< حزقیال 46 >

خداوند یهوه چنین می‌گوید: «دروازه صحن اندرونی که به سمت مشرق متوجه است در شش روز شغل بسته بماند و درروز سبت مفتوح شود و در روز اول ماه گشاده گردد. ۱ 1
प्रभू परमेश्वर असे म्हणतो, आतल्या अंगणाचे पूर्वेकडचे दार कामाच्या सहा दिवसात बंद असेल. पण शब्बाथ व चंद्रदर्शन या दिवशी ते उघडले जाईल.
و رئیس از راه رواق دروازه بیرونی داخل شود و نزد چهار چوب دروازه بایستد و کاهنان قربانی سوختنی و ذبیحه سلامتی او را بگذرانند واو بر آستانه دروازه سجده نماید، پس بیرون بروداما دروازه تا شام بسته نشود. ۲ 2
अधिपती, त्या द्वाराच्या द्वारमंडपाच्या वाटेने बाहेरून आत येईल आणि तो द्वाराच्या खांबाजवळ उभा राहील तेव्हा याजक त्याचे होमार्मण व शांत्यर्पण करील. मग त्याने दाराच्या उंबरठ्यावरून परमेश्वरास दंडवत घालून बाहेर जावे. पण द्वार संध्याकाळपर्यंत बंद केले जाणार नाही.
و اهل زمین درسبت‌ها و هلال‌ها نزد دهنه آن دروازه به حضورخداوند سجده نمایند. ۳ 3
देशातील लोकांनी शब्बाथ व नवचंद्रदिनी या दोन दिवशी दारातूनच परमेश्वराची उपासना करावी.
و قربانی سوختنی که رئیس در روز سبت برای خداوند بگذراند، شش بره بی‌عیب و یک قوچ بی‌عیب خواهد بود. ۴ 4
शब्बाथ दिवशी अधिपतीने परमेश्वरास जे अर्पण करायचे ते सहा निर्दोष कोकरे व निर्दोष मेंढा यांचे होमार्पण असे करावे.
وهدیه آردی‌اش یک ایفا برای هر قوچ باشد وهدیه‌اش برای بره‌ها هر‌چه از دستش برآید و یک هین روغن برای هر ایفا. ۵ 5
त्याने मेंढ्यासाठी एक एफा अन्नार्पण करावे व कोकरांसाठी जसे त्यांची देण्याची इच्छा आहे तसे त्यांनी अन्नार्पण द्यावे. आणि प्रत्येक एफाबरोबर एक हीनभर तेल अर्पावे.
و در غره ماه یک گاوجوان بی‌عیب و شش بره و یک قوچ که بی‌عیب باشد. ۶ 6
नवचंद्रदिनी त्याने एक निर्दोष गोऱ्हा, सहा निर्दोष कोकरे व एक निर्दोष मेंढा अर्पण करावा.
و هدیه آردی‌اش یک ایفا برای هر گاو ویک ایفا برای هر قوچ و هر‌چه از دستش برآیدبرای بره‌ها و یک هین روغن برای هر ایفا بگذراند. ۷ 7
त्याने बैलासाठी व मेंढ्यासाठी प्रत्येकी एक एफा अन्नार्पण सिद्ध करावे. एका कोकरांसाठी त्याच्या इच्छेप्रमाणे त्याने द्यावे. आणि प्रत्येक एफाबरोबर एक हीनभर तेल अर्पावे.
و هنگامی که رئیس داخل شود از راه رواق دروازه درآید و از همان راه بیرون رود. ۸ 8
जेव्हा अधिपती दरवाजा व देवडीच्या मार्गाने आत प्रवेश करील तेव्हा त्याने त्याच मार्गाने बाहेर जावे.
