< 2 Krønikebok 25 >

1 Amasja var fem og tyve år gammel da han blev konge, og regjerte ni og tyve år i Jerusalem; hans mor hette Joaddan og var fra Jerusalem.
अमस्या राजा झाला तेव्हा पंचवीस वर्षांचा होता. नंतर त्याने यरूशलेमामध्ये एकोणतीस वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव यहोअदान, ती यरूशलेमची होती.
2 Han gjorde hvad rett var i Herrens øine, dog ikke med udelt hjerte.
त्याची वर्तणूक परमेश्वरास पटेल अशी होती पण त्यामध्ये मन: पूर्वकता नव्हती.
3 Så snart han hadde fått kongedømmet fast i sin hånd, slo han ihjel dem av sine tjenere som hadde slått ihjel hans far kongen.
अमस्या शक्तीशाली राजा झाला मग त्याने आपल्या वडलांच्या मारेकऱ्यांची हत्या केली.
4 Men deres barn drepte han ikke; han gjorde efter det som er skrevet i loven, i Mose-boken, hvor Herren har gitt dette bud: Foreldre skal ikke lide døden for sine barns skyld, og barn ikke lide døden for sine foreldres skyld; men enhver skal dø for sin egen synd.
पण त्यांच्या पुत्रांना त्याने ठार केले नाही कारण याबाबतीत मोशेच्या नियमशास्त्रातली आज्ञा त्याने पाळली. परमेश्वराची आज्ञा अशी आहे, “मुलांच्या अपराधासाठी मातापितांना आणि मातापित्यांच्या अपराधासाठी पुत्रांना मृत्युदंड देऊ नये. ज्याच्या हातून अपराध झाला त्या व्यक्तीलाच देहदंड व्हावा.”
5 Siden samlet Amasja Juda og stilte dem op efter deres familier under høvedsmennene over tusen og høvedsmennene over hundre i hele Juda og Benjamin; han mønstret dem fra tyveårsalderen og opover, og han fant ut at det var tre hundre tusen utvalgte stridsdyktige menn, som kunde føre spyd og skjold.
अमस्याने सर्व यहूदा लोकांस एकत्र केले आणि त्यांच्या घराण्यांवर सेनापती आणि सेनानायक यांच्या नेमणुका केल्या. समस्त यहूदा आणि बन्यामीन सैनिकांवर या प्रमुखांचा अंमल होता. युध्दात भाग घेण्यासाठी किमान वीस आणि त्यापुढील वयाचे सैनिक निवडले. भाले आणि ढालींनी सज्ज असे एकंदर तीन लाख सैनिक युध्दाला तयार होते.
6 Dessuten leide han i Israel hundre tusen djerve stridsmenn for hundre talenter sølv.
यांच्याखेरीज आणखी एक लाख सैन्याची कुमक अमस्याने इस्राएलकडून मागवली. त्यासाठी त्याने शंभर किक्कार चांदी एवढी किंमत मोजली.
7 Men en Guds mann kom til ham og sa: La ikke israelitt-hæren dra med dig, konge! For Herren er ikke med Israel - ikke med nogen av Efra'ims barn.
पण यावेळी देवाचा एक मनुष्य अमस्याकडे येऊन त्यास म्हणाला, “हे राजा, इस्राएलच्या सैन्याला आपल्याबरोबर घेऊ नकोस. एफ्राइमाच्या वंशजांना म्हणजेच इस्राएलच्या लोकांस परमेश्वराची साथ नाही.
8 Men dra du frem - gjør det og gå modig i striden! Ellers vil Gud la dig falle for fienden; for det står i Guds makt både å hjelpe og å felle.
तू भले कितीही तयारी करून लढाईत उतरलास तरी तुझा जय पराजय होणे देवाच्याच हातात आहे.”
9 Og Amasja spurte den Guds mann: Men hvad blir det da av de hundre talenter jeg har gitt hærflokken av Israel? Den Guds mann svarte: Herren kan vel gi dig mere enn dette.
यावर अमस्या त्या देवाच्या मनुष्यास म्हणाला, “पण इस्राएली सैन्याला मी शंभर किक्कार चांदी देऊन बसलो आहे, त्याचे काय?” देवाचा मनुष्य म्हणाला, “परमेश्वराकडे अलोट संपत्ती आहे, तो तुला त्यापेक्षा कितीतरी जास्त देऊ शकेल.”
10 Da skilte Amasja ut den flokk som var kommet til ham fra Efra'im, og lot dem dra hjem igjen. Derfor blev de harme på Juda, og de vendte hjem i brennende vrede.
१०तेव्हा अमस्याने इस्राएलच्या सैन्याला एफ्राइमला परत पाठवले, या कृत्यामुळे इस्राएली सैन्य, यहूदाचा राजा आणि यहूदाचे लोक यांच्यावर संतापले आणि रागाने घरी परतले.
