< Powtórzonego 25 >

1 Jeźliby się spór wszczął między stronami, a przyszliby do sądu, aby je sądzono: tedy usprawiedliwią sprawiedliwego, a niezbożnego osądzą za niezbożnego.
लोकांमध्ये वाद झाल्यास ते न्याय मागण्यासाठी आले तर न्यायाधीशांनी त्यांचा न्याय करावा. निर्दोष्याला निर्दोष ठरवावे आणि दोष्याला दोषी ठरवावे.
2 A jeźli godzien będzie bicia niepobożny, tedy każe go położyć sędzia, i każe go bić przed sobą według miary nieprawości jego, pod liczbą.
दोषी व्यक्ती फटक्यांच्या शिक्षेला पात्र ठरल्यास न्यायाधीशाने त्यास पालथे पाडावे व आपल्या समक्ष त्यास फटके मारुन घ्यावेत. फटक्यांची संख्या गुन्ह्याच्या प्रमाणात असावी.
3 Czterdzieści kroć uderzy go; więcej nie przyda, by snać, jeźliby mu nad to zadano więcej plag, nie znikczemniał brat twój przed oczyma twemi.
चाळीस फटक्यांच्यावर कोणालाही शिक्षा होऊ नये. त्याच्यापेक्षा अधिक मारल्यास तुझ्या बांधवाची तुझ्या देखत अप्रतिष्ठा होईल.
4 Nie zawiążesz gęby wołowi młócącemu.
धान्याची मळणी करताना बैलाला मुसके बांधू नका.
5 Gdyby mieszkali bracia pospołu, a zszedłby jeden z nich, nie mając syna, nie pójdzie żona onego zmarłego za męża obcego, brat jego wnijdzie do niej, a pojmie ją sobie za żonę, a prawem powinowactwa przyłączy ją sobie.
दोन भाऊ एकत्र राहत असले आणि त्यातला एक मूलबाळ व्हायच्या आधीच वारला तर त्याच्या पत्नीने कुटुंबाबाहेरच्या कोणा परपुरुषाशी लग्न करु नये. दिरानेच तिच्याशी लग्न करावे व दिराचे कर्तव्य बजावावे.
6 A pierworodny syn, którego by porodziła, nazwany będzie imieniem brata jego zmarłego, aby nie było wygładzone imię jego z Izraela.
यानंतर तिला जो पहिला मुलगा होईल त्याने तिच्या मृत पतीचे नाव पुढे चालवावे. म्हणजे त्याचे नाव इस्राएलातून पुसले जाऊ नये.
7 A jeźliby nie chciał on mąż pojąć bratowej swojej, tedy pójdzie bratowa jego do bramy przed starsze, i rzecze: Nie chce brat męża mego wzbudzić bratu swemu imienia w Izraelu, i nie chce mię prawem powinowactwa sobie przyłączyć.
त्या मृत व्यक्तीच्या भावाने आपल्या विधवा भावजयीशी लग्न करण्याचे नाकारले तर तिने गावाच्या वेशीपाशी वडीलधाऱ्या पंचांकडे जावे व सांगावे की “आपला दिर त्याच्या भावाचे नाव इस्राएलामध्ये राखायला राजी दिसत नाही. दिराच्या कर्तव्याला अनुसरुन तो माझ्याशी वागत नाही.”
8 Tedy go przyzowią starsi miasta onego, i będą mówić z nim; a stanąwszy, jeźli rzecze: Nie chcę jej pojąć,
अशावेळी वडिलांनी त्याच्या नगराच्या लोकांस बोलावून त्याच्याशी बोलावे. यावरही तो ऐकायला तयार नसेल, तिच्याशी लग्न करायला तयार नसेल
9 Przystąpi bratowa jego do niego przed oczyma starszych, a zzuje trzewik jego z nogi jego, i plunie na twarz jego, a odpowiadając rzecze: Tak się stanie mężowi, któryby nie budował domu brata swego.
