< Matäus 18 >

1 NI auer ota tounpadak kan poto dong Iesus potoan ong: Iaduen is me pan lapalap nan wein nanlang?
त्यावेळेस शिष्य येशूकडे आले आणि त्यांनी विचारले, “स्वर्गाच्या राज्यात सर्वात महान कोण?”
2 Iesus lao kotin molipeido kisin seri amen, ap kotin kotiki ong nan pung arail,
तेव्हा त्याने एका लहान बालकाला आपल्याजवळ बोलावून त्यांच्यामध्ये उभे केले,
3 Masani: Melel I indai ong komail, ma komail sota pan wukila, wiala song en kisin seri, komail sota pan kak ko ong nan wein nanlang.
आणि म्हटले, “मी तुम्हास खरे सांगतो, तुमच्यात बदल होऊन तुम्ही बालकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही.
4 Ari, meamen pan kasapwiledi pein i, dueta kisin seri men et, i me pan lapalap nan wein nanlang.
म्हणून जो कोणी आपणाला या बालकासारखे लीन करतो तोच स्वर्गाच्या राज्यात सर्वाहून महान आहे.
5 O ma amen apwali kisin seri men due met ni ad ai, i me kin apwali ia.
आणि जो कोणी अशा एका लहान बालकाला माझ्या नावाने स्वीकारतो, तो मला स्वीकारतो.
6 A meamen me pan kamakar amen ir, me tikitik, me poson ia, a mau ong, takai en plaua eu en sali ong tapin wor a, ap kamopela nan madau wasa me lol.
परंतु जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या या लहानातील एकाला अडखळण आणील त्याच्या गळ्यात जात्याची मोठी तळी बांधून त्यास समुद्राच्या खोल पाण्यात बुडविणे हे त्याच्या हिताचे आहे.
7 Suedi ong sappa pweki a men kamakar akan, Ari so, men kamakar akan udan mia; suedi ong aramas o, me men kamakar pan tapi sang ia.
अडखळण्याच्या कारणामुळे जगाला धिक्कार असो! तरी अशा काही गोष्टी होत राहणारच, पण जे लोक या अडखळण्याला कारणीभूत होतील त्यांना फार हानीचे ठरेल.
8 A ma apali en pa om de apali en nä om pan kamakar uk, lepuke sang, o kase sang uk, pwe a mau ong uk ko ong maur ni om dangidang de sikilikil, sang om pa de nä pokon mia, ap ko ong kisiniai soutuk. (aiōnios g166)
जर तुमचा उजवा हात किंवा पाय तुम्हास पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो कापून टाका व फेकून द्या. दोन हात व दोन पाय असून सर्वकाळच्या कधीही न विझणाऱ्या अग्नीततुम्ही टाकले जाण्यापेक्षा व्यंग किंवा लंगडे होऊन सार्वकालिक जीवनात जावे जास्त बरे होईल. (aiōnios g166)
9 O ma apali en mas om pan kamakar uk, waikada sang o kase sang uk, pwe a mau ong uk, ko ong maur ni om mas pali, sang mas om pokon mia ap lokidokila nan iai en pweleko. (Geenna g1067)
जर तुमचा डोळा तुम्हास पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो उपटून फेकूनच द्या कारण एकच डोळा असला आणि तुम्हास सार्वकालिक जीवन मिळाले तर ते जास्त बरे आहे. दोन डोळ्यासह तुम्ही नरकात टाकले जाण्यापेक्षा ते जास्त बरे आहे. (Geenna g1067)
10 Kalaka, pwe komail der mamaleki amen tikitik pukat; pwe I indai ong komail, me arail tounlang kan, me mi nanlang, kin ariri Sam ai, me kotikot nanlang.
१०सावध असा. ही लहान मुले यांना कमी समजू नका कारण मी तुम्हास सांगतो की, स्वर्गात त्यांचे देवदूत माझ्या स्वर्गातील पित्याचे मुख नेहमी पाहतात.
11 Pwe Nain aramas kodon dorela, me salongalar akan.
११आणखी, जे हरवलेले त्यास तारावयास मनुष्याचा पुत्र आला आहे.”
12 Da me komail lamelame, ma aramas amen, naineki sip epuki, a amen irail pan salongala, a so pan pwilikidi duekduamen pon nana, ap kola raparapaki me salongala?
१२जर एखाद्या मनुष्याजवळ शंभर मेंढरे आहेत आणि त्यांच्यापैकी एक मेंढरू हरवले तर तो नव्याण्णव मेंढरे टेकडीवर सोडून देईल आणि ते हरवलेले एक मेंढरू शोधायला जाईल की नाही?
