< Dommernes 7 >

1 Jerubba’al - det er den same som Gideon - og alt folket som var med honom, tok ut tidleg um morgonen, og lægra seg ved Harodkjelda, og Midjans-heren låg nordanfor, frå Morehaugen og burtetter legdi.
मग यरूब्बाल म्हणजे गिदोन आणि त्याच्याबरोबरचे जे सर्व लोक ह्यांनी सकाळी उठून हरोदा झऱ्याजवळ तळ दिला, आणि मिद्यानी लोकांची छावणी मोरे डोंगराच्या उत्तर खोऱ्यात होती.
2 Då sagde Herren til Gideon: «Du hev for mykje folk med deg! Eg vil’kje gjeva midjanitarne i henderne på so mange; elles kunde Israel kyta for meg og segja: «Det er mi eigi hand som hev berga meg!»
तेव्हा परमेश्वर गिदोनाला म्हणाला, “तुझ्याबरोबर जे सैन्य आहे ते मिद्यानावर मला विजय देण्यास फारच आहेत; अशाप्रकारे इस्राएल मजविरूद्ध अशी बढाई मारून म्हणतील की, आम्ही आमच्या सामर्थ्यानेच वाचलो.
3 Ropa no ut for folket: «Den som er rædd og fælen, kann snu og fara heim att frå Gileadfjellet!»» Då var det tvo og tjuge tusund mann som snudde heim, og ti tusund vart att.
तर आता तू लोकांच्या कानी जाईल असे जाहीर करून सांग की, ‘जो कोणी भित्रा आणि घाबरट आहे,’ त्याने गिलाद डोंगरावरून निघून परत माघारी जावे.” तेव्हा लोकांतून बावीस हजार लोक माघारी गेले आणि दहा हजार राहिले.
4 Men Herren sagde til Gideon: «Du hev endå for mykje folk! Lat deim ganga ned til kjelda, so skal eg røyna deim for deg der, og dei som eg segjer skal vera med deg, deim skal du taka med, men alle dei som eg segjer ikkje skal vera med deg, deim skal du ikkje hava med!»
मग परमेश्वर गिदोनाला म्हणाला, “अजूनही लोक फार आहेत; तू त्यांना खाली पाण्याजवळ ने, आणि तेथे मी तुझ्यासाठी त्यांची कसोटी घेईन. ज्याच्याविषयी मी तुला सांगेन, त्याने तुझ्याबरोबर यावे तो तुझ्याबरोबर जावो, आणि ज्या प्रत्येकाविषयी मी तुला सांगेन की, त्याने तुझ्याबरोबर न यावे, तो न जावो.”
5 So let han folket ganga ned til kjelda, og Herren sagde til han: «Alle deim som lepjar vatnet i seg med tunga liksom hunden, skal du setja for seg, og sameleis alle deim som legg seg på kne og drikk.»
मग त्याने लोकांस खाली पाण्याजवळ नेले; मग परमेश्वराने गिदोनाला सांगितले, “जसा कुत्रा चाटून पाणी पितो, तसा जो कोणी आपल्या जिभेने चाटून पाणी पिईल त्यास तू एकीकडे ठेव; आणि जो कोणी पाणी पिण्यास आपल्या गुडघ्यावर टेकेल त्यास एकीकडे ठेव.”
6 Dei som då førde vatnet til munnen med handi og lepja, var tri hundrad i talet; alt hitt folket lagde seg på kne og drakk av vatnet.
तेव्हा जे आपला हात आपल्या तोंडाकडे नेऊन चाटीत प्याले, ते पुरुष मोजले, ते तीनशे होते, आणि बाकीचे सर्व लोक पाणी प्यावयास आपल्या गुडघ्यावर टेकले.
7 Og Herren sagde til Gideon: «Med dei tri hundrad mann som drakk av handi, vil eg berga dykk og gjeva Midjan i henderne dine; alt hitt folket kann ganga heim att.»
नंतर परमेश्वराने गिदोनाला सांगितले, “जे तीनशे पुरुष पाणी चाटून प्याले त्यांच्याकडून मी तुम्हाला सोडवीन, आणि मिद्यानाला तुझ्या हाती देईन; यास्तव बाकीच्या सर्व लोकांस आपल्या ठिकाणी जाऊ दे.”
8 So tok dei til seg ferdakosten åt folket og lurarne deira; og Gideon let alle Israels-menner fara heim so nær som dei tri hundrad; deim hadde han att hjå seg. Midjans-lægret låg nedanfor honom, i lægdi.
तेव्हा त्या लोकांनी त्यांच्या हाती अन्नसामग्री व त्यांची रणशिंगे घेतली, आणि त्याने इस्राएलाची बाकीची सर्व माणसे त्यांच्या तंबूकडे पाठवली; केवळ ती तीनशे माणसे ठेवली. तेव्हा मिद्यान्यांचा तळ त्यांच्या खाली खिंडीत होता.