11 Men Amasia tok mot til sig og drog ut med sine folk og kom til Saltdalen; der hugg han ned ti tusen mann av Se'irs barn.
११यानंतर अमस्याने मोठे धाडस करून अदोम देशातील मिठाच्या खोऱ्यावर हल्ला चढवला. अमस्याच्या सैन्याने याठिकाणी सेईर मधील दहा हजार लोकांस ठार केले.
12 Og ti tusen tok Judas barn levende til fange og førte dem op på toppen av en klippe og styrtet dem ned derfra, så de alle knustes.
१२यहूदी लोकांनी दहा हजार जणांना बंदिवान केले. त्यांना धरुन पर्वत माथ्यावर नेले आणि एवढ्या उंचीवरुन त्यांचा कडेलोट केला. खालच्या दगडधोंड्यांवर त्यांचे देह छिन्नविच्छिन्न होऊन पडले.
13 Men de som hørte til den flokk som Amasja hadde sendt tilbake, så de ikke kom til å dra med ham i krigen, falt inn i Judas byer fra Samaria like til Bet-Horon; og de hugg ned der tre tusen mann og tok meget hærfang.
१३नेमक्या याचवेळी अमस्याने परत पाठवलेल्या इस्राएली सैन्याने यहूदातील काही नगरांवर हल्ला चढवला. त्यांनी बेथ-होरोनपासून सरळ शोमरोनपर्यंत गावे उद्ध्वस्त केली, तीन हजार लोकांस जिवे मारले आणि मौल्यवान चीजवस्तू लुटल्या. अमस्याने आपल्याला लढाईत सामील करून न घेतल्यामुळे हे इस्राएली सैन्य भडकले होते.
14 Da Amasja kom tilbake og hadde slått edomittene, førte han Se'irs barns guder med sig og stilte dem op som sine guder; og han kastet sig ned for dem og brente røkelse for dem.
१४अदोम्यांचा पाडाव करून अमस्या आपल्या नगरात परतला. येताना त्याने सेईर येथील लोकांच्या देवाच्या मूर्ती बरोबर आणल्या आणि त्यांची पूजाअर्चा सुरू केली. या दैवतांना वंदन करून तो त्यांच्यापुढे धूप जाळू लागला.
15 Da optendtes Herrens vrede mot Amasja, og han sendte en profet til ham; han sa til ham: Hvorfor søker du dette folks guder, de som ikke har reddet sitt eget folk av din hånd?
१५या कृतीमुळे परमेश्वराचा अमस्यावर कोप झाला. परमेश्वराने संदेष्ट्याला अमस्याकडे पाठवले. संदेष्टा राजाला म्हणाला, “अमस्या, त्या लोकांच्या दैवतांची पूजा तू का करत आहेस? त्या दैवतांना तर स्वत: च्याच लोकांचे तुझ्यापासून रक्षण करता आले नाही.”
16 Men da han talte således til ham, svarte han ham: Har vi satt dig til rådgiver for kongen? Hold op med dette hvis du ikke vil bli slått ihjel! Da hørte profeten op og sa: Jeg vet at Gud har besluttet å ødelegge dig, siden du har gjort dette og ikke hørt på mitt råd.
१६अमस्या संदेष्ट्याच्या या बोलण्यावर म्हणाला, “आम्ही तुला राजाचा सल्लागार म्हणून नेमलेले नाही, तेव्हा तू गप्प रहावे हे चांगले नाहीतर जिवाला मुकशील.” संदेष्टा गप्प बसला पण नंतर म्हणाला, “देवाने तुझा नाश करायचे निश्चित केले आहे. कारण तू करु नये त्या गोष्टी केल्यास आणि माझे ऐकले नाहीस.”
17 Men Judas konge Amasja holdt råd og sendte så bud til Israels konge Joas, sønn av Joakas, Jehus sønn, og lot si: Kom, la oss prøve styrke med hverandre!
१७यहूदाचा राजा अमस्या याने यावर आपल्या सल्लागारांबरोबर विचार विनिमय केला. मग योवाशाला त्याने निरोप पाठवला की, “आपली एकदा प्रत्यक्ष युध्दात गाठ पडली पाहिजे.” योवाश हा यहोआहाजाला पुत्र आणि यहोआहाज येहूचा, येहू इस्राएलचा राजा होता.
18 Men Israels konge Joas sendte bud til Judas konge Amasja og svarte: Tornebusken på Libanon sendte bud til sederen på Libanon og lot si: La min sønn få din datter til hustru! Men de ville dyr på Libanon for frem og trådte tornebusken ned.
१८इस्राएलचा राजा योवाश याने यहूदाचा राजा अमस्या याच्याकडे आपले उत्तर पाठवले. योवाशाने दृष्टांत दिला तो असा: “लबानोन मधल्या एका काटेरी झुडुपाने लबानोनाच्या एका गंधसरूला निरोप पाठवला की, ‘तुझ्या कन्येचे माझ्या पुत्रांशी लग्न व्हावे.’ पण तेवढ्यात ते झुडुप तिथून जाणाऱ्या एका वन्यपशूच्या पायाखाली तुडवले गेले.
