< Jeremias 38 >

1 Men Sefatja, Mattans sønn, og Gedalja, Pashurs sønn, og Jukal, Selemjas sønn, og Pashur, Malkias sønn, hørte de ord som Jeremias talte til alt folket:
यिर्मयाने सर्व लोकांस जी वचने सांगितली ती मत्तानाचा मुलगा शफाट्या व पशहूरचा मुलगा गदल्या, शलेम्याचा मुलगा युकाल आणि मल्कीयाचा मुलगा पशहूर यांनी ऐकली. तो सांगत होता,
2 Så sier Herren: Den som blir i denne by, skal dø ved sverd, ved hunger og ved pest; men den som går ut til kaldeerne, skal bli i live, han skal få sitt liv til krigsbytte og leve.
“परमेश्वर असे म्हणतो जो कोणी या नगरात राहतो तो तलवारीने, दुष्काळाने आणि मरीने मारला जाईल. पण कोणी खास्द्यांकडे निघून जाईल तो वाचेल, त्यास आपल्या स्वतःचा जीव लूट असा होईल, कारण तो जिवंत राहील.
3 Så sier Herren: Denne by skal visselig gis i hendene på Babels konges hær, og han skal innta den.
परमेश्वर असे म्हणतो ‘हे नगर बाबेल राजाच्या सैन्याच्या हाती दिले जाईल आणि तो ते हस्तगत करेल.”
4 Da sa høvdingene til kongen: La denne mann drepe, fordi han får de stridsmenn som er blitt tilbake i denne by, og alt folket til å la hendene synke ved at han taler slike ord til dem! For denne mann søker ikke folkets vel, han søker dets ulykke.
म्हणून अधिकारी राजाला म्हणाले, या मनुष्यास ठार मारावे, कारण याप्रकारे नगरात उरलेल्या लढणाऱ्या मनुष्यांचे आणि सर्व लोकांचे हात दुर्बल करतो. कारण तो ही वचने सांगून, मनुष्यांचे संरक्षण करत नाही पण अरिष्ट करायला पाहतो.
5 Da sa kong Sedekias: Se, han er i eders hånd; for kongen makter ikke noget mot eder.
मग सिद्कीया राजा म्हणाला, “पाहा, तो तुमच्या हातात आहे कारण राजाला तुम्हास विरोध करता येत नाही.”
6 Da tok de Jeremias og kastet ham i kongesønnen Malkias brønn, som var i vaktgården, og de firte Jeremias ned med rep; i brønnen var ikke vann, men bare dynd, og Jeremias sank ned i dyndet.
मग त्यांनी यिर्मयाला घेतले आणि राजाचा मुलगा मल्कीया याच्या पाण्याच्या टाकीत टाकले. पाण्याची टाकी पहारेकऱ्यांच्या चौकात होती. त्यांनी यिर्मयाला दोरीने खाली सोडले. कैदखानेत पाणी नव्हते पण चिखल होता आणि तो त्या चिखलात रुतला.
7 Men etioperen Ebed-Melek, en gilding som tjente i kongens hus, hørte at de hadde kastet Jeremias i brønnen - kongen satt da i Benjamin-porten.
आता राजाच्या घरात एबद-मलेख हा एक कुशी षंढ होता. त्यांनी यिर्मयाला पाण्याच्या टाकीत टाकले आहे हे त्याने ऐकले. त्यासमयी राजा बन्यामिनाच्या प्रवेशद्वाराशी बसला होता.
8 Så gikk Ebed-Melek ut av kongens hus og talte til kongen og sa:
म्हणून एबद-मलेख राजाच्या घरातून निघाला आणि राजाबरोबर बोलला. तो म्हणाला,
9 Herre konge! Disse menn har gjort ille i alt det de har gjort mot profeten Jeremias, som de har kastet i brønnen, og han dør der han er, av sult; for det er ikke brød i byen mere.
माझ्या स्वामी राजा, या मनुष्यांनी ज्या मार्गाने यिर्मया संदेष्ट्याबरोबर वाईट वागणूक केली. तो भुकेने तेथे मरावा म्हणून त्यांनी त्यास पाण्याच्या टाकीत टाकले, कारण तेथे नगरात काही अन्न नाही.
10 Da bød kongen etioperen Ebed-Melek: Ta tretti menn med dig herfra og dra profeten Jeremias op av brønnen før han dør!
१०नंतर एबद-मलेख कुशीला राजाने आज्ञा दिली. तो म्हणाला, “येथून तीस माणसे बरोबर घे आणि यिर्मया संदेष्टा मरण्यापूर्वी त्यास पाण्याच्या टाकीतून बाहेर काढ.”