13 A ma a pan diar, melel I indai ong komail, a pan peren kida, me men en sang duekduamen, me sota salongalar.
१३आणि जर त्या मनुष्यास हरवलेले मेंढरू सापडले तर त्यास कधीही न हरवलेल्या नव्याण्णव मेंढरांबद्दल वाटणाऱ्या आनंदापेक्षा त्या एकासाठी जास्त आनंद होईल. असे मी तुम्हास खरे सांगतो,
14 Iduen Sam omail, me kotikot nanlang, sota kotin men, amen kisin seri pukat en salongala.
१४तशाच प्रकारे, या लहान मुलांपैकी एकाचा अगदी लहानातील लहानाचा ही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गीय पित्याची इच्छा नाही.
15 A ma ri om ol wia dip ong uk, en kelep kila i, kapung ong i dip a; ma a pan rong uk, nan koe kasapaledo ri om.
१५जर तुझा भाऊ तुझ्यावर अन्याय करील, तर जा अणि त्यास तुझ्यावर काय अन्याय झाला ते एकांतात सांग. जर त्यांने तुझे ऐकले तर त्यास आपला बंधू म्हणून परत मिळवला आहेस.
16 A ma a sota pan rong uk, ap ukada amen de riamen, pwe meakaros en mi ren saunkadede riamen de silimen.
१६पण जर तो किंवा ती तुझे ऐकत नसेल तर एकाला किंवा दोघांना तुझ्याबरोबर घे, यासाठी की जे काही झाले त्याविषयी साक्ष द्यायला दोन किंवा तीन जण तेथे असतील,
17 A ma a kang rong irail, ap kaireki momodisou, a ma a pil kang rong momodisou, ap wia kin i men liki o saunopwei men.
१७जर तो मनुष्य लोकांचेही ऐकणार नाही तर मंडळीलाही गोष्ट कळव. जर तो मनुष्य मंडळीचेही ऐकणार नाही, तर मग तो तुला परराष्ट्रीय किंवा एखाद्या जकातदारासारखा समज.
18 Melel I indai ong komail, me komail pan saliedi nin sappa, pan salidi nanlang, o me komail pan lapwada nin sappa, pan lapwada nanlang.
१८मी तुम्हास खरे सांगतो, जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधले जाईल. पृथ्वीवर मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले.
19 I pil indai ong komail, ma riamen nin sappa pan minimin pene ni meakot, me re men poeki, a pan pwai ong ira sang Sam ai, me kotikot nanlang.
१९तसेच मी तुम्हास खरे सांगतो की, जर पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघांचे कोणत्याही गोष्टीविषयी एकमत झाले तर त्याकरता एकत्रित होऊन विनंती करतील तर ती. माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल;
20 Pwe wasa kis, me riamen de silimen pokon pena ni ad ai, i wasa I kin mi nan pung arail.
२०कारण जिथे दोघे किंवा तिघे जर माझ्या नावाने एकत्र जमले असतील तेथे त्यांच्यांमध्ये मी आहे.
21 Petrus ap kai dong i potoan ong: Maing, pan pak depa i en makeki ong ri ai ol o, me wia dip ong ia? A itar ma a pan me isepak?
२१नंतर पेत्र येशूकडे आला आणि त्याने विचारले, “प्रभू, जर माझा भाऊ माझ्यावर अन्याय करीत राहिला तर मी त्यास किती वेळा क्षमा करावी? मी त्यास सात वेळा क्षमा करावी काय?”
22 Iesus kotin masani ong i: I indai ong uk, kaidin isepak eta, a pan pak isu wad iseisok.
२२येशूने उत्तर दिले, “मी तुला सांगतो, फक्त सातच वेळा नाही तर उलट त्याने तुझ्यावर साताच्या सत्तरवेळा अन्याय केला तरी तू त्यास क्षमा करीत राहा.”
23 I me wein nanlang rasong nanmarki amen, me pan kapukapung na ladu kan.
२३म्हणूनच स्वर्गाच्या राज्याची तुलना एका राजाशी करता येईल. आपले जे चाकर आपले देणे लागत होते त्यांच्याकडून त्या राजाने पैसे परत घेण्याचे ठरवले.
24 A ni a tapiada kapukapung, amen ap wisike dong i, me pwaipwandeki talent nen.
२४जेव्हा त्याने पैसे जमा करायला सुरूवात केली, तेव्हा एक देणेकरी ज्याच्याकडे लक्षावधी रुपयांचे कर्ज होते त्यास त्याच्याकडे आणण्यात आले.
