< اول سموئیل 25 >

و سموئیل وفات نمود، و تمامی اسرائیل جمع شده، از برایش نوحه گری نمودند، و او را در خانه‌اش در رامه دفن نمودند و داود برخاسته، به بیابان فاران فرود شد. ۱ 1
शमुवेल मरण पावला तेव्हा सर्व इस्राएल लोकांनी एकत्र जमून त्याच्यासाठी शोक केला आणि त्यांनी त्यास रामा येथे त्याच्या घरात पुरले. दावीद उठून खाली पारान नावाच्या रानात गेला.
و در معون کسی بود که املاکش در کرمل بود و آن مرد بسیار بزرگ بود و سه هزار گوسفند وهزار بز داشت، و گوسفندان خود را در کرمل پشم می‌برید. ۲ 2
मावोनात एक पुरुष होता त्याची मालमत्ता कार्मेल येथे होती; तो पुरुष फार मोठा होता; त्याची तीन हजार मेंढरे व एक हजार बकरी होती; तो आपली मेंढरे कर्मेलात कातरीत होता.
و اسم آن شخص نابال بود و اسم زنش ابیجایل. و آن زن نیک فهم و خوش منظر بود. اماآن مرد سخت دل و بدرفتار و از خاندان کالیب بود. ۳ 3
त्या पुरुषाचे नाव नाबाल व त्याच्या पत्नीचे नाव अबीगईल होते; त्याची पत्नी तर बुध्दीने चांगली व सुंदर रूपवती होती परंतु तो पुरूष कठोर व वाईट चालीचा होता; तो कालेबाच्या कुळातला होता.
و داود در بیابان شنید که نابال گله خود راپشم می‌برد. ۴ 4
नाबाल आपली मेंढरे कातरीत आहे, असे दावीदाने रानात ऐकले.
پس داود ده خادم فرستاد و داود به خادمان خود گفت که «به کرمل برآیید و نزد نابال رفته، اززبان من سلامتی او را بپرسید. ۵ 5
मग दावीदाने दहा तरुणास पाठवले आणि दावीद त्या तरुणास म्हणाला, “कर्मेल येथे जा व नाबालाकडे जाऊन माझ्या नावाने त्यास सलाम करा.
و چنین گویید: زنده باش و سلامتی بر تو باد و بر خاندان تو و برهرچه داری سلامتی باشد. ۶ 6
त्या सुखी जिवाला असे म्हणा, ‘तुला शांती असो. व तुझ्या घराला शांती असो आणि जे काही तुझे आहे त्या अवघ्याला शांती असो.
و الان شنیده‌ام که پشم برندگان داری و به شبانان تو که در این اوقات نزد ما بودند، اذیت نرسانیدیم. همه روزهایی که در کرمل بودند چیزی از ایشان گم نشد. ۷ 7
तुझ्याकडे कातरणारे आहेत असे मी आता ऐकले. आताच तुझे मेंढपाळ आम्हाजवळ होते त्यांना आम्ही उपद्रव केला नाही आणि जितके दिवस ते कर्मेलात होते तितके दिवस त्यांचे काही हरवले नाही.
از خادمان خود بپرس و تو را خواهند گفت. پس خادمان در نظر تو التفات یابند زیرا که در روزسعادتمندی آمده‌ایم، تمنا اینکه آنچه دستت بیابد به بندگانت و پسرت داود بدهی.» ۸ 8
तू आपल्या तरुणास विचार म्हणजे ते तुला सांगतील; तर या तरुणावर तुझी कृपादृष्टी व्हावी कारण आम्ही चांगल्या दिवशी आलो”
پس خادمان داود آمدند و جمیع این سخنان را از زبان داود به نابال گفته، ساکت شدند. ۹ 9
मी तुला विनंती करतो जे काही तुझ्या हाताशी येईल ते तू तुझ्या दासांना व तुझा मुलगा दावीद याला दे. मग दावीदाचे तरुण येऊन या सर्व शब्दांप्रमाणे दावीदाच्या नावाने नाबालाशी बोलून शांत राहिले.
ونابال به خادمان داود جواب داده، گفت: «داودکیست و پسر یسا کیست؟ امروز بسا بندگان هریکی از آقای خویش می‌گریزند. ۱۰ 10
१०तेव्हा नाबालाने त्याच्या चाकरांना उत्तर देऊन म्हटले, “दावीद कोण आहे? इशायाचा मुलगा कोण? जे आपआपल्या धन्याला सोडून पळतात असे पुष्कळ चाकर या दिवसात आहेत.
