< Lukas 17 >

1 A KOTIN masani ong sapwilim a tounpadak kan: Nan a sota kak, men kamakar kan en so pwaida, a suedi ong me kokido.
मग येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “ज्यामुळे लोक पाप करतील त्या येतीलच पण ज्याच्यामुळे ती येतात त्याची केवढी दुर्दशा होणार!
2 A mau ong, takai en ir plaua eu en paudoki ong ni tapin wor a, ap lokidokila nan madau, sang a kamakar amen tikitik pukat.
त्याने या लहानातील एकाला पाप करावयास लावण्यापेक्षा त्याच्या गळ्यात जात्याची तळी बांधून त्यास समुद्रात टाकावे यामध्ये त्याचे हित आहे.
3 Kalaka pein komail! Ma ri om ol wia dipi ong uk, en kapung ong i, a ma a pan kalukila, maki ong i.
स्वतःकडे लक्ष द्या! जर तुमचा भाऊ पाप करतो तर त्यास धमकावा आणि जर तो पश्चात्ताप करतो तर त्यास माफ करा.
4 A ma a wia dipi ong uk pan isepak ni ran eu o pure dong uk pan isepak indada: I kalula, koe en maki ong i!
जर तो दिवसातून सात वेळा तुझ्याविरुद्ध पाप करतो आणि सात वेळा तुझ्याकडे येतो व म्हणतो, मी पश्चात्ताप करतो, तरीही तू त्यास माफ कर.”
5 A wanporon akan potoan ong Kaun o: Re kotin kalaudela at poson!
मग प्रेषित प्रभू येशूला म्हणाले, “आमचा विश्वास वाढव.”
6 A Kaun o kotin masani: Ma omail poson laudi ong wan katiring, komail pan kak indai ong tuka pik pot et: Kaisang, kasau ong nan madau, a pan oke komail.
प्रभू येशू म्हणाला, “जर तुमचा विश्वास मोहरीच्या दाण्याएवढा असेल तर तुम्ही या तुतीच्या झाडाला म्हणू शकता, मुळासकट उपटून समुद्रात लावली जा. तर ते झाड तुमचे ऐकेल.
7 A is re omail, me a ladu men, me kin matimat o kamakamanga man akan, pan indang i ni a puredo sang matuel o: Madang kodo mondi o manga?
तुमच्यापैकी असा कोण आहे की, त्याचा नांगरणारा किंवा मेंढरे राखणारा दास शेतातून आल्यावर तो त्यास म्हणेल, ‘आत्ताच येऊन जेवायला बस.’
8 A sota pan indang i: Kaonopada me i pan manga nin sautik o, kaiada om likau, papa ia, lao i mangaer o nim, a muri koe pan manga o nim.
उलट माझे जेवण तयार कर, ‘माझे खाणेपिणे होईपर्यंत कंबर बांधून माझी सेवा कर आणि मग तू खा व पी,’ असे तो त्यास म्हणणार नाही काय?
9 De a pan danke ladu pweki a wiada, me a masani ong i? I lamelam so.
ज्या गोष्टी करण्याबद्दल तुम्ही नोकराला हुकुम करता ते केल्याबद्दल तुम्ही त्यास धन्यवाद म्हणता का?
10 Pil dueta komail, komail, lao wiadar meakan me kakaliki ong komail er, komail ap pan inda: Kit ladu mal, pwe i eta, me se wiadar, me kakalik ong kit er.
१०तुमच्या बाबतीतही तसेच आहे. जेव्हा तुम्हास करण्यास सांगितलेली सर्व कामे केल्यावर तुम्ही असे म्हणले पाहिजे, आम्ही कोणत्याही मानास लायक नसलेले नोकर आहोत आम्ही फक्त आमचे कर्तव्य केले आहे.”
