< रोम. 3 >

1 मग यहूदी असण्यात फायदा तो काय? किंवा सुंताविधीकडून काय लाभ?
Kas tad nu Jūdam ir pārāki, jeb kāds ir tas apgraizīšanas labums?
2 सर्वबाबतीत पुष्कळच आहे. प्रथम हे की, त्यांच्यावर देवाची वचने सोपवली होती.
Visādi liels! Jo pirmā kārtā Dieva vārdi tiem ir uzticēti.
3 पण काहींनी विश्वास ठेवला नाही म्हणून काय झाले? त्यांचा अविश्वास देवाचा विश्वासूपणा व्यर्थ करील काय?
Jo kas par to, ja kādi nav ticējuši? Vai viņu neticība Dieva uzticību iznīcinās?
4 कधीच नाही! देव खरा व प्रत्येक मनुष्य खोटा ठरो. पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘तुझ्या बोलण्यात तू नीतिमान ठरावेस, आणि तुझा न्याय होत असता विजयी व्हावेस.’
Nemaz ne! Bet lai tā paliek, ka Dievs ir taisns un ikkatrs cilvēks melkulis, itin kā ir rakstīts: “Ka Tu palieci taisns Savos vārdos un uzvari, kad Tu topi tiesāts.”
5 पण आमची अनीती जर देवाचे न्यायीपण स्थापित करते तर आम्ही काय म्हणावे? जो देव आमच्यावर आपला क्रोध आणतो तो अन्यायी आहे काय? (मी मानवी व्यवहाराप्रमाणे बोलत आहे.)
Kad nu mūsu netaisnība Dieva taisnību apstiprina, ko lai sakām? Vai tad Dievs nav netaisns, kad Viņš soda? To runāju, kā cilvēki mēdz runāt.
6 कधीच नाही! असे झाले तर, देव जगाचा न्याय कसा करील?
Nemaz ne! Jo kā tad Dievs pasauli tiesās?
7 कारण जर माझ्या लबाडीने देवाचा खरेपणा अधिक प्रकट होऊन त्याच्या गौरवास कारण झाले, तर माझाही पापी म्हणून न्याय का व्हावा?
Jo ja Dieva patiesība caur maniem meliem ir vairojusies Viņam par godu, ko tad es vēl kā grēcinieks topu tiesāts?
8 आणि आपण चांगले घडावे म्हणून वाईट करू या असे का म्हणून नये? आम्ही असे सांगत असतो अशी आमची निंदा कित्येक लोक करत आहे, अशा लोकांची त्यांना यथान्याय शिक्षा आहे.
Un kam mēs nesakām, itin kā topam zaimoti, un itin kā daži teic, mūs sakām: darīsim ļaunu, lai nāk labums? Tādiem sods pēc taisnības notiks.
9 मग काय? आपण यहूदी अधिक चांगले आहोत काय? मुळीच नाही, कारण सगळे यहूदी व ग्रीक पापाखाली आहेत, असा आधीच आम्ही त्यांच्यावर आरोप केला आहे.
Ko tad nu? Vai mēs esam labāki? Nemaz ne. Jo mēs jau pirmāk esam rādījuši, gan Jūdus, gan Grieķus, visus esam apakš grēka.
10 १० पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘नीतिमान कोणी नाही, एकही नाही.
Itin kā stāv rakstīts: nav neviena taisna, it neviena,
11 ११ ज्याला समजते असा कोणी नाही, जो झटून देवाचा शोध करतो असा कोणी नाही,
Nav neviena prātīga, nav neviena, kas Dievu meklē.
12 १२ ते सगळे बहकले आहेत, ते सगळे निरुपयोगी झाले आहेत; सत्कर्म करणारा कोणी नाही, एकही नाही.
Visi ir atkāpušies un kopā tapuši nelieši, nav neviena, kas labu dara, it neviena.
13 १३ त्यांचा घसा एक उघडलेले थडगे आहे. ते आपल्या जीभांनी कपट योजतात, त्यांच्या ओठांखाली सर्पाचे विष असते.
Viņu rīkle ir atvērts kaps; ar savām mēlēm tie viltību dara: odžu dzelonis ir apakš viņu lūpām;
14 १४ त्यांचे तोंड शापाने व कडूपणाने भरले आहे;
Viņu mute ir lāstu un rūgtuma pilna.
15 १५ त्यांचे पाय रक्त पाडण्यास उतावळे आहेत.
Viņu kājas ir čaklas izliet asinis.
16 १६ विध्वंस व विपत्ती त्यांच्या मार्गात आहेत.
Posts un sirdēsti ir pa viņu ceļiem,
17 १७ शांतीचा मार्ग त्यांनी ओळखला नाही.
Un miera ceļu tie nezin.