9 Og då det vart natt, sagde Herren til honom: «Gjer deg reidug og tak på lægret der nede! Eg gjev det i henderne dine!
आणि त्या रात्री असे झाले की परमेश्वराने त्यास सांगितले, “तू उठून खाली तळावर जा, कारण मी तो तुझ्या हाती दिला आहे.
10 Er du rædd, so gakk fyrst ned med Pura, sveinen din!
१०आणि जर तुला खाली जायला भीती वाटत असली तर आपला सेवक पुरा यालाबरोबर घेऊन खाली तळाजवळ जा.
11 Då fær du høyra kva dei talar um, og sidan kjem du til å kjenna deg so sterk, at du torer taka på lægret.» So gjekk han og Pura, sveinen hans, ned til forpostarne i lægret.
११आणि ते जे बोलतील, ते तू ऐक; म्हणजे तुझे हात बळकट होतील आणि तू उतरून तळावर जाशील. तेव्हा तळात जे हत्यारबंद होते,” त्यांच्या काठापर्यंत तो आपला सेवक पुरा याला घेऊन खाली गेला.
12 Og midjanitarne og amalekitarne og alle austmennerne låg i dalen, so tett som grashoppar, og det var ikkje tal på kamelarne deira; dei var som sand på havsens strand.
१२तेव्हा मिद्यानी व अमालेकी व पूर्वेकडल्या सर्व प्रजा खिंडीत टोळाच्या दाट थव्याप्रमाणे पसरल्या होत्या, आणि त्यांचे उंट मोजता येणार नाही इतके जास्त होते; ते संख्येने समुद्राच्या काठावरल्या वाळूच्या कणांप्रमाणे असंख्य होते.
13 Då Gideon kom, var der ein som fortalde felagen sin ein draum: «No skal du høyra kva eg hev drøymt!», sagde han: «Eg tykte eg såg ei byggkaka kom trillande inn i Midjans-lægret, og då ho kom til tjeldet, skuva ho til det, so det rulla i koll, og der låg det.»
१३मग गिदोन गेला आणि पाहा, कोणी आपल्या सोबत्याला असे स्वप्न सांगत होता की, “पाहा, मी एक स्वप्न पाहिले, सातूची गोल भाकर मिद्यानी तळात घरंगळत येऊन एका तंबूपर्यंत आली आणि तिने असा जोराचा धक्का दिला की, तो तंबू पडला आणि उलटून भुई सपाट झाला.”
14 «Dette er’kje noko anna enn sverdet åt Gideon Joasson, israeliten, » svara hin; «Gud hev gjeve midjanitarne og heile lægret i henderne hans.»
१४तेव्हा त्याच्या सोबत्याने उत्तर दिले की, “इस्राएली मनुष्य योवाशाचा पुत्र गिदोन याची ही तलवार! तिच्याशिवाय हे दुसरे काही नाही; देवाने मिद्यान व सर्व तळ त्याच्या हाती दिला आहे.”
15 Då Gideon høyrde draumen og uttydingi, lagde han seg på kne og takka Gud. Han gjekk attende til Israels-lægret og sagde: «Ris upp! Herren hev gjeve Midjans-lægret i henderne dykkar!»
१५तेव्हा असे झाले की गिदोनाने ते स्वप्न व त्याचा अर्थ ऐकल्यावर नमन करून प्रार्थना केली; मग तो इस्राएली तळावर माघारी येऊन बोलला, “तुम्ही उठा, कारण की परमेश्वराने मिद्यानी तळ तुमच्या हाती दिला आहे.”
16 So skifte han dei tri hundrad mann i tri flokkar, og gav deim alle lurar og tome krukkor i henderne; men inni krukkorne var det kyndlar.
१६तेव्हा त्याने त्या तीनशे मनुष्यांच्या विभागून तीन टोळ्या केल्या, आणि त्यांना सर्व कर्णे दिले आणि रिकामे मडके देऊन त्या मडक्यांमध्ये दिवे दिले होते.
17 Og han sagde til deim: «Sjå etter korleis eg fer åt, og far de like eins! So snart de ser eg er komen tett innåt lægret, skal de gjera som eg gjer!
१७तेव्हा त्याने त्यांना सांगितले, “तुम्ही माझ्याकडे पाहा आणि मी करतो तसे करा; आता पाहा, मी छावणीच्या काठी जातो, जसे मी करतो तसे तुम्ही करा.
18 Når eg blæs i luren, eg og alle deim som er med meg, so skal de og blåsa i lurarne dykkar rundt ikring heile lægret og ropa: «For Herren og for Gideon!»»