11 Kadekadeo ni a kotilang Ierusalem, a kotin weid nan wein Samaria o Kaliläa.
११मग असे झाले की, तो यरूशलेम शहराकडे चालला असता, शोमरोन व गालील प्रांताच्या सीमा यांमधून गेला.
12 O ni a kotin kotilong ong nan kisin kanim eu, ol tuketuk ek tu ong i, me udi ong kaila wei.
१२तो कोणाएका खेड्यात जात असताना तेथे त्यास कुष्ठरोगाने ग्रस्त दहा पुरूष भेटले
13 Irail ngil laudeda indada: Maing Iesus, kupurai kit!
१३आणि ते दूर उभे राहून मोठमोठ्याने ओरडून म्हणाले “येशू, स्वामी, आमच्यावर दया करा,” असे बोलून त्यांनी त्याच्याकडे आरोळी केली.
14 A lao kotin masanier, ap masani ong irail: Komail koieila kasansale ong pein komail ong samero kan. Kadekadeo ni arail kokola irail kelailada.
१४जेव्हा येशूने कुष्ठरोग्यांना पाहिले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, “जा आणि स्वतःला याजकांना दाखवा.” ते याजकाकडे जात असतांनाच शुद्ध झाले,
15 A amen irail ni a kilanger me a kelailadar, ap puredo ngil laudeda, kapikapinga Kot.
१५जेव्हा त्यांच्यातील एकाने पाहिले की आपण बरे झालो आहोत तेव्हा तो परत आला व तो मोठ्याने ओरडून देवाचे गौरव करू लागला.
16 O poridi sang aluwilu a, danke i; ari, i men Samaria men.
१६तो येशूच्या पायाजवळ खाली पडला व त्याने त्यास नमन केले. तसेच त्याने त्याचे उपकार मानले. तो एक शोमरोनी होता.
17 Iesus kotin sapeng masani: Kaidin me ek, me kelailadar, a ia me duemen oko?
१७येशू त्यास म्हणाला, “दहाजण शुद्ध झाले नाहीत काय? बाकीचे नऊजण कोठे आहेत?
18 Sota me pure dong kapinga Kot, ol en liki men et eta?
१८या विदेशी मनुष्याशिवाय कोणीही देवाचे गौरव करण्यासाठी परत आला नाही काय?”
19 A masani ong i: Uda ko wei, om poson me kakel uk ada!
१९तो त्यास म्हणाला, “ऊठ आणि जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.”
20 Parisär akai lao kalelapok re a: Dokan da me wein Kot pan pwaida? A kotin sapeng masani: Nan wein Kot sota kin sansal kokodo.
२०परूश्यांनी येशूला विचारले, देवाचे राज्य केव्हा येईल, येशूने त्यांना उत्तर दिले, “देवाचे राज्य दृश्य स्वरुपात येत नाही.
21 Irail sota pan indada: Kilang met, de kilang monen, pwe kilang, wein Kot mi lol omail.
२१पाहा, ते येथे आहे किंवा तेथे आहे! असे म्हणणार नाहीत कारण देवाचे राज्य तर तुमच्यामध्ये आहे.”
22 A kotin masani ong sapwilim a tounpadak kan: Ran oko pan kodo, me komail pan men kilangada ran eu en Nain aramas, a komail sota pan kak kilang.
२२शिष्यांना तो म्हणाला, “मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या दिवसापैकी एका दिवसाची तुम्ही आतुरतेने वाट पाहाल. पण तो दिवस तुम्ही पाहू शकणार नाही, असे दिवस येतील.
23 Irail pan indai ong komail: Kilang monen, de kilang met! A der kola o der idauen ir ala!
२३आणि लोक तुम्हास म्हणतील, पाहा, तो तर येथे आहे किंवा पाहा, तो तेथे आहे, तेव्हा तुम्ही मला पाहाण्यासाठी त्यांच्यामागे जाऊ नका.
