< Псалтирь 119 >

1 Аллилуия. Блаженны непорочные в пути, ходящие в законе Господнем.
ज्यांचे मार्ग निर्दोष आहेत, जे परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात ते आशीर्वादित आहेत.
2 Блаженны хранящие откровения Его, всем сердцем ищущие Его.
जे त्याच्या आज्ञा प्रामाणिकपणे पाळतात, जे संपूर्ण मनाने त्याचा शोध घेतात ते आशीर्वादित आहेत.
3 Они не делают беззакония, ходят путями Его.
ते चुकीचे करीत नाहीत; ते त्याच्या मार्गात चालतात.
4 Ты заповедал повеления Твои хранить твердо.
तुझे विधी आम्ही काळजीपूर्वक पाळावे म्हणून तू आम्हास आज्ञा दिल्या आहेत.
5 О, если бы направлялись пути мои к соблюдению уставов Твоих!
मी नेहमी तुझे नियम पाळण्यासाठी माझी वागणूक व्यवस्थित असावी, हेच माझे मागणे आहे.
6 Тогда я не постыдился бы, взирая на все заповеди Твои:
मी जेव्हा तुझ्या सर्व आज्ञांचा विचार करीन तेव्हा मी कधीही लाजणार नाही.
7 я славил бы Тебя в правоте сердца, поучаясь судам правды Твоей.
मी जेव्हा तुझे न्याय्य निर्णय शिकेन, तेव्हा मी मनःपूर्वक तुला धन्यवाद देईन.
8 Буду хранить уставы Твои; не оставляй меня совсем.
मी तुझे नियम पाळीन; मला एकट्याला सोडू नकोस.
9 Как юноше содержать в чистоте путь свой? - Хранением себя по слову Твоему.
तरुण मनुष्य आपला मार्ग कशाने शुध्द राखील? तुझ्या वचनाचे पालन करण्याने.
10 Всем сердцем моим ищу Тебя; не дай мне уклониться от заповедей Твоих.
१०मी आपल्या मनापासून तुझा शोध केला आहे; तुझ्या आज्ञांपासून मला बहकू देऊ नकोस.
11 В сердце моем сокрыл я слово Твое, чтобы не грешить пред Тобою.
११मी तुझ्याविरुध्द पाप करू नये म्हणून तुझे वचन आपल्या हृदयात साठवून ठेवले आहे.
12 Благословен Ты, Господи! научи меня уставам Твоим.
१२हे परमेश्वरा, तू धन्य आहेस; मला तुझे नियम शिकव.
13 Устами моими возвещал я все суды уст Твоих.
१३मी आपल्या मुखाने तुझ्या तोंडचे सर्व योग्य निर्णय जे तू प्रकट केले ते जाहीर करीन.
14 На пути откровений Твоих я радуюсь, как во всяком богатстве.
१४तुझ्या आज्ञेच्या कराराचा मार्ग हीच माझी सर्व धनसंपत्ती असे मानून मी त्यामध्ये अत्यानंद करतो.
15 О заповедях Твоих размышляю, и взираю на пути Твои.
१५मी तुझ्या नियमांचे मनन करीन, आणि तुझ्या मार्गाकडे लक्ष देईन.
16 Уставами Твоими утешаюсь, не забываю слова Твоего.
१६मी तुझ्या नियमांनी आनंदित होईन; मी तुझे वचन विसरणार नाही.
17 Яви милость рабу Твоему, и буду жить и хранить слово Твое.
१७आपल्या सेवकावर दया कर याकरिता की; मी जिवंत रहावे, आणि तुझे वचन पाळावे.
18 Открой очи мои, и увижу чудеса закона Твоего.
१८माझे डोळे उघड म्हणजे तुझ्या नियमशास्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील.
19 Странник я на земле; не скрывай от меня заповедей Твоих.
१९मी या देशात परका आहे; तुझ्या आज्ञा माझ्यापासून लपवू नकोस.
20 Истомилась душа моя желанием судов Твоих во всякое время.
२०तुझ्या योग्य निर्णयांची सतत उत्कंठा धरल्यामुळे माझा जीव चिरडून गेला आहे.
21 Ты укротил гордых, проклятых, уклоняющихся от заповедей Твоих.
२१तू गर्विष्ठांना रागावतोस, तुझ्या आज्ञापासून भरकटतात ते शापित आहेत.
22 Сними с меня поношение и посрамление, ибо я храню откровения Твои.
२२माझ्यापासून लाज आणि मानहानी दूर कर, कारण मी तुझ्या कराराची आज्ञा पाळली आहे.
23 Князья сидят и сговариваются против меня, а раб Твой размышляет об уставах Твоих.
२३अधिपतीही माझ्याविरूद्ध कट रचतात आणि निंदा करतात, तुझा सेवक तुझ्या नियमांचे मनन करतो.
24 Откровения Твои - утешение мое, и уставы Твои - советники мои.
२४तुझ्या कराराची आज्ञा मला आनंददायी आहे, आणि ते माझे सल्लागार आहेत.