آیا نان و آب خود را و گوشت را که برای پشم برندگان خودذبح نموده‌ام، بگیرم و به کسانی که نمی دانم از کجاهستند بدهم.» ۱۱ 11
११माझी भाकर व माझे पाणी व माझ्या मारलेल्या पशूंचे मांस जे मी आपल्या मेंढरे कातरणाऱ्यांसाठी तयार केले ते घेऊन, ही जी माणसे कोठून आली आहेत हे माला माहित नाही अशांना मी द्यावे काय?”
پس خادمان داود برگشته، مراجعت نمودند و آمده، داود را از جمیع این سخنان مخبر ساختند. ۱۲ 12
१२मग दावीदाचे तरुण आपल्या वाटेने परत गेले आणि माघारे येऊन त्यांनी हे सर्व शब्द त्यास जसेच्या तसे सांगितले.
و داود به مردان خودگفت: «هر یک از شما شمشیر خود را ببندد.» وهریک شمشیر خود را بستند، و داود نیز شمشیرخود را بست و تخمین چهارصد نفر از عقب داودرفتند، و دویست نفر نزد اسباب ماندند. ۱۳ 13
१३तेव्हा दावीद आपल्या मनुष्यांना म्हणाला, “तुम्ही आपापली तलवार कंबरेस बांधा.” मग प्रत्येकाने आपआपली तलवार कंबरेस बांधली दावीदानेही आपली तलवार कंबरेस बांधली आणि दावीदामागे सुमारे चारशे मनुष्ये वर गेली आणि दोनशे मनुष्ये सामानाजवळ राहिली.
و خادمی از خادمانش به ابیجایل، زن نابال، خبر داده، گفت: «اینک داود، قاصدان از بیابان فرستاد تا آقای مرا تحیت گویند و او ایشان رااهانت نمود. ۱۴ 14
१४नाबालाची पत्नी अबीगईल हिला चाकरातील एकाने सांगितले, “पाहा दावीदाने रानातून आमच्या धन्याला सलाम सांगायला दूत पाठवले. परंतु तो त्यांच्या अंगावर धावून गेला.
و آن مردمان احسان بسیار به مانمودند و همه روزهایی که در صحرا بودیم و باایشان معاشرت داشتیم اذیتی به ما نرسید وچیزی از ما گم نشد. ۱۵ 15
१५ती माणसे तर आम्हाशी फार चांगली वागली; त्यांनी आम्हास काही उपद्रव केला नाही; जितके दिवस आम्ही रानात त्यांच्याबरोबर राहिलो तितके दिवस आमची काही हानी झाली नाही.
و تمام روزهایی که باایشان گوسفندان را می‌چرانیدیم هم در شب وهم در روز برای ما مثل حصار بودند. ۱۶ 16
१६आम्ही त्याच्याजवळ मेंढरे राखीत होतो तितके दिवस ती आम्हांला रात्रदिवस तटबंदीसारखी होती.
پس الان بدان و ببین که چه باید بکنی زیرا که بدی برای آقای ما و تمامی خاندانش مهیاست، چونکه او به حدی پسر بلیعال است که احدی با وی سخن نتواند گفت.» ۱۷ 17
१७तर आता तू काय करणार हे समजून विचार कर कारण आमच्या धन्यावर व त्याच्या सर्व घरावर वाईट येण्याचे ठरले आहे; कारण त्याच्याशी कोणाच्याने बोलवत नाही एवढा तो वाईट आहे.”
آنگاه ابیجایل تعجیل نموده، دویست گرده نان و دو مشگ شراب و پنج گوسفند مهیا شده، وپنج کیل خوشه برشته و صد قرص کشمش ودویست قرص انجیر گرفته، آنها را بر الاغهاگذاشت. ۱۸ 18
१८अबीगईलेने घाई करून दोनशे भाकरी व द्राक्षरसाचे दोन बुधले व शिजवून तयार केलेली पाच मेंढरे व पाच मापे हुरडा व खिसमिसाचे शंभर घड व अंजिराच्या दोनशे ढेपा ही घेतली व गाढवावर लादली.
و به خادمان خود گفت: «پیش من بروید و اینک من از عقب شما می‌آیم.» اما به شوهر خود نابال هیچ خبر نداد. ۱۹ 19
१९तिने आपल्या चाकरांना म्हटले, “माझ्यापुढे चला पाहा मी तुमच्यामागून येते.” परंतु तिने आपला पती नाबाल याला काही सांगितले नाही.
