< Dommernes 2 >

1 Herrens engel kom frå Gilgal upp til Bokim og sagde: «Eg henta dykk ut or Egyptarland, og fylgde dykk til det landet eg lova federne dykkar, og eg sagde: «Aldri i verdi skal eg brjota mi pakt med dykk,
परमेश्वराचा दूत गिलगालाहून वर बोखीमास चढून आला आणि तो म्हणाला, “मी तुम्हाला मिसरातून काढले आणि तुमच्या पूर्वजांना शपथेवर देऊ केलेल्या देशात आणले; तुमच्याशी केलेला माझा करार मी कधी मोडणार नाही;
2 og de skal ikkje gjera samband med deim som bur her i landet; de skal riva ned altari deira!» Men de høyrde ikkje på ordi mine. Kvi gjorde de’kje det?
तुम्ही या देशात राहणाऱ्यांशी काही करार करू नका; तुम्ही त्यांच्या वेद्या मोडून टाका, असे मी तुम्हाला सांगितले होते, पण तुम्ही माझी वाणी ऐकली नाही. तुम्ही हे काय केले?
3 So segjer eg dykk: Eg vil ikkje driva deim burt for dykk; dei skal vera til broddar i sidorne dykkar, og gudarne deira skal verta ei snara for dykk.»
आणि म्हणून मी देखील म्हणालो, मी कनानी लोकांस तुमच्यासमोरून घालवून देणार नाही; पण ते तुमच्या कुशीला काट्यासारखे होतील आणि त्यांचे देव तुम्हाला पाश होतील.”
4 Soleis tala Herrens engel til alle Israels-sønerne. Då gret folket høgt;
परमेश्वराचा दूत जेव्हा सर्व इस्राएल लोकांस हे शब्द बोलला, तेव्हा त्यांनी मोठा आक्रोश केला आणि रडले
5 difor kalla dei den staden Bokim. Der ofra deim til Herren.
त्यांनी त्या जागेचे नाव बोखीम असे ठेवले. तेथे त्यांनी परमेश्वरास यज्ञ अर्पण केले.
6 Då Josva hadde bede farvel med folket, og Israels-sønerne var farne heim, kvar til sin odel, for å eigna til seg landet,
जेव्हा यहोशवाने लोकांस निरोप देऊन पाठवून दिले तेव्हा इस्राएलाचे लोक देश आपल्या मालकीचा करून घ्यायला प्रत्येकजण आपल्या वतनास गेले.
7 då tente folket Herren so lenge Josva var til, og so lenge dei gamle var til, som livde etter Josva, og hadde set alle dei storverk Herren hadde gjort for Israel.
यहोशवाच्या सर्व दिवसात, आणि यहोशवाच्या मरणानंतर जिवंत राहिलेल्या ज्या वडील लोकांनी परमेश्वराने इस्राएलासाठी केलेली महान कामे पाहिली होती त्यांच्या सर्व दिवसात लोकांनी परमेश्वराची सेवा केली.
8 Men då Josva Nunsson, Herrens tenar, var slokna, hundrad og ti år gamall,
परमेश्वराचा सेवक नूनाचा मुलगा यहोशवा हा एकशे दहा वर्षांचा होऊन मरण पावला.
9 og dei hadde gravlagt honom på hans eigen gard og grunn i Timnat-Heres i Efraimsheidi, nordanfor Ga’asfjell,
एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील गाश डोंगराच्या उत्तरेस तिम्नाथ-हेरेस येथे त्यांच्या वतनाच्या सीमेवर त्यांनी त्यास पुरले.
10 og då heile den ætti var fari til federne sine, og det stod fram ei ny ætt, som ikkje kjende Herren og ikkje visste kva han hadde gjort for Israel,
१०ती सर्व पिढी पूर्वजांना मिळाल्यानंतर जी दुसरी पिढी उदयास आली तिला परमेश्वराची आणि त्याने इस्राएलासाठी केलेल्या कामाची ओळख नव्हती.
11 då gjorde Israels-sønerne det som var Herrens imot, og dyrka Ba’als-bilæti;
११इस्राएल लोक परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करून बआल देवांची सेवा करू लागले;
12 dei vende seg frå Herren, sin fedregud, som hadde ført deim ut or Egyptarlandet, og heldt seg til andre gudar, gudarne åt grannefolki, og låg på kne for deim, og arga Herren;
१२आपल्या पूर्वजांचा देव जो परमेश्वर, ज्याने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले त्याचा त्यांनी त्याग केला व अन्य लोकांच्या देवांच्या नादी लागले, आणि त्यांच्या पाया पडले. त्यांनी परमेश्वरास क्रोधाविष्ट केले.
13 dei vende seg frå Herren og dyrka Ba’al og Astarte-bilæti.