25 Душа моя повержена в прах; оживи меня по слову Твоему.
२५माझा जीव धुळीस चिकटून आहे; आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे.
26 Объявил я пути мои, и Ты услышал меня; научи меня уставам Твоим.
२६मी तुला आपले मार्ग सांगितले आणि तू मला उत्तर दिलेस; तू मला आपले नियम शिकव.
27 Дай мне уразуметь путь повелений Твоих, и буду размышлять о чудесах Твоих.
२७मला तुझ्या विधींचा मार्ग समजावून दे. यासाठी की, मी तुझ्या आश्चर्यकारक शिक्षणाचे मनन करावे.
28 Душа моя истаевает от скорби: укрепи меня по слову Твоему.
२८माझा जीव दुःखाने गळून जातो; आपल्या वचनाने मला उचलून धर.
29 Удали от меня путь лжи, и закон Твой даруй мне.
२९असत्याचा मार्ग माझ्यापासून दूर कर; कृपाकरून तुझे नियमशास्त्र मला शिकीव.
30 Я избрал путь истины, поставил пред собою суды Твои.
३०मी विश्वासाचा मार्ग निवडला आहे; मी तुझे योग्य निर्णय आपल्यासमोर ठेवले आहेत.
31 Я прилепился к откровениям Твоим, Господи; не постыди меня.
३१मी तुझ्या कराराच्या निर्बंधास चिकटून राहिलो आहे; हे परमेश्वरा, मला लज्जित होऊ देऊ नकोस.
32 Потеку путем заповедей Твоих, когда Ты расширишь сердце мое.
३२मी तुझ्या आज्ञांच्या मार्गात धावेन, कारण तू ते करण्यास माझे हृदय विस्तारित करतोस.
33 Укажи мне, Господи, путь уставов Твоих, и я буду держаться его до конца.
३३हे परमेश्वरा, तू आपल्या नियमाचा मार्ग मला शिकव म्हणजे मी तो शेवटपर्यंत धरून राहिन.
34 Вразуми меня, и буду соблюдать закон Твой и хранить его всем сердцем.
३४मला बुद्धी दे म्हणजे मी तुझे नियमशास्त्र पाळीन; मी आपल्या अगदी मनापासून ते पाळीन.
35 Поставь меня на стезю заповедей Твоих, ибо я возжелал ее.
३५तू आपल्या आज्ञांच्या मार्गाने मला चालीव, कारण त्यामध्ये चालण्यास मला आनंद आहे.
36 Приклони сердце мое к откровениям Твоим, а не к корысти.
३६माझे मन तुझ्या कराराच्या निर्बंधाकडे असू दे, आणि अन्याय्य लाभापासून दूर कर.
37 Отврати очи мои, чтобы не видеть суеты; животвори меня на пути Твоем.
३७निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझे डोळे वळीव. मला तुझ्या मार्गात पुर्नजीवीत कर.
38 Утверди слово Твое рабу Твоему, ради благоговения пред Тобою.
३८तुझा सन्मान करणाऱ्यांना दिलेले वचन, आपल्या सेवकासंबंधाने खरे कर.
39 Отврати поношение мое, которого я страшусь, ибо суды Твои благи.
३९ज्या अपमानाची मला धास्ती वाटते ती दूर कर, कारण तुझे निर्णय उत्तम आहेत.
40 Вот, я возжелал повелений Твоих; животвори меня правдою Твоею.
४०पाहा, मला तुझ्या विधींची उत्कंठा लागली आहे. तू मला आपल्या न्यायत्वाने मला नवजीवन दे.
41 Да придут ко мне милости Твои, Господи, спасение Твое по слову Твоему,
४१हे परमेश्वरा, मला तुझे अचल प्रेम दे. तुझ्या वचनाप्रमाणे मला तुझे तारण प्राप्त होवो.
42 и я дам ответ поносящему меня, ибо уповаю на слово Твое.
४२जो माझी थट्टा करतो त्यास मला उत्तर देता येईल, कारण मी तुझ्या वचनावर विश्वास ठेवला आहे.
43 Не отнимай совсем от уст моих слова истины, ибо я уповаю на суды Твои
४३तू माझ्या मुखातून सत्य वचन काढून घेऊ नको, कारण मी तुझ्या योग्य निर्णयाची प्रतिक्षा करतो.
44 и буду хранить закон Твой всегда, во веки и веки;
४४मी सदैव तुझे नियमशास्त्र, सदासर्वकाळ आणि कायम पाळीन.
45 буду ходить свободно, ибо я взыскал повелений Твоих;
४५मी सुरक्षितपणे चालेन, कारण मी तुझे निर्बंध शोधले आहेत.
46 буду говорить об откровениях Твоих пред царями и не постыжусь;
४६मी तुझ्या विधीवत आज्ञेबद्दल राजांसमोर बोलेन, आणि मी लज्जित होणार नाही.
47 буду утешаться заповедями Твоими, которые возлюбил;
४७मी तुझ्या आज्ञेत आनंद करीन, ज्या मला अतिशय प्रिय आहेत.
