< ایّوب 41 >

«آیا لویاتان را با قلاب توانی کشید؟ یازبانش را با ریسمان توانی فشرد؟ ۱ 1
तुला लिव्याथानाला गळ टाकून पकडता येईल का? तुला त्याची जीभ दोरीने बांधता येईल का?
آیادر بینی او مهار توانی کشید؟ یا چانه‌اش را باقلاب توانی سفت؟ ۲ 2
तुला लिव्याथानाच्या नाकातून दोरी घालून त्यास वेसण घालता येईल का? किंवा त्याच्या जबड्यात गळ घालता येईल का?
آیا او نزد تو تضرع زیادخواهد نمود؟ یا سخنان ملایم به تو خواهدگفت؟ ۳ 3
लिव्याथान तुझ्याकडे सोडून देण्यासाठी याचना करील का? तो तुझ्याशी मृदू शब्दात बोलेल का?
آیا با تو عهد خواهد بست یا او را برای بندگی دایمی خواهی گرفت؟ ۴ 4
लिव्याथान तुझ्याशी करार करून जन्मभर तुझा दास होऊन राहील का?
آیا با او مثل گنجشک بازی توانی کرد؟ یا او را برای کنیزان خود توانی بست؟ ۵ 5
तू पक्ष्याशी जसा खेळशील तसा लिव्याथानाशी खेळशील का? तू त्यास दोरीने बांधशील का? तुझ्या मुली त्याच्याशी खेळू शकतील काय?
آیا جماعت (صیادان ) از اوداد و ستد خواهند کرد؟ یا او را در میان تاجران تقسیم خواهند نمود؟ ۶ 6
मच्छीमार तुझ्याकडून लिव्याथानाला विकत घेण्याचा प्रयत्न करतील का? ते त्याचे तुकडे करून ते व्यापाऱ्यांना विकण्याचा प्रयत्न करतील का?
آیا پوست او را با نیزه هامملو توانی کرد؟ یا سرش را با خطافهای ماهی گیران؟ ۷ 7
तू लिव्याथानाच्या कातडीत किंवा डोक्यात बरच्या फेकशील का?
اگر دست خود را بر او بگذاری جنگ را به یاد خواهی داشت و دیگر نخواهی کرد. ۸ 8
तू एकदा का लिव्याथानावर हात टाकलास तर पुन्हा तसे कधी करु शकणार नाहीस. ती कशा प्रकारची लढाई असेल याचा एकदा विचार कर.
اینک امید به او باطل است. آیا از رویتش نیز آدمی به روی درافکنده نمی شود؟ ۹ 9
तू लिव्याथानाचा पराभव करु शकशील असे तुला वाटत असेल तर ते विसरून जा. तशा आशेला जागाच नाही. त्याच्याकडे नजर टाकताच तुझी भीतीने गाळण उडेल.
کسی اینقدر متهور نیست که او را برانگیزاند. پس کیست که در حضور من بایستد؟ ۱۰ 10
१०एकही मनुष्य त्यास जागे करून त्याचा राग ओढवून घेण्याइतका शूर नाही. “माझ्याविरुध्द उभा राहणाराही कोणी नाही.
کیست که سبقت جسته، چیزی به من داده، تابه او رد نمایم؟ هرچه زیر آسمان است از آن من می‌باشد. ۱۱ 11
११मला कोणी काही प्रथम दिले नाही म्हणून मी त्यांची परत फेड करू? या नभोमंडळाखाली जे जे आहे ते सर्व माझे आहे.
«درباره اعضایش خاموش نخواهم شد و ازجبروت و جمال ترکیب او خبر خواهم داد. ۱۲ 12
१२मी तुला लिव्याथानाच्या पायांविषयी, त्याच्या शक्तीविषयी आणि त्याच्या ऐटदार बांध्याविषयी सांगेन.
کیست که روی لباس او را باز تواند نمود؟ وکیست که در میان دو صف دندانش داخل شود؟ ۱۳ 13
१३कोणीही त्याची कातडी छेदू शकत नाही. त्याची जबड्यांत कोणाला शिरता येईल?
کیست که درهای چهره‌اش را بگشاید؟ دایره دندانهایش هولناک است. ۱۴ 14
१४लिव्याथानाला त्याचा जबडा उघडायला कोणीही भाग पाडू शकत नाही. त्याच्या तोंडातल्या दातांची लोकांस भीती वाटते.
سپرهای زورآورش فخر او می‌باشد، با مهر محکم وصل شده است. ۱۵ 15
१५लिव्याथानाच्या पाठीवर ढालीसारख्या खवल्यांच्या रांगा एकमेकांना चिकटून आहेत.
با یکدیگر چنان چسبیده‌اند که باد از میان آنهانمی گذرد. ۱۶ 16
१६ते खवले एकमेकांना इतके चिकटले आहेत की त्यातून हवासुध्दा जाऊ शकत नाही.
با همدیگر چنان وصل شده‌اند و باهم ملتصقند که جدا نمی شوند. ۱۷ 17
१७त्याचे खवले एकमेकांशी घटृ बांधलेले आहेत. ते एकमेकांशी इतके घटृ बांधलेले आहेत की कोणी ते ओढून वेगळे करु शकत नाही.
