< 1 Peters 1 >

1 Peter, Jesu Kristi apostel - til de utlendinger som er spredt omkring i Pontus, Galatia, Kappadokia, Asia og Bitynia, utvalgt
येशू ख्रिस्ताचा प्रेषित पेत्र ह्याजकडून, पंत, गलतीया, कप्पदुकिया, आशिया व बिथुनिया या प्रांतात उपरी म्हणून पांगलेल्या देवाच्या लोकांस पत्र,
2 efter Gud Faders forutviten, i Åndens helliggjørelse, til lydighet og oversprengning med Jesu Kristi blod: Nåde og fred bli eder mangfoldig til del!
देवपित्याच्या पूर्वज्ञानानुसार, आत्म्याच्या पवित्रीकरणाद्वारे, येशूच्या आज्ञेत राहण्यासाठी त्याचे रक्त शिंपडून निवडलेले तुम्हास कृपा व शांती विपुल मिळोत.
3 Lovet være Gud og vår Herre Jesu Kristi Fader, han som efter sin store miskunn har gjenfødt oss til et levende håp ved Jesu Kristi opstandelse fra de døde,
आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव आणि पिता धन्यवादित असो! त्याने आपल्या महादयेने येशू ख्रिस्ताला मृतांतून उठवून आपल्याला एका जिवंत आशेत पुन्हा जन्म दिला आहे,
4 til en uforgjengelig og usmittet og uvisnelig arv, som er gjemt i himlene for eder,
आणि त्याद्वारे मिळणारे अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन स्वर्गात तुमच्यासाठी राखून ठेवले आहे,
5 I som ved Guds makt holdes oppe ved troen til den frelse som er ferdig til å bli åpenbaret i den siste tid.
आणि शेवटच्या काळात प्रकट करण्याकरता सिद्ध केलेल्या तारणासाठी तुम्ही देवाच्या सामर्थ्याने विश्वासाद्वारे, राखलेले आहात.
6 Derover fryder I eder, om I enn nu - når så skal være - har sorg en liten stund ved allehånde fristelser,
आणि या कारणास्तव, आताच्या काळात, निरनिराळया प्रकारच्या परीक्षांमुळे तुम्हास थोडा वेळ भाग पडल्यास तुम्ही दुःख सोशीत असताही आनंदित होता.
7 forat eders prøvede tro, som er meget kosteligere enn det forgjengelige gull, som dog prøves ved ild, må finnes til lov og pris og ære i Jesu Kristi åpenbarelse,
म्हणजे, नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात, त्या सोन्याहून मोलवान असलेल्या तुमच्या विश्वासाची परीक्षा, येशू ख्रिस्ताचे येणे होईल त्यावेळी, प्रशंसेला, गौरवाला व मानाला कारण व्हावी.
8 han som I ikke har kjent og dog elsker, han som I nu ikke ser og dog tror på, og derfor fryder I eder med en usigelig og herliggjort glede,
तुम्ही त्यास बघितले नसताही तुम्ही त्याच्यावर प्रीती करता आणि त्यास पाहिले नसताही त्याच्यावर विश्वास ठेवून, तुम्ही अवर्णनीय, गौरवी आनंदाने उल्लसीत होता.
9 når I vinner frem til endemålet for eders tro, sjelenes frelse.
कारण, तुमच्या विश्वासाचे प्रतिफळ, म्हणजे तुमच्या आत्म्याचे तारण तुम्ही मिळवत आहात.
10 Om denne frelse var det profetene gransket og ransaket, de som spådde om den nåde som I skulde få,
१०तुम्हास प्राप्त होणार्‍या कृपेविषयी ज्या संदेष्ट्यांनी संदेश सांगितले ते या तारणाविषयी विचार व शोध करीत होते.
11 idet de ransaket hvilken eller hvad slags tid Kristi Ånd, som var i dem, viste frem til når han forut vidnet om Kristi lidelser og om herligheten derefter;
११त्यांच्यामधील ख्रिस्ताचा आत्मा जेव्हा ख्रिस्ताच्या दुःखांविषयी व त्यानंतरच्या त्याच्या जिवंत उठण्याच्या गौरवी गोष्टींविषयी पूर्वीच सांगितले होते, तेव्हा त्याने कोणता किंवा कोणत्या प्रकारचा काळ दर्शवला याचा ते विचार करीत होते.
12 for det blev dem åpenbaret at de ikke tjente sig selv, men oss, med dette som nu er blitt kunngjort ved dem som har forkynt eder evangeliet ved den Hellige Ånd, som blev sendt fra himmelen - dette som englene attrår å skue inn i.
१२त्यांना प्रकट झाले होते की, स्वर्गातून खाली पाठवलेल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने, तुम्हास शुभवर्तमान सांगणार्‍यांनी आता ज्या गोष्टी तुम्हास सांगितल्या, त्यामध्ये ते स्वतःची नाही, पण तुमची सेवा करीत होते. त्या गोष्टी न्याहाळून पाहण्याची इच्छा देवदूतांना आहे.