48 руки мои буду простирать к заповедям Твоим, которые возлюбил, и размышлять об уставах Твоих.
४८ज्या तुझ्या आज्ञा मला प्रिय आहेत, त्याकडे मी आपले हात उंचावीन; मी तुझ्या नियमांचे मनन करीन.
49 Вспомни слово Твое к рабу Твоему, на которое Ты повелел мне уповать:
४९तू आपल्या सेवकाला दिलेल्या वचनाची आठवण ठेव. कारण तू मला आशा दिली आहेस.
50 это - утешение в бедствии моем, что слово Твое оживляет меня.
५०माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की, तुझे वचन मला नवजीवन देते;
51 Гордые крайне ругались надо мною, но я не уклонился от закона Твоего.
५१गर्विष्ठांनी माझी टवाळी केली आहे, तरी मी तुझ्या नियमशास्रापासून भरकटलो नाही.
52 Вспоминал суды Твои, Господи, от века, и утешался.
५२हे परमेश्वरा, प्राचीन काळच्या तुझ्या निर्णयाविषयी मी विचार करतो, आणि मी आपले समाधान करतो.
53 Ужас овладевает мною при виде нечестивых, оставляющих закон Твой.
५३दुष्ट तुझे नियमशास्त्र नाकारतात, म्हणून संताप माझा ताबा घेतो.
54 Уставы Твои были песнями моими на месте странствований моих.
५४ज्या घरात मी तात्पुरता राहतो; तुझे नियम मला माझे गीत झाले आहेत.
55 Ночью вспоминал я имя Твое, Господи, и хранил закон Твой.
५५हे परमेश्वरा, रात्रीत मी तुझ्या नावाची आठवण करतो, आणि मी तुझे नियमशास्त्र पाळतो.
56 Он стал моим, ибо повеления Твои храню.
५६हे मी आचरिले आहे, कारण मी तुझे विधी पाळले आहेत.
57 Удел мой, Господи, сказал я, соблюдать слова Твои.
५७परमेश्वर माझा वाटा आहे; तुझे वचन पाळण्याचा मी निश्चय केला आहे.
58 Молился я Тебе всем сердцем: помилуй меня по слову Твоему.
५८मी आपल्या संपूर्ण हृदयाने तुझ्या अनुग्रहासाठी कळकळीची विनंती करतो; तुझ्या वचनाप्रमाणे माझ्यावर कृपा कर;
59 Размышлял о путях моих и обращал стопы мои к откровениям Твоим.
५९मी आपल्या मार्गाचे परीक्षण केले, आणि तुझ्या कराराकडे आपले पावली वळवीली.
60 Спешил и не медлил соблюдать заповеди Твои.
६०मी तुझ्या आज्ञा पाळण्याची घाई केली, आणि मी उशीर केला नाही.
61 Сети нечестивых окружили меня, но я не забывал закона Твоего.
६१दुष्टाच्या दोऱ्यांनी मला जाळ्यात पकडले आहे; तरी मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही.
62 В полночь вставал славословить Тебя за праведные суды Твои.
६२मी मध्यरात्री तुझ्या न्याय्य निर्णयांबद्दल तुला धन्यवाद देण्यासाठी उठतो.
63 Общник я всем боящимся Тебя и хранящим повеления Твои.
६३तुझे भय धरणाऱ्या सर्वांचा, तुझे विधी पाळणाऱ्यांचा, मी साथीदार आहे.
64 Милости Твоей, Господи, полна земля; научи меня уставам Твоим.
६४हे परमेश्वरा, तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेने सर्व पृथ्वी भरली आहे. तू आपले नियम मला शिकव.
65 Благо сотворил Ты рабу Твоему, Господи, по слову Твоему.
६५हे परमेश्वरा, तू आपल्या वचनाप्रमाणे, आपल्या सेवकाचे चांगले केले आहेस.
66 Доброму разумению и ведению научи меня, ибо заповедям Твоим я верую.
६६योग्य निर्णय घेण्याविषयीचे ज्ञान आणि बुद्धी तू मला दे, कारण तुझ्या आज्ञांवर माझा विश्वास आहे.
67 Прежде страдания моего я заблуждался; а ныне слово Твое храню.
६७पीडित होण्यापूर्वी मी बहकलो होतो, परंतु आता मी तुझे वचन पाळीत आहे.
68 Благ и благодетелен Ты, Господи; научи меня уставам Твоим.
६८तू चांगला आहेस आणि तू चांगले करतोस. मला तुझे नियम शिकव.
69 Гордые сплетают на меня ложь; я же всем сердцем буду хранить повеления Твои.
६९गर्विष्ठांनी माझ्यावर लबाडीने चिखलफेक केली आहे, पण मी तुझे विधी अगदी मनापासून पाळीन.
70 Ожирело сердце их, как тук; я же законом Твоим утешаюсь.
७०त्यांचे हृदय कठीण झाले आहे, पण मला तुझ्या नियमशास्त्रात आनंद आहे.