19 Du tenker: Jeg har slått Edom, og derfor er du blitt overmodig og vil vinne ennu mere ære. Bli bare hjemme! Hvorfor vil du kalle ulykken ned over dig, så du går til grunne, både du og Juda med dig?
१९मी अदोमचा पराभव केला. असे तू खुशाल म्हण. तू हे प्रौढीने म्हणतो आहेस खरे पण तू आपल्या घरी स्वस्थ बसावेस हे बरे. स्वत: ला उगीच अडचणीत पाडू नकोस! पण तू तसे केलेस तर तू स्वत: च्या आणि त्याबरोबर यहूदाच्या नाशाला कारणीभूत होशील.”
20 Men Amasja hørte ikke på ham; for det var Gud som styrte det således; han vilde gi dem i fiendehånd, fordi de hadde søkt Edoms guder.
२०पण अमस्याने या निरोपाला दाद दिली नाही. यहूदाच्या लोकांनी अदोमी लोकांच्या दैवताचे भजन पूजन सुरु केल्यामुळे इस्राएलकडून यहूदाचा पराभव करायचे परमेश्वराने योजले होते.
21 Da drog Israels konge Joas op, og han og Judas konge Amasja prøvde styrke med hverandre ved Bet-Semes, som hører til Juda.
२१तेव्हा इस्राएलचा राजा योवाश आणि यहूदाचा राजा अमस्या यांची बेथ-शेमेश नगरात समोरासमोर गाठ पडली. बेथ-शेमेश यहूदातच आहे.
22 Og Judas menn blev slått av Israel, og de flyktet hver til sitt hjem;
२२इस्राएलने यहूदाचा पराभव केला. झाडून सर्व यहूद्यांनी या लढाईतून पळ काढला.
23 men Judas konge Amasja, sønn av Joas, Joakas' sønn blev tatt til fange av Israels konge Joas ved Bet-Semes, og han førte ham til Jerusalem, og han rev ned et stykke av Jerusalems mur, fra Efra'im-porten til Hjørneporten, fire hundre alen.
२३इस्राएलाचा राजा योवाशाने बेथ-शेमेश येथे यहूदाचा राजा अमस्याला पकडले आणि यरूशलेमेला नेले. अमस्याच्या पित्याचे नाव योवाश. योवाशाचे पिता यहोआहाज. योवाशाने एफ्राइम वेशीपासून कोपऱ्याच्या वेशीपर्यंतची यरूशलेमेच्या तटबंदीची चारशे हात लांबीची भिंत पार मोडून तोडून टाकली.
24 Og han tok alt det gull og sølv og alle de kar som fantes i Guds hus hos Obed-Edom, og skattene i kongens hus og dessuten gislene; så vendte han tilbake til Samaria.
२४सर्व सोने व रुपे तसेच मंदिरातील उपकरणे, भांडी देखील त्याने हस्तगत केली. देवाच्या मंदिरातील वस्तूंची देखभाल करण्याची जबाबदारी ओबेद-अदोमची होती. राजमहालातील वस्तूही योवाशाने लुटल्या. काहीजणांना बंदिवान केले. या सगळ्यासह तो शोमरोनला परतला.
25 Judas konge Amasja, Joas' sønn, levde femten år efterat Israels konge Joas, Joakas' sønn, var død.
२५यहोआहाजाचा पुत्र इस्राएलाचा राजा योवाश याच्या मृत्यूनंतर अमस्या पंधरा वर्षे जगला. अमस्याचे पिता म्हणजे यहूदाचा राजा योवाश.
26 Hvad som ellers er å fortelle om Amasja, både i hans første og i hans senere dager, det er opskrevet boken om Judas og Israels konger.
२६यहूदा आणि इस्राएलमधील राजांचा इतिहास या पुस्तकात, अमस्याने बाकी जे जे केले त्याची संपूर्ण हकिकत आली आहे.
27 Men fra den tid Amasja falt fra Herren, gjorde de en sammensvergelse mot ham i Jerusalem, og han flyktet til Lakis; men de sendte folk efter ham til Lakis, og de drepte ham der.
२७अमस्याने परमेश्वराचे आज्ञापालन करायचे थांबवल्यावर यरूशलेमेच्या लोकांनी त्याच्याविरुध्द कट केला. तेव्हा तो लाखीश येथे पळून गेला. पण लोकांनी त्याच्या मागावर माणसे पाठवून त्याचा तेथे वध केला.
28 Så kjørte de ham derfra med hester og begravde ham hos hans fedre i Judas stad.
२८अमस्याचा मृतदेह मग लोकांनी घोड्यावर लादला आणि यहूदाच्या नगरात आणून त्यास पूर्वंजाशेजारी पुरले.

< 2 Krønikebok 25 >