< ارمیا 5 >

«در کوچه های اورشلیم گردش کرده، ببینید و بفهمید و در چهارسوهایش تفتیش نمایید که آیا کسی را که به انصاف عمل نماید و طالب راستی باشد توانید یافت تا من آن رابیامرزم؟ ۱ 1
परमेश्वर म्हणतो, “यरूशलेमच्या रस्त्यावरुन धावा, सभोवती पाहा आणि या गोष्टींचा विचार करा. नगरातील चव्हाटे शोधा. सत्याचा शोध घेणारा आणि न्यायीपणाने चालणारा, असा कोणी एक मनुष्य जरी आढळला, तरी मी यरूशलेमेची क्षमा करीन.
و اگر‌چه بگویند: قسم به حیات یهوه، لیکن به دروغ قسم می‌خورند.» ۲ 2
परमेश्वर जिवंत आहे, जरी ते असे म्हणतात ती ते खोटी शपथ वाहत आहेत.”
‌ای خداوند آیا چشمان تو براستی نگران نیست؟ ایشان را زدی اما محزون نشدند. و ایشان را تلف نمودی اما نخواستند تادیب را بپذیرند. رویهای خود را از صخره سختتر گردانیدند ونخواستند بازگشت نمایند. ۳ 3
हे परमेश्वरा, तुझे डोळे सत्याकडे पाहत नाहीत काय? तू लोकांस मारलेस पण त्यांना वेदना झाल्या नाहीत. तू त्यांना पूर्णपणे पराभूत केले, तरी त्यांनी शिक्षा घेण्याचे नकारले. त्यांनी आपले मुख खडकांपेक्षा कठीण केले आहे, कारण त्यांनी पश्चातप करण्याचे नकारले आहे.
و من گفتم: «به درستی که اینان فقیرند و جاهل هستند که راه خداوند و احکام خدای خود را نمی دانند. ۴ 4
तेव्हा मी म्हणालो, “खचित ते गरिब आहेत. ते मूर्ख आहेत, कारण त्यांना परमेश्वराचा मार्ग व आपल्या देवाचा नियम माहीत नाही.
پس نزد بزرگان می‌روم و با ایشان تکلم خواهم نمودزیرا که ایشان طریق خداوند و احکام خدای خود را می‌دانند.» لیکن ایشان متفق یوغ راشکسته و بندها را گسیخته‌اند. ۵ 5
म्हणून मी महत्वाच्या लोकांकडे जाऊन त्यांना देवाचा संराष्ट्र घोषीत करीन. कारण त्यांना कमीत कमी परमेश्वराचा आपल्या देवाचा नियम तर माहीत आहे.” पण त्यांनी तर एकमताने जू मोडले आहे आणि तो साखळदंड तोडला आहे जो त्यांना देवासोबत बांधून होता.
از این جهت شیری از جنگل ایشان را خواهد کشت و گرگ بیابان ایشان را تاراج خواهد کرد و پلنگ برشهرهای ایشان در کمین خواهد نشست و هر‌که از آنها بیرون رود دریده خواهد شد، زیرا که تقصیرهای ایشان بسیار و ارتدادهای ایشان عظیم است. ۶ 6
म्हणून गर्द झाडीतून सिंह त्यांच्यावर हल्ला करेल, जंगलातील लांडगा त्यांना ठार मारील. चित्ता त्यांच्या शहराविरूद्ध येईल. जो कोणी शहरातून बाहेर जाईल तो फाडण्यात येईल. कारण त्यांची पापे बहूतपट झालीत, आणि त्यांचे अविश्वासू कृत्ये फार झाली आहेत.