तर सर्व वडिलांसमोर त्याच्यापुढे येऊन तिने त्याच्या पायातला जोडा काढावा. त्याच्या तोंडावर थुकावे आणि म्हणावे, “जो कोणी आपल्या भावाचा वंश वाढवत नाही त्याचे असेच करावे.”
10 I nazywać będą imię jego w Izraela: Dom wyzutego.
१०जोडा काढून घेतलेल्याचे घराणे, असे मग त्याचे इस्राएलात सर्वत्र नाव होईल.
11 Gdyby się powadzili z sobą dwaj jacy mężowie, a przybieżałaby żona jednego, aby wyrwała męża swego z ręki onego, co go bije, a ściągnąwszy rękę swą, uchwyciłaby go za łono jego,
११दोन पुरुषांच्या मारामारीमध्ये त्यातील एकाची पत्नी आपल्या नवऱ्याच्या मदतीसाठी मध्ये पडली असता तिने आपला हात पुढे करून मारणाऱ्याचे जननेंद्रिय पकडले,
12 Utniesz jej rękę, i nie zlituje się nad nią oko twoje.
१२तर दयामाया न दाखवता त्या स्त्रीचा हात तोडावा.
13 Nie będziesz miał w worku twoim różnych gwichtów, większego i mniejszego.
१३बनावट तराजू वापरुन लोकांची फसवणूक करु नये. वजने अति जड किंवा अति हलकी अशी तुझ्या पिशवीत नसावीत.
14 Nie będziesz też miał w domu twoim dwojakiego korca, większego i mniejszego.
१४आपल्या घरात मापे फार मोठी किंवा फार लहान असू नयेत.
15 Wagę słuszną i sprawiedliwą mieć będziesz; także korzec słuszny i sprawiedliwy mieć będziesz, aby się przedłużyły dni twoje na ziemi, którą Pan, Bóg twój, dawa tobie.
१५आपली वजने मापे अचूक आणि योग्य असावीत. म्हणजे तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेल्या प्रदेशात तुम्ही दीर्घकाळ रहाल.
16 Albowiem obrzydliwością jest Panu, Bogu twemu, każdy, który to czyni, wszelki czyniący nieprawość.
१६खोट्या वजनमापांनी लोकांची फसवणूक करणाऱ्यांचा, अनुचित वागणाऱ्यांचा तुमचा परमेश्वर देव ह्याला वीट आहे.
17 Pomnij na to, coć uczynił Amalek w drodze, kiedyście szli z Egiptu;
१७तुम्ही मिसरमधून येत असताना अमालेक येथील लोक तुमच्याशी कसे वागले ते आठवा.
18 Jakoć zabieżał drogę, a pobił ostatnie wojska twego, wszystkie mdłe, idące za tobą, gdyś ty był utrudzony i spracowany, a nie bał się Boga.
१८त्यांना देवाविषयी भीती नव्हती. तुम्ही दमले भागलेले असताना त्यांनी तुमच्यावर हल्ला केला. दमून मागे पडलेल्या तुमच्यातील दुर्बळांना त्यांनी ठार केले.
19 Przetoż, gdyć da odpocznienie Pan, Bóg twój, od wszystkich nieprzyjaciół twoich w około, w ziemi, którą Pan, Bóg twój dawa tobie w dziedzictwo, abyś ją posiadł, wygładzisz pamiątkę Amalekowę pod niebem. Nie zapominajże tego.
१९म्हणून अमालेकांची आठवण सुद्धा तुम्ही पृथ्वीच्या पाठीवरुन पुसून टाकली पाहिजे. तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेल्या प्रदेशात तुम्हास शत्रूंपासून तुझा देव परमेश्वर ह्याने तुम्हास विश्राम दिल्यावर हे अंमलात आणा. विसरू नका.

< Powtórzonego 25 >