< Salomos Ordsprog 2 >

1 Min sønn! Dersom du tar imot mine ord og gjemmer mine bud hos dig,
माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारशील आणि माझ्या आज्ञा तुझ्याजवळ संग्रह करून ठेवशील,
2 så du vender ditt øre til visdommen og bøier ditt hjerte til klokskapen,
ज्ञानाचे ऐकशील. आणि ज्ञानाकडे तुझे मन लावशील.
3 ja, dersom du roper efter innsikten og løfter din røst for å kalle på forstanden,
जर तू विवेकासाठी आरोळी करशील, आणि तुझा आवाज त्यासाठी मोठ्याने उच्चारशील;
4 dersom du leter efter den som efter sølv og graver efter den som efter skjulte skatter,
जर तू रुप्याप्रमाणे त्याचा शोध घेशील, आणि जसे तू गुप्तधन मिळविण्याचा प्रयत्न करतो तसेच ज्ञानाचा शोध घेशील;
5 da skal du forstå Herrens frykt og finne kunnskap om Gud.
तर तुला परमेश्वराच्या भयाची जाणीव होईल, आणि देवाविषयीचे ज्ञान तुला सापडेल.
6 For Herren er den som gir visdom, fra hans munn kommer kunnskap og forstand,
कारण परमेश्वर ज्ञान देतो, त्याच्या मुखातून सुज्ञता आणि ज्ञान येतात.
7 og han gjemmer frelse for de opriktige, et skjold for dem som lever ustraffelig,
जे त्यास संतोषवितात त्यांना तो पूर्ण ज्ञान देतो, जे प्रामाणिकपणे चालतात त्यांना तो ढाल आहे,
8 han vokter rettens stier og bevarer sine frommes vei.
तो न्यायाच्या मार्गाचे रक्षण करतो, आणि जे त्याच्याबरोबर विश्वसनीय आहेत त्याच्या मार्गात टिकून राहतील.
9 Da skal du forstå rettferdighet og rett og rettvishet, ja enhver god vei.
मग धर्म, निती व सात्विकता तुला समजेल, आणि प्रत्येक चांगला मार्ग कळेल.
10 For visdom skal komme i ditt hjerte, og kunnskap skal glede din sjel;
१०ज्ञान तुझ्या हृदयात प्रवेश करील, आणि तुझ्या आत्म्याला ज्ञान आनंदित करील.
11 eftertanke skal holde vakt over dig, forstand skal verne dig,
११दूरदर्शीपणा तुझ्यावर पहारा करील, आणि समंजसपणा तुला सांभाळेल.
12 for å fri dig fra onde veier, fra menn som fører forvendt tale,
१२ते तुला वाईट मार्गापासून सोडविल, कपटी गोष्टी बोलणाऱ्यापासून, सोडवायला तो तुला संभाळील,
13 fra dem som forlater rettvishets stier for å vandre på mørkets veier,
१३ते चांगले मार्ग सोडून, अंधकाराच्या मार्गांनी चालत आहेत.
14 som gleder sig ved å gjøre ondt og jubler over onde, forvendte gjerninger,
१४जेव्हा ते दुष्कर्म करतात ते आनंदित होतात, आणि दुष्कर्माच्या विकृतीवरून ते उल्लासतात.
15 som går på krokete stier og følger vrange veier.
१५ते वाकडे मार्ग अनुसरतात, आणि ते फसवणूक करून त्यांच्या वाटा लपवतात.
16 Visdommen skal fri dig fra annen manns hustru, fra fremmed kvinne, som taler glatte ord,
१६ज्ञान आणि दूरदर्शीपणा तुला अनितीमान स्त्रीपासून वाचवील, जी स्त्री धाडस करायला बघते आणि खुशामतीच्या शब्दांनी स्तुती करते.
17 som har forlatt sin ungdoms venn og glemt sin Guds pakt;
१७तिने आपला तरुणपणाचा सोबती सोडला आहे, आणि आपल्या देवाचा करार विसरली आहे.
18 for hennes hus synker ned i døden, og hennes veier bærer ned til dødningene;
१८कारण तिचे घर मरणाकडे खाली वाकले आहे. आणि तिच्या वाटा तुला त्या कबरेत असलेल्याकडे घेऊन जातात.
19 de som går inn til henne, kommer aldri tilbake og når aldri livets stier.
१९जे सर्व कोणी तिच्याकडे जातात ते पुन्हा माघारी येत नाहीत. आणि त्यांना जीवनाचा मार्ग सापडत नाही.
20 Visdommen skal hjelpe dig til å vandre på de godes vei og holde dig på de rettferdiges stier;
२०म्हणून तू चांगल्या लोकांच्या मार्गाने चालावे, व जे योग्य मार्गाने जातात त्याच्यामागे जावे.
21 for de opriktige skal bo i landet, og de ustraffelige skal bli tilbake i det,
२१कारण योग्य करतात तेच देशात घर करतील, आणि जे प्रामाणिक आहेत तेच त्यामध्ये राहतील.
22 men de ugudelige skal utryddes av landet, og de troløse skal rykkes bort fra det.
२२परंतु दुष्टांना त्यांच्या वतनातून छेदून टाकले जाईल, आणि जे विश्वासहीन त्यांना त्यांच्या वतनापासून दूर नेले जाईल.

< Salomos Ordsprog 2 >