«چگونه تو را برای این بیامرزم که پسرانت مرا ترک کردند و به آنچه خدا نیست قسم خوردند و چون من ایشان را سیر نمودم مرتکب زنا شدند و در خانه های فاحشه‌ها ازدحام نمودند. ۷ 7
मी या लोकांस का क्षमा करावी? तुझ्या मुलांनी माझा त्याग केला आणि त्यांनी जे देव नाही त्यांच्या शपथा वाहिल्या. मी त्यांना भरपूर खाऊ घातले, परंतू त्यांनी व्यभिचार केला आणि वारांगनेच्या घराचा मार्ग पकडला.
مثل اسبان پرورده شده مست شدند که هر یکی از ایشان برای زن همسایه خود شیهه می‌زند. ۸ 8
भरपूर खाद्य खाणाऱ्या व समागमाला तयार असणाऱ्या घोड्यांप्रमाणे ते मोकाट फिरत होते. प्रत्येक पुरुष त्याच्या शेजाऱ्याच्या पत्नीसाठी किंकाळला.
و خداوند می‌گوید: «آیا به‌سبب این کارهاعقوبت نخواهم رسانید و آیا جان من از چنین طایفه‌ای انتقام نخواهد کشید؟» ۹ 9
तेव्हा मी त्यांना शिक्षा नाही करावी काय? असे परमेश्वर म्हणतो, असल्या राष्ट्रांविषयी माझ्या अंत: करणात सूड उमटू नये का?
برحصارهایش برآیید و آنها را خراب کنید امابالکل هلاک مکنید و شاخه هایش را قطع نماییدزیرا که از آن خداوند نیستند. ۱۰ 10
१०तिच्या द्राक्षवेलींच्या माळीवर चढून जा आणि नाश कर, परंतू त्यांचा संपूर्ण नाश करु नकोस. तिच्या द्राक्षवेलीची काटछाट कर, कारण ती द्राक्षवेल परमेश्वराकडून नाही.
خداوند می‌گوید: «هر آینه خاندان اسرائیل و خاندان یهودا به من به شدت خیانت ورزیده‌اند.» ۱۱ 11
११कारण यहूदा व इस्राएल घराण्याने माझा फार विश्वासघात केला आहे, असे परमेश्वर म्हणतो.
خداوند را انکار نموده، می‌گویندکه او نیست و بلا به ما نخواهد رسید و شمشیر وقحط را نخواهیم دید. ۱۲ 12
१२त्यांनी मला नाकार दिला, ते म्हणाले; “तो खरा नाही, अरीष्ट आम्हांवर नाही येणार, किंवा आम्ही तलवार व दुष्काळ पाहणार नाही.
و انبیا باد می‌شوند وکلام در ایشان نیست پس به ایشان چنین واقع خواهد شد. ۱۳ 13
१३संदेष्टे हे पोकळ वाऱ्या प्रमाणे होतील आणि परमेश्वराचे वचन आम्हांला घोषीत करायला कोणीच नाही. त्यांच्या धमक्या त्यांच्यावरच येवो.”
بنابراین یهوه خدای صبایوت چنین می‌گوید: «چونکه این کلام را گفتید همانامن کلام خود را در دهان تو آتش و این قوم راهیزم خواهم ساخت و ایشان را خواهد سوزانید.» ۱۴ 14
१४यास्तव सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “तू हे बोलला याकारणास्तव पाहा, मी जे शब्द तुझ्या मुखात घालत आहे, ते आगीप्रमाणे असतील आणि हे लोक लाकडाप्रमाणे असतील. कारण ती आग त्यांना खाऊन टाकील.
خداوند می‌گوید: «ای خاندان اسرائیل، اینک من امتی را از دور بر شما خواهم آورد. امتی که زورآورند و امتی که قدیمند و امتی که زبان ایشان را نمی دانی و گفتار ایشان را نمی فهمی. ۱۵ 15
१५पाहा! परमेश्वर असे म्हणतो, हे इस्राएलाच्या घराण्या, मी दूरुन एक राष्ट्र आणतो, ते शक्तीशाली राष्ट्र आहे. ते प्राचीन राष्ट्र आहे. त्या राष्ट्रांतील भाषा तुला माहीत नाहीत. किंवा ते काय बोलतात ते तू समजू शकणार नाही.
