< Matteus 7 >

1 Døm ikkje, elles vert de dømde! For den domen de dømer, skal de dømast etter,
इतरांचे दोष काढू नका म्हणजे तुमचे दोष काढण्यात येणार नाहीत.
2 og det målet de mæler med, skal dei mæla åt dykk i.
कारण ज्या प्रकारे तुम्ही इतरांचे दोष काढता त्याच न्यायाने तुमचेही दोष काढले जातील आणि ज्या मापाने तुम्ही मोजून देता त्याच मापाने तुम्हास परत मोजून देण्यात येईल.
3 Kvi ser du flisi i auga åt bror din, men bjelken i ditt eige auga, den vert du ikkje var?
तू आपल्या डोळ्यातील मुसळ लक्षात न घेता आपल्या भावाच्या डोळ्यातील कुसळ का पाहतोस?
4 Eller korleis kann du segja til bror din: Kom, lat meg taka flisi ut or auga ditt! og sjå, det sit ein bjelke i ditt eige auga!
अथवा ‘तुझ्या डोळ्यांतले कुसळ मला काढू दे’ असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील? पाहा, तुझ्या स्वतःच्या डोळ्यात तर मुसळ आहे.
5 Din hyklar! Drag fyrst bjelken ut or ditt auga - då kann du sjå å taka flisi ut or auga åt bror din.
अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यांतले मुसळ काढून टाक म्हणजे आपल्या भावाच्या डोळयांतले कुसळ काढण्यासाठी तुला स्पष्टपणे पाहता येईल.
6 Gjev ikkje hundarne det som heilagt er, og kasta ikkje perlorne dykkar for svini! Dei kjem berre til å trøda deim under føterne, og snu seg og riva dykk sund.
जे पवित्र आहे ते कुत्र्यांना टाकू नका आणि आपले मोती डुकरांपुढे टाकू नका; टाकाल तर कदाचित ती त्यांना पायदळी तुडवतील व नंतर ती उलटून येवून तुम्हासही फाडतील.
7 Bed, so skal de få, leita, so skal de finna, banka på, so skal det verta upplate for dykk!
मागा म्हणजे तुम्हास देण्यात येईल. शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल.
8 For kvar den som bed, han fær, og den som leitar, han finn, og den som bankar på, vert det upplate for.
कारण प्रत्येकजण जो मागतो त्यास मिळते, जो शोधतो त्यास सापडते आणि जो ठोठावतो, त्याच्यासाठी दरवाजा उघडले जाते.
9 Eller er det nokon av dykk som gjev son sin ein stein når han bed honom um brød,
तुमच्यामध्ये कोण मनुष्य असा आहे, जो आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्यास दगड देईल?
10 eller ein orm når han bed um ein fisk?
१०किंवा त्याने मासा मागितला असता, त्याऐवजी त्यास साप देईल?
11 Når no de veit å gjeva borni dykkar gode gåvor, de som er vonde, kor mykje meir vil so’kje far dykkar i himmelen gjeva noko godt til deim som bed honom!
११वाईट असूनही जर तुम्हास आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी देण्याचे कळते तर तुमच्या स्वर्गातील पित्याकडे जे मागतात, त्यांच्या गरजा तो किती चांगल्या प्रकारे भागवील?
12 Alt som de då vil at andre skal gjera mot dykk, det skal de og gjera mot deim; for so er lovi og profetarne.
१२यासाठी ज्या गोष्टी लोकांनी तुमच्यासाठी कराव्यात असे तुम्हास वाटते त्या सर्व गोष्टी तुम्हीही त्यांच्यासाठी करा, कारण नियमशास्त्राच्या व संदेष्टयांच्या शिकवणीचे सार हेच आहे.
13 Gakk inn igjenom den tronge porten! For vid er den porten, og breid er den vegen som fører til fortaping, og mange er dei som gjeng inn der.
१३अरुंद दरवाजाने आत जा कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रूंद व मार्ग प्रशस्त आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ लोक आहेत.
14 Men trong er den porten, og smal er den vegen som fører til livet, og få er dei som finn honom.
१४पण जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग अडचणीचा आहे आणि ज्यांस तो सापडतो ते फारच थोडके आहेत.