25 A ni sota a men pwain, a monsap ap masanier, me a pan netila, o a paud, o na seri kan, o karos, me a aneki, pwen pwainda.
२५त्या देणेकऱ्याकडे राजाचे पैसे परत करण्यासाठी काहीच नव्हते, तेव्हा मालकाने आज्ञा केली की त्याला, त्याच्या पत्नीला, त्याच्या मुलांना आणि जे काही त्याच्याकडे आहे ते सर्व विकले जावे आणि जे पैसे येतील त्यातून कर्जाची परतफेड व्हावी.
26 A ladu o ap poridi mo a pongi, potoan ong: Maing kom kotin kanongama ong ia, i pan pwain ong komui karos.
२६परंतु त्या चाकराने पाया पडून, गयावया करीत म्हटले, मला थोडी सवलत द्या. जे काही मी तुमचे देणे लागतो ते तुम्हास परत करीन.
27 A monsap en ladu o ap pokela, ap lapwada o makeki ong i a pwaipwand.
२७त्या मालकाला आपल्या चाकराचा कळवळा आला, म्हणून त्याने त्या चाकराचे सर्व कर्ज माफ केले आणि त्यास सोडले.
28 A ladu ota ap koieila, diaradar kis a ladu amen, me pwaipwand ong i denar epuki; i ari koledi i, padik pena tapin wor a indada: Kapungala, ma om pwaipwand mia.
२८नंतर त्याच चाकराचे काही शंभर चांदीचे नाणे देणे लागत असलेला दुसरा एक चाकर पहिल्या चाकराला भेटला. त्याने त्या दुसऱ्या चाकराचा गळा पकडला आणि तो त्यास म्हणाला, तू माझे जे काही पैसे देणे लागतोस ते सर्व आताच्या आता दे.
29 Ladu ap poridi mo a, poeki indada: Kom kotin kanongama ong ia, i pan pwain ong komui.
२९परंतु दुसरा चाकर गुडघे टेकून गयावया करीत म्हणाला, मला थोडी सवलत द्या. जे काही पैसे मी तुम्हास देणे लागतो ते परत करीन.
30 A a kang, ap koieila, kasedi ong nan imateng lao a kapungala a pwaipwand.
३०पण पहिल्या चाकराने दुसऱ्या चाकराला सांभाळून घेण्यास साफ नकार दिला. उलट तो गेला आणि त्याने त्यास तुरूंगात टाकले. तेथे त्यास त्याचे कर्ज फिटेपर्यंत रहावे लागणार होते.
31 A kis a ladu kan lao kilanger me wiauier, rap mauk kaualap, koieila kaireki arail monsap karos, me wiauier.
३१घडलेला हा प्रकार जेव्हा दुसऱ्या चाकरांनी पाहिला तेव्हा ते फार दुःखी झाले, तेव्हा ते गेले आणि त्यांनी जे सर्व घडले होते ते मालकाला सांगितले.
32 A monsap ap ekere dong i, masani ong i: Koe meid ladu sued amen! I make ki ong uk er om pwaipwand karos pweki om poeki re i.
३२तेव्हा पहिल्या चाकराच्या मालकाने त्यास बोलावले व तो त्यास म्हणाला, “दुष्टा, तू माझे कितीतरी देणे लागत होतास, परंतु मी तुझे देणे माफ करावे अशी विनंती तू मला केलीस तेव्हा मी तुझे सर्व कर्ज माफ केले.
33 Menda koe sota kadek ong ri om ladu, duen i kin kadek ong uk er?
३३म्हणून तू तुझ्याबरोबरच्या चाकरालाही तशीच दया दाखवायची होतीस?”
34 A monsap ap makar kidar o pangalang i ren saun kalokolok lao a kapungalar a pwaipwand karusia.
३४मालक फार संतापला, शिक्षा म्हणून मालकाने पहिल्या चाकराला तुरूंगात टाकले आणि त्याने सर्व कर्ज फेडीपर्यंत त्यास तुरूंगातून सोडले नाही.
35 Iduen Sam ai nanlang, pan pil wia ong komail, ma komail sota pan makeki sang nan mongiong omail ong ri omail.
३५“जसे या राजाने केले तसेच माझा स्वर्गीय पिता तुमचे करील. तुम्ही आपल्या बंधूला मनापासून क्षमा केली नाही तर तुमचा स्वर्गीय पिताही तुम्हास क्षमा करणार नाही.”

< Matäus 18 >