و چون بر الاغ خود سوار شده، از سایه کوه به زیر می‌آمد، اینک داود و کسانش به مقابل او رسیدند و به ایشان برخورد. ۲۰ 20
२०मग असे झाले की, ती आपल्या गाढवावर बसून डोंगराच्या कडेने जात असता पाहा दावीद व त्याची माणसे समोरून येत होती आणि त्यांना ती भेटली.
و داود گفته بود: «به تحقیق که تمامی مایملک این شخص را در بیابان عبث نگاه داشتم که از جمیع اموالش چیزی گم نشد و او بدی را به عوض نیکویی به من پاداش داده است. ۲۱ 21
२१दावीदाने म्हटले होते की, “रानात त्यांचे जे होते त्या सर्वांतले हरवले नाही असे मी त्यांचे राखले ते व्यर्थ गेले; माझ्याशी बऱ्याची त्याने वाईटाने परत फेड केली आहे.
خدا به دشمنان داود چنین بلکه زیاده از این عمل نمایداگر از همه متعلقان او تا طلوع صبح ذکوری واگذارم.» ۲۲ 22
२२जे काही त्याचे आहे त्या सर्वातून एकही पुरूष जर मी सकाळ उजाडेपर्यंत राहू दिला, तर परमेश्वर दावीदाला तसे व त्यापेक्षा अधिक करो.”
و چون ابیجایل، داود را دید، تعجیل نموده، از الاغ پیاده شد و پیش داود به روی خودبه زمین افتاده، تعظیم نمود. ۲۳ 23
२३अबीगईलेने दावीदाला पाहिले तेव्हा ती लवकर गाढवा वरून उतरली आणि दावीदापुढे उपडे पडून तिने भूमीकडे नमन केले.
و نزد پایهایش افتاده، گفت: «ای آقایم این تقصیر بر من باشد وکنیزت در گوش تو سخن بگوید، و سخنان کنیزخود را بشنو. ۲۴ 24
२४तिने त्याच्या पाया पडून म्हटले, “माझ्या प्रभू अन्याय माझ्याकडे माझ्याकडेच असावा आणि मी तुम्हास विनंती करते तुमच्या दासीला तुमच्या कानी काही बोलू द्या, आणि तुम्ही आपल्या दासीचे शब्द ऐका.
و آقایم دل خود را بر این مردبلیعال، یعنی نابال مشغول نسازد، زیرا که اسمش مثل خودش است اسمش نابال است و حماقت بااوست، لیکن من کنیز تو خادمانی را که آقایم فرستاده بود، ندیدم. ۲۵ 25
२५मी तुम्हास विनंती करते, माझ्या प्रभूने त्या वाईट मनुष्यास नाबालाला मारू नये, कारण जसे त्याचे नाव तसाच आहे, त्याचे नाव नाबाल (म्हणजे मूर्ख) असे आहे. आणि त्याच्याठायी मूर्खपणच आहे. परंतु माझ्या प्रभूची तरुण माणसे जी तुम्ही पाठवली त्यांना मी तुमच्या दासीने पाहिले नाही.
و الان‌ای آقایم به حیات خداوند و به حیات جان تو چونکه خداوند تو رااز ریختن خون و از انتقام کشیدن به‌دست خودمنع نموده است، پس الان دشمنانت و جویندگان ضرر آقایم مثل نابال بشوند. ۲۶ 26
२६तर आता माझ्या प्रभू परमेश्वर जिवंत आहे आणि तुझा जीव जिवंत आहे. रक्त पाडण्याच्या दोषापासून आणि आपल्या हाताने सूड घेण्यापासून परमेश्वराने तुम्हास आवरले आहे. तर आता जे तुमचे शत्रू व जे माझ्या प्रभूचे वाईट करायला पाहतात ते नाबालासारखे होवोत.
و الان این هدیه‌ای که کنیزت برای آقای خود آورده است به غلامانی که همراه آقایم می‌روند، داده شود. ۲۷ 27
२७आता ही जी भेट तुमच्या दासीने माझ्या प्रभूकडे आणली आहे ती माझ्या प्रभूच्यामागून चालणाऱ्या तरुण मनुष्यांना द्यावी.
