< اشعیا 19 >

وحی درباره مصر: اینک خداوند بر ابر تیزرو سوار شده، به مصر می‌آید و بتهای مصر از حضور وی خواهدلرزید و دلهای مصریان در اندرون ایشان گداخته خواهد شد. ۱ 1
मिसराविषयी घोषणा. पाहा, परमेश्वर, वेगवान मेघावर स्वार होऊन मिसराकडे येत आहे; मिसराच्या मूर्ती त्याच्यापुढे थरथरतील आणि मिसऱ्यांचे हृदय आतल्या आत वितळेल.
و مصریان را بر مصریان خواهم برانگیخت. برادر با برادر خود و همسایه باهمسایه خویش و شهر با شهر و کشور با کشورجنگ خواهند نمود. ۲ 2
देव म्हणतो, मी मिसऱ्यांना मिसराविरूद्ध चिथावेल, ते माणसे आपल्या भावाविरूद्ध, आणि आपल्या शेजाऱ्याविरूद्ध; नगर नगराविरूद्ध आणि राज्य राज्याविरूद्ध लढेल.
و روح مصر در اندرونش افسرده شده، مشورتش را باطل خواهم گردانید وایشان از بتها و فالگیران و صاحبان اجنه وجادوگران سوال خواهند نمود. ۳ 3
मिसराचा उत्साह त्याच्यामध्ये कमजोर होईल. मी त्यांचा सल्ला नष्ट करील, जरी ते मूर्तीना, मृत मनुष्याच्या आत्म्याला, व मांत्रिकाजवळ व भूतवैद्यांचा सल्ला शोधतील.
و مصریان را به‌دست آقای ستم کیش تسلیم خواهم نمود وپادشاه زورآور بر ایشان حکمرانی خواهد کرد. خداوند یهوه صبایوت چنین می‌گوید. ۴ 4
“मी मिसऱ्यांना एका कठोर धन्याच्या हातात देईन आणि एक सामर्थ्यवान राजा त्यांच्यावर राज्य करील. असे प्रभू सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
و آب از دریا (نیل ) کم شده، نهر خراب وخشک خواهد گردید. ۵ 5
समुद्राचे पाणी पूर्ण कोरडे पडेल आणि नदी आटेल व रिक्त होईल.”
و نهرها متعفن شده، جویهای ماصور کم شده می‌خشکد و نی و بوریاپژمرده خواهد شد. ۶ 6
नद्यांना दुर्गंध येईल; मिसराचे प्रवाह कमी होतील आणि सुकून जातील. बोरू व लव्हाळे सुकून जातील
و مرغزاری که بر کنار نیل وبر دهنه نیل است و همه مزرعه های نیل خشک ورانده شده و نابود خواهد گردید. ۷ 7
नीलजवळचे बोरू, नीलच्या मुखाजवळची आणि नीलजवळ सर्व पेरलेली शेते सुकून जातील, धुळीत बदलतील आणि वाऱ्याने उडून जातील.
و ماهی گیران ماتم می‌گیرند و همه آنانی که قلاب به نیل اندازندزاری می‌کنند و آنانی که دام بر روی آب گسترانند افسرده خواهند شد. ۸ 8
कोळी विलाप आणि शोक करतील व जे सर्व नील नदीत गळ टाकणारे शोक करतील त्यासारखे जे पाण्यावर जाळी पसरतात ते दुःखीत होतील.
و عاملان کتان شانه زده و بافندگان پارچه سفید خجل خواهندشد. ۹ 9
जे पिंजलेला ताग तयार करतात आणि जे पांढरे कापड विणतात ते निस्तेज होतील.
و ارکان او ساییده و جمیع مزدوران رنجیده دل خواهند شد. ۱۰ 10
१०मिसरचे वस्त्र कामगार चिरडले जातील; जे सर्व मोलासाठी काम करतात ते नाउमेद होतील.
سروران صوعن بالکل احمق می‌شوند ومشورت مشیران دانشمند فرعون وحشی می گردد. پس چگونه به فرعون می‌گویید که من پسر حکما و پسر پادشاهان قدیم می‌باشم. ۱۱ 11
११सोअनाचे सरदार पूर्णपणे मूर्ख आहेत. फारोचे शहाणे सल्लागार बुद्धिहीन झाले आहेत. तुम्ही फारोला कसे म्हणू शकता, मी ज्ञानाचा मुलगा, प्राचीन काळच्या राजाचा मुलगा आहे?
پس حکیمان تو کجایند تا ایشان تو را اطلاع دهند وبدانند که یهوه صبایوت درباره مصر چه تقدیرنموده است. ۱۲ 12
१२मग ते, तुझी सुज्ञ माणसे कोठे आहेत? तर आता त्यांनी तुला सांगावे आणि सेनाधीश परमेश्वराने मिसराबद्दल काय योजले आहे ते त्यांनी समजावे.
سروران صوعن ابله شده وسروران نوف فریب خورده‌اند و آنانی که سنگ زاویه اسباط مصر هستند آن را گمراه کرده‌اند. ۱۳ 13
१३सोअनाचे सरदार मूर्ख बनले आहेत, नोफाचे सरदार फसले आहेत; जे तिच्या गोत्राची कोनशिला असे आहेत त्यांनी मिसराला चुकीच्या मार्गाने नेले आहे.