71 Благо мне, что я пострадал, дабы научиться уставам Твоим.
७१मी पीडित झाल्यामुळे माझे चांगले झाले; त्यामुळे, मी तुझे नियमशास्त्र शिकलो.
72 Закон уст Твоих для меня лучше тысяч золота и серебра.
७२सोने आणि रुपे ह्यांच्या हजारो तुकड्यापेक्षा, मला तुझ्या तोंडचे नियमशास्त्र अधिक मोलवान आहेत.
73 Руки Твои сотворили меня и устроили меня; вразуми меня, и научусь заповедям Твоим.
७३तुझ्या हातांनी मला निर्माण केले आणि आकार दिला; मला बुद्धी दे म्हणजे मी तुझ्या आज्ञा शिकेन.
74 Боящиеся Тебя увидят меня - и возрадуются, что я уповаю на слово Твое.
७४तुझा सन्मान करणारे मला पाहून हर्ष करतील, कारण मला तुझ्या वचनात आशा सापडली आहे.
75 Знаю, Господи, что суды Твои праведны и по справедливости Ты наказал меня.
७५हे परमेश्वरा, तुझे निर्णय न्यायानुसार आहेत हे मला माहित आहेत, आणि तुझ्या सत्यतेने मला पीडिले आहे.
76 Да будет же милость Твоя утешением моим, по слову Твоему к рабу Твоему.
७६तू आपल्या सेवकाला दिलेल्या वचनानुसार, आपल्या कराराच्या विश्वसनीयतेने सांत्वन कर.
77 Да придет ко мне милосердие Твое, и я буду жить; ибо закон Твой - утешение мое.
७७मला कळवळा दाखव यासाठी की, मी जिवंत राहीन, कारण तुझे नियमशास्त्र माझा आनंद आहे.
78 Да будут постыжены гордые, ибо безвинно угнетают меня; я размышляю о повелениях Твоих.
७८गर्विष्ठ लज्जित होवोत, कारण त्यांनी माझी निंदानालस्ती केली आहे; पण मी तुझ्या विधींचे मनन करीन;
79 Да обратятся ко мне боящиеся Тебя и знающие откровения Твои.
७९तुझा सन्मान करणारे माझ्याकडे वळोत, म्हणजे त्यांना तुझे निर्बंध कळतील.
80 Да будет сердце мое непорочно в уставах Твоих, чтобы я не посрамился.
८०मी लज्जित होऊ नये याकरिता माझे हृदय आदराने, तुझ्या निर्दोष नियमाकडे लागू दे.
81 Истаевает душа моя о спасении Твоем; уповаю на слово Твое.
८१मी तुझ्या विजयासाठी उत्कंठा धरतो; मी तुझ्या वचनावर आशा ठेवली आहे.
82 Истаевают очи мои о слове Твоем; я говорю: когда Ты утешишь меня?
८२माझे डोळे तुझे वचन पाहण्यास आसुसले आहेत; तू माझे सांत्वन कधी करशील?
83 Я стал, как мех в дыму, но уставов Твоих не забыл.
८३कारण मी धुरात ठेविलेल्या बुधलीसारखा झालो आहे; तरी मी तुझे नियम विसरलो नाही.
84 Сколько дней раба Твоего? Когда произведешь суд над гонителями моими?
८४तुझ्या सेवकाचे किती वेळ वाट पाहावी लागणार आहे? जे माझा छळ करतात. त्यांचा न्याय तू कधी करशील?
85 Яму вырыли мне гордые, вопреки закону Твоему.
८५गार्विष्ठांनी माझ्यासाठी खाचा खणून ठेविल्या आहेत, तुझे नियमशास्त्र झुगारले आहे.
86 Все заповеди Твои - истина; несправедливо преследуют меня: помоги мне;
८६तुझ्या सर्व आज्ञा विश्वसनीय आहेत; ते लोक माझा छळ अनुचितपणे करत आहेत; मला मदत कर.
87 едва не погубили меня на земле, но я не оставил повелений Твоих.
८७त्यांनी पृथ्वीवरून माझा जवळजवळ सर्वनाश केला; पण मी तुझे विधी नाकारले नाहीत.
88 По милости Твоей оживляй меня, и буду хранить откровения уст Твоих.
८८तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेने वचन दिल्याप्रमाणे मला नवजीवन दे, याकरिता की, मी तुझ्या तोंडचे निर्बंध पाळीन.
89 На веки, Господи, слово Твое утверждено на небесах;
८९हे परमेश्वरा, तुझे वचन स्वर्गात सर्वकाळ स्थिर आहे; तुझे वचन स्वर्गात ठामपणे प्रस्थापित आहे.
90 истина Твоя в род и род. Ты поставил землю, и она стоит.
९०तुझी सत्यता सदासर्वदा सर्व पिढ्यानपिढ्यासाठी आहे; तू पृथ्वीची स्थापना केलीस आणि म्हणून ती टिकून राहते.
