लोक तेथे आले होते.
18 अमेध्यभूतग्रस्ताश्च तन्निकटमागत्य स्वास्थ्यं प्रापुः।
१८ते तेथे त्याचे ऐकण्यास व आपल्या रोगांपासून बरे होण्यास आले व ज्यांना अशुद्ध आत्म्यांची बाधा होती त्यांनाही त्यांच्या व्याधीपासून मुक्त करण्यात आले.
19 सर्व्वेषां स्वास्थ्यकरणप्रभावस्य प्रकाशितत्वात् सर्व्वे लोका एत्य तं स्प्रष्टुं येतिरे।
१९सगळा लोकसमुदाय त्यास स्पर्श करू पाहत होता, कारण त्याच्यामधून सामर्थ्य येत होते आणि सर्वांना ते बरे करत होते.
20 पश्चात् स शिष्यान् प्रति दृष्टिं कुत्वा जगाद, हे दरिद्रा यूयं धन्या यत ईश्वरीये राज्ये वोऽधिकारोस्ति।
२०मग येशूने आपल्या शिष्यांकडे पाहिले व म्हणाला, “अहो दिनांनो, तुम्ही धन्य आहात कारण देवाचे राज्य तुमचे आहे.
21 हे अधुना क्षुधितलोका यूयं धन्या यतो यूयं तर्प्स्यथ; हे इह रोदिनो जना यूयं धन्या यतो यूयं हसिष्यथ।
२१अहो जे तुम्ही आता भूकेले आहात, ते तुम्ही धन्य आहात, कारण तुम्ही तृप्त व्हाल. अहो जे तुम्ही आता रडता, ते तुम्ही आशीर्वादित आहात कारण तुम्ही हसाल.
22 यदा लोका मनुष्यसूनो र्नामहेतो र्युष्मान् ऋृतीयिष्यन्ते पृथक् कृत्वा निन्दिष्यन्ति, अधमानिव युष्मान् स्वसमीपाद् दूरीकरिष्यन्ति च तदा यूयं धन्याः।
२२जेव्हा मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील आणि जेव्हा ते आपल्या समाजातून तुम्हास दूर करतील व तुमची निंदा करतील व तुमचे नाव ते वाईट म्हणून टाकून देतील आणि मनुष्याच्या पुत्रामुळे तुम्हास नाकारतील, तेव्हा तुम्ही धन्य आहात.
23 स्वर्गे युष्माकं यथेष्टं फलं भविष्यति, एतदर्थं तस्मिन् दिने प्रोल्लसत आनन्देन नृत्यत च, तेषां पूर्व्वपुरुषाश्च भविष्यद्वादिनः प्रति तथैव व्यवाहरन्।
२३त्यादिवशी आनंद करून उड्या मारा, कारण खरोखर स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे! कारण त्यांच्या पूर्वजांनी संदेष्ट्यांना सुद्धा तसेच केले.
24 किन्तु हा हा धनवन्तो यूयं सुखं प्राप्नुत। हन्त परितृप्ता यूयं क्षुधिता भविष्यथ;
२४पण श्रीमंतानो, तुम्हास दुःख होवो कारण तुम्हास अगोदरच सर्व सुख मिळाले आहे.
25 इह हसन्तो यूयं वत युष्माभिः शोचितव्यं रोदितव्यञ्च।
२५जे तुम्ही तृप्त आहात त्या तुम्हास दुःख होवो, कारण तुम्ही भूकेले व्हाल. जे आता हसतात त्यांना दुःख होवो कारण तुम्ही शोक कराल आणि रडाल.
26 सर्व्वैलाकै र्युष्माकं सुख्यातौ कृतायां युष्माकं दुर्गति र्भविष्यति युष्माकं पूर्व्वपुरुषा मृषाभविष्यद्वादिनः प्रति तद्वत् कृतवन्तः।
२६जेव्हा सर्व तुमच्याविषयी चांगले बोलतील तेव्हा तुम्हास दुःख होवो कारण त्यांच्या वाडवडिलांनी खोट्या संदेष्ट्यांना असेच केले.”
27 हे श्रोतारो युष्मभ्यमहं कथयामि, यूयं शत्रुषु प्रीयध्वं ये च युष्मान् द्विषन्ति तेषामपि हितं कुरुत।
२७“परंतु तुम्हा ऐकणाऱ्यांस मी सांगतो, तुमच्या शत्रूंवर प्रीती करा. जे तुमचा द्वेष करतात, त्यांचे चांगले करा.
28 ये च युष्मान् शपन्ति तेभ्य आशिषं दत्त ये च युष्मान् अवमन्यन्ते तेषां मङ्गलं प्रार्थयध्वं।
२८जे तुम्हास शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या. जे तुमचा अपमान करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.
29 यदि कश्चित् तव कपोले चपेटाघातं करोति तर्हि तं प्रति कपोलम् अन्यं परावर्त्त्य सम्मुखीकुरु पुनश्च यदि कश्चित् तव गात्रीयवस्त्रं हरति तर्हि तं परिधेयवस्त्रम् अपि ग्रहीतुं मा वारय।
२९जर कोणी तुमच्या एका गालावर मारतो तर त्याच्यासमोर दुसराही गाल करा. जर कोणी तुमचा अंगरखा घेतो तर त्यास तुमची बंडी ही घेऊन जाण्यास मना करू नका.
