< Romerne 3 >

1 Kva fyremun hev so jøden? eller kva gagn er det i umskjeringi?
मग यहूदी असण्यात फायदा तो काय? किंवा सुंताविधीकडून काय लाभ?
2 Mykje i alle måtar! fyrst og fremst det at Guds ord vart gjeve deim til i vareign.
सर्वबाबतीत पुष्कळच आहे. प्रथम हे की, त्यांच्यावर देवाची वचने सोपवली होती.
3 For korleis er det? um sume var utrue, skulde då deira utruskap gjera Guds truskap til inkjes?
पण काहींनी विश्वास ठेवला नाही म्हणून काय झाले? त्यांचा अविश्वास देवाचा विश्वासूपणा व्यर्थ करील काय?
4 Nei, langt ifrå! Lat det standa fast at Gud er sannordig, men kvart menneskje ein ljugar, som skrive stend: «At du må finnast rettferdig i dine ord, og vinna når du fører di sak.»
कधीच नाही! देव खरा व प्रत्येक मनुष्य खोटा ठरो. पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘तुझ्या बोलण्यात तू नीतिमान ठरावेस, आणि तुझा न्याय होत असता विजयी व्हावेस.’
5 Men um vår urettferd syner Guds rettferd, kva skal me då segja? Er vel Gud urettferdig når han fører vreiden sin yver oss? Eg talar på menneskjevis.
पण आमची अनीती जर देवाचे न्यायीपण स्थापित करते तर आम्ही काय म्हणावे? जो देव आमच्यावर आपला क्रोध आणतो तो अन्यायी आहे काय? (मी मानवी व्यवहाराप्रमाणे बोलत आहे.)
6 Nei, langt ifrå! Korleis kunde då Gud døma verdi?
कधीच नाही! असे झाले तर, देव जगाचा न्याय कसा करील?
7 Ja, men um no Guds sannleik ved mi lygn synte seg ovstor til hans æra, kvi vert då eg endå dømd som ein syndar?
कारण जर माझ्या लबाडीने देवाचा खरेपणा अधिक प्रकट होऊन त्याच्या गौरवास कारण झाले, तर माझाही पापी म्हणून न्याय का व्हावा?
8 Og skal me ikkje då - som me vert spotta for, og som sume segjer at me lærer - gjera det vonde, so det gode kann koma utav det? Rettferdig er den domen som slike fær yver seg.
आणि आपण चांगले घडावे म्हणून वाईट करू या असे का म्हणून नये? आम्ही असे सांगत असतो अशी आमची निंदा कित्येक लोक करत आहे, अशा लोकांची त्यांना यथान्याय शिक्षा आहे.
9 Kva då? Hev me nokon fyremun? Nei, slett ikkje; for me hev fyrr klaga både jødar og grækarar for at dei er under synd alle saman,
मग काय? आपण यहूदी अधिक चांगले आहोत काय? मुळीच नाही, कारण सगळे यहूदी व ग्रीक पापाखाली आहेत, असा आधीच आम्ही त्यांच्यावर आरोप केला आहे.
10 so som skrive stend: «Det finst ingen rettferdig, ikkje ein heller;
१०पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘नीतिमान कोणी नाही, एकही नाही.
11 det finst ikkje den som er vitug, det finst ikkje den som søkjer Gud.
११ज्याला समजते असा कोणी नाही, जो झटून देवाचा शोध करतो असा कोणी नाही,
12 Alle er avvikne, dei er udugande vortne alle saman; det finst ikkje nokon som gjer godt, det finst ikkje ein einaste.
१२ते सगळे बहकले आहेत, ते सगळे निरुपयोगी झाले आहेत; सत्कर्म करणारा कोणी नाही, एकही नाही.
13 Ei opna grav er strupen deira, med tungorne sine gjorde dei svik, orme-eiter er under lipporne deira.
१३त्यांचा घसा एक उघडलेले थडगे आहे. ते आपल्या जीभांनी कपट योजतात, त्यांच्या ओठांखाली सर्पाचे विष असते.
14 Deira munn er full av bannskap og beiska.
१४त्यांचे तोंड शापाने व कडूपणाने भरले आहे;
15 Deira føter er snare til å spilla blod.
१५त्यांचे पाय रक्त पाडण्यास उतावळे आहेत.
16 Øyding og usæla hev deira vegar,
१६विध्वंस व विपत्ती त्यांच्या मार्गात आहेत.
