< प्रक. 3 >

1 सार्दीस येथील मंडळीच्या दूताला लिही: ज्याच्याजवळ देवाचे सात आत्मे व सात तारे आहेत त्याचे हे शब्द आहेत. मला तुमची कामे माहीत आहेत, तू जिवंत आहेस अशी तुझी किर्ती आहे. पण तुम्ही मरण पावलेले आहात.
“Y escribe al ángel de la asamblea de Sardis: “El que tiene los siete Espíritus de Dios y las siete estrellas dice estas cosas: “Conozco tus obras, que tienes fama de estar vivo, pero estás muerto.
2 जागृत हो आणि जे मरणाच्या पंथास लागले आहे ते सावरून धर कारण माझ्या देवासमोर तुमची कामे पूर्ण झाल्याचे मला आढळले नाही.
Despierta y fortalece lo que te queda, que estabas a punto de tirar, porque no he encontrado ninguna obra tuya perfeccionada ante mi Dios.
3 म्हणून जे तुम्ही स्वीकारले आणि ऐकले याची आठवण करा, त्याप्रमाणे वागा आणि पश्चात्ताप करा. पण जर तुम्ही जागे होत नाही, तर मी चोरासारखा येईन आणि की मी नेमक्या कोणत्या वेळेला तुमच्याकडे येईन हे तुम्हास कळणार नाही.
Recuerda, pues, cómo has recibido y oído. Guárdalo y arrepiéntete. Si, pues, no veláis, vendré como un ladrón, y no sabréis a qué hora vendré sobre vosotros.
4 तरी ज्यांनी आपली वस्त्रे मलीन केली नाहीत अशी थोडी नावे सार्दीसमध्ये तुझ्याजवळ आहेत, ते माझ्याबरोबर शुभ्र वस्त्रात चालतील कारण ते लायक आहेत.
Sin embargo, tienes unos pocos nombres en Sardis que no mancharon sus vestiduras. Ellos caminarán conmigo de blanco, porque son dignos.
5 जो विजय मिळवतो, तो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान करील, मी त्याचे नाव जीवनाच्या पुस्तकातून खोडणारच नाही; पण माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतांसमोर त्याचे नाव स्वीकारीन,
El que venza se vestirá de ropas blancas, y de ninguna manera borraré su nombre del libro de la vida, y confesaré su nombre ante mi Padre y ante sus ángeles.
6 आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.
El que tenga oído, que oiga lo que el Espíritu dice a las asambleas.
7 फिलदेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिहीः जो पवित्र व सत्य आहे त्याचे हे शब्द आहेत, ज्याच्याजवळ दाविदाची किल्ली आहे, जे तो उघडतो, ते कोणी बंद करू शकणार नाही आणि जे तो बंद करतो ते कोणी उघडू शकणार नाही.
“Al ángel de la asamblea en Filadelfia escribe: “El que es santo, el que es verdadero, el que tiene la llave de David, el que abre y nadie puede cerrar, y el que cierra y nadie abre, dice estas cosas:
8 मला तुमची कामे माहीत आहेत, पाहा मी तुमच्यासमोर द्वार उघडे करून ठेवले आहे. जे कोणीही बंद करू शकणार नाही. मला माहीत आहे की, तुला शक्ती थोडी आहे, तरी तू माझा शब्द पाळला आहेस आणि माझे नाव नाकारले नाहीस.
“Yo conozco tus obras (he aquí que he puesto ante ti una puerta abierta que nadie puede cerrar), que tienes un poco de poder, y has guardado mi palabra, y no has negado mi nombre.
9 पाहा, जे सैतानाच्या सभास्थानाचे आहेत, ते स्वतःला यहूदी समजतात पण ते यहूदी नाहीत तर ते खोटारडे आहेत. मी त्यांना तुमच्याकडे आणून तुमच्या पाया पडायला लावीन आणि त्यांना समजेल की मी तुमच्यावर प्रीती केली आहे.
He aquí yo hago que algunos de la sinagoga de Satanás, de los que se dicen judíos, y no lo son, sino que mienten, vengan a adorar ante tus pies, y sepan que yo te he amado.
10 १० धीराने सहन करण्याविषयी तुम्ही माझी आज्ञा पाळली आहे. म्हणून सर्व जगावर जो संकटाचा समय येणार आहे त्यापासून मी तुम्हास राखीन. हा त्रास जे लोक या पृथ्वीवर राहतात त्यांची परीक्षा होण्यासाठी येईल.
Por cuanto has guardado mi mandato de resistir, yo también te guardaré de la hora de la prueba que ha de venir sobre el mundo entero, para probar a los que habitan en la tierra.