91 По определениям Твоим все стоит доныне, ибо все служит Тебе.
९१त्या सर्व गोष्टी आजपर्यंत, तुझ्या निर्णयात म्हटल्याप्रमाणे राहिली आहेत, कारण सर्व गोष्टी तुझी सेवा करतात.
92 Если бы не закон Твой был утешением моим, погиб бы я в бедствии моем.
९२जर तुझे नियमशास्त्र माझा आनंद नसता, तर माझ्या दुःखात माझा नाश झाला असता.
93 Вовек не забуду повелений Твоих, ибо ими Ты оживляешь меня.
९३मी तुझे निर्बंध कधीच विसरणार नाही, कारण त्याद्वारे तू मला सजीव ठेवले आहे.
94 Твой я, спаси меня; ибо я взыскал повелений Твоих.
९४मी तुझाच आहे; माझा उध्दार कर. कारण मी तुझे निर्बंध शोधले आहेत.
95 Нечестивые подстерегают меня, чтобы погубить; а я углубляюсь в откровения Твои.
९५दुष्टांनी माझा नाश करायची तयारी केली आहे, पण मी तुझ्या कराराच्या निर्बंधाचा शोध घेईन.
96 Я видел предел всякого совершенства, но Твоя заповедь безмерно обширна.
९६प्रत्येकगोष्टीला त्याची मर्यादा असते हे मी पाहिले आहे, पण तुझ्या आज्ञा व्यापक, मर्यादे पलीकडे आहेत.
97 Как люблю я закон Твой! весь день размышляю о нем.
९७अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहेत! दिवसभर मी त्याच्यावर मनन करतो.
98 Заповедью Твоею Ты соделал меня мудрее врагов моих, ибо она всегда со мною.
९८तुझ्या आज्ञा मला माझ्या शत्रूंपेक्षा ज्ञानी करतात, कारण तुझे नियम नेहमी माझ्याजवळ आहेत.
99 Я стал разумнее всех учителей моих, ибо размышляю об откровениях Твоих.
९९माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा मला अधिक बुद्धी आहे. कारण मी तुझ्या कराराच्या निर्बंधाचे मनन करतो.
100 Я сведущ более старцев, ибо повеления Твои храню.
१००वयोवृध्दापेक्षा मला अधिक कळते; कारण मी तुझे विधी पाळतो.
101 От всякого злого пути удерживаю ноги мои, чтобы хранить слово Твое;
१०१तुझे वचन पाळावे म्हणून मी आपले पाऊल प्रत्येक वाईट मार्गापासून दूर ठेवतो. या करता, मी तुझे वचन पाळावे.
102 от судов Твоих не уклоняюсь, ибо Ты научаешь меня.
१०२मी तुझ्या निर्णयापासून दुसऱ्याबाजूला वळलो नाही, कारण तू मला शिकविले आहे.
103 Как сладки гортани моей слова Твои! лучше меда устам моим.
१०३तुझे वचन माझ्या चवीला कितीतरी गोड आहेत, होय माझ्या मुखाला मधापेक्षा गोड आहेत.
104 Повелениями Твоими я вразумлен; потому ненавижу всякий путь лжи.
१०४तुझ्या विधींच्याद्वारे मला बुद्धी प्राप्त होते; यास्तव मी प्रत्येक खोट्या मार्गाचा द्वेष करतो.
105 Слово Твое - светильник ноге моей и свет стезе моей.
१०५तुझे वचन माझ्या पावलाकरता दिवा आहे, आणि माझ्या मार्गासाठी प्रकाश आहे.
106 Я клялся хранить праведные суды Твои, и исполню.
१०६तुझे निर्णय पाळण्याची मी शपथ वाहिली आहे, व ती पक्की केली आहे.
107 Сильно угнетен я, Господи; оживи меня по слову Твоему.
१०७मी फार पीडित आहे; हे परमेश्वरा तुझ्या वचनात वचन दिल्याप्रमाणे मला जिवीत ठेव.
108 Благоволи же, Господи, принять добровольную жертву уст моих, и судам Твоим научи меня.
१०८हे परमेश्वरा, माझ्या मुखातील वचने ही स्वसंतोषाची अर्पणे समजून स्वीकार कर, आणि मला तुझे निर्णय शिकव.
109 Душа моя непрестанно в руке моей, но закона Твоего не забываю.
१०९माझे जीवन नेहमीच धोक्यात असते, तरी मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही.
110 Нечестивые поставили для меня сеть, но я не уклонился от повелений Твоих.
११०दुष्टांनी माझ्यासाठी पाश रचला आहे, पण मी तुझ्या विधीपासून भरकटलो नाही.
111 Откровения Твои я принял, как наследие на веки, ибо они веселие сердца моего.
१११तुझे निर्बंध माझे सर्वकाळचे वतन म्हणून मी स्वीकारले आहे, कारण त्याच्या योगे माझ्या मनाला आनंद होतो.
112 Я приклонил сердце мое к исполнению уставов Твоих навек, до конца.