30 यस्त्वां याचते तस्मै देहि, यश्च तव सम्पत्तिं हरति तं मा याचस्व।
३०जे तुम्हास मागतात त्या प्रत्येकाला द्या आणि जो तुमची वस्तू हिरावून घेतो त्याच्यापाशी ते परत मागू नको.
31 परेभ्यः स्वान् प्रति यथाचरणम् अपेक्षध्वे परान् प्रति यूयमपि तथाचरत।
३१आणि जसे मनुष्यांनी तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा असेल तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा.
32 ये जना युष्मासु प्रीयन्ते केवलं तेषु प्रीयमाणेषु युष्माकं किं फलं? पापिलोका अपि स्वेषु प्रीयमाणेषु प्रीयन्ते।
३२तुमच्यावर जे प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती करा, तर त्यामध्ये तुमचा उपकार तो काय? कारण पापी लोकही आपणावर प्रीती करणाऱ्यांवर प्रीती करतात.
33 यदि हितकारिण एव हितं कुरुथ तर्हि युष्माकं किं फलं? पापिलोका अपि तथा कुर्व्वन्ति।
३३तुमचे जे चांगले करतात, त्यांचे जर तुम्ही चांगले करता तर तुम्हास काय लाभ? पापीसुद्धा असेच करतात.
34 येभ्य ऋणपरिशोधस्य प्राप्तिप्रत्याशास्ते केवलं तेषु ऋणे समर्पिते युष्माकं किं फलं? पुनः प्राप्त्याशया पापीलोका अपि पापिजनेषु ऋणम् अर्पयन्ति।
३४ज्यांच्याकडून तुम्हास परत मिळेल अशी आशा असते, त्यांना जर उसने देता तर तुम्हास काय लाभ? पापीसुद्धा परत मिळावे या उद्देशाने दुसऱ्या पाप्याला उसने देतात.
35 अतो यूयं रिपुष्वपि प्रीयध्वं, परहितं कुरुत च; पुनः प्राप्त्याशां त्यक्त्वा ऋणमर्पयत, तथा कृते युष्माकं महाफलं भविष्यति, यूयञ्च सर्व्वप्रधानस्य सन्ताना इति ख्यातिं प्राप्स्यथ, यतो युष्माकं पिता कृतघ्नानां दुर्व्टत्तानाञ्च हितमाचरति।
३५परंतु तुम्ही आपल्या शत्रूंवर प्रीती करा व त्यांचे बरे करा आणि निराश न होता उसने द्या म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल व तुम्ही परात्पराचे पुत्र व्हाल कारण तो अनुपकारी व वाईट यांच्यावर तो दया करणारा आहे.
36 अत एव स यथा दयालु र्यूयमपि तादृशा दयालवो भवत।
३६जसा तुमचा स्वर्गीय पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा.”
37 अपरञ्च परान् दोषिणो मा कुरुत तस्माद् यूयं दोषीकृता न भविष्यथ; अदण्ड्यान् मा दण्डयत तस्माद् यूयमपि दण्डं न प्राप्स्यथ; परेषां दोषान् क्षमध्वं तस्माद् युष्माकमपि दोषाः क्षमिष्यन्ते।
३७“दुसऱ्यांचा न्याय करू नका, म्हणजे तुमचाही न्याय होणार नाही. दुसऱ्यांना दोषी ठरवू नका म्हणजे तुम्हास दोषी ठरवले जाणार नाही. दुसऱ्यांची क्षमा करा म्हणजे तुमचीही क्षमा केली जाईल.
38 दानानिदत्त तस्माद् यूयं दानानि प्राप्स्यथ, वरञ्च लोकाः परिमाणपात्रं प्रदलय्य सञ्चाल्य प्रोञ्चाल्य परिपूर्य्य युष्माकं क्रोडेषु समर्पयिष्यन्ति; यूयं येन परिमाणेन परिमाथ तेनैव परिमाणेन युष्मत्कृते परिमास्यते।
३८द्या म्हणजे तुम्हास दिले जाईल. चांगले माप दाबून, हालवून व शीग भरून तुमच्या पदरी घालतील कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हास परत मापून देण्यात येईल.”
39 अथ स तेभ्यो दृष्टान्तकथामकथयत्, अन्धो जनः किमन्धं पन्थानं दर्शयितुं शक्नोति? तस्माद् उभावपि किं गर्त्ते न पतिष्यतः?
३९त्याने त्यांना एक दाखला सांगितला, “एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला मार्ग दाखवू शकेल काय? ते दोघेही खड्डयात पडणार नाहीत काय?
40 गुरोः शिष्यो न श्रेष्ठः किन्तु शिष्ये सिद्धे सति स गुरुतुल्यो भवितुं शक्नोति।
४०कोणताही शिष्य त्याच्या गुरुपेक्षा थोर नाही. पण प्रत्येक शिष्य जेव्हा पूर्ण शिकतो तेव्हा तो गुरुसारखाच होतो.