11 ११ मी लवकर येत आहे, जे तुझ्याकडे आहे त्यास घट्ट धरून राहा यासाठी की कोणीही तुझा मुकुट घेऊ नये.
¡Voy a venir pronto! Mantén firmemente lo que tienes, para que nadie te quite la corona.
12 १२ जो विजय मिळवतो त्यास मी माझ्या देवाच्या भवनाचा खांब बनवीन आणि तो कधीही बाहेर जाणार नाही, मी त्याच्यावर माझ्या देवाचे नाव व माझ्या देवापासून स्वर्गातून उतरणारे नवे यरूशलेम, म्हणजे माझ्या देवाची नगरी हिचे नाव आणि माझे नवे नाव लिहीन.
Al que venza, lo haré columna en el templo de mi Dios, y no saldrá más de allí. Escribiré en él el nombre de mi Dios y el nombre de la ciudad de mi Dios, la nueva Jerusalén, que desciende del cielo de mi Dios, y mi propio nombre nuevo.
13 १३ आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.
El que tenga oído, que oiga lo que el Espíritu dice a las asambleas.
14 १४ लावदीकिया येथील मंडळीच्या दूताला लिही: जो आमेन, विश्वासू आणि खरा साक्षीदार आहे, देवाच्या निर्मितीवरील सत्ताधीश आहे त्याचे हे शब्द आहेत.
“Al ángel de la asamblea de Laodicea escribe: “El Amén, el Testigo Fiel y Verdadero, el Principio de la creación de Dios, dice estas cosas:
15 १५ मला तुझी कामे माहीत आहेत, ती अशी की, तू थंड नाहीस व गरमही नाहीस. तू थंड किंवा गरम असतास तर बरे झाले असते.
“Conozco tus obras, que no eres ni frío ni caliente. Quisiera que fueras frío o caliente.
16 १६ पण, तू तसा नाहीस, कोमट आहेस, तू थंड नाहीस किंवा गरम नाहीस. म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे.
Por eso, porque eres tibio, y no eres ni frío ni caliente, te vomitaré de mi boca.
17 १७ तू म्हणतो मी सधन आहे, मी संपत्ती मिळविली आहे, आणि मला कशाची गरज नाही, पण तू कष्टी, दयनीय, गरीब, आंधळा व नग्न आहेस हे तुला कळत नाही.
Porque dices: “Soy rico, y he conseguido riquezas, y no tengo necesidad de nada”, y no sabes que eres un miserable, un pobre, un ciego y un desnudo;
18 १८ मी तुम्हास सल्ला देतो की, अग्नीत शुद्ध केलेले सोने माझ्याकडून विकत घे. म्हणजे तू श्रीमंत होशील आणि तुमची लज्जास्पद नग्नता दिसू नये म्हणून नेसावयाला शुभ्र वस्त्रे विकत घे आणि स्पष्ट दिसावे म्हणून डोळ्यांत घालण्यास अंजन विकत घे.
te aconsejo que me compres oro refinado por el fuego, para que te enriquezcas; y ropas blancas, para que te vistas y no se descubra la vergüenza de tu desnudez; y colirio para ungir tus ojos, para que veas.
19 १९ ज्यांच्यावर मी प्रेम करतो, त्यांना शिकवण देतो व त्यांनी कसे रहावे याची शिस्त लावतो, म्हणून झटून प्रयत्न करा आणि पश्चात्ताप करा.
A todos los que amo, los reprendo y los castigo. Sed, pues, celosos y arrepentíos.
20 २० पाहा, मी दाराजवळ उभा आहे व दरवाजा ठोकीत आहे. जर कोणी माझा आवाज ऐकतो आणि दरवाजा उघडतो, तर मी आत येईन आणि त्याच्याबरोबर भोजन करेन व तोसुध्दा माझ्याबरोबर भोजन करेल.
He aquí que yo estoy a la puerta y llamo. Si alguien oye mi voz y abre la puerta, entonces entraré a él y cenaré con él, y él conmigo.
21 २१ ज्याप्रमाणे मी विजय मिळवला आणि माझ्या पित्याच्या राजासनावर बसलो आहे तसा जो विजय मिळवील त्यास मी माझ्या राजासनावर बसण्याचा अधिकार देईन.
Al que venza, le daré que se siente conmigo en mi trono, como yo también vencí y me senté con mi Padre en su trono.
22 २२ आत्मा मंडळ्यास काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत तो ऐको.”
El que tenga oído, que oiga lo que el Espíritu dice a las asambleas”.

< प्रक. 3 >