ترکش ایشان قبر گشاده است و جمیع ایشان جبارند. ۱۶ 16
१६त्यांचे भाते उघड्या थडग्यांप्रमाणे आहेत. ते सर्व सैनिक आहेत.
و خرمن و نان تو را که پسران و دخترانت آن را می باید بخورند خواهند خورد و گوسفندان وگاوان تو را خواهند خورد و انگورها و انجیرهای تو را خواهند خورد و شهرهای حصاردار تو را که به آنها توکل می‌نمایی با شمشیر هلاک خواهندساخت.» ۱۷ 17
१७तुझे पीक व तुझी भाकर जी तुझ्या मुलांना व तुझ्या मुलींनी खावी ती ते खाऊन टाकतील, ते तुझी मेंढरे व तुझी गुरे ते खाऊन टाकतील. ते तुझी द्राक्षेवली आणि अंजीर झाडे खाऊन टाकतील. त्यांच्या तलवारीच्या जोरावर ते तुमच्या मजबूत शहरांचा नाश करतील, ज्याच्यावर तुम्ही विसंबून होता.”
لیکن خداوند می‌گوید: «در آن روزها نیز شما را بالکل هلاک نخواهم ساخت. ۱۸ 18
१८“पण तरीही त्या दिवसात मी तुमचा पूर्णपणे शेवट करणार नाही. असे परमेश्वर म्हणतो.
و چون شما گویید که یهوه خدای ما چراتمامی این بلاها را بر ما وارد آورده است آنگاه توبه ایشان بگو از این جهت که مرا ترک کردید وخدایان غیر را در زمین خویش عبادت نمودید. پس غریبان را در زمینی که از آن شما نباشدبندگی خواهید نمود. ۱۹ 19
१९हे असे घडणार, जेव्हा तू, इस्राएल आणि यहूदा असे म्हणेल की, आपल्या परमेश्वर देवाने आम्हासोबत या सर्व गोष्टी का केल्या? तेव्हा यिर्मया तू त्यांना असे म्हण, ‘ज्याप्रकारे तुम्ही परमेश्वरास सोडून आपल्या देशात परक्या देवांची सेवा केली, त्याचप्रकारे जो राष्ट्र तुमचा नाही त्यामध्ये तुम्ही परक्यांची सेवा कराल.”
«این را به خاندان یعقوب اخبار نمایید و به یهودا اعلان کرده، گویید ۲۰ 20
२०याकोबाच्या घराण्याला ही वार्ता कळव आणि यहूदाला हे ऐकू दे.
که‌ای قوم جاهل وبی فهم که چشم دارید اما نمی بینید و گوش داریداما نمی شنوید این را بشنوید. ۲۱ 21
२१मूर्ख लोकांनो, जे तुम्हास डोळे असून पाहत नाही व कान असून ऐकत नाही ते तुम्ही हे ऐका.
خداوندمی گوید آیا از من نمی ترسید و آیا از حضور من نمی لرزید که ریگ را به قانون جاودانی، حد دریاگذاشته‌ام که از آن نتواند گذشت و اگر‌چه امواجش متلاطم شود غالب نخواهد آمد و هرچند شورش نماید اما از آن تجاوز نمی تواندکرد؟ ۲۲ 22
२२परमेश्वर म्हणतो, तुम्ही भीत नाही काय? किंवा माझ्यापुढे तुम्ही भीतीने थरथर कापत नाही काय? मी सनातन नियमाने समुद्राच्याविरूद्ध वाळूची सीमा घातली आहे, जेणेकरून त्याने उल्लंघन करू नये. जरी समुद्र उठतो आणि खाली पडतो, तरी त्याच्याने उल्लंघवत नाही. जरी त्याच्या लाटा गर्जतात, तरी त्या ओलांडून जात नाही.
