< स्तोत्रसंहिता 89 >

1 एथानाचे स्तोत्र मी परमेश्वराच्या विश्वासाच्या कराराच्या कृतीचे गीत सर्वकाळ गाईन. मी तुझी सत्यता भावी पिढ्यांना जाहीर करीन.
मैं हमेशा ख़ुदावन्द की शफ़क़त के हम्द गाऊँगा। मैं नसल दर नसल अपने मुँह से तेरी वफ़ादारी का 'ऐलान करूँगा।
2 कारण मी म्हणालो आहे की, विश्वासाचा करार सर्वकाळासाठी स्थापित होईल; तुझी सत्यता स्वर्गात तूच स्थापन केली आहेस.
क्यूँकि मैंने कहा कि शफ़क़त हमेशा तक बनी रहेगी, तू अपनी वफ़ादारी को आसमान में क़ाईम रखेगा।
3 मी माझ्या निवडलेल्याशी करार केला आहे, मी आपला सेवक दावीद ह्याच्याशी शपथ वाहिली आहे.
“मैंने अपने बरगुज़ीदा के साथ 'अहद बाँधा है मैंने अपने बन्दे दाऊद से क़सम खाई है;
4 मी तुझ्या वंशाजांची स्थापना सर्वकाळ करीन, आणि तुझे राजासन सर्व पिढ्यांसाठी स्थापिन.
मैं तेरी नसल को हमेशा के लिए क़ाईम करूँगा, और तेरे तख़्त को नसल दर नसल बनाए रखूँगा।” (सिलाह)
5 हे परमेश्वरा, तुझ्या विस्मयकारक कृतीची स्तुती आकाश करील, तुझ्या सत्यतेची स्तुती पवित्रजनांच्या मंडळीत होईल.
ऐ ख़ुदावन्द, आसमान तेरे 'अजायब की ता'रीफ़ करेगा; पाक लोगों के मजमे' में तेरी वफ़ादारी की ता'रीफ़ होगी।
6 कारण परमेश्वराशी तुलना होऊ शकेल असा आकाशात कोण आहे? देवाच्या मुलांपैकी परमेश्वरासारखा कोण आहे?
क्यूँकि आसमान पर ख़ुदावन्द का नज़ीर कौन है? फ़रिश्तों की जमा'त में कौन ख़ुदावन्द की तरह है?
7 पवित्र जनांच्या सभेत ज्याचा सन्मान होतो असा तो देव आहे; आणि त्याच्या सभोवती असणाऱ्या सर्वांपेक्षा तो भितीदायक आहे.
ऐसा मा'बूद जो पाक लोगो की महफ़िल में बहुत ता'ज़ीम के लायक़ ख़ुदा है, और अपने सब चारों तरफ़ वालों से ज़्यादा बड़ा है।
8 हे सेनाधीश देवा, परमेश्वरा, हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोण समर्थ आहे? तुझी सत्यता तुझ्याभोवती आहे?
ऐ ख़ुदावन्द लश्करों के ख़ुदा, ऐ याह! तुझ सा ज़बरदस्त कौन है? तेरी वफ़ादारी तेरे चारों तरफ़ है।
9 समुद्राच्या खवळण्यावर तू अधिकार चालवतोस; जेव्हा त्याच्या लाटा उसळतात, तेव्हा तू त्यांना शांत करतोस.
समन्दर के जोश — ओ — ख़रोश पर तू हुक्मरानी करता है; तू उसकी उठती लहरों को थमा देता है।
10 १० तू राहाबाला ठेचून त्याचा चुराडा केलास. तू तुझ्या बलवान बाहूंनी आपल्या शत्रूंना पांगवलेस.
तूने रहब को मक़्तूल की तरह टुकड़े टुकड़े किया; तूने अपने क़वी बाज़ू से अपने दुश्मनों को तितर बितर कर दिया।
11 ११ आकाश तुझे आहे आणि पृथ्वीही तुझी आहे. तू जग आणि त्यातले सर्वकाही निर्माण केलेस.
आसमान तेरा है, ज़मीन भी तेरी है; जहान और उसकी मा'मूरी को तू ही ने क़ाईम किया है।
12 १२ उत्तर आणि दक्षिण निर्माण केल्या. ताबोर आणि हर्मोन तुझ्या नावाचा जयजयकार करतात.
उत्तर और दाख्खिन का पैदा करने वाला तू ही है; तबूर और हरमून तेरे नाम से ख़ुशी मनाते हैं।
13 १३ तुला पराक्रमी भुज आहे आणि तुला बळकट हात आहे व तुझा उजवा हात उंचावला आहे.