11 Og Ebed-Melek tok mennene med sig og gikk inn i kongens hus, ned i rummet under forrådskammeret, og tok derfra filler av sønderrevne og utslitte klær og firte dem ned til Jeremias i brønnen med rep.
११म्हणून एबद-मलेख याने त्या मनुष्यांचा ताबा घेतला आणि त्याच्या ताब्यातील मनुष्यांना घेऊन व कपड्यासाठी राजाच्या घरातील भांडारात खाली गेला. तेथून त्याने चिंध्या व झिजलेले कपडे घेतले आणि दोरांनी त्या पाण्याच्या टाकीत खाली सोडल्या.
12 Og etioperen Ebed-Melek sa til Jeremias: Legg fillene av de sønderrevne og utslitte klær under dine armer, under repene! Og Jeremias gjorde så.
१२एबद-मलेख कुशी यिर्मयाला म्हणाला, “त्या चिंध्या आणि झिजलेले कपडे तुझ्या काखेखाली व दोरांच्यावर ठेव. मग यिर्मयाने तसे केले.
13 Så drog de Jeremias op med repene og fikk ham op av brønnen, og Jeremias blev i vaktgården.
१३नंतर त्यांनी यिर्मयाला दोरांनी ओढून पाण्याच्या टाकीबाहेर काढले. मग यिर्मया पहारेकऱ्यांच्या चौकात राहिला.
14 Derefter sendte kong Sedekias bud og hentet profeten Jeremias til sig i den tredje inngang i Herrens hus, og kongen sa til Jeremias: Jeg vil spørre dig om noget; dølg intet for mig!
१४नंतर सिद्कीया राजाने निरोप पाठवला आणि यिर्मया संदेष्ट्याला परमेश्वराच्या घराच्या तिसऱ्या प्रवेशद्वाराजवळ आपल्याजवळ बोलावले. मग राजा यिर्मयाला म्हणाला, मी तुला काही विचारायचे आहे. माझ्यापासून काही लपवू नकोस.”
15 Jeremias sa til Sedekias: Om jeg sier dig det, vil du da ikke la mig drepe? Og om jeg gir dig råd, vil du ikke høre på mig.
१५यिर्मया सिद्कीयाला म्हणाला, “जर मी तुला सांगितले, तर तू मला खचित मारणार नाहीस काय? आणि जर मी तुला सल्ला दिला, तरी तू माझे ऐकणार नाहीस.”
16 Da svor kong Sedekias Jeremias en ed i lønndom og sa: Så sant Herren lever, han som har gitt oss dette vårt liv, vil jeg ikke drepe dig og ikke gi dig i hendene på disse menn som står dig efter livet.
१६पण सिद्कीया राजाने गुप्तपणे यिर्मयाकडे शपथ घेतली व म्हणाला, परमेश्वर ज्याने आमचा जीव उत्पन्न केला, तो जिवंत आहे, मी तुला मारणार नाही किंवा जी मनुष्ये तुझा जीव घ्यायला पाहतात त्यांच्या हातात मी तुला देणार नाही.
17 Da sa Jeremias til Sedekias: Så sier Herren, hærskarenes Gud, Israels Gud: Dersom du går ut til Babels konges høvdinger, så skal du leve, og denne by skal ikke bli brent op med ild, og du skal leve, du og ditt hus.
१७मग यिर्मया सिद्कीयाला म्हणाला, “परमेश्वर, सेनाधीश देव, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, जर तू बाबेलाच्या राजाच्या अधिकाऱ्याकडे गेलास तर तू मग जिवंत राहशील आणि हे नगर जाळले जाणार नाही. तू आणि तुझा परीवार जिवंत राहील.
18 Men dersom du ikke går ut til Babels konges høvdinger, så skal denne by bli gitt i kaldeernes hånd, og de skal brenne den op med ild, og du skal ikke undkomme av deres hånd.
१८पण जर बाबेलाच्या राजाच्या अधिकाऱ्याकडे गेला नाहीस तर हे नगर खास्द्यांच्या हाती दिले जाईल. ते जाळून टाकतील आणि तू त्यांच्या हातातून सुटणार नाहीस.”
19 Men kong Sedekias sa til Jeremias: Jeg er redd for de jøder som er gått over til kaldeerne, at jeg skal bli overgitt i deres hånd, og at de skal fare ille med mig.