18 १८ त्यांच्या डोळ्यांपुढे देवाचे भय नाही.’
Dieva bijāšanas nav priekš viņu acīm.
19 १९ आता आपण हे जाणतो की नियमशास्त्र जे काही सांगते ते नियमशास्त्राधीन असलेल्यांस सांगते म्हणजे प्रत्येक तोंड बंद केले जावे आणि सर्व जग देवासमोर अपराधी म्हणून यावे.
Bet mēs zinām, ka bauslība visu, ko tā saka, to tā runā uz tiem, kas ir apakš bauslības, lai ikviena mute top aizbāzta, un visa pasaule ir noziedzīga Dieva priekšā.
20 २० कारण देवाच्या दृष्टीपुढे नियमशास्त्राच्या कृतींकडून कोणीही मनुष्य नीतिमान ठरणार नाही, कारण नियमशास्त्राकडून पापाचे ज्ञान होते.
Tādēļ no bauslības darbiem neviena miesa netaps taisnota Viņa priekšā; jo caur bauslību nāk grēku atzīšana.
21 २१ पण नियमशास्त्राकडून व संदेष्ट्यांकडून साक्ष दिली गेल्याप्रमाणे, नियमशास्त्राशिवाय देवाचे नीतिमत्त्व, आता, प्रकट झाले आहे.
Bet Dieva taisnība, kas no bauslības un no praviešiem ir apliecināta, tagad ir tapusi zināma bez bauslības,
22 २२ पण हे देवाचे नीतिमत्त्व येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे, विश्वास ठेवणार्‍या सर्वांसाठी आहे कारण तेथे कसलाही फरक नाही.
Tā Dieva taisnība caur ticību uz Jēzu Kristu priekš visiem un pie visiem, kas tic; jo tur nav nekādas starpības.
23 २३ कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरले आहेत;
Jo visi ir grēkojuši, un tiem trūkst teikšanas Dieva priekšā,
24 २४ देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामुल्य नीतिमान ठरतात.
Un top taisnoti bez nopelna no Viņa žēlastības caur to atpirkšanu, kas notikusi caur Kristu Jēzu.
25 २५ त्याच्या रक्ताकडून विश्वासाद्वारे प्रायश्चित्त होण्यास देवाने त्यास पुढे ठेवले, कारण देवाच्या मागे झालेल्या पापांच्या क्षमेमुळे सहनशीलपणात आणि त्याने आपले नीतिमत्त्व प्रकट करावे;
To Dievs ir nolicis par salīdzināšanu, caur ticību iekš Viņa asinīm, ka tas Savu taisnību parādītu, pamezdams tos priekšlaikā darītos grēkus
26 २६ त्याने या आताच्या काळात आपले नीतिमत्त्व प्रकट करावे, म्हणजे त्याने नीतिमान असावे आणि जो येशूवर विश्वास ठेवतो त्यास नीतिमान ठरविणारा व्हावे.
Iekš dievišķas paciešanas, ka Tas Savu taisnību parādītu šinī laikā: Sevi esam taisnu, un taisnu darām to, kas ir no Jēzus ticības.
27 २७ मग आपला अभिमान कुठे आहे? तो बाहेर ठेवला गेला. कोणत्या नियमामुळे? कर्मांच्या काय? नाही, पण विश्वासाच्या नियमामुळे.
Kur nu ir tā lielīšanās? Tā ir zudusi. Caur kuru bauslību? Vai caur darbu bauslību? Nē! Bet caur ticības bauslību.
28 २८ म्हणून, नियमशास्त्राच्या कर्मांवाचून मनुष्य विश्वासाने नीतिमान ठरतो हे आपण पाहतो.
Tad nu mēs turam, ka cilvēks top taisnots caur ticību bez bauslības darbiem.
29 २९ किंवा देव केवळ यहूद्यांचा देव आहे काय? परराष्ट्रीयाचा नाही काय? हो, परराष्ट्रीयांचा ही आहे.
Jeb vai Dievs tikai Jūdu Dievs? Vai nav arī pagānu Dievs? Tiešām arī pagānu.
30 ३० जर सुंता झालेल्यांस विश्वासाने आणि सुंता न झालेल्यांस विश्वासाद्वारे जो नीतिमान ठरवील तो तोच एक देव आहे.
Jo viens Dievs ir, kas taisno apgraizījumu no ticības un priekšādu caur ticību.
31 ३१ तर मग आपण विश्वासाद्वारे नियमशास्त्र व्यर्थ करतो काय? तसे न होवो. उलट आपण नियमशास्त्र प्रस्थापित करतो.
Vai tad nu mēs bauslību iznīcinām caur ticību? Nemaz! Bet mēs bauslību apstiprinām.

< रोम. 3 >