< रोम. 10 >

1 बंधूंनो, त्यांचे तारण व्हावे, ही माझ्या मनाची कळकळीची इच्छा व माझी त्यांच्याकरिता देवाजवळ विनंती आहे.
Brāļi, mana sirds vēlēšanās un Dieva lūgšana par Israēla bērniem ir, ka tie tiek pestīti.
2 कारण त्यांच्याविषयी मी साक्ष देतो की, त्यांना देवाविषयी ईर्ष्या आहे, पण ती ज्ञानामुळे नाही.
Jo es tiem liecību dodu, ka tie karsti dzenās pēc Dieva, bet bez saprašanas.
3 कारण ते देवाच्या नीतिमत्त्वाविषयी अज्ञानी असता आणि स्वतःचे नीतिमत्त्व प्रस्थापित करू पाहत असता ते देवाच्या नीतिमत्त्वाला वश झाले नाहीत.
Jo nepazīdami Dieva taisnību un meklēdami uzcelt savu pašu taisnību, tie Dieva taisnībai nav paklausījuši.
4 कारण ख्रिस्त हा विश्वास ठेवणार्‍या प्रत्येकाला नीतिमत्त्वासाठी नियमशास्त्राचा शेवट आहे.
Jo bauslības gals ir Kristus, par taisnību ikvienam, kas tic.
5 कारण नियमशास्त्राने प्राप्त होणार्‍या नीतिमत्त्वाविषयी मोशे लिहितो की, ‘जो मनुष्य ते आचरतो तो त्याद्वारे जगेल.’
Jo Mozus raksta par to taisnību, kas nāk no bauslības: kurš cilvēks to dara, tas caur to dzīvos.
6 पण विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्त्व असे म्हणते की, तू आपल्या मनात म्हणू नकोस की, स्वर्गात कोण चढेल? (म्हणजे ख्रिस्ताला खाली आणण्यास)
Bet tā taisnība, kas no ticības, saka tā: nesaki savā sirdī, kas uzkāps debesīs? Proti Kristu novest zemē.
7 किंवा मृतलोकात कोण उतरेल? (म्हणजे ख्रिस्ताला मरण पावलेल्यांमधून वर आणण्यास) (Abyssos g12)
Jeb: kas nokāps bezdibenī? Proti Kristu no miroņiem atvest. (Abyssos g12)
8 पण ते काय म्हणते? ते वचन तुझ्याजवळ, ते तुझ्या मुखात व तुझ्या अंतःकरणात आहे. म्हणजे आम्ही ज्याची घोषणा करतो ते विश्वासाचे वचन हे आहे.
Bet ko tā saka? Tuvu pie tevis ir tas vārds, tavā mutē un tavā sirdī: proti tas ticības vārds, ko mēs pasludinājām.
9 कारण येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्यास मरण पावलेल्यांमधून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल.
Jo ja tu ar savu muti Jēzu apliecināsi par Kungu un savā sirdī ticēsi, ka Dievs Viņu no miroņiem ir uzmodinājis, tad tu mūžīgi dzīvosi.
10 १० कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते.
Jo ar sirdi tic uz taisnību un ar muti apliecina uz mūžīgu dzīvošanu.
11 ११ म्हणून शास्त्रलेख म्हणतो की, ‘जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लज्जित होणार नाही.’
Jo tas raksts saka: neviens, kas uz Viņu tic, nepaliks kaunā.
12 १२ यहूदी व हेल्लेणी ह्यांच्यात फरक नाही, कारण तोच प्रभू सर्वांवर असून जे त्याचा धावा करतात त्या सर्वांसाठी तो संपन्न आहे,
Jo še nav starpības starp Jūdiem un Grieķiem, jo Tas pats ir Kungs pār visiem, bagāts priekš visiem, kas Viņu piesauc.
13 १३ ‘कारण जो कोणी प्रभूच्या नावाचा धावा करील त्याचे तारण होईल.’
Jo ikviens, kas Tā Kunga vārdu piesauks, taps izglābts.
14 १४ मग ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा ते कसा धावा करतील? आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते कसा विश्वास ठेवतील? आणि घोषणा करणार्‍याशिवाय ते कसे ऐकतील?
Kā lai nu To piesauc, uz ko nav ticējuši? Bet kā lai tic, par ko nav dzirdējuši? Bet kā lai dzird bez sludinātāja?
15 १५ आणि त्यांना पाठविल्याशिवाय ते कशी घोषणा करतील? कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘जे चांगल्या गोष्टींची सुवार्ता सांगतात त्यांचे पाय किती सुंदर आहेत!’
Bet kā lai sludina, ja netop sūtīti? Itin kā ir rakstīts: cik jaukas ir to prieka vēstnešu kājas, kas sludina mieru, kas sludina labumu.
16 १६ पण सर्वांनीच सुवार्तेचे आज्ञापालन केले नाही, कारण यशया म्हणतो की, ‘प्रभू, आमच्याकडून ऐकले त्यावर कोणी विश्वास ठेवला आहे?’
Bet ne visi tam evaņģēlijam bijuši paklausīgi; jo Jesaja saka: Kungs, kas tic mūsu sludināšanai?
17 १७ तर मग ऐकण्यामुळे विश्वास होतो आणि ख्रिस्ताच्या वचनामुळे ऐकणे होते.
Tad nu ticība ir no sludināšanas, un sludināšana caur Dieva vārdu.
18 १८ पण मी म्हणतो की त्यांनी ऐकले नव्हते काय? हो, खचित ऐकले; ‘सर्व पृथ्वीवर त्यांचा आवाज आणि जगाच्या टोकापर्यंत त्यांचे शब्द पोहोचले आहेत.’
Bet es saku: vai tie nav dzirdējuši? Tiešām, viņu skaņa ir izgājusi pa visu zemi, un viņu vārdi līdz pasaules galam.
19 १९ पण मी म्हणतो की, इस्राएलाला कळले नव्हते काय? प्रथम मोशे म्हणतो, ‘जे राष्ट्र नाहीत त्यांच्याकडून. मी तुम्हास ईर्ष्येस चढवीन, एका निर्बुद्ध राष्ट्राकडून मी तुम्हास चेतवीन.’
Bet es saku: vai Israēls to nav sapratis? Jau Mozus saka: “Es jūs kaitināt kaitināšu caur tautu, kas nav Mana, caur ģeķīgu tautu Es jūs tirināt tirināšu.”
20 २० पण यशया फार धीट होऊन म्हणतो की, ‘ज्यांनी माझा शोध केला नाही त्यांना मी सापडलो आहे, ज्यांनी माझ्याविषयी विचारले नाही त्यांना प्राप्त झालो आहे.’
Bet Jesaja drīkst sacīt: “Es esmu atrasts no tiem, kas Mani nav meklējuši, un esmu tiem parādījies, kas pēc Manis nav vaicājuši.”
21 २१ पण इस्राएलाविषयी तो म्हणतो, ‘मी एका, अवमान करणार्‍या आणि उलटून बोलणार्‍या प्रजेपुढे दिवसभर माझे हात पसरले.’
Bet uz Israēli viņš saka: “Augu dienu Savas rokas esmu izstiepis pār ļaudīm, kas neklausa, bet runā pretī.”

< रोम. 10 >