از عطسه های او نور ساطع می‌گردد و چشمان او مثل پلکهای فجر است. ۱۸ 18
१८लिव्याथान जेव्हा शिंकतो तेव्हा वीज चमकल्यासारखी वाटते. त्याचे डोळे पहाटेच्या प्रकाशासारखे चमकतात.
از دهانش مشعلها بیرون می‌آید وشعله های آتش برمی جهد. ۱۹ 19
१९त्याच्या तोंडातून आगीचे लोळ बाहेर पडतात. आगीच्या ठिणग्या निघतात.
از بینی های او دودبرمی آید مثل دیگ جوشنده و پاتیل. ۲۰ 20
२०उकळत्या भांड्याखाली ठेवलेल्या जळत्या लव्हाळ्यातून निघतो तसा धूर त्याच्या नाकातून येतो.
از نفس او اخگرها افروخته می‌شود و از دهانش شعله بیرون می‌آید. ۲۱ 21
२१लिव्याथानाच्या श्वासांनी कोळसे पेटतात आणि त्याच्या तोंडातून ज्वाला बाहेर पडतात.
بر گردنش قوت نشیمن دارد، وهیبت پیش رویش رقص می‌نماید. ۲۲ 22
२२लिव्याथानाची मान मजबूत आहे. लोक त्यास घाबरतात आणि त्याच्यापासून दूर पळत सुटतात.
طبقات گوشت او بهم چسبیده است، و بر وی مستحکم است که متحرک نمی شود. ۲۳ 23
२३त्याच्या कातडीवर एकही मऊ भाग नाही ती लोखंडासाखी कठीण आहे.
دلش مثل سنگ مستحکم است، و مانند سنگ زیرین آسیا محکم می‌باشد. ۲۴ 24
२४लिव्याथानाचे हृदय पाषाणासारखे आहे. त्यास भीती वाटत नाही ते पाट्यासारखे आहे. जात्याच्या खालच्या तळीसारखे ते आहे.
چون او برمی خیزد نیرومندان هراسان می‌شوند، و از خوف بی‌خود می‌گردند. ۲۵ 25
२५लिव्याथान उठून उभा राहिला की शूर वीरही घाबरतात लिव्याथानाने त्यांची शेपटी हलवली की ते पळून जातात.
اگر شمشیر به او انداخته شود اثر نمی کند، و نه نیزه و نه مزراق و نه تیر. ۲۶ 26
२६तलवारी, भाले आणि तीर त्याच्यावर फेकले तरी ते त्यास न लागता परत येतात. त्या शस्त्रांनी त्यास काहीही इजा होत नाही.
آهن را مثل کاه می‌شمارد و برنج را مانند چوب پوسیده. ۲۷ 27
२७तो लोखाडास गवताच्या काडीसारखे मोडू शकतो कुजलेले लाकूड जसे पटकन मोडते तसे तो पितळ मोडतो.
تیرهای کمان او را فرار نمی دهد و سنگهای فلاخن نزد او به کاه مبدل می‌شود. ۲۸ 28
२८तो बाणांना घाबरुन पळून जात नाही वाळलेल्या गवताप्रमाणे दगड त्याच्यावर आपटून परत येतात.
عمود مثل کاه شمرده می‌شود و بر حرکت مزراق می‌خندد. ۲۹ 29
२९जेव्हा लाकडी गदा त्याच्यावर आपटली जाते तेव्हा त्यास ते गवत आपटल्याप्रमाणे वाटते. लोक त्याच्यावर भाले फेकतात तेव्हा तो हसतो.
در زیرش پاره های سفال تیز است و گردون پرمیخ را بر گل پهن می‌کند. ۳۰ 30
३०लिव्याथानाच्या शरीरावरची कातडी तीक्ष्ण, टणक खापरासाखी आहे. तो चिखलात कुळक फिरवल्याप्रमाणे तास पाडतो.
لجه را مثل دیگ می‌جوشاند و دریا را مانند پاتیلچه عطاران می‌گرداند. ۳۱ 31
३१लिव्याथान पाण्याला उकळी आल्याप्रमाणे हलवतो. तो त्यास उकळत्या तेलाच्या भांड्याप्रमाणे तो त्यावर बुडबुडे आणतो.
راه را در عقب خویش تابان می‌سازد به نوعی که لجه را سفیدمو گمان می‌برند. ۳۲ 32
३२लिव्याथान पोहतो तेव्हा तो आपल्यामागे मार्ग तयार करतो. तो पाणी ढवळून टाकतो आणि आपल्यामागे पांढरा फेस ठेवतो.
بر روی خاک نظیر او نیست، که بدون خوف آفریده شده باشد. ۳۳ 33
३३पृथ्वीवरचा एकही पशू लिव्याथानासारखा नाही. तो एक भीतिविरहित प्राणी आहे.
بر هرچیز بلند نظر می‌افکندو بر جمیع حیوانات سرکش پادشاه است.» ۳۴ 34
३४लिव्याथान गर्विष्ठ प्राण्याला कमी (तुच्छ) लेखतो तो सगळ्या रानटी श्वापदांचा राजा आहे. आणि मी, परमेश्वराने त्यास निर्माण केले आहे.”

< ایّوب 41 >