११२तुझे नियम सर्वकाळ शेवटपर्यंत पाळण्याकडे मी आपले मन लाविले आहे.
113 Вымыслы человеческие ненавижу, а закон Твой люблю.
११३परमेश्वरा, जे लोक तुझ्याशी पूर्णपणे प्रामाणिक नाहीत त्या लोकांचा मी तिरस्कार करतो, पण मला तुझी शिकवण आवडते.
114 Ты покров мой и щит мой; на слово Твое уповаю.
११४मला लपव आणि माझे रक्षण कर. परमेश्वरा, तू जे काही सांगतोस त्यावर माझा विश्वास आहे.
115 Удалитесь от меня, беззаконные, и буду хранить заповеди Бога моего.
११५वाईट करणाऱ्यांनो माझ्यापासून दूर जा, यासाठी की, मी आपल्या देवाच्या आज्ञा पाळीन.
116 Укрепи меня по слову Твоему, и буду жить; не посрами меня в надежде моей;
११६तू आपल्या वचनानुसार मला आधार दे म्हणजे मी जगेन, आणि माझ्या आशा लज्जित होऊ देऊ नकोस.
117 поддержи меня, и спасусь; и в уставы Твои буду вникать непрестанно.
११७मला आधार दे म्हणजे मी सुरक्षित राहीन; मी नेहमीच तुझ्या नियमांवर मनन करीन.
118 Всех, отступающих от уставов Твоих, Ты низлагаешь, ибо ухищрения их - ложь.
११८तुझ्या नियमापासून बहकले आहेत त्यांना तू नाकारतोस, कारण हे लोक फसवणारे आणि अविश्वसनीय आहेत.
119 Как изгарь, отметаешь Ты всех нечестивых земли; потому я возлюбил откровения Твои.
११९पृथ्वीवरील सर्व दुष्टांना तू गाळाप्रमाणे दूर करतो; म्हणून मी तुझ्या विधीवत करारावर प्रेम करतो.
120 Трепещет от страха Твоего плоть моя, и судов Твоих я боюсь.
१२०तुझ्या भितीने माझे शरीर थरथरते, आणि तुझ्या न्याय्य निर्णयाची भिती वाटते.
121 Я совершал суд и правду; не предай меня гонителям моим.
१२१मी जे योग्य आहे आणि चांगले आहे तेच करतो; माझा छळ करणाऱ्याकडे मला सोडून देऊ नको.
122 Заступи раба Твоего ко благу его, чтобы не угнетали меня гордые.
१२२तू आपल्या सेवकाच्या कल्याणार्थ जामीन हो. गर्विष्ठांना मला जाचू देऊ नकोस.
123 Истаевают очи мои, ожидая спасения Твоего и слова правды Твоей.
१२३तू सिद्ध केलेल्या तारणाची व तुझ्या न्याय्य वचनाची प्रतिक्षा करून माझे डोळे थकले आहेत.
124 Сотвори с рабом Твоим по милости Твоей, и уставам Твоим научи меня.
१२४तुझ्या सेवकाला कराराची विश्वसनियता दाखव आणि मला तुझे नियम शिकव.
125 Я раб Твой: вразуми меня, и познаю откровения Твои.
१२५मी तुझा सेवक आहे, मला तुझ्या कराराच्या निर्बंधाचे ज्ञान व्हावे म्हणून मला बुद्धी दे.
126 Время Господу действовать: закон Твой разорили.
१२६ही वेळ परमेश्वराच्या कार्याची आहे, कारण लोकांनी तुझे नियमशास्त्र मोडले आहे.
127 А я люблю заповеди Твои более золота, и золота чистого.
१२७खरोखर मी तुझ्या आज्ञा सोन्यापेक्षा, बावनकशी सोन्यापेक्षा प्रिय मानतो.
128 Все повеления Твои - все признаю справедливыми; всякий путь лжи ненавижу.
१२८यास्तव मी काळजी पूर्वक तुझे सर्व विधी पाळतो, आणि प्रत्येक असत्य मार्गाचा द्वेष करतो.
129 Дивны откровения Твои; потому хранит их душа моя.
१२९तुझे कराराचे निर्बंध आश्चर्यकारक आहेत; म्हणूनच मी ते पाळतो.
130 Откровение слов Твоих просвещает, вразумляет простых.
१३०तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो; त्याने अशिक्षितास ज्ञान प्राप्त होते.
131 Открываю уста мои и вздыхаю, ибо заповедей Твоих жажду.
१३१मी आपले तोंड उघडले आणि धापा टाकल्या, कारण मी तुझ्या आज्ञेची उत्कंठा धरली.
132 Призри на меня и помилуй меня, как поступаешь с любящими имя Твое.
१३२तू माझ्याकडे वळ आणि माझ्यावर दया कर, जशी तुझ्या नावावर प्रीती करणाऱ्यावर तू दया करतोस.
133 Утверди стопы мои в слове Твоем и не дай овладеть мною никакому беззаконию;
१३३तुझ्या वचनाप्रमाणे मला मार्गदर्शन कर; माझ्यावर कोणत्याही पापाची सत्ता चालू देऊ नको.
