< प्रक. 20 >
1 १ आणि मी बघितले की, एक देवदूत आकाशामधून खाली आला; त्याच्या हातात अगाधकूपाची किल्ली व एक मोठी साखळी होती. (Abyssos )
And I saw an angel coming down out of heaven, having the key of the abyss and a great chain in his hand. (Abyssos )
2 २ आणि ज्याला दियाबल आणि सैतान म्हणतात त्या पुरातन सर्पाला म्हणजे त्या अजगराला त्याने धरले, एक हजार वर्षांसाठी त्यास बांधले,
And he laid hold on the dragon, the old serpent, which is the Devil and Satan, and bound him for a thousand years,
3 ३ आणि अगाधकूपात टाकले; आणि त्यामध्ये बंद करून वर शिक्का लावला; म्हणजे ती हजार वर्षे पूर्ण होईपर्यंत त्याने राष्ट्रांना आणखी फसवू नये. त्यानंतर त्यास पुन्हा थोडा वेळ सोडणे जरूर होते. (Abyssos )
and cast him into the abyss, and shut [it], and sealed [it] over him, that he should deceive the nations no more, until the thousand years should be finished: after this he must be loosed for a little time. (Abyssos )
4 ४ तेव्हा मी राजासने बघितली व त्यावर जे कोणी बसले होते; त्यांच्याकडे न्यायनिवाडा देण्यात आला आणि येशूच्या साक्षीसाठी व देवाच्या वचनासाठी ज्यांचा शिरच्छेद झाला होता आणि त्या पशूला किंवा त्याच्या मूर्तीला ज्यांनी नमन केले नव्हते आणि आपल्या कपाळावर किंवा हातावर त्याचा शिक्का मारलेला नव्हता, त्यांचे आत्मे मला दिसले. ते परत जिवंत झाले व त्यांनी ख्रिस्ताबरोबर एक हजार वर्षे राज्य केले.
And I saw thrones, and they sat upon them, and judgment was given unto them: and [I saw] the souls of them that had been beheaded for the testimony of Jesus, and for the word of God, and such as worshipped not the beast, neither his image, and received not the mark upon their forehead and upon their hand; and they lived, and reigned with Christ a thousand years.
5 ५ पण ती हजार वर्षे पूर्ण होईपर्यंत बाकीचे मरण पावलेले पुन्हा जिवंत झाले नाहीत. हे पहिले पुनरुत्थान होय.
The rest of the dead lived not until the thousand years should be finished. This is the first resurrection.
6 ६ ज्याला पहिल्या पुनरुत्थानात भाग आहे, तो धन्य आणि पवित्र आहे; अशांवर दुसऱ्या मरणाची सत्ता नाही, तर ते देवाचे आणि ख्रिस्ताचे याजक होतील; आणि त्याच्याबरोबर एक हजार वर्षे राज्य करतील.
Blessed and holy is he that hath part in the first resurrection: over these the second death hath no power; but they shall be priests of God and of Christ, and shall reign with him a thousand years.
7 ७ जेव्हा ती हजार वर्षे संपतील तेव्हा सैतानाला त्याच्या कैदेतून सोडण्यात येईल;
And when the thousand years are finished, Satan shall be loosed out of his prison,
8 ८ आणि तो पृथ्वीच्या चारी कोपऱ्यांतील गोग व मागोग या राष्ट्रांना, लढाईसाठी एकत्र करावे म्हणून तो त्यांना फसवायला बाहेर निघेल; त्यांची संख्या समुद्राच्या वाळूइतकी आहे.
and shall come forth to deceive the nations which are in the four corners of the earth, Gog and Magog, to gather them together to the war: the number of whom is as the sand of the sea.
9 ९ ते पृथ्वीच्या विस्तारावर गेले आणि त्यांनी पवित्र जनांची छावणी व प्रिय नगरी वेढली; तेव्हा स्वर्गातून अग्नी उतरला आणि त्याने त्यांना गिळून घेतले;
And they went up over the breadth of the earth, and compassed the camp of the saints about, and the beloved city: and fire came down out of heaven, and devoured them.
10 १० आणि त्यांना फसविणाऱ्या सैतानाला अग्नीच्या व गंघकाच्या सरोवरात टाकण्यात आले; तो पशू व तो खोटा संदेष्टा हे; तेथेच असून ते रात्रंदिवस सदासर्वकाळ पीडा भोगतील. (aiōn , Limnē Pyr )
And the devil that deceived them was cast into the lake of fire and brimstone, where are also the beast and the false prophet; and they shall be tormented day and night for ever and ever. (aiōn , Limnē Pyr )
11 ११ तेव्हा मी एक, मोठे, शुभ्र राजासन आणि त्यावर जो बसला होता त्यास बघितले. त्याच्या उपस्थितीतून पृथ्वी व आकाशही पळून गेली; आणि त्यांना कोठेच जागा मिळाली नाही.
And I saw a great white throne, and him that sat upon it, from whose face the earth and the heaven fled away; and there was found no place for them.
12 १२ मग मी मृतांना, लहान व मोठे ह्यांना राजासनासमोर उभे राहिलेले बघितले; तेव्हा पुस्तके उघडली गेली; नंतर आणखी एक पुस्तक उघडले गेले. ते जीवनाचे पुस्तक होते; आणि त्या पुस्तकात लिहिलेल्या गोष्टींवरून ज्यांच्या त्यांच्या कामांप्रमाणे मृतांचा न्याय करण्यात आला.
And I saw the dead, the great and the small, standing before the throne; and books were opened: and another book was opened, which is [the book] of life: and the dead were judged out of the things which were written in the books, according to their works.
13 १३ समुद्राने आपल्यामधील मरण पावलेले होते ते दिले आणि मृत्यू व मृतलोक ह्यांनीही आपल्यामधील मरण पावलेले होते ते दिले; आणि त्यांच्या कामांप्रमाणे त्यांचा प्रत्येकाचा न्याय करण्यात आला. (Hadēs )
And the sea gave up the dead that were in it; and death and Hades gave up the dead that were in them: and they were judged every man according to their works. (Hadēs )
14 १४ आणि मरण व मृतलोक अग्नीच्या सरोवरात टाकले गेले. हे दुसरे मरण होय. हे अग्नीचे तळे म्हणजे दुसरे मरण. (Hadēs , Limnē Pyr )
And death and Hades were cast into the lake of fire. This is the second death, [even] the lake of fire. (Hadēs , Limnē Pyr )
15 १५ आणि ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले आढळले नाही त्यास अग्नीच्या सरोवरात टाकण्यात आले. (Limnē Pyr )
And if any was not found written in the book of life, he was cast into the lake of fire. (Limnē Pyr )