وهنگامی که اهل زمین در مواسم به حضورخداوند داخل شوند، آنگاه هر‌که از راه دروازه شمالی به جهت عبادت داخل شود، از راه دروازه جنوبی بیرون رود. و هرکه از راه دروازه جنوبی داخل شود، از راه دروازه شمالی بیرون رود و ازآن دروازه که از آن داخل شده باشد، برنگرددبلکه پیش روی خود بیرون رود. ۹ 9
पण देशातले लोक नेमलेल्या सणांच्या दिवसात परमेश्वरासमोर येतील. त्यावेळी उत्तरेकडच्या दारातून आत आलेल्याने दक्षिणेकडील दारातून बाहेर जावे व दक्षिणेकडच्या दारातून आत आलेल्याने उत्तरेच्या दारातून बाहेर जावे. कोणीही आलेल्या दारानेच बाहेर जाऊ नये. तर सरळ पुढे बाहेर जावे.
و چون ایشان داخل شوند رئیس در میان ایشان داخل شود و چون بیرون روند با هم بیرون روند. ۱۰ 10
१०आणि ते प्रवेश करीत असता अधिपती त्यांच्यामध्ये आत जाईल ते बाहेर जात असता त्याने त्यांच्याबरोबर बाहेर जावे.
و هدیه آردی‌اش در عیدها و مواسم یک ایفا برای هر گاوو یک ایفا برای هر قوچ و هر‌چه از دستش برآیدبرای بره‌ها و یک هین روغن برای هر ایفا خواهدبود. ۱۱ 11
११सणांच्या आणि उत्सवाच्या दिवशी, एका गोऱ्ह्यामागे एक एफा अन्नार्पण व एक एडक्यामागे अन्नार्पण करावे. एक कोकरामागे जी काही त्याची देण्याची इच्छा असेल तसे करावे. आणि एफासाठी एक हीनभर तेल द्यावे.
و چون رئیس هدیه تبرعی را خواه قربانی سوختنی یا ذبایح سلامتی به جهت هدیه تبرعی برای خداوند بگذراند، آنگاه دروازه‌ای را که به سمت مشرق متوجه است بگشایند و او قربانی سوختنی و ذبایح سلامتی خود را بگذراند به طوری که آنها را در روز سبت می‌گذراند. پس بیرون رود و چون بیرون رفت دروازه را ببندند. ۱۲ 12
१२जेव्हा अधिपती परमेश्वरासाठी स्वसंतोषाचे अर्पण म्हणून होमबली व शांत्यर्पणे करील तेव्हा पूर्वेचे दार त्याच्यासाठी उघडावे. मग शब्बाथाच्या दिवसाप्रमाणे त्याने होमार्पणे व शात्यर्पणे करावी. मग त्याने बाहेर जावे आणि तो बाहेर गेल्यावर दार बंद करावे.
و یک بره یک ساله بی‌عیب هر روز به جهت قربانی سوختنی برای خداوند خواهی گذرانید، هر صبح آن را بگذران. ۱۳ 13
१३“परमेश्वरास रोज होमार्पण करण्यासाठी तू एक वर्षांचे निर्दोष असे कोकरु द्यावे. तू दररोज सकाळी हे करावे.
و هر بامداد هدیه آردی آن را خواهی گذرانید، یعنی یک سدس ایفا و یک ثلث هین روغن که بر آرد نرم پاشیده شود که هدیه آردی دایمی برای خداوند به فریضه ابدی خواهد بود. ۱۴ 14
१४आणि दररोज सकाळी त्याबरोबर तुम्ही अन्नार्पण द्यावे. गव्हाचे पीठ एफाचा सहावा भाग व ते नरम करण्यासाठी हीनाचा तिसरा भाग तेल, असे अन्नार्पण परमेश्वरास करावे. हा सर्वकाळचा विधी सतत चालावयाचा आहे.
پس بره و هدیه آردی‌اش و روغنش را هر صبح به جهت قربانی سوختنی دایمی خواهند گذرانید.» ۱۵ 15
१५याप्रमाणे ते रोज सकाळी निरंतरच्या होमार्पणासाठी कोकरू, अन्नार्पण व तेल रोज सकाळी सिद्ध करतील.”
خداوند یهوه چنین می‌گوید: «چون رئیس بخششی به یکی از پسران خود بدهد، حق ارثیت آن از آن پسرانش خواهد بود و ملک ایشان به رسم ارثیت خواهد بود. ۱۶ 16
१६प्रभू परमेश्वर असे म्हणतो, “जर अधिपतीने आपल्या मुलापैकी एकाला काही इनाम दिले तर ते त्याच्या वतनातले असल्यामुळे त्याच्या मुलाचे होईल. ते त्याचे वतन आहे.
