< तीत. 2 >

1 तू तर सुशिक्षणास शोभणार्‍या गोष्टी बोलत जा.
sino que digan lo que conviene a la sana doctrina,
2 त्या अशा की, वृद्ध पुरुषांनी संयमशील, गंभीर व समंजस व्हावे आणि विश्वास, प्रीती व सहनशीलता ह्यात दृढ व्हावे.
que los hombres mayores sean templados, sensatos, de mente sobria, sanos en la fe, en el amor y en la perseverancia,
3 वृद्ध स्त्रियांनी, त्याचप्रमाणे, आपल्या आचरणात पवित्रेस शोभणाऱ्या असाव्या; चुगलखोर, मद्य पिणाऱ्या नसाव्या; चांगले शिक्षण देणार्‍या असाव्या;
y que las mujeres mayores sean igualmente reverentes en su conducta, no calumniadoras ni esclavas del mucho vino
4 आणि आपल्यातील तरुण स्त्रियांना असे शिक्षण द्यावे की, त्यांनी आपल्या पतींवर व मुलांवर प्रेम करावे.
que instruyan a las mujeres jóvenes en el amor a sus maridos, en el amor a sus hijos,
5 आणि त्यांनी समंजस, शुद्धाचरणी, घर संभाळणार्‍या, ममताळू व पतीच्या अधीन राहणार्‍या व्हावे; म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही.
que sean sobrias, castas, trabajadoras en el hogar, bondadosas, sometidas a sus propios maridos, para que la palabra de Dios no sea blasfemada.
6 आणि तसेच तरुण पुरुषांनी समंजस मनाचे व्हावे म्हणून, तू त्यांना बोध कर.
Asimismo, exhorta a los más jóvenes a ser sobrios.
7 तू सर्व गोष्टींत चांगल्या कामांचे उदाहरण असे स्वतःला दाखव; तुझ्या शिक्षणात निर्मळपणा, गंभीरता,
En todo, muéstrate como ejemplo de buenas obras. En tu enseñanza, muestra integridad, seriedad, incorruptibilidad,
8 आणि निरपवाद चांगली शिकवण दिसू दे, म्हणजे तुझ्यावर टिका करणार्‍याला तुझ्याविषयी बोलण्यास काही वाईट न मिळून तो लज्जित व्हावा.
y solidez de palabra que no pueda ser condenada, para que el que se oponga a vosotros se avergüence, sin tener nada malo que decir de nosotros.
9 आणि दासांनी सर्व गोष्टींत त्यांच्या स्वामीच्या आज्ञेत रहावे, त्यांना संतोष देणारे व्हावे आणि उलट बोलू नये;
Exhorta a los siervos a que estén sujetos a sus propios amos y sean agradables en todo, sin contradecir,
10 १० त्यांनी चोर्‍या करू नयेत तर सर्व गोष्टींत चांगला विश्वासूपणा दाखवावा; आणि आपल्या तारक देवाच्या शिकवणीस, सर्व लोकात, त्यांनी शोभा आणावी; असा तू त्यांना बोध कर.
sin robar, sino mostrando toda buena fidelidad, para que adornen en todo la doctrina de Dios, nuestro Salvador.
11 ११ कारण, सर्व लोकांस तारणारी देवाची कृपा प्रकट झाली आहे.
Porque la gracia de Dios se ha manifestado, trayendo la salvación a todos los hombres,
12 १२ ती आपल्याला असे शिकवते की, अभक्तीचा व जगीक वासनांचा त्याग करून, आपण या आताच्या युगात संयमाने, नीतिने व सुभक्तीने वागले पाहिजे. (aiōn g165)
instruyéndonos para que, renunciando a la impiedad y a los deseos mundanos, vivamos en este tiempo sobria, justa y piadosamente; (aiōn g165)
13 १३ आणि आपल्या धन्य आशेची, म्हणजे आपला महान देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या गौरवी आगमनाची प्रतीक्षा करावी;
aguardando la esperanza bienaventurada y la manifestación de la gloria de nuestro gran Dios y Salvador Jesucristo,
14 १४ आपल्यासाठी त्याने स्वतःचे दान केले ते ह्यासाठी की, आपली सर्व अनाचारातून सुटका करावी आणि चांगल्या कामात आवेशी असलेले आपले स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करावेत.
que se entregó a sí mismo por nosotros, para redimirnos de toda iniquidad y purificar para sí un pueblo que le pertenezca, celoso de buenas obras.
15 १५ तू या गोष्टी समजावून सांग, बोध कर आणि सर्व अधिकार पूर्वक दोष पदरी घाल. कोणी तुझा उपहास करू नये.
Decid estas cosas y exhortad y reprended con toda autoridad. Que nadie os desprecie.

< तीत. 2 >