اما این قوم، دل فتنه انگیز و متمرد دارند. ایشان فتنه انگیخته و رفته‌اند. ۲۳ 23
२३पण हे लोक दुराग्रही हृदयाचे आहेत, जे बंडखोर होऊन दूर गेले आहे.
و در دلهای خودنمی گویند که از یهوه خدای خود بترسیم که باران اول و آخر را در موسمش می‌بخشد و هفته های معین حصاد را به جهت ما نگاه می‌دارد. ۲۴ 24
२४यहूदातील लोक आपल्या हृदयात म्हणत नाहीत, परमेश्वर आपला देव, जो योग्य वेळेला आगोटीचा व वळवाचा पाऊस पाडतो. आणि आमच्याकरता नेमलेले आठवडे राखतो, त्याचे भय आपण धरू या.
خطایای شما این چیزها را دور کرده و گناهان شما نیکویی را از شما منع نموده است. ۲۵ 25
२५तुमच्या अन्यायाने या गोष्टी तुमच्यापासून राखून ठेवल्या आहेत. तुमच्या पापांनी तुम्हापासून चांगले ते आवरून धरले आहे.
زیرادر میان قوم من شریران پیدا شده‌اند که مثل کمین نشستن صیادان در کمین می‌نشینند. دامها گسترانیده، مردم را صید می‌کنند. ۲۶ 26
२६कारण माझ्या लोकात काही दुष्ट मनुष्य आढळतात. दबा धरणाऱ्या फासेपारध्यांप्रमाणे ते एखद्यावर नजर ठेवतात. ते जाळे पसरतात आणि लोकांस पकडतात.
مثل قفسی که پر از پرندگان باشد، همچنین خانه های ایشان پر از فریب است و از این جهت بزرگ و دولتمندشده‌اند. ۲۷ 27
२७पक्ष्यांनी पिंजरे भरावेत तशी ह्यांची घरे कपटांनी भरलेली आहेत. म्हणून ते श्रीमंत व मोठे झाले आहेत.
فربه و درخشنده می‌شوند و در اعمال زشت هم از حد تجاوز می‌کنند. دعوی یعنی دعوی یتیمان را فیصل نمی دهند و با وجود آن کامیاب می‌شوند و فقیران را دادرسی نمی کنند. ۲۸ 28
२८ते पुष्ट झाले आहेत, स्वस्थ मनुष्यासारखे ते चकाकतात. त्यांनी दुष्टपणाची सर्व बंधने पार केली आहेत. ते लोकांच्या आणि अनाथांच्या विनंतींना समर्थन करत नाहीत. त्यांची भरभराट झाली आहे परंतू ते गरीबांचा न्याय न्यायीपणाने करत नाही.
و خداوند می‌گوید: آیا به‌سبب این کارهاعقوبت نخواهم رسانید و آیا جان من از چنین طایفه‌ای انتقام نخواهد کشید؟ ۲۹ 29
२९परमेश्वर असे म्हणतो, या गोष्टींमुळे मी त्यांना शिक्षा नाही करावी का? “अशा राष्ट्रांवर मी माझा सूड नाही उगवणार का?
امری عجیب و هولناک در زمین واقع شده است. ۳۰ 30
३०देशात अत्याचार व भयानक घटना घडल्या आहेत.
انبیا به دروغ نبوت می‌کنند و کاهنان به واسطه ایشان حکمرانی می‌نمایند و قوم من این حالت را دوست می‌دارند و شما در آخر این چه خواهید کرد؟» ۳۱ 31
३१भविष्यवादी खोटेपणाने भविष्य सांगतात, आणि याजक त्यांच्या शक्तीने अधिकार गाजवतात. ते काम ते करणार नाहीत. आणि माझ्या लोकांस हे प्रिय आहे! पण शेवटी काय होणार?”

< ارمیا 5 >