१८म्हणजे जेव्हा मी कर्णा वाजवीन, तेव्हा, मी आणि माझ्याबरोबर असणारे सर्व संपूर्ण छावणीच्या चहुकडे कर्णे वाजवीत म्हणा, परमेश्वरासाठी व गिदोनासाठी.”
19 Gideon og hundrad mann som var med honom, kom til utkanten av lægret fyrstundes i midnattsvakti; det var so vidt midjanitarne hadde sett ut vaktpostarne. Då bles dei i lurarne, og slo sund krukkorne, som dei hadde i handi;
१९तेव्हा गिदोन व त्याच्याबरोबर असणारे जे शंभर माणसे, ती मध्य प्रहराच्या आरंभी, नुकतेच मिद्यानी पहारेकरी बदली करत होते तेव्हा, छावणीच्या कडेला गेले; मग त्यांनी कर्णे वाजवले, आणि आपल्या हातातली मडकी फोडली.
20 og alle tri flokkarne bles i lurarne og slo sund krukkorne; med vinstre handi greip dei kring kyndlarne, og i høgre handi heldt dei lurarne, og bles i deim og ropa: «Drag sverdet for Herren og for Gideon!»
२०असे त्या तिन्ही टोळ्यांनी कर्णे वाजवले, आणि मडकी फोडली; “मग दिवे आपल्या डाव्या हाती आणि वाजवायचे कर्णे आपल्या उजव्या हाती धरले, आणि परमेश्वराची तलवार व गिदोनाची तलवार, अशी गर्जना केली.”
21 alt med dei vart standande kvar på sin stad rundt ikring lægret. Då tok alt som i lægret var til å renna att og fram og hua og røma,
२१तेव्हा ते छावणीच्या चोहोकडून आपापल्या ठिकाणी उभे राहिले; आणि छावणीतल्या सर्व मिद्यानी लोकांनी पलायन केले. ते मोठ्याने आरोळी मारीत दूर पळाले.
22 og Herren laga det so at då dei høyrde ljomen av dei tri hundrad lurarne, vende dei sverdi sine mot kvarandre. So gjekk det i heile lægret. Og heren rømde til Bet-Hassitta, burtimot Serera, til Abel-Meholastrandi framum Tabbat.
२२ती तीनशे माणसे तर कर्णे वाजवीत होती, या प्रकारे परमेश्वराने मिद्यानांच्या छावणीत प्रत्येकाची तलवार त्याच्या आपापल्या साथीदारावर आणि सैन्याच्या विरूद्ध चालवली; आणि सरेरा येथल्या बेथ-शिट्टा तेथपर्यंत, आणि आबेल-महोलाच्या सीमेपर्यंत टब्बाथास सैन्य पळून गेले.
23 Men Israels-mennerne av Naftali og Asser og heile Manasse vart utbodne og sette etter midjanitarne.
२३मग नफताली, व आशेर, व मनश्शे यांतली इस्राएली माणसे एकत्रित येऊन त्यांनी मिद्यान्यांचा पाठलाग केला.
24 Og yver heile Efraimsheidi sende Gideon folk som ropa ut: «Far ned og møt midjanitarne, og steng deim av frå elvi, frå Jordan, alt burt til Bet-Bara!» Då vart alle Efraims-mennerne utbodne og stengde vegen til elvi, til Jordan, alt burtåt Bet-Bara.
२४गिदोनाने एफ्राईमाच्या सर्व डोंगराळ प्रदेशात जासूद पाठवून सांगितले की, “तुम्ही खाली जाऊन बेथ-बारापर्यंत यार्देन नदीवर नियंत्रण मिळवा आणि मिद्यानी लोकांस आडवा.” म्हणून एफ्राईमाचे सर्व लोक एकत्र आले आणि त्यांनी बेथ-बारापर्यंत यार्देन नदी पार करण्याच्या सर्व वाटा रोखून धरल्या.
25 Dei tok tvo av Midjans-hovdingarne, Oreb og Ze’eb, og drap Oreb på Ramneberget, og Ze’eb ved Ulvepersa. Sidan sette dei etter midjanitarne og kom med hovudi av Oreb og Ze’eb til Gideon på hi sida Jordan.
२५त्यांनी ओरेब व जेब हे मिद्यान्यांचे दोन सरदार पकडले. ओरेबाला त्यांनी ओरेबाच्या खडकावर ठार मारले, आणि जेबाला जेबाच्या द्राक्षकुंडात ठार मारले. त्यांनी मिद्यान्यांचा पाठलाग गेला व ओरेब व जेब ह्यांची मुंडकी यार्देनेच्या पलीकडे असलेल्या गिदोनाकडे आणली.

< Dommernes 7 >