< 2 Korintierne 9 >

1 For å skriva til dykk um hjelpi til dei heilage, det treng eg ikkje,
तथापि पवित्र जनांची सेवा करण्याविषयी मी तुम्हास लिहावे ह्याचे अगत्य नाही.
2 for eg kjenner dykkar viljuge hug, som eg rosar dykk for hjå makedonarane, med di eg segjer: «Akaia var ferdigt alt frå i fjor; » og ihugen dykkar tilskunda dei mange.
कारण मदत करण्याबद्दलची तुमची उत्सुकता मला माहीत आहे आणि मी मासेदोनियातील लोकांस याविषयी अभिमानाने सांगत होतो की, गेल्या वर्षापासून अखयातील तुम्ही लोक देण्यासाठी तयार आहात आणि तुमच्या उत्साहामुळे पुष्कळजण कृति करण्यास आवेशाने पुढे आले आहेत.
3 Men eg sender brørne, so ikkje vår ros yver dykk skal verta til inkjes i dette stykke, men at de, som eg sagde, skal vera ferdige,
तरी या बाबतीत तुमच्याविषयीचा आमचा अभिमान व्यर्थ होऊ नये म्हणून मी या बंधूंना पाठवत आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आपली तयारी केलेली असावी.
4 so me - um eg ikkje skal segja de sjølve - ikkje skal få skam av denne tiltru, um det kjem makedonarar med meg og finn dykk uferdige.
नाही तर कदाचित, मासेदोनियाचे लोक जर माझ्याबरोबर आले आणि तुम्ही तयारीत नसलेले आढळला, तर या खातरीमुळे आमची आम्ही म्हणत नाही की, तुमची फजिती होईल.
5 Difor fann eg det naudsynlegt å telja brørne til å ganga i fyrevegen til dykk og fyreåt tilskipa gåva dykkar som fyrr var lova, so at ho kann vera ferdig som ei velsigning og ikkje som ei karg gåva.
म्हणून मला हे आवश्यक वाटते की, ह्यांनी तुमच्याकडे आधी जावे अशी या बंधूंना विनंती करावी आणि तुम्ही देऊ केलेली देणगी त्यांनी आधीच तयार करावी; म्हणजे लोभाने घेऊन नाही पण देणगी म्हणून ती तयार राहील.
6 Men det segjer eg: Den som sparleg sår, skal og sparleg hausta; og den som sår med velsigningar, skal og hausta med velsigningar.
हे लक्षात ठेवा जो हात राखून पेरतो तो त्याच प्रमाणात कापणी करील आणि जो उदार हाताने पेरील तो त्याच प्रमाणात कापणी करील.
7 Kvar gjeve som han set seg fyre i hjarta, ikkje med sut eller av tvang! For Gud elskar ein glad gjevar.
प्रत्येक मनुष्याने आपल्या मनात जे ठरवले असेल त्याप्रमाणे त्याने द्यावे; दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये कारण ‘संतोषाने देणारा देवाला’ आवडतो.
8 Og Gud er megtig til å gjeva dykk all nåde i rikt mål, so de i alle ting alltid kann hava all nøgd og vera rike til all god gjerning,
तुमच्याजवळ सर्व गोष्टींत सदा, सर्व पुरवठा रहावा आणि प्रत्येक चांगल्या कामात तुम्ही संपन्न व्हावे म्हणून देव तुम्हास सर्व प्रकारची कृपा पुरवण्यास समर्थ आहे.
9 som skrive stend: «Han strøydde ut, han gav dei fatige, hans rettferd vert verande i all æva.» (aiōn g165)
असे पवित्र शास्त्रात लिहिले आहे; “तो गरीबांना उदारहस्ते देतो, त्याचे नीतिमत्त्व सर्वकाळ राहते.” (aiōn g165)
10 Og han som gjev såmannen såkorn og brød til å eta, han skal og gjeva dykk sæde og gjera det rikelegt og gjeva vokster til frukterne av dykkar rettferd,
१०आता जो पेरणार्‍याला बीज व खाण्यासाठी भाकर पुरवतो तो तुमच्यासाठी बीज पुरवील आणि बहुगुणित करील व तुमच्या नीतिमत्त्वाचे फळ वाढवील.
11 med di de i alt vert rike til all einfald kjærleik, som ved oss verkar takk til Gud.
११म्हणजे तुम्ही सर्व उदारतेसाठी प्रत्येक गोष्टीत संपन्न व्हाल व ती उदारता आमच्याद्वारे देवाचे उपकारस्मरण अधिक होण्यास कारणीभूत होईल.
12 For tenesta med denne hjelp utfyller ikkje berre det som vantar hjå dei heilage, men ber og rik frukt med takk til Gud ifrå mange,
१२कारण या सेवेचे काम केवळ पवित्रजनांच्या गरजा पुरवणे एवढेच नाही पण देवाच्या पुष्कळ उपकारस्मरणात ते सेवाकार्य बहुगुणित होते.
13 då dei ved det sannrøynde hjartelag som denne hjelp syner, må prisa Gud for dykkar lydnad til å sanna Kristi evangelium, og for den einfalde truskapen i samfundet med deim og med alle,
१३या सेवेच्या कसोटीमध्ये, ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाच्या अंगिकाराबाबत तुमच्या आज्ञांकितपणामुळे आणि त्यांच्यासाठी व इतरांसाठी तुम्ही उदारपणे दिलेल्या दानामुळे ते देवाचे गौरव करतात;
14 med di dei og i bøn for dykk lengtar etter dykk for den Guds nåde som er so ovrik yver dykk.
१४आणखी ते तुम्हाकरिता प्रार्थना करीत असता तुम्हावर देवाने जी विपुल कृपा केली आहे त्यामुळे तुमची भेट व्हावी अशी उत्कंठा ते धरतात.
15 Gud vere takk for si usegjelege gåva!
१५देवाचे अवर्णनीय दान जे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याबद्दल त्याची स्तुती असो!

< 2 Korintierne 9 >