و خداوند روح خیرگی در وسط آن آمیخته است که ایشان مصریان را در همه کارهای ایشان گمراه کرده‌اند مثل مستان که در قی خود افتان وخیزان راه می‌روند. ۱۴ 14
१४परमेश्वराने त्यांच्यामध्ये विकृतीचा आत्मा मिसळला आहे आणि जसा मद्यपी आपल्या ओकारीत लटपटत चालतो तसे त्यांनी सर्व कामात जे तिने केले, मिसराला चुकीच्या मार्गाने नेले आहे.
و مصریان را کاری نخواهد ماند که سر یا دم نخل یا بوریا بکند. ۱۵ 15
१५तेथे मिसरासाठी डोके किंवा शेपूट, झावळ्याची फांदी किंवा लव्हाळा कोणीही एक काहीच करू शकत नाही.
در آن روز اهل مصر مثل زنان می‌باشند و ازحرکت دست یهوه صبایوت که آن را بر مصر به حرکت می‌آورد لرزان و هراسان خواهند شد. ۱۶ 16
१६त्या दिवशी मिसरी बायकांसारखे होतील. ते थरथर कापतील आणि भयभीत होतील कारण सेनाधीश परमेश्वर आपला हात वर उंचावेल तो त्यांच्यावर उगारील.
و زمین یهودا باعث خوف مصر خواهد شد که هرکه ذکر آن را بشنود خواهد ترسید به‌سبب تقدیری که یهوه صبایوت بر آن مقدر نموده است. ۱۷ 17
१७यहूदाची भूमी मिसराला लटपटविण्याचे कारण होईल. जेव्हा कोणीएक तिची आठवण त्यास करून देईल, ते घाबरतील, परमेश्वराने त्यांच्याविरुद्ध जी योजना आखली आहे त्यामुळे असे होईल.
در آن روز پنج شهر در زمین مصر به زبان کنعان متکلم شده، برای یهوه صبایوت قسم خواهند خورد و یکی شهر هلاکت نامیده خواهدشد. ۱۸ 18
१८त्या दिवशी मिसर देशामध्ये पाच नगरे कनानाची भाषा बोलतील आणि ती सेनाधीश परमेश्वरापुढे एकनिष्ठतेची शपथ वाहतील. त्यातील एका नगरास सूर्याचे नगर म्हणतील.
در آن روز مذبحی برای خداوند در میان زمین مصر و ستونی نزد حدودش برای خداوندخواهد بود. ۱۹ 19
१९त्या दिवशी मिसर देशाच्या मध्ये परमेश्वरासाठी एक वेदी होईल आणि त्याच्या सीमेवर परमेश्वरासाठी एक दगडी स्तंभ होईल.
و آن آیتی و شهادتی برای یهوه صبایوت در زمین مصر خواهد بود. زیرا که نزدخداوند به‌سبب جفاکنندگان خویش استغاثه خواهد نمود و او نجات‌دهنده و حمایت کننده‌ای برای ایشان خواهد فرستاد و ایشان راخواهد رهانید. ۲۰ 20
२०ही मिसर देशात सेनाधीश परमेश्वराचे चिन्ह व साक्ष अशी होतील. कारण ते जुलूमामुळे परमेश्वराकडे जेव्हा आरोळी मारतील तेव्हा तो त्यांच्यासाठी एक तारणारा व संरक्षणकर्ता पाठवील, आणि तो त्यांना सोडवील.
و خداوند بر مصریان معروف خواهد شد و در آن روز مصریان خداوند راخواهند شناخت و با ذبایح و هدایا او را عبادت خواهند کرد و برای خداوند نذر کرده، آن را وفاخواهند نمود. ۲۱ 21
२१त्या काळी परमेश्वर मिसऱ्यांस ओळख करून देईल आणि मिसरी परमेश्वरास ओळखतील. ते यज्ञ व अर्पणासह उपासना करतील आणि बली अर्पण करतील. ते परमेश्वरास नवस करतील आणि तो पूर्ण करतील.
و خداوند مصریان را خواهدزد و به زدن شفا خواهد داد زیرا چون بسوی خداوند بازگشت نمایند ایشان را اجابت نموده، شفا خواهد داد. ۲۲ 22
२२परमेश्वर मिसराला पीडील, पीडील व बरे ही करील. ते परमेश्वराकडे परत येतील; तो त्यांची प्रार्थना ऐकेल व त्यांना बरे करील.
در آن روز شاهراهی از مصر به آشورخواهد بود و آشوریان به مصر و مصریان به آشورخواهند رفت و مصریان با آشوریان عبادت خواهند نمود. ۲۳ 23
२३त्या दिवसात मिसरातून अश्शूराकडे महामार्ग होईल आणि अश्शूरी मिसरात व मिसरी अश्शूरात येईल; आणि मिसरी अश्शूऱ्यांच्या बरोबर उपासना करतील.
در آن روز اسرائیل سوم مصر وآشور خواهد شد و آنها در میان جهان برکت خواهند بود. ۲۴ 24
२४त्या दिवसात इस्राएल मिसराशी व अश्शूराशी मिळालेला असा तिसरा सोबती होईल; तो पृथ्वीच्यामध्ये आशीर्वाद होईल.
زیرا که یهوه صبایوت آنها رابرکت داده خواهد گفت قوم من مصر و صنعت دست من آشور و میراث من اسرائیل مبارک باشند. ۲۵ 25
२५सेनाधीश परमेश्वराने त्यांना आशीर्वाद दिला. मिसर माझे लोक व अश्शूर माझ्या हातचे कृत्य व इस्राएल माझे वतन आशीर्वादीत असो.

< اشعیا 19 >