41 अपरञ्च त्वं स्वचक्षुुषि नासाम् अदृष्ट्वा तव भ्रातुश्चक्षुषि यत्तृणमस्ति तदेव कुतः पश्यमि?
४१स्वतःच्या डोळ्यातील मुसळ ध्यानात न आणता तू आपल्या भावाच्या डोळ्यातील कुसळ का पाहतोस?
42 स्वचक्षुषि या नासा विद्यते ताम् अज्ञात्वा, भ्रातस्तव नेत्रात् तृणं बहिः करोमीति वाक्यं भ्रातरं कथं वक्तुं शक्नोषि? हे कपटिन् पूर्व्वं स्वनयनात् नासां बहिः कुरु ततो भ्रातुश्चक्षुषस्तृणं बहिः कर्त्तुं सुदृष्टिं प्राप्स्यसि।
४२अथवा तू आपल्या डोळ्यातले मुसळ न पाहता आपल्या भावाला कसे म्हणशील की, भाऊ, तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे? अरे ढोंग्या, प्रथम तुझ्या डोळ्यातील मुसळ काढ मगच तुला तुझ्या भावाच्या डोळ्यातील कुसळ काढताना चांगले दिसेल.”
43 अन्यञ्च उत्तमस्तरुः कदापि फलमनुत्तमं न फलति, अनुत्तमतरुश्च फलमुत्तमं न फलति कारणादतः फलैस्तरवो ज्ञायन्ते।
४३कोणतेही चांगले झाड नाही की जे वाईट फळ देते किंवा कोणतेही वाईट झाड नाही की जे चांगले फळ देते.
44 कण्टकिपादपात् कोपि उडुम्बरफलानि न पातयति तथा शृगालकोलिवृक्षादपि कोपि द्राक्षाफलं न पातयति।
४४कारण प्रत्येक झाड हे त्याच्या फळावरुन ओळखले जाते. लोक काटेरी झुडुपातून अंजीरे गोळा करीत नाहीत तसेच काटेरी झुडुपातून ते द्राक्षे गोळा करीत नाहीत.
45 तद्वत् साधुलोकोऽन्तःकरणरूपात् सुभाण्डागाराद् उत्तमानि द्रव्याणि बहिः करोति, दुष्टो लोकश्चान्तःकरणरूपात् कुभाण्डागारात् कुत्सितानि द्रव्याणि निर्गमयति यतोऽन्तःकरणानां पूर्णभावानुरूपाणि वचांसि मुखान्निर्गच्छन्ति।
४५चांगला मनुष्य त्याच्या अंतःकरणात ज्या चांगल्या गोष्टी साठवलेल्या असतात त्याच काढतो आणि दुष्ट मनुष्य त्याच्या अंतःकरणात जे वाईट आहे तेच बाहेर काढतो कारण अंतःकरणात जे भरले आहे तेच मुखावाटे निघणार.
46 अपरञ्च ममाज्ञानुरूपं नाचरित्वा कुतो मां प्रभो प्रभो इति वदथ?
४६“तुम्ही मला ‘प्रभू, प्रभू,’ म्हणता, पण जे मी सांगतो ते तुम्ही का करीत नाही?
47 यः कश्चिन् मम निकटम् आगत्य मम कथा निशम्य तदनुरूपं कर्म्म करोति स कस्य सदृशो भवति तदहं युष्मान् ज्ञाापयामि।
४७प्रत्येकजण जो माझ्याकडे येतो व माझी वचने ऐकून त्या आज्ञा पाळतो तो कसा आहे हे मी तुम्हास दाखवितो.
48 यो जनो गभीरं खनित्वा पाषाणस्थले भित्तिं निर्म्माय स्वगृहं रचयति तेन सह तस्योपमा भवति; यत आप्लाविजलमेत्य तस्य मूले वेगेन वहदपि तद्गेहं लाडयितुं न शक्नोति यतस्तस्य भित्तिः पाषाणोपरि तिष्ठति।
४८तो एका घर बांधणाऱ्या मनुष्यासारखा आहे. त्याने खोल खोदले आणि खडकावर पाया बांधला. मग पूर आला आणि पाण्याचा लोंढा घरावर आदळला, पण पाण्याने ते हलले नाही, कारण ते चांगले बांधले होते.
49 किन्तु यः कश्चिन् मम कथाः श्रुत्वा तदनुरूपं नाचरति स भित्तिं विना मृृदुपरि गृहनिर्म्मात्रा समानो भवति; यत आप्लाविजलमागत्य वेगेन यदा वहति तदा तद्गृहं पतति तस्य महत् पतनं जायते।
४९पण जो कोणी माझी वचने ऐकतो पण ती पाळीत नाही तो ज्याने आपले घर पाया न घालता जमिनीवर बांधले त्या मनुष्यासारखा आहे, त्या घरावर पाण्याचा लोंढा आदळला आणि ते लागलेच पडले व त्या घराचा मोठा नाश झाला.”

< लूकः 6 >