13 Derfor, omgjord eders sinns lender, vær edrue, og sett eders håp fullt og fast til den nåde som blir eder til del i Jesu Kristi åpenbarelse!
१३म्हणून तुम्ही आपल्या मनाची कंबर कसून सावध रहा आणि येशू ख्रिस्ताचे येणे होईल त्यावेळी तुमच्यावर जी कृपा होणार आहे तिच्यावर पूर्ण आशा ठेवा.
14 Som lydige barn skal I ikke skikke eder efter de forrige lyster i eders vankundighet,
१४तुम्ही आज्ञांकित मुले होऊन, तुमच्या पूर्वीच्या अज्ञानातील वासनांप्रमाणे स्वतःला वळण लावू नका.
15 men vær, efter den Hellige som kalte eder, også I hellige i all eders ferd!
१५परंतु तुम्हास ज्याने पाचारण केले तो जसा पवित्र आहे तसे तुम्ही आपल्या सर्व वागण्यात पवित्र व्हा.
16 for det er skrevet: I skal være hellige; for jeg er hellig.
१६कारण असे जे पवित्र शास्त्रात लिहिले आहे की, “तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे.”
17 Og når I påkaller som Fader ham som dømmer uten å gjøre forskjell, efter enhvers gjerning, da ferdes i frykt i eders utlendighets tid,
१७आणि पक्षपात न करता, जो प्रत्येक मनुष्याचा कामाप्रमाणे न्याय करतो त्यास तुम्ही जर पिता म्हणून हाक मारता, तर तुमच्या प्रवासाच्या काळात तुम्ही भय धरून वागले पाहिजे.
18 for I vet at I ikke med forgjengelige ting, sølv eller gull, blev løskjøpt fra eders dårlige ferd, som var arvet fra fedrene,
१८कारण तुम्हास माहीत आहे की, तुमच्या पूर्वजांनी लावून दिलेल्या निरर्थक आचरणातून चांदीसोन्यासारख्या नाशवंत गोष्टीद्वारे, तुमची सुटका केली गेली नाही.
19 men med Kristi dyre blod som blodet av et ulastelig og lyteløst lam,
१९निष्कलंक व निर्दोष कोकरा झालेल्या ख्रिस्ताच्या मोलवान रक्ताद्वारे तुम्ही मुक्त झाला आहात.
20 han som forut var kjent, før verdens grunnvoll blev lagt, men blev åpenbaret ved tidenes ende for eders skyld,
२०खरोखर, जगाच्या स्थापने अगोदर, तो पूर्वीपासून नेमलेला होता. पण या शेवटच्या काळात तो तुमच्यासाठी प्रकट झाला,
21 I som ved ham tror på Gud, som opvakte ham fra de døde og gav ham herlighet, så at eders tro også er håp til Gud.
२१आणि त्याच्याद्वारे तुम्ही देवावर विश्वास ठेवला; कारण देवावर तुमचा विश्वास व तुमची आशा असावी म्हणून त्यास मृतांतून उठवून गौरव दिला.
22 Rens eders sjeler i lydighet mot sannheten til uskrømtet broderkjærlighet, og elsk hverandre inderlig av hjertet,
२२तुम्ही जर आत्म्याच्याद्वारे, सत्याचे आज्ञापालन करून, निष्कपट बंधुप्रेमासाठी आपले जीव शुद्ध केले आहे, तर तुम्ही आस्थेने एकमेकांवर मनापासून प्रीती करा.
23 I som er gjenfødt, ikke av forgjengelig, men uforgjengelig sæd, ved Guds ord, som lever og blir! (aiōn g165)
२३कारण तुम्ही नाशवंत बीजाकडून नाही पण अविनाशी बीजाकडून, म्हणजे देवाच्या, जिवंत टिकणार्‍या वचनाच्याद्वारे तुमचा पुन्हा जन्म पावलेले आहात. (aiōn g165)
24 For alt kjød er som gress, og all dets herlighet som blomst på gress: gresset visnet, og blomsten på det falt av,
२४कारण पवित्रशास्त्रात असे लिहिले आहे, “सर्व मानवजाती गवतासारखी आहे व तिचे सर्व वैभव गवताच्या फुलासारखे आहे गवत वाळते व त्याचे फूल गळते.
25 men Herrens ord blir evindelig; og dette er det ord som er forkynt eder ved evangeliet. (aiōn g165)
२५परंतु परमेश्वराचे वचन सर्वकाळ टिकते.” तुम्हास त्याच वचनाचे शुभवर्तमान तुम्हास सांगण्यात आले ते तेच आहे. (aiōn g165)

< 1 Peters 1 >