لیکن اگر بخششی ازملک موروث خویش به یکی از بندگان خودبدهد، تا سال انفکاک از آن او خواهد بود، پس به رئیس راجع خواهد شد و میراث او فقط از آن پسرانش خواهد بود. ۱۷ 17
१७पण त्याने जर आपल्या वतनाचा काही भाग, आपल्या एखाद्या सेवकाला दिला, तर स्वातंत्र्याच्या वर्षापर्यंत तो त्या सेवकाचा होईल. मग तो अधिपतीकडे परत जाईल. त्याचे वतन त्याच्या मुलासच मिळेल.
و رئیس از میراث قوم نگیرد و ملک ایشان را غصب ننماید بلکه پسران خود را از ملک خویش میراث دهد تا قوم من هر کس از ملک خویش پراکنده نشوند. ۱۸ 18
१८आणि अधिपतीने लोकांचे कोणतेही वतन घेऊन त्यास घालवून देऊ नये. त्याने आपल्या मालकीच्या जमिनीचा काही भाग आपल्या मुलांना द्यावा. म्हणजे माझ्या लोकांपैकी प्रत्येक मनुष्य आपआपल्या वतनातून विखरला जाऊ नये.”
پس مرا ازمدخلی که به پهلوی دروازه بود به حجره های مقدس کاهنان که به سمت شمال متوجه بوددرآورد. و اینک در آنجا بهر دو طرف به سمت مغرب مکانی بود.» ۱۹ 19
१९मग त्या मनुष्याने मला दाराच्या जवळून पलीकडे नेले. उत्तरेकडे तोंड असलेल्या याजकाच्या पवित्र खोल्याकडे त्याने मला नेले. आणि पाहा! तेथे अगदी पश्चिमेकडे एक जागा दिसली.
و مرا گفت: «این است مکانی که کاهنان، قربانی جرم و قربانی گناه را طبخ می‌نمایند وهدیه آردی را می‌پزند تا آنها را به صحن بیرونی به جهت تقدیس نمودن قوم بیرون نیاورند.» ۲۰ 20
२०तो मला म्हणाला, “येथे याजक दोषार्पणे व पापार्पणे शिजवतील, ज्यात ते अन्नार्पण भाजतील ते हेच आहे यासाठी की, लोकांस पवित्र करायला त्यांनी ती अर्पणे घेऊन बाहेरच्या अंगणात जाऊ नये.”
پس مرا به صحن بیرونی آورد و مرا به چهار زاویه صحن گردانید و اینک در هر زاویه صحن صحنی بود. ۲۱ 21
२१मग मला त्याने बाहेरच्या अंगणात आणले आणि त्याने मला अंगणाच्या चारी कोपऱ्यात नेले. आणि पाहा! अंगणाच्या प्रत्येक कोपऱ्यात एक अंगण होते.
یعنی در چهار گوشه صحن صحنهای محوطه‌ای بود که طول هر یک چهل وعرضش سی (ذراع ) بود. این چهار را که درزاویه‌ها بود یک مقدار بود. ۲۲ 22
२२अंगणाच्या चारी कोपऱ्यात चाळीस हात लांब व तीस हात रुंदीची आवारे होती. चारी कोपरे सारख्याच मापाचे होते.
و به گرداگرد آنهابطرف آن چهار طاقها بود و مطبخ‌ها زیر آن طاقهااز هر طرفش ساخته شده بود. ۲۳ 23
२३त्यामध्ये चाऱ्हींच्या भोवताली दगडाची भिंत होती. त्या भिंतीत दगडाच्या रांगाखाली स्वयंपाकासाठी जागा केलेली होती.
و مرا گفت: «اینها مطبخ‌ها می‌باشد که خادمان خانه در آنهاذبایح قوم را طبخ می‌نمایند.» ۲۴ 24
२४तो मनुष्य मला म्हणाला, “या पाकशाला आहेत, त्यामध्ये येथे मंदिराचे सेवक लोकांकडचा यज्ञ शिजवतील.”

< حزقیال 46 >