१३परमेश्वराचा त्याग करून त्यांनी बआल आणि अष्टारोथ यांची उपासना केली;
14 Då vart Herren brennande harm på Israel, og gav deim i henderne på røvarar, som herja deim; han slepte deim i henderne på uvenerne deira rundt um, og dei kunde ikkje lenger standa seg mot fiendarne.
१४इस्राएलावर परमेश्वराचा कोप भडकला, त्याने त्यांना लुटणाऱ्यांच्या हवाली केले, त्यांनी त्यांची मालमत्ता लुटली; त्याने त्यांना त्यांच्या आसपासच्या शत्रूंच्या हाती गुलाम म्हणून विकले, म्हणून त्यांचा आपल्या शत्रूंसमोर टिकाव लागेना.
15 Kvar dei for fram, var Herrens hand imot deim, so det gjekk deim ille, som Herren hadde sagt deim, og som Herren hadde svore, og dei kom i stor naud.
१५परमेश्वराने त्यांना शपथपूर्वक सांगितल्याप्रमाणे जेथे इस्राएल लढण्यास जात तेथे त्यांच्याविरुद्ध परमेश्वराचा हात पडून त्यांचा पराभव होई आणि ते फार संकटात पडत.
16 Då vekte Herren upp domarar, som berga deim frå røvararne.
१६मग परमेश्वर न्यायाधीश उभे करी, ते त्यांना त्यांची मालमत्ता लुटणाऱ्याच्या हातून सोडवीत;
17 Men dei lydde ikkje domarane sine heller, og heldt seg med andre gudar, og låg på kne for deim; dei tok snart ut av den vegen som federne deira hadde fylgt; for dei lydde Herrens bod, men so gjorde ikkje desse.
१७तरी ते आपल्या न्यायाधीशांचे ऐकत नसत; ते व्यभिचारी बुद्धीने अन्य देवांच्या मागे लागले आणि त्यांची उपासना केली. त्यांचे पूर्वज परमेश्वराच्या आज्ञा पाळून ज्या मार्गाने चालले होते तो त्यांनी त्वरीत सोडून दिला आणि त्यांनी आपले पूर्वज करत असत तसे केले नाही.
18 Og kvar gong Herren let ein domar standa fram millom deim, so var Herren med domaren, og berga deim frå uvenerne deira so lenge domaren livde; for Herren ynkast yver deim når dei sukka og stunde for di dei vart tvinga og trælka.
१८परमेश्वर जेव्हा त्यांच्यासाठी न्यायाधीश उभे करी तेव्हा त्या न्यायाधीशाबरोबर परमेश्वर असे आणि त्या न्यायाधीशाच्या सर्व दिवसात तो त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हातून बचावीत असे; कारण त्यांच्यावर जुलूम करणारे व त्यांना गांजणारे यांच्यामुळे ते कण्हत असत; म्हणून देवाला त्यांची दया येई.
19 Men ikkje fyrr var domaren burte, fyrr dei fall ifrå att, og for endå verre åt enn federne sine, heldt seg til andre gudar, og dyrka deim, og bad til deim; dei lagde’kje ned noko av det vonde dei hadde fyre seg, eller av si tråssuge framferd.
१९पण न्यायाधीश मरण पावला म्हणजे ते पुन्हा उलटून अन्य देवांची सेवा करीत व उपासना करीत व आपल्या पूर्वजांपेक्षा अधिक बिघडत. ते आपला दुराचार व दुराग्रह सोडीत नसत.
20 Då vart Herren harm på Israel, og han sagde: «For di dette folket hev brote den pakti eg gjorde med federne deira, og ikkje hev lydt mine ord,
२०तेव्हा इस्राएलावर परमेश्वराचा कोप भडकून तो म्हणाला, “मी या राष्ट्राच्या पूर्वजांशी केलेला करार ह्याने मोडला आहे आणि माझी वाणी ऐकली नाही;
21 so vil ikkje eg heller hjelpa deim meir, og ikkje driva ut noko av dei folki som Josva let vera att då han døydde;
२१म्हणून यहोशवाच्या मृत्यू वेळी उरलेल्या राष्ट्रांपैकी कोणालाही मी देखील येथून पुढे त्यांच्या समोरून घालवून देणार नाही;
22 med deim skal Israel røynast um dei vilde halda seg etter Herrens vegar og ganga på deim, som federne deira gjorde.»
२२पण त्यांच्याकरवी मी इस्राएलाची परीक्षा करीन आणि त्यांच्या पूर्वजांनी परमेश्वराचे जसे मार्ग पाळले तसे ते चालतात की नाही हे मी पाहीन.”
23 Soleis var det Herren let desse folki få vera, og ikkje straks dreiv deim ut, og ikkje gav deim i Josvas hender.
२३म्हणून परमेश्वराने त्या राष्ट्रांना घालवून देण्याची घाई केली नाही, त्यांना राहू दिले आणि त्यांना यहोशवाच्या हाती दिले नाही.

< Dommernes 2 >