< Matteus 20 >

1 For himmelriket kann liknast med ein husbond som gjekk ut tidleg um morgonen og vilde leiga arbeidsfolk til vingarden sin.
“म्हणून स्वर्गाचे राज्य हे कोणा शेतमालकासारखे आहे. जो अगदी पहाटे त्याच्या द्राक्षमळ्यासाठी मोलाने मजूर आणण्यासाठी गेला.
2 Han vart samd med arbeidsfolki um ei mark for dagen, og sende deim burt i vingarden.
त्या मनुष्याने एक दिवसाच्या मजुरीकरिता प्रत्येकाला एक चांदीचे नाणे देण्याचे कबूल केले आणि त्याने द्राक्षाच्या मळ्यात कामास पाठवले.
3 So gjekk han ut ikring den tridje timen, og fekk sjå nokre andre som stod gjerandslause på torget.
सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तो मनुष्य बाजारात गेला तेव्हा तेथे काही माणसे उभी असलेली त्यास दिसली. त्या लोकांस काहीच काम नव्हते.
4 Han sagde til deim: «Gakk de og burt i vingarden, og det som rett er, skal de få.» So gjekk dei.
मग तो त्यांना म्हणाला, ‘तुम्हीसुद्धा माझ्या द्राक्षमळ्यात कामाला जा आणि जी योग्य मजुरी आहे ती मी तुम्हास देईन.’
5 Sidan gjekk han ut ikring den sette og niande timen og gjorde like eins.
मग ते काम करण्यास मळ्यात गेले, तो मनुष्य बारा वाजता आणि तीन वाजता बाजारात गेला आणि त्या मनुष्याने आपल्या मळ्यात काम करण्यासाठी लोकांस दोन वेळा जाऊन मजुरीवर घेतले
6 Då det leid til den ellevte timen, gjekk han ut att, og fann endå nokre som stod der. Han segjer til dei: «Kvi stend de her arbeidslause heile dagen?»
पाच वाजता तो मनुष्य परत एकदा बाजारात गेला तेव्हा आणखी काही लोक उभे असलेले त्यास आढळले. त्याने त्यांना विचारले, ‘तुम्ही काही काम न करता दिवसभर येथे का बरे उभे राहिला आहात?’
7 «Av di ingen hev leigt oss, » svara dei. «Gakk de og burt i vingarden!» sagde han då.
त्या लोकांनी उत्तर दिले, ‘आम्हास कोणी काम दिले नाही.’ तो मनुष्य त्यांना म्हणाला, ‘तर मग तुम्ही जाऊन माझ्या द्राक्षमळ्यात काम करा.’
8 Um kvelden sagde vingardseigaren til hushaldaren sin: «Ropa inn arbeidsfolket, og lat deim få løni si! Tak til med dei siste, og haldt fram til dei fyrste!»
संध्याकाळी द्राक्षमळ्याचा मालक मुकादमाला म्हणाला, ‘मजुरांना बोलवा आणि त्यांना त्यांची मजुरी देऊन टाका, मी ज्यांना अगदी शेवटी कामावर आणले त्यांना अगोदर मजुरी द्या, नंतर बाकीच्या सर्वांना मजुरी द्या, मी कामावर रोजगारीने पहिल्याने बोलावलेल्यांना सर्वात शेवटी मजुरी द्या.’
9 So kom dei som var leigde kring den ellevte timen, og fekk ei mark kvar.
जे मजूर संध्याकाळी साधारण पाच वाजता कामावर घेतले होते ते आपली मजुरी घेण्यासाठी आले. प्रत्येकाला एक नाणे मजुरी मिळाली.
10 Då dei fyrste kom, tenkte dei at dei skulde få meir; men dei fekk og kvar si mark;
१०मग ज्यांना सुरूवातीला कामावर घेण्यात आले होते, ते आपली मजुरी घेण्यासाठी आले. त्यांना वाटत होते की, इतरांपेक्षा त्यांना जास्त पैसे मिळतील, पण त्या सर्वांना चांदीचे एकच नाणे मजुरी मिळाली.
