< Hioba 18 >

1 A odpowiadając Bildad Suhytczyk rzekł:
नंतर शूहीच्या बिल्ददने उत्तर दिले आणि म्हणाला,
2 Dokądże nie uczynicie końca mowom? pomyślcie pierwej, a potem mówić będziemy.
तू तुझे बोलणे बंद कर! शांत राहा आणि लक्ष दे. आम्हास काही बोलू दे.
3 Czemuż nas poczytają jako bydło? zdajemy się mu przemierzłymi, jako sami widzicie.
आम्ही पशूसारखे आहोत असे तू का समजतोस, आम्ही का तुझ्या दृष्टीने अशुद्ध झालोत?
4 Ty, który duszę twoję tracisz w zapalczywości twojej, azaż dla ciebie będzie opuszczona ziemia, a będą przeniesione skały z miejsca swego?
रागाने स्वत: स फाडून टाकणाऱ्या, तुझ्यामुळे पृथ्वी ओस पडेल काय, किंवा खडक त्याची जागा सोडेल का?
5 Owszem, światłość niepobożnych zgaśnie, i nie będzie świeciła iskra ognia ich.
खरोखर, “दुष्ट मनुष्याचा प्रकाश नाहीसा होईल. त्याचा अग्नी पेटणे बंद होईल.
6 Światło się zaćmi w przybytku jego, i pochodnia jego nad nim zgaśnie.
त्यांच्या घरातला प्रकाश अंधकारमय होईल. त्यांच्या जवळचा दिवा विझेल.
7 Ściśnione będą kroki siły jego, a porazi go rada jego.
त्याची पाऊले पुन्हा दमदारपणे व भरभर पडणार नाहीत. तो हळुहळु चालेल आणि अशक्त बनेल. त्याच्या दुष्ट मसलती त्याचा अध: पात करतील.
8 Bo zawiodą w sieci nogi jego, i w uwikłaniu chodzić będzie.
त्याचेच पाय त्यास सापळ्यात अडकवतील. तो खडकाळ मार्गाने चालला आहे.
9 Uchwyci go sidło za piętę jego, i przemoże go łupieżca.
सापळा त्याची टाच पकडेल. त्यास घटृ पकडून ठेवेल.
10 Skryty jest w ziemi powróz jego, a samołówka jego na ścieszce.
१०जमिनीवरची दोरी त्यास जाळ्यात अडकवेल. सापळा त्याची त्याच्या मार्गातच वाट बघत असेल.
11 Zewsząd go straszyć będą strachy, a nacierać będą na nogi jego.
११दहशत चोहोबाजूंनी त्याची वाट पाहत आहे. भीती त्याच्या प्रत्येक पावलावर पाठलाग करीत आहे.
12 Wymorzy się głodem siła jego, a zginienie pogotowiu jest przy boku jego.
१२वाईट संकटे त्याच्यासाठी भुकेली आहेत. विध्वंस आणि अरिष्ट तो पडण्याचीच वाट पाहत आहेत.
13 Pożre żyły skóry jego, pożre członki jego pierworodny śmierci.
१३भयानक रोग त्याचे अवयव तोडून खाईल. खरोखर, मृत्यूचा जेष्ठ पुत्र त्याचा नाश करील.
14 Ufanie jego będzie wykorzenione z przybytku jego, a przywiedzie go do króla strachów.
१४त्याच्या घराच्या सुरक्षिततेपासून दूर नेला जाईल. त्यास भयाच्या राजापुढे हजर करण्यासाठी दूर नेले जाईल.
15 Będzie mieszkał strach w przybytku jego, chociaż nie był jego, a siarką będzie potrząśnione mieszkanie jego.
१५जे त्याचे नव्हते ते त्याच्या डेऱ्यात वास करतील त्याच्या घरात सर्वत्र जळते गंधक विखरतील.
16 Ze spodku korzeń jego uschnie, a z wierzchu będzie obcięta gałąź jego.
१६त्याची खालची मुळे सुकून जातील आणि वरच्या फांद्या मरतील.
17 Pamiątka jego zginie z ziemi, a imienia jego nie wspomną po ulicach.
१७पृथ्वीवरील लोकांस त्याची आठवण राहणार नाही. आता त्याचे नाव रसत्यावर पण कोणी घेत नाही.
18 Wypędzą go z światłości do ciemności, a z okręgu świata wyrzucą go.
१८लोक त्यास प्रकाशापासून दूर अंधारात ढकलतील. आणि त्याना या जगातून पळवून लावतील.
19 Nie będzie syn ani wnuk między ludem jego, i nikt nie pozostanie w mieszkaniach jego.
१९त्यास मुले आणि नातवंडे असणार नाहीत. तो जेथे राहतो तिथे कोणी उरणार नाही.
20 Nade dniem jego zdumiewają się potomkowie, a przodków ogarnie strach.
२०पश्चिमेकडचे लोक जेव्हा या दुष्ट मनुष्याचे काय झाले ते ऐकतील तेव्हा त्यांना धक्का बसेल. आणि पूर्वेकडचे लोक भयाने कंपित होतील.
21 Takoweć są mieszkania niezbożnego, i do tego przychodzi temu, który nie zna Boga.
२१दुष्ट मनुष्याच्या घराचे खरोखरच असे होईल. जो देवाला ओळखत नाही त्याच्याबाबतीत असेच घडेल.”

< Hioba 18 >