< Dommernes 10 >

1 Efter Abimelek stod Tola frem og frelste Israel; han var sønn av Pua, Dodos sønn, av Issakars stamme, og bodde i Samir på Efra'im-fjellet.
अबीमलेखाच्या मृत्यूनंतर इस्राएलाच्या सुटकेसाठी दोदोचा पुत्र पुवा याचा पुत्र तोला, जो इस्साखारातला मनुष्य तो उभा झाला, आणि तो एफ्राइम डोंगराळ प्रदेशात शामीर शहरात राहत होता.
2 Han dømte Israel i tre og tyve år, og han døde og blev begravet i Samir.
त्याने तेवीस वर्षे इस्राएलाचा न्याय केला, मग तो मेला आणि शामीर नगरात पुरला गेला.
3 Efter ham stod gileaditten Ja'ir frem og dømte Israel i to og tyve år.
नंतर त्याच्या मृत्यूनंतर गिलादी याईर उभा राहिला, आणि त्याने बावीस वर्षे इस्राएलाचा न्याय केला.
4 Han hadde tretti sønner, som red på tretti asenfoler og hadde tretti byer; disse kalles den dag idag Ja'irs byer; de ligger i Gileads land.
त्यास तीस पुत्र होते; प्रत्येकाचे आपापले गाढव होते ज्यावर ते सवार होत होते; आणि त्यास तीस नगरेही होती; आजपर्यंत त्यास हावोथ याईर म्हणतात; ती गिलादाच्या प्रांतात आहेत.
5 Og Ja'ir døde og blev begravet i Kamon.
मग याईर मरण पावल्यावर त्यास कामोन शहरात पुरले.
6 Og Israels barn gjorde atter det som var ondt i Herrens øine, og dyrket Ba'alene og Astarte-billedene og Arams guder og Sidons guder og Moabs guder og ammonittenes guder og filistrenes guder; de forlot Herren og tjente ham ikke.
यानंतर इस्राएलाच्या लोकांनी फिरून देवाच्या दृष्टीने जे वाईट ते केले; कारण की त्यांनी बआल, अष्टारोथ, अरामाचे देव, सीदोनातले देव, मवाबातले देव व अम्मोनी लोकांचे देव व पलिष्ट्यांचे देव, यांची उपासना केली; त्यांनी परमेश्वरास सोडले, आणि त्यानंतर त्याची उपासना केलीच नाही.
7 Da optendtes Herrens vrede mot Israel, og han solgte dem i filistrenes hånd og i ammonittenes hånd,
यास्तव परमेश्वराचा राग इस्राएलावर भडकला, आणि त्याने त्यांना पलिष्ट्यांच्या हाती व अम्मोनी लोकांच्या हाती दिले.
8 og de begynte i samme år å trenge og undertrykke Israels barn; i atten år trengte de alle Israels barn som bodde på hin side Jordan, i amorittenes land, i Gilead.
त्या वर्षी, त्यानंतर अठरा वर्षे त्यांनी इस्राएलाच्या सर्व लोकांस छळले आणि यार्देनेच्या पलीकडे अमोऱ्यांच्या देशातल्या गिलादात जे इस्राएली होते त्या सर्वांना जाचले.
9 Og Ammons barn satte også over Jordan for å stride mot Juda og mot Benjamin og mot Efra'ims hus; og Israel kom i stor trengsel.
यहूदा व बन्यामीन व एफ्राइमाची घराणे यांच्याशीही लढावयास अम्मोनी लोक यार्देन पार करून अलीकडे आले, त्यामुळे इस्राएलावर फार मोठे दु: ख आले.
10 Da ropte Israels barn til Herren og sa: Vi har syndet mot dig; vi har forlatt vår Gud og dyrket Ba'alene.
१०तेव्हा इस्राएली लोकांनी परमेश्वरास मोठ्याने आरोळी मारीत म्हटले की, “आम्ही तुझ्याविरुद्ध पाप केले आहे; ते असे की आम्ही आपल्या देवाला सोडून बआलाच्या मूर्तींची उपासना केली.”
11 Og Herren sa til Israels barn: Har jeg ikke frelst eder fra egypterne og amorittene og Ammons barn og filistrene?
११तेव्हा परमेश्वराने इस्राएलाच्या लोकांस म्हटले. “मिसऱ्यांपासून व अमोऱ्यांपासून व अम्मोन्यांच्या लोकांपासून व पलिष्ट्यांपासून मी तुम्हाला सोडवले नाही काय?
12 Og da sidonierne og Amalek og Maon undertrykte eder, og I ropte til mig, frelste jeg eder av deres hånd.
१२आणि सीदोनी व अमालेकी व मावोनी यानी तुम्हाला जाचले, तेव्हा तुम्ही मला मोठ्याने हाक मारली, आणि मी तुम्हाला त्यांच्या हातातून सोडवले.
13 Men I forlot mig og dyrket andre guder; derfor vil jeg ikke frelse eder mere.
१३तरी तुम्ही मला सोडून दुसऱ्या देवांची उपासना केली; यास्तव मी यापुढे तुमचा बचाव करणार नाही.
14 Gå bort og rop til de guder I har valgt eder! La dem frelse eder, nu da I er i slik trengsel!
१४जा, आणि ज्या देवाची तुम्ही उपासना करता त्यास हाक मारा; तुमच्या संकटाच्या वेळेस त्याने तुम्हाला सोडवावे.”
15 Da sa Israels barn til Herren: Vi har syndet! Gjør med oss hvad der tykkes dig godt; bare du vil frelse oss denne gang!
१५तेव्हा इस्राएलाच्या लोकांनी परमेश्वरास म्हटले, “आम्ही पाप केले आहे; जे सर्व तुला चांगले वाटेल, त्याप्रमाणे तू आम्हांला कर; आम्ही तुला विनंती करतो केवळ त्या दिवशी तू आम्हांला सोडव.”
16 Og de hadde de fremmede guder bort fra sig og tjente Herren; da kunde han ikke tåle å se på Israels nød.
१६तेव्हा त्यांनी आपल्यामधून परके देव दूर करून परमेश्वराची उपासना केली, आणि इस्राएलाच्या दुःखामुळे त्याच्या मनाला खेद झाला.
17 Og Ammons barn blev kalt til våben og leiret sig i Gilead; og Israels barn samlet sig og leiret sig i Mispa.
१७अम्मोनी लोक तर एकत्र मिळून त्यांनी गिलादात तळ दिला, आणि इस्राएलाच्या लोकांनी एकत्र जमून मिस्पात तळ दिला.
18 Da sa krigsfolket, høvdingene i Gilead, til hverandre: Hvor er den mann som vil gå først i striden mot Ammons barn? Han skal være høvding over alle som bor i Gilead.
१८तेव्हा गिलादातले लोक व अधिकारी एकमेकांना म्हणाले, “जो मनुष्य अम्मोनी लोकांशी लढू लागेल असा मनुष्य कोण आहे? तो गिलादातल्या सर्व राहणाऱ्यांचा अधिकारी असा होईल.”

< Dommernes 10 >