15 Tak dykk i vare for dei falske profetarne! Dei kjem til dykk i saueham, men innvertes er dei gråduge ulvar.
१५खोट्या संदेष्ट्यांविषयी सावध असा. ते मेंढरांच्या वेषात घेऊन तुमच्याकडे येतात. पण खरे सांगायचे तर ते क्रूर लांडग्यांसारखे आहेत.
16 På frukterne deira skal de kjenna deim; kann ein hausta druvor av klunger eller fikor av tistlar?
१६त्यांच्या फळांवरुन तुम्ही त्यांस ओळखाल. काटेरी झाडाला द्राक्षे लागतात काय? किंवा रिंगणीच्या झाडाला अंजिरे येताच काय?
17 Soleis ber alle gode tre god frukt; men låke tre ber vond frukt,
१७त्याचप्रमाणे चांगले झाड चांगले फळ देते, परंतु वाईट झाड वाईट फळ देते.
18 eit godt tre kann ikkje bera vond frukt, og eit låkt tre kann ikkje bera god frukt.
१८चांगल्या झाडाला वाईट फळे येणार नाहीत आणि वाईट झाडाला चांगली फळे येणार नाहीत.
19 Men kvart tre som ikkje gjev god frukt, vert hogge ned og kasta på elden.
१९जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडण्यात येते व अग्नीत टाकले जाते.
20 So skal de då kjenna deim på frukterne.
२०यास्तव त्यांना तुम्ही त्यांच्या फळांवरून ओळखाल.
21 Ikkje alle som segjer til meg: «Herre, herre!» skal koma inn i himmelriket, men dei som gjer det far min i himmelen vil.
२१मला प्रभू, प्रभू म्हणणारा प्रत्येकजण स्वर्गाच्या राज्यात जाईलच असे नाही; तर माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे जो वागतो त्याचाच प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल.
22 På den dagen skal mange segja til meg: «Herre, herre, hev me ikkje tala profetord i ditt namn, og drive ut djevlar i ditt namn, og gjort mange under i ditt namn?»
२२त्यादिवशी मला अनेक जण म्हणतील, हे प्रभू, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिले, तुझ्या नावाने भूते काढली व तुझ्या नावाने पुष्कळ चमत्कार केले नाहीत काय?
23 Då skal eg segja deim beint ut: «Eg hev aldri kjent dykk. Gakk ifrå meg, de illgjerdsmenner!»
२३तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की, मी तुम्हास ओळखत नाही. अहो दुराचार करणाऱ्यांनो, माझ्यापासून चालते व्हा.
24 Den som no høyrer desse ordi mine og gjer etter deim, honom vil eg likna med ein vitug mann, som bygde huset sitt på berg.
२४जो कोणी माझ्या सांगण्याप्रमाणे आचारण करतो तो शहाण्या मनुष्यासारखा आहे, अशा शहाण्या मनुष्याने आपले घर खडकावर बांधले.
25 Og regnet sila, og elvarne fløymde, og vindarne bles og sette mot huset; men det stod; for det var tufta på berg.
२५मग जोराचा पाऊस झाला आणि पूर आला. जोराचा वारा आला. वादळात घर सापडले, पण ते पडले नाही कारण त्याचा पाया खडकावर बांधला होता.
26 Og den som høyrer desse ordi mine og ikkje gjer etter deim, han kann liknast med ein fåvis mann, som bygde huset sitt på sand.
२६जो कोणी माझीही वचने ऐकून त्याप्रमाणे आचरण करीत नाही तो कोणाएका मूर्ख मनुष्यासारखा आहे, त्याने आपले घर वाळूवर बांधले.
27 Og regnet sila, og elvarne fløymde, og vindarne bles og sette mot huset; då fall det, og fallet vart stort.»
२७मग जोराचा पाऊस आला आणि पूर आला. जोराचा वारा सुटला. वादळवाऱ्यात ते घर सापडले आणि कोसळून पडले.”
28 Då Jesus hadde tala desse ordi, då var folket reint upp i under yver læra hans.
२८येशूने हे सर्व बोलणे समाप्त केल्यावर असे झाले की, लोकसमुदाय त्याच्या शिक्षणाने थक्क झाला.
29 For han lærde deim som ein som hev velde, og ikkje som deira skriftlærde.
२९कारण येशू त्यांना त्यांच्या नियमशास्त्र शिक्षकांप्रमाणे नव्हे, तर अधिकारवाणीने शिकवत होता.

< Matteus 7 >