24 Pwe duen liol kin lingaling sang apali en lang lel pali teio en lang, iduen Nain aramas ni a ran o.
२४कारण जशी वीज आकाशाच्या एका सिमेपासुन दुसऱ्या सिमेपर्यंत चमकते तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे त्याच्या दिवसात होईल.
25 A mas a pan kalokolok toto o lokidokila ren di wet.
२५पण पहिल्याने त्याने खूप दुःख भोगावे व या पिढीकडून नाकारले जावे याचे अगत्य आहे.
26 O duen a wiaui ni muein Noa, iduen a pan wiaui ni ran oko en Nain aramas:
२६जसे नोहाच्या दिवसात झाले, तसेच मनुष्याच्या पुत्राच्या दिवसात पण होईल.
27 Irail manga, irail nim, irail papaud, irail kapapaud, lao lel ran en Noa a pedelong ong nan war im o, o nolik pwaida kamom ir ala karos.
२७नोहाने तारवात प्रवेश केला आणि मग महापूर आला व त्या सर्वांचा नाश झाला त्या दिवसापर्यंत ते खात होते, पीत होते, लग्न करून घेत होते आणि लग्न करुनही देत होते.
28 Pil dueta ni muein Lot: Irail manga, irail nim, irail netinet, irail sapasap, irail kauadar im,
२८त्याचप्रमाणे, लोटाच्या दिवसात झाले तसे होईलः ते खात होते, पीत होते. विकत घेत होते. विकत देत होते. लागवड करीत होते. बांधीत होते.
29 A ni ran o, me Lot koiei sang Sodom, kisiniai o swepel ap moredi sang nanlang, kame ir ala karos.
२९पण ज्या दिवशी लोट सदोम सोडून बाहेर निघाला त्यादिवशी आकाशातून आग व गंधक यांचा पाऊस पडला आणि सर्वांचा नाश केला.
30 Nan iduen a pan wiaui ni ran, me Nain aramas pan sansaledo.
३०मनुष्याचा पुत्र प्रकट होण्याच्या दिवशीही असेच घडेल
31 Ni ran o meamen mi pon im, o a kapwa mi nan im, a ender kodi ong ale. O pil dueta me mimi nan sap, i ender puredo.
३१त्यादिवशी जर एखादा छतावर असेल व त्याचे सामान घरात असेल, तर त्याने ते बाहेर काढण्यासाठी घरात जाऊ नये. त्याचप्रमाणे जो शेतात असेल त्याने परत जाऊ नये.
32 Tamatamanda en Lot a paud!
३२लोटाच्या पत्नीची आठवण करा.
33 Pwe meamen kanakanai ong maur a, pan pupe sang, a me pan kasela, nan i me pan maureta.
३३जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो आपला जीव गमवेल आणि जो कोणी आपला जीव गमावील तो त्यास वाचवील.
34 I indai ong komail, ni pong ota ol riamen pan wonon pon pet eu, amen pan peuka sang, a me teio pan mimieta.
३४मी तुम्हास सांगतो, त्या रात्री बिछान्यावर दोघे असतील, त्यांच्यामधून एक घेतला जाईल व दुसरा ठेवला जाईल.
35 Li riamen pan iris pena plaua, amen pan peuka sang, a me teio pan mimieta.
३५दोन स्त्रिया दळण करत असतील, तर त्यांपैकी एक घेतली जाईल व दुसरी ठेवली जाईल.
36 Ol riamen pan mi nan sap, amen pan peuka sang, a me teio pan mimieta.
३६शेतात दोघे असतील एकाला घेतले जाईल व दुसऱ्याला ठेवले जाईल.”
37 Irail sapeng potoan ong i: Ia Maing? A kotin masani ong irail: Wasa me man mat mi ia, nan i wasa pwin ikel pan pil pokon pena ia.
३७शिष्यांनी त्यास विचारले, कोठे प्रभू? येशूने उत्तर दिले, “जेथे प्रेत असेल तेथे गिधाडे जमतील.”

< Lukas 17 >