तेरा बाज़ू कु़दरत वाला है; तेरा हाथ क़वी और तेरा दहना हाथ बुलंद है।
14 १४ निती आणि न्याय तुझ्या राजासनाचा पाया आहेत. कराराचा विश्वास आणि सत्य तुझ्यासमोर आहेत.
सदाक़त और 'अद्ल तेरे तख़्त की बुनियाद हैं; शफ़क़त और वफ़ादारी तेरे आगे आगे चलती हैं।
15 १५ जे तुझी उपासना करतात ते आशीर्वादित आहेत. हे परमेश्वरा ते तुझ्या मुखप्रकाशात चालतात.
मुबारक है वह क़ौम, जो खु़शी की ललकार को पहचानती है, वह ऐ ख़ुदावन्द, जो तेरे चेहरे के नूर में चलते हैं;
16 १६ ते दिवसभर तुझ्या नावाची स्तुती करतात, आणि तुझ्या न्यायीपणाने ते तुला उंचावतात.
वह दिनभर तेरे नाम से ख़ुशी मनाते हैं, और तेरी सदाक़त से सरफराज़ होते हैं।
17 १७ त्यांच्या शक्तीचे वैभव तू आहेस, आणि तुझ्या कृपेने आम्ही विजयी आहोत.
क्यूँकि उनकी ताक़त की शान तू ही है और तेरे करम से हमारा सींग बुलन्द होगा।
18 १८ कारण आमची ढाल परमेश्वराची आहे; इस्राएलाचा पवित्र देव आमचा राजा आहे.
क्यूँकि हमारी ढाल ख़ुदावन्द की तरफ़ से है, और हमारा बादशाह इस्राईल के क़ुद्दूस की तरफ़ से।
19 १९ पूर्वी तू आपल्या विश्वासणाऱ्यांशी दृष्टांतात बोललास; तू म्हणालास, मी एका वीरावर मुकुट ठेवण्याचे ठरवले आहे; लोकांतून निवडलेल्या एकास मी उंचावले आहे.
उस वक़्त तूने ख़्वाब में अपने पाक लोगों से कलाम किया, और फ़रमाया, मैंने एक ज़बरदस्त को मददगार बनाया है, और क़ौम में से एक को चुन कर सरफ़राज़ किया है।
20 २० मी माझा सेवक दावीद याला निवडले आहे; मी त्यास आपल्या पवित्र तेलाने अभिषेक केला आहे.
मेरा बन्दा दाऊद मुझे मिल गया, अपने पाक तेल से मैंने उसे मसह किया है।
21 २१ माझा हात त्यास आधार देईल; माझा बाहू त्यास बलवान करील.
मेरा हाथ उसके साथ रहेगा, मेरा बाजू़ उसे तक़वियत देगा।
22 २२ कोणी शत्रू त्यास फसवणार नाही. दुष्टांची मुले त्यास छळणार नाहीत.
दुश्मन उस पर जब्र न करने पाएगा, और शरारत का फ़र्ज़न्द उसे न सताएगा।
23 २३ मी त्याच्या शत्रूंना त्याच्यापुढे चिरडून टाकीन; जे त्याचा द्वेष करतात त्यांना मारून टाकीन.
मैं उसके मुख़ालिफ़ों को उसके सामने मग़लूब करूँगा और उससे 'अदावत रखने वालों को मारूँगा।
24 २४ माझे सत्य आणि विश्वासाचा करार त्यांच्याबरोबर राहील; माझ्या नावाने ते विजयी होतील.
लेकिन मेरी वफ़ादारी और शफ़क़त उसके साथ रहेंगी, और मेरे नाम से उसका सींग बुलन्द होगा।
25 २५ मी त्याचा हात समुद्रावर आणि त्याचा उजवा हात नद्यांवर ठेवीन.
मैं उसका हाथ समन्दर तक बढ़ाऊँगा, और उसके दहने हाथ को दरियाओं तक।
26 २६ तो मला हाक मारून म्हणेल, तू माझा पिता, माझा देव, माझ्या तारणाचा खडक आहेस.
वह मुझे पुकार कर कहेगा, 'तू मेराबाप, मेरा ख़ुदा, और मेरी नजात की चट्टान है।
27 २७ आणि मी त्यास माझा प्रथम जन्मलेला पुत्र करीन, पृथ्वीवरील राजांत त्यास परमश्रेष्ठ करीन.
और मैं उसको अपना पहलौठा बनाऊँगा और दुनिया का शहंशाह।
28 २८ मी आपला विश्वासाचा करार त्यांच्यासाठी सर्वकाळ विस्तारील, आणि त्यांच्याबरोबरचा माझा करार सर्वकाळ टिकेल.
मैं अपनी शफ़क़त को उसके लिए हमेशा तक क़ाईम रखूँगा