و تقصیر کنیز خود را عفو نما زیرا به درستی که خداوند برای آقایم خانه استوار بنا خواهد نمود، چونکه آقایم در جنگهای خداوند می‌کوشد وبدی در تمام روزهایت به تو نخواهد رسید. ۲۸ 28
२८मी तुम्हास विनंती करते, तुम्ही आपल्या दासीच्या अपराधाची क्षमा करा; कारण माझे प्रभू परमेश्वराच्या लढाया लढत आहेत, म्हणून परमेश्वर माझ्या प्रभूचे घर खरोखर स्थिर करील; आणि तुम्ही जिवंत आहात तो पर्यंत तुमच्याठाई दुष्टाई सापडणार नाही.
واگر‌چه کسی برای تعاقب تو و به قصد جانت برخیزد، اما جان آقایم در دسته حیات، نزد یهوه، خدایت، بسته خواهد شد. و اما جان دشمنانت راگویا از میان کفه فلاخن خواهد انداخت. ۲۹ 29
२९जरी मनुष्ये उठून तुमच्या पाठीस लागले व तुमचा जीव घ्यायला पाहत असले, तरी माझ्या प्रभूचा जीव परमेश्वर तुमचा देव याच्याजवळ जीवांच्या समुहात बांधलेला राहील, आणि जसे गोफणीच्या खळग्यातून फेकतात, तसे तुमच्या शत्रूंचे जीव तो गोफणीतून फेकून देईल.
وهنگامی که خداوند بر‌حسب همه احسانی که برای آقایم وعده داده است، عمل آورد، و تو راپیشوا بر اسرائیل نصب نماید. ۳۰ 30
३०असे होईल की, परमेश्वराने तुमच्यविषयी जे चांगले सांगितले आहे, ते सर्व तो माझ्या प्रभूचे करून तुम्हास इस्राएलाचा अधिपती नेमील.
آنگاه این برای تو سنگ مصادم و به جهت آقایم لغزش دل نخواهد بود که خون بی‌جهت ریخته‌ای و آقایم انتقام خود را کشیده باشد، و چون خداوند به آقایم احسان نماید آنگاه کنیز خود را بیاد آور.» ۳۱ 31
३१तेव्हा माझ्या प्रभूने विनाकारण रक्त पाडले व सूड घेतला ह्याबद्दल तुम्हास खेद होणार नाही किंवा मनाचा संताप माझ्या प्रभूला होणार नाही. आणि परमेश्वर माझ्या प्रभूचे बरे करील तेव्हा तुम्ही आपल्या दासीचे स्मरण करा.”
داود به ابیجایل گفت: «یهوه، خدای اسرائیل، متبارک باد که تو را امروز به استقبال من فرستاد. ۳۲ 32
३२तेव्हा दावीद अबीगईलेला म्हणाला, “परमेश्वर इस्राएलाचा देव ज्याने तुला आज मला भेटायला पाठवले तो धन्यवादित असो.
و حکمت تو مبارک و تو نیز مبارک باشی که امروز مرا از ریختن خون و از کشیدن انتقام خویش به‌دست خود منع نمودی. ۳۳ 33
३३तुझा बोध आशीर्वादित होवो; आज रक्त पाडण्याच्या दोषापासून आणि आपल्या हाताने सूड घेण्यापासून मला जिने आवरिले ती तू आशीर्वादित हो.
ولیکن به حیات یهوه، خدای اسرائیل، که مرا ازرسانیدن اذیت به تو منع نمود. اگر تعجیل ننموده، به استقبال من نمی آمدی البته تا طلوع صبح برای نابال ذکوری باقی نمی ماند.» ۳۴ 34
३४कारण तुझे वाईट मी करणार होतो ते ज्याने मला करू दिले नाही तो इस्राएलाचा देव परमेश्वर जिवंत आहे; जर तू मला भेटायला लवकर आली नसतीस तर खचित नाबालाचा एक पुरूष देखील सकाळ उजाडेपर्यंत जिवंत राहिला नसता.”
پس داود آنچه را که به جهت او آورده بود، از دستش پذیرفته، به او گفت: «به سلامتی به خانه ات برو وببین که سخنت را شنیده، تو را مقبول داشتم.» ۳۵ 35
३५मग जे तिने दावीदासाठी आणले होते ते त्याने तिच्या हातातून घेतले व तिला म्हटले, “तू आपल्या घरी शांतीने जा, पाहा मी तुझी वाणी ऐकली आहे आणि तुला मान्य केले आहे.”