11 då dei fekk den, mukka dei mot husbonden og sagde:
११त्यांनी ते घेतले व मालकाकडे तक्रार करू लागले.
12 «Desse siste hev’kje arbeidt meir enn ein time, og so gjev du deim likt med oss, som hev slite og sveitta heile dagen!»
१२ते म्हणाले, ‘ज्यांना शेवटी कामावर घेतले त्यांनी केवळ एक तासच काम केले. परंतु तुम्ही त्यांना आमच्या बरोबरीने मजुरी दिली. आम्ही मात्र दिवसभर उन्हात कष्ट केले.’
13 Då svara han ein av deim: «Eg gjer deg ikkje urett, venen min. Var me’kje samde um ei mark?
१३परंतु मळ्याचा मालक त्यांच्यातील एकाला म्हणाला, ‘मित्रा मी तुझ्याबाबतीत अन्याय करीत नाही. मी तुला एक चांदीचे नाणे मजुरी देईन यावर आपण सहमत झालो नाही का?
14 Tak du ditt og gakk! Men eg hev hug til å gjeva denne siste likso mykje som deg.
१४जे तुझे आहे ते घे आणि चालायला लाग, तुला दिली तितकीच मजुरी मला या शेवटच्या मनुष्यास द्यायची आहे.
15 Hev eg’kje lov til å gjera med mitt som eg vil? Eller ser du ilt til det at eg gjer vel?»
१५मी माझ्या पैशाचा वापर मला पाहिजे तसा करू शकत नाही का? मी लोकांशी चांगला आहे म्हणून, तुला हेवा वाटतो का?’
16 Soleis skal dei siste vera dei fyrste, og dei fyrste dei siste; for mange er kalla, men få utvalde.»
१६म्हणून आता जे शेवटचे आहेत ते पहिले होतील आणि पहिले ते शेवटचे होतील.”
17 Med Jesus var på vegen til Jerusalem, tok han dei tolv læresveinarne til sides og sagde til deim:
१७येशू यरूशलेम शहराला जात असता त्याने त्याच्या शिष्यांना एकाबाजूला घेतले आणि त्यांना म्हणाला,
18 «No fer me upp til Jerusalem, og Menneskjesonen skal gjevast i henderne på dei øvste prestarne og dei skriftlærde, og dei kjem til å døma honom frå livet
१८“पाहा, आपण यरूशलेम शहराकडे जात आहोत. मनुष्याच्या पुत्राला धरून मुख्य याजक लोक व नियमशास्त्राचे शिक्षक यांच्या हाती धरुन देण्यात येईल. ते त्यास मरणदंड ठरतील.
19 og gjeva honom yver til heidningarne, so dei skal spotta og hudfletta og krossfesta honom; men tridje dagen skal han standa upp att.»
१९आणि थट्टा करावयास, फटके मारावयास व वधस्तंभावर खिळावयास त्यास परराष्ट्रीयांच्या हाती देतील. परंतु तिसऱ्या दिवशी तो परत जीवनात येईल.”
20 Då kom mor åt Sebedæus-sønerne til honom med sønerne sine, og fall på kne og bad honom um noko.
२०त्यानंतर जब्दीच्या मुलांची आई, आपल्या मुलांसह त्याच्याकडे आली. ती त्याच्या पाया पडली आणि तिने त्यास एक विनंती केली.
21 «Kva er det du vil?» spurde han. Ho svara: «Seg at desse tvo sønerne mine skal få sitja innmed deg i riket ditt, den eine på di høgre og den andre på di vinstre sida!»
२१त्याने तिला विचारले, “तुला काय पाहिजे?” ती म्हणाली, “माझा एक मुलगा तुमच्या राज्यात तुमच्या उजवीकडे बसेल आणि दुसरा डावीकडे बसेल असे वचन द्या.”
22 «De veit ikkje kva de bed um, » sagde Jesus. «Kann de drikka den skåli som eg lyt drikka?» «Ja, det kann me, » svara dei.
२२तो तिला म्हणाला, “तू काय मागत आहेस ते तुला समजत नाही! जो प्याला मी पिणार आहे तो तुम्हास पिता येईल काय?” ते म्हणाले, होय, “पिता येईल!”