17 og freds veg kjenner dei ikkje.
१७शांतीचा मार्ग त्यांनी ओळखला नाही.
18 Ingen age for Gud dei heve for augo.»
१८त्यांच्या डोळ्यांपुढे देवाचे भय नाही.’
19 Men me veit at alt det som lovi segjer, det talar ho til deim som hev lovi, so kvar munn skal tagna og all verdi verta saka for Gud,
१९आता आपण हे जाणतो की नियमशास्त्र जे काही सांगते ते नियमशास्त्राधीन असलेल्यांस सांगते म्हणजे प्रत्येक तोंड बंद केले जावे आणि सर्व जग देवासमोर अपराधी म्हणून यावे.
20 sidan inkje kjøt kann verta rettferdiggjort for honom med lovgjerningar; for ved lovi kjem ein til å kjenna synd.
२०कारण देवाच्या दृष्टीपुढे नियमशास्त्राच्या कृतींकडून कोणीही मनुष्य नीतिमान ठरणार नाही, कारण नियमशास्त्राकडून पापाचे ज्ञान होते.
21 Men no er Guds rettferd, som lovi og profetarne vitnar um, openberra utan lovi,
२१पण नियमशास्त्राकडून व संदेष्ट्यांकडून साक्ष दिली गेल्याप्रमाणे, नियमशास्त्राशिवाय देवाचे नीतिमत्त्व, आता, प्रकट झाले आहे.
22 det vil segja Guds rettferd ved tru på Jesus Kristus for alle og yver alle som trur. For det finst inkje skil;
२२पण हे देवाचे नीतिमत्त्व येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे, विश्वास ठेवणार्‍या सर्वांसाठी आहे कारण तेथे कसलाही फरक नाही.
23 alle hev synda og vantar æra for Gud,
२३कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरले आहेत;
24 med di dei vert rettferdiggjorde ufortent av hans nåde ved utløysingi i Kristus Jesus.
२४देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामुल्य नीतिमान ठरतात.
25 Honom synte Gud fram i blodet hans, som ein nådestol ved trui, til å visa si rettferd, av di han i sitt langmod hadde havt tol med dei synder som fyrr var gjorde -
२५त्याच्या रक्ताकडून विश्वासाद्वारे प्रायश्चित्त होण्यास देवाने त्यास पुढे ठेवले, कारण देवाच्या मागे झालेल्या पापांच्या क्षमेमुळे सहनशीलपणात आणि त्याने आपले नीतिमत्त्व प्रकट करावे;
26 til å visa si rettferd i den tid som no er, so han kunde vera rettferdig og gjera den rettferdig som hev trui på Jesus.
२६त्याने या आताच्या काळात आपले नीतिमत्त्व प्रकट करावे, म्हणजे त्याने नीतिमान असावे आणि जो येशूवर विश्वास ठेवतो त्यास नीतिमान ठरविणारा व्हावे.
27 Kvar er so vår ros? Ho er utestengd. Kva lov er det ved? Gjerningslovi? Nei, ved tru-lovi.
२७मग आपला अभिमान कुठे आहे? तो बाहेर ठेवला गेला. कोणत्या नियमामुळे? कर्मांच्या काय? नाही, पण विश्वासाच्या नियमामुळे.
28 For me held fyre at menneskja vert rettferdiggjord ved tru utan lovgjerningar.
२८म्हणून, नियमशास्त्राच्या कर्मांवाचून मनुष्य विश्वासाने नीतिमान ठरतो हे आपण पाहतो.
29 Eller er Gud berre Gud for jødar? Er han ikkje Gud for heidningar og? Jau, for heidningar og,
२९किंवा देव केवळ यहूद्यांचा देव आहे काय? परराष्ट्रीयाचा नाही काय? हो, परराष्ट्रीयांचा ही आहे.
30 so sant Gud er ein, og han rettferdiggjer dei umskorne av tru, og dei u-umskorne ved tru.
३०जर सुंता झालेल्यांस विश्वासाने आणि सुंता न झालेल्यांस विश्वासाद्वारे जो नीतिमान ठरवील तो तोच एक देव आहे.
31 Gjer me då lovi um inkje med trui? Nei, langt ifrå; me stadfester lovi.
३१तर मग आपण विश्वासाद्वारे नियमशास्त्र व्यर्थ करतो काय? तसे न होवो. उलट आपण नियमशास्त्र प्रस्थापित करतो.

< Romerne 3 >