پس ابیجایل نزد نابال برگشت و اینک اوضیافتی مثل ضیافت ملوکانه در خانه خودمی داشت و دل نابال در اندرونش شادمان بودچونکه بسیار مست بود و تا طلوع صبح چیزی کم یا زیاد به او خبر نداد. ۳۶ 36
३६मग अबीगईल नाबालाकडे आली आणि पाहा त्याने आपल्या घरी राजाच्या मेजवाणीसारखी मेजवाणी केली होती. तेव्हा नाबालाचे मन त्याच्या आत संतुष्ट होते कारण तो मद्य पिऊन फार मस्त झाला होता, म्हणून तिने पहाट उजाडेपर्यंत त्यास अधिक उणे काहीच सांगितले नाही.
و بامدادان چون شراب از نابال بیرون رفت، زنش این چیزها را به او بیان کرد و دلش در اندرونش مرده گردید و خود مثل سنگ شد. ۳۷ 37
३७मग असे झाले की, सकाळी नाबालाची नशा उतरल्यावर त्याच्या पत्नीने या गोष्टी त्यास सांगितल्या तेव्हा त्याचे मन त्याच्या आत मेल्यासारखे झाले व तो दगडासारखा झाला.
و واقع شد که بعد از ده روز خداوندنابال را مبتلا ساخت که بمرد. ۳۸ 38
३८नंतर असे झाले की, सुमारे दहा दिवसानंतर परमेश्वराने नाबालाला मारले व तो मेला.
و چون داود شنید که نابال مرده است، گفت: «مبارک باد خداوند که انتقام عار مرا ازدست نابال کشیده، و بنده خود را از بدی نگاه داشته است، زیرا خداوند شرارت نابال را به‌سرش رد نموده است و داود فرستاده، با ابیجایل سخن گفت تا او را به زنی خود بگیرد.» ۳۹ 39
३९नाबाल मेला असे दावीदाने ऐकले, तेव्हा तो म्हणाला, “ज्याने माझ्या अपमानाचा सूड नाबालावर उगवला आहे आणि ज्याने आपल्या सेवकाला वाईट करण्यापासून आवरून धरले तो परमेश्वर धन्यवादीत असो. परमेश्वराने नाबालाची दुष्टाई त्याच्याच मस्तकावर परत घातली आहे.” मग दावीदाने अबीगईलेकडे सेवकाला पाठवून तिला आपली पत्नी करण्याविषयीची गोष्ट काढली.
وخادمان داود نزد ابیجایل به کرمل آمده، با وی مکالمه کرده، گفتند: «داود ما را نزد تو فرستاده است تا تو را برای خویش به زنی بگیرد.» ۴۰ 40
४०आणि दावीदाने चाकर कर्मेलास अबीगईलेकडे येऊन तिला म्हणाले, “दावीदाने तू त्याची पत्नी व्हावे म्हणून आम्हांला तूझ्याकडे पाठवले आहे.”
و اوبرخاسته، رو به زمین خم شد و گفت: «اینک کنیزت بنده است تا پایهای خادمان آقای خود رابشوید.» ۴۱ 41
४१तेव्हा ती उठून भूमीकडे लवून नमली व म्हणाली, “पाहा तुमची दासी माझ्या प्रभूच्या चाकरांचे पाय धुवायला चाकरीण होण्यास तयार आहे.”
و ابیجایل تعجیل نموده، برخاست وبر الاغ خود سوار شد و پنج کنیزش همراهش روانه شدند و از عقب قاصدان داود رفته، زن اوشد. ۴۲ 42
४२मग अबीगईल घाई करून उठली व गाढवावर बसून निघाली आणि तिच्या पाच सख्या तिच्या मागे गेल्या; आणि ती दावीदाच्या सेवकाच्या मागून गेली आणि त्याची पत्नी झाली.
و داود اخینوعم یزرعیلیه را نیز گرفت وهردوی ایشان زن او شدند. ۴۳ 43
४३दावीदाने इज्रेलकरीण अहीनवामलाही पत्नी करून घेतले; त्या दोघीही त्याच्या स्त्रिया झाल्या.
و شاول دخترخود، میکال، زن داود را به فلطی ابن لایش که ازجلیم بود، داد. ۴۴ 44
४४शौलाने तर आपली मुलगी मीखल दावीदाची पत्नी गल्लीमातील लईशाचा मुलगा पालती याला दिली होती.

< اول سموئیل 25 >