134 избавь меня от угнетения человеческого, и буду хранить повеления Твои;
१३४मनुष्याच्या जाचजुलमापासून मला मुक्त कर याकरिता की, मी तुझे विधी पाळीन.
135 осияй раба Твоего светом лица Твоего и научи меня уставам Твоим.
१३५तू आपला मुखप्रकाश आपल्या सेवकावर पाड, आणि तुझे नियम मला शिकव.
136 Из глаз моих текут потоки вод оттого, что не хранят закона Твоего.
१३६माझ्या डोळ्यातून अश्रूंचे प्रवाह खाली वाहतात; कारण लोक तुझे नियमशास्त्र पाळत नाहीत.
137 Праведен Ты, Господи, и справедливы суды Твои.
१३७हे परमेश्वरा, तू न्यायी आहेस, आणि तुझे निर्णय योग्य आहेत.
138 Откровения Твои, которые Ты заповедал, - правда и совершенная истина.
१३८तू आपले निर्बंध न्याय्य व पूर्ण विश्वसनीय असे लावून दिले आहेत.
139 Ревность моя снедает меня, потому что мои враги забыли слова Твои.
१३९रागाने माझा नाश केला आहे, कारण माझे शत्रू तुझे वचन विसरले आहेत.
140 Слово Твое весьма чисто, и раб Твой возлюбил его.
१४०तुझ्या वचनाची खूपच पारख झाली आहे, आणि ते तुझ्या सेवकाला प्रिय आहे.
141 Мал я и презрен, но повелений Твоих не забываю.
१४१मी उपेक्षणीय आणि तुच्छ मानलेला आहे, तरी मी तुझे विधी विसरत नाही.
142 Правда Твоя - правда вечная, и закон Твой - истина.
१४२तुझे न्याय्यत्व हे सर्वकाळ योग्य आहे, आणि नियमशास्त्र सत्य आहे.
143 Скорбь и горесть постигли меня; заповеди Твои - утешение мое.
१४३मला खूप संकट आणि क्लेशांनी घेरिले आहे, तरी तुझ्या आज्ञांत मला आनंद आहे.
144 Правда откровений Твоих вечна: вразуми меня, и буду жить.
१४४तुझ्या कराराचे निर्बंध सर्वकाळ न्याय्य आहेत; मला बुद्धी दे म्हणजे मी जगेन.
145 Взываю всем сердцем моим: услышь меня, Господи, - и сохраню уставы Твои.
१४५मी संपूर्ण मनापासून तुला हाक मारतो, हे परमेश्वरा, मला उत्तर दे, मी तुझे नियम पाळीन.
146 Призываю Тебя: спаси меня, и буду хранить откровения Твои.
१४६मी तुला हाक मारतो; तू मला तार आणि मी तुझे कराराचे नियम पाळीन.
147 Предваряю рассвет и взываю; на слово Твое уповаю.
१४७मी उजडण्यापूर्वी पहाटेस उठतो आणि मदतीसाठी आरोळी मारतो. तुझ्या वचनात माझी आशा आहे.
148 Очи мои предваряют утреннюю стражу, чтобы мне углубляться в слово Твое.
१४८तुझ्या वचनावर चिंतन करण्यासाठी रात्रीच्या प्रत्येक प्रहरापूर्वी माझे डोळे उघडे असतात.
149 Услышь голос мой по милости Твоей, Господи; по суду Твоему оживи меня.
१४९तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेने माझी वाणी ऐक; हे परमेश्वरा, तू आपल्या निर्णयानुसार मला जिवंत ठेव.
150 Приблизились замышляющие лукавство; далеки они от закона Твоего.
१५०जे माझा छळ करतात ते माझ्याजवळ येत आहेत, पण ते तुझ्या नियमशास्रापासून फार दूर आहेत.
151 Близок Ты, Господи, и все заповеди Твои - истина.
१५१हे परमेश्वरा, तू जवळ आहेस आणि तुझ्या सर्व आज्ञा सत्य आहेत.
152 Издавна узнал я об откровениях Твоих, что Ты утвердил их на веки.
१५२तुझ्या कराराच्या निर्बंधावरून मला पूर्वीपासून माहित आहे की, ते तू सर्वकाळासाठी स्थापिले आहेत.
153 Воззри на бедствие мое и избавь меня, ибо я не забываю закона Твоего.
१५३माझे दु: ख पाहा आणि मला मदत कर, कारण मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही.
154 Вступись в дело мое и защити меня; по слову Твоему оживи меня.
१५४तू माझा वाद चालव आणि माझा उद्धार कर. तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे.
155 Далеко от нечестивых спасение, ибо они уставов Твоих не ищут.
१५५दुष्टपासून तारण फार दूर आहे, कारण त्यांना तुझे नियम प्रिय नाहीत.
156 Много щедрот Твоих, Господи; по суду Твоему оживи меня.