१९सिद्कीया राजा यिर्मयाला म्हणाला, “पण जे यहूदी सोडून खास्द्यांकडे गेले आहेत त्यांची मला भीती वाटते, कारण ते मला त्यांच्या हाती देतील, माझी चेष्टा करतील व मला वाईट वागवतील”
20 Men Jeremias sa: Du skal ikke bli overgitt til dem; hør bare på Herrens røst i det som jeg taler til dig, så det må gå dig vel, og du må leve!
२०यिर्मया म्हणाला, “ते तुला त्यांच्या स्वाधीन करणार नाहीत. मी तुला सांगत आहे तो परमेश्वराचा संदेश पाळ याकरिता की सर्व गोष्टी तुझ्यासाठी चांगल्या होतील आणि तुझा जीवही वाचेल.
21 Men undslår du dig for å gå ut, da er dette det ord Herren har latt mig se:
२१पण जर तू बाहेर जाण्यास नकार दिलास, तर काय होईल, हे परमेश्वराने मला दाखविले आहे.
22 Se, alle de kvinner som er blitt tilbake i Judas konges hus, skal bli ført ut til Babels konges høvdinger, og de skal si til dig: Dine gode venner har lokket dig og fått overhånd over dig; da dine føtter sank ned i skarnet, trakk de sig tilbake.
२२यहूदाच्या घरात ज्या स्त्रिया मागे राहिल्या आहेत त्या सर्वांना बाहेर बाबेलाच्या राजाच्या अधिकाऱ्याकडे आणले जाईल. नंतर पाहा! त्या स्त्रिया तुला म्हणतील, तुला तुझ्या मित्रांनी फसवले आहे; त्यांनी तुझा नाश केला आहे. तुझे पाय आता चिखलात रुतले आहेत आणि तुझे मित्र पळून गेले आहेत.
23 Og alle dine hustruer og dine barn skal bli ført ut til kaldeerne, og du skal ikke undkomme av deres hånd; men ved Babels konges hånd skal du bli grepet, og for din skyld skal denne by bli brent op med ild.
२३कारण तुझ्या सर्व स्त्रिया आणि मुलांना ते बाहेर खास्द्यांकडे नेतील आणि तू स्वतः त्यांच्या हातातून सुटणार नाहीस. तू बाबेलाच्या राजाच्या हातात सापडशील आणि हे नगर अग्नीने जाळण्यात येईल.”
24 Og Sedekias sa til Jeremias: La ikke nogen få vite om denne samtale, ellers skal du dø!
२४मग सिद्कीया यिर्मयाला म्हणाला, या वचनाविषयी कोणालाही कळू देऊ नको. म्हणजे तू मरणार नाही.
25 Og om høvdingene får høre at jeg har talt med dig, og de så kommer til dig og sier: Fortell oss hvad du har sagt til kongen! Dølg det ikke for oss, ellers vil vi drepe dig! Hvad har kongen sagt til dig?
२५मी तुझ्याशी बोललो हे अधिकाऱ्यांनी जर ऐकले, ते जर आले आणि तुला म्हणाले, तू राजाबरोबर काय बोललास ते आम्हास सांग. आमच्यापासून लपवून ठेवू नको अथवा आम्ही तुला ठार मारू आणि राजा तुला काय म्हणाला तेही आम्हास सांग
26 da skal du si til dem: Jeg bar min ydmyke bønn frem for kongens åsyn; Jeg bad at han ikke måtte føre mig tilbake til Jonatans hus for å dø der.
२६मग तू त्यांना असे सांग, मी राजाला विनंती करून सांगितले की, मला योनाथानाच्या घरी मरण्यासाठी परत पाठवू नको.
27 Og da alle høvdingene kom til Jeremias og spurte ham, svarte han dem aldeles som kongen hadde befalt. Og de tidde og lot ham være i fred; for saken var ikke blitt kjent.
२७नंतर सर्व अधिकारी यिर्मयाकडे आले आणि त्यांनी त्यास प्रश्न विचारले आणि त्याने उत्तर दिले, राजाने सूचना केल्याप्रमाणे त्याने उत्तरे दिली. मग त्यांनी त्याच्याशी बोलणे थांबवले कारण त्यांनी यिर्मया व राजा यांच्यात झालेले संभाषण ऐकले नव्हते.
28 Og Jeremias blev i vaktgården like til den dag da Jerusalem blev inntatt.
२८ह्याप्रमाणे यिर्मया, यरूशलेम जिंकले जाईपर्यंत, पहारेकऱ्याच्या चौकात राहिला.

< Jeremias 38 >