< Efeserne 6 >

1 De born, lyd dykkar foreldre i Herren, for det er rett!
मुलांनो, प्रभूमध्ये आपल्या आई-वडीलांच्या आज्ञा पाळा कारण हे योग्य आहे.
2 «Heidra far din og mor di» - dette er det fyrste bodet med lovnad -
“आपल्या वडिलांचा व आईचा मान राख, यासाठी की तुझे सर्वकाही चांगले व्हावे व तुला पृथ्वीवर दीर्घ आयुष्य लाभावे.” अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे.
3 «at det må ganga deg vel, og du må leva lenge i landet.»
4 Og de feder, arga ikkje dykkar born, men fostra deim upp i Herrens tukt og påminning!
आणि वडिलांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका पण तुम्ही त्यांना प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवा.
5 De tenarar, ver lyduge mot dykkar herrar etter kjøtet med age og otte i dykkar hjartans einfelde som mot Kristus,
दासांनो, तुमच्या अंतःकरणाच्या प्रामाणिकतेने जशी ख्रिस्ताची आज्ञा पाळता तशी पूर्ण आदराने व थरथर कांपत जे देहानुसार पृथ्वीवरील मालकांशी आज्ञाधारक असा.
6 ikkje med augnetenesta, liksom dei som vil tekkjast menneskje, men som Kristi tenarar, so de gjer Guds vilje av hjarta
मनुष्यास संतोषवणाऱ्या सारखे तोंडदेखल्या चाकरीने नव्हे तर मनापासून, देवाची इच्छा साधणाऱ्या ख्रिस्ताच्या दासांसारखे आज्ञांकित असा,
7 og godviljugt tener som for Herren og ikkje som for menneskje,
ही सेवा मनुष्याची नाही तर प्रभूची सेवा आहे अशी मानून ती आनंदाने करा,
8 då de veit, at kva godt kvar gjer, det skal han få att av Herren, anten han so er tenar eller fri mann.
प्रत्येक व्यक्ती जे काही चांगले कार्य करतो, तो दास असो अथवा स्वतंत्र असो, प्रभूकडून त्यास प्रतिफळ प्राप्त होईल.
9 Og de herrar, gjer det same mot deim, so de let vera å truga; for de veit at både deira og dykkar Herre er i himmelen, og han gjer ikkje skil på folk.
आणि मालकांनो तुम्ही, त्यांना न धमकावता, तुमच्या दासाशी तसेच वागा, तुम्हास हे ठाऊक आहे की, दोघाचाही मालक स्वर्गात आहे आणि त्याच्याजवळ पक्षपात नाही.
10 Elles, vert sterke i Herren og i hans veldes kraft!
१०शेवटी, प्रभूमध्ये बलवान होत जा आणि त्याच्या सामर्थ्याने सशक्त व्हा.
11 Klæd dykk i Guds fulle herbunad, so de kann standa dykk imot djevelens svikråder!
११सैतानाच्या कट-कारस्थानी योजनांविरुद्ध उभे राहता यावे, म्हणून देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करा.
12 For me hev ikkje strid mot blod og kjøt, men mot herrevelde, mot magter, mot heimsens herrar, som råder i myrkret i denne tid, mot vondskaps åndeher i himmelrømdi. (aiōn g165)
१२कारण आपले झगडणे रक्त आणि मांसाबरोबर नाही, तर सत्ताधीशांविरुद्ध, अधिकाऱ्याविरुद्ध, या अंधकारातील जगाच्या अधिपतीबरोबर आणि आकाशातील दुष्ट आत्म्याविरुद्ध आहे. (aiōn g165)
13 Tak difor Guds fulle herbunad på, so de kann standa imot på den vonde dag og verta standande når de hev vunne yver alt.
१३या कारणास्तव वाईट दिवसात तुम्हास प्रतिकार करता यावा म्हणून देवाने दिलेली संपूर्ण शस्त्रसामग्री घ्या. म्हणजे तुम्हास सर्व ते केल्यावर टिकून राहता येईल
14 So statt då umgyrde um dykkar lend med sanning og klædde i rettferds-brynja,
१४तर मग स्थिर उभे राहा, सत्याने आपली कंबर बांधा, नीतिमत्त्वाचे उरस्त्राण धारण करा.
15 og umbundne på føterne med den tilbunad som evangeliet um freden gjev.
१५शांतीच्या सुवार्तेसाठी तयार केलेल्या वहाणा पायात घाला.
16 Og tak attåt alt dette tru-skjolden, so de dermed kann sløkkja alle gloande piler frå den vonde!
१६नेहमी विश्वासाची ढाल हाती घ्या, जिच्यायोगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण विझवू शकाल, ती हाती घेऊन उभे राहा.
17 og tak frelse-hjelmen, og Andens sverd, som er Guds ord,
१७आणि तारणाचे शिरस्राण व आत्म्याची तलवार, जी देवाच वचन आहे, ती घ्या,
18 medan de alltid bed i Anden med all bøn og påkalling og er årvakne deri med all trott og bøn for alle dei heilage,
१८प्रत्येक प्रार्थना आणि विनंतीद्वारे सर्व प्रसंगी आत्म्यात प्रार्थना करा आणि चिकाटीने उत्तराची वाट पाहा व सर्व पवित्र जनांसाठी प्रार्थना करीत जागृत राहा.
19 og for meg med, at det må verta gjeve meg ord når eg opnar min munn, til å forkynna fritt mod løyndomen i evangeliet,
१९आणि माझ्यासाठी प्रार्थना करा, जेव्हा मी तोंड उघडीन तेव्हा मला धैर्याने सुवार्तेचे रहस्य कळवण्यास शब्द मिळावे,
20 den som eg er sendebod for i lekkjor, at eg må tala med frimod um det, soleis som eg bør tala.
२०मी, त्यासाठीच बेड्यांत पडलेला वकील आहे, म्हणजे मला जसे त्याविषयी बोलले पाहिजे तसे धैर्याने बोलता यावे.
21 Men at de og kann få vita um mitt tilstand, korleis det gjeng meg, skal Tykikus kunngjera dykk alt, han den kjære bror og true tenar i Herren,
२१पण माझ्याविषयी, म्हणजे मी काम करीत आहे ते तुम्हास समजावे म्हणून, प्रिय बंधू आणि प्रभूमधील विश्वासू सेवक तुखिक या सर्व गोष्टी तुम्हास कळवील.
22 som eg just difor sender til dykk at de skal få vita korleis det er med oss, og at han kann trøysta dykkar hjarto.
२२मी त्यास त्याच हेतूने तुमच्याकडे धाडले आहे; म्हणजे तुम्हास माझ्याविषयी कळावे आणि त्याने तुमच्या मनाचे सांत्वन करावे.
23 Fred vere med brørne og kjærleik med tru frå Gud Fader og Herren Jesus Kristus!
२३देवपिता आणि प्रभू येशू ख्रिस्तापासून आता बंधूंना विश्वासासह प्रीती आणि शांती लाभो.
24 Nåde vere med alle som elskar vår Herre Jesus Kristus med uforgjengeleg kjærleik!
२४जे सर्वजण आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर अविनाशी प्रीती करतात, त्या सर्वाबरोबर देवाची कृपा असो.

< Efeserne 6 >