23 Då sagde han: «Mi skål skal de nok drikka, men sæte ved mi høgre og vinstre sida kann ikkje eg gjeva nokon; det lyt dei få som far min hev etla det åt.»
२३येशू त्याना म्हणाला, “तुम्ही खरोखर माझ्या प्याल्यातून प्याल खरे, पण माझ्या उजव्या आणि डाव्या हाताला बसण्याचा मान कोणाला देणे हे ठरविणारा मी नाही, तर माझ्या पित्याने तो मान कोणाला द्यायचा हे ठरवले आहे.”
24 Då dei ti høyrde det, vart dei harme på dei tvo brørne.
२४जेव्हा इतर दहा शिष्यांनी हे ऐकले तेव्हा ते त्या दोघां भावांवर नाराज झाला.
25 Då kalla Jesus deim kring seg og sagde: «De veit at fyrstarne råder yver folki sine, og dei store hev velde yver deim.
२५मग येशूने त्यांना बोलावून म्हटले, “परराष्ट्रीय लोकांच्या राजांना लोकांवर आपली सत्ता आहे हे दाखवणे आवडले आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांना आपले अधिकार वाटेल तसे वापरणे आवडते.
26 Men so skal det ikkje vera hjå dykk; den som vil verta stor millom dykk, lyt tena dei andre,
२६पण तुमचे वागणे तसे नसावे. जर तुमच्यातील कोणाला मोठे व्हायचे असेल तर त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे.
27 og den som vil vera den fyrste av dykk, lyt vera træl for dei andre.
२७आणि ज्याला पहिला व्हावयाचे आहे त्याने दास झाले पाहिजे.
28 Menneskjesonen er’kje heller komen for å tenast, men for å tena og gjeva livet sitt til løysepening for mange.»
२८म्हणजे तुम्ही मनुष्याच्या पुत्रासारखे असले पाहिजे. जसा तो इतरांकडून सेवा करून घ्यायला आला नाही तर इतरांची सेवा करायला आणि अनेकांचे तारण व्हावे यासाठी आपला जीव खंडणी म्हणून देण्यासाठी आला.”
29 Då dei tok ut frå Jeriko, fylgde det mykje folk med honom.
२९ते यरीहो शहर सोडत असताना, मोठा लोकसमुदाय त्याच्यामागे आला.
30 Attmed vegen sat det tvo blinde, og då dei høyrde at Jesus for framum, ropa dei: «Gjer sælebot på oss, Herre, du Davids son!»
३०रस्त्याच्या कडेला दोन आंधळे बसले होते आणि जेव्हा त्यांनी ऐकले की, येशू तेथून जात आहे, तेव्हा ते मोठ्याने ओरडले, “प्रभू येशू, दाविदाच्या पुत्रा. आमच्यावर दया करा.”
31 Folket truga deim, og sagde dei skulde tegja; men dei ropa endå meir: «Herre, gjer sælebot på oss, du som er Davids son!»
३१जमावाने त्यांना दटावले व त्यांना शांत राहण्यास सांगितले. पण ते अधिकच मोठ्याने ओरडू लागले, “प्रभू, दाविदाच्या पुत्रा, आमच्यावर दया करा.”
32 Då stana Jesus og ropa på deim og sagde: «Kva vil de eg skal gjera for dykk?»
३२मग येशू थांबला आणि त्यांच्याशी बोलला, त्याने विचारले, “मी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?”
33 «Herre, lat oss få att syni!» svara dei.
३३त्या आंधळ्या मनुष्यांनी उत्तर दिले, “प्रभूजी, आम्हास दिसावे अशी आमची इच्छा आहे.”
34 Jesus tykte synd i deim og tok burtpå augo deira; og med ein gong kunde dei sjå, og dei fylgde honom.
३४येशूला त्यांच्यांबद्दल कळवळा आला आणि त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला. त्याच क्षणी त्यांना दिसू लागले आणि ते त्याच्यामागे गेले.

< Matteus 20 >