१५६हे परमेश्वरा, तुझी करुणा थोर आहे, तू आपल्या निर्णयास अनुसरुन मला नवजीवन दे.
157 Много у меня гонителей и врагов, но от откровений Твоих я не удаляюсь.
१५७मला छळणारे माझे शत्रू पुष्कळ आहेत, तरी मी तुझ्या कराराच्या निर्बंधापासून मागे वळलो नाही.
158 Вижу отступников, и сокрушаюсь, ибо они не хранят слова Твоего.
१५८विश्वासघातक्यांना पाहून मला वीट आला आहे. कारण ते तुझे वचन पाळीत नाहीत.
159 Зри, как я люблю повеления Твои; по милости Твоей, Господи, оживи меня.
१५९तुझ्या विधींना मी किती प्रिय मानितो ते पाहा; हे परमेश्वरा, तुझ्या वचनाप्रमाणे कराराच्या विश्वसनीयतेने मला जिवंत ठेव.
160 Основание слова Твоего истинно, и вечен всякий суд правды Твоей.
१६०तुझ्या वचनाचे मर्म सत्य आहे; तुझ्या न्यायीपणाचा प्रत्येक निर्णय सर्वकाळ आहे.
161 Князья гонят меня безвинно, но сердце мое боится слова Твоего.
१६१अधिपती विनाकारण माझ्या पाठीस लागले आहेत; तुझे वचन न पाळल्यामुळे माझे हृदय भितीने कापते.
162 Радуюсь я слову Твоему, как получивший великую прибыль.
१६२ज्याला मोठी लूट सापडली त्याच्यासारखा मला तुझ्या वचनाविषयी आनंद होतो.
163 Ненавижу ложь и гнушаюсь ею; закон же Твой люблю.
१६३मी असत्याचा द्वेष आणि तिरस्कार करतो, पण मला तुझे नियमशास्त्र प्रिय आहे.
164 Семикратно в день прославляю Тебя за суды правды Твоей.
१६४मी दिवसातून सात वेळा तुझ्या न्याय्य, निर्णयांसाठी तुझी स्तुती करतो.
165 Велик мир у любящих закон Твой, и нет им преткновения.
१६५तुझ्या नियमशास्त्रावर प्रेम करणाऱ्यास मोठी शांती असते, त्यास कसलेच अडखळण नसते.
166 Уповаю на спасение Твое, Господи, и заповеди Твои исполняю.
१६६हे परमेश्वरा, मी तुझ्या उध्दाराची वाट पाहत आहे आणि तुझ्या आज्ञा मी पाळल्या आहेत.
167 Душа моя хранит откровения Твои, и я люблю их крепко.
१६७मी तुझ्या विधीवत आज्ञांप्रमाणे वागलो, आणि मला ते अत्यंत प्रिय आहेत.
168 Храню повеления Твои и откровения Твои, ибо все пути мои пред Тобою.
१६८मी तुझे निर्बंध आणि तुझे विधीवत आज्ञा पाळल्या आहेत, कारण मी जी प्रत्येकगोष्ट केली ते सर्व तुला माहित आहे.
169 Да приблизится вопль мой пред лице Твое, Господи; по слову Твоему вразуми меня.
१६९हे परमेश्वरा, माझी मदतीसाठीची आरोळी ऐक. तू आपल्या वचनाप्रमाणे मला बुद्धी दे.
170 Да придет моление мое пред лице Твое; по слову Твоему избавь меня.
१७०माझी विनंती तुझ्यासमोर येवो; तू वचन दिल्याप्रमाणे मला मदत कर.
171 Уста мои произнесут хвалу, когда Ты научишь меня уставам Твоим.
१७१तू मला आपले नियम शिकवितोस म्हणून माझ्या मुखातून स्तुती बाहेर पडो.
172 Язык мой возгласит слово Твое, ибо все заповеди Твои праведны.
१७२माझी जीभ तुझ्या वचनाची स्तुती गावो; कारण तुझ्या सर्व आज्ञा न्याय्य आहेत.
173 Да будет рука Твоя в помощь мне, ибо я повеления Твои избрал.
१७३तुझा हात माझे साहाय्य करण्यास सिद्ध असो, कारण तुझे निर्बंध मी निवडले आहेत.
174 Жажду спасения Твоего, Господи, и закон Твой - утешение мое.
१७४हे परमेश्वरा, मी तुझ्या तारणाची उत्कंठा धरली आहे आणि तुझ्या नियमशास्त्रत मला आनंद आहे.
175 Да живет душа моя и славит Тебя, и суды Твои да помогут мне.
१७५माझा जीव वाचो म्हणजे तो तुझी स्तुती करील; तुझे निर्णय मला मदत करो.
176 Я заблудился, как овца потерянная: взыщи раба Твоего, ибо я заповедей Твоих не забыл.
१७६मी हरवलेल्या मेंढराप्रमाणे भरकटलो आहे; तू आपल्या सेवकाचा शोध कर, कारण मी तुझ्या आज्ञा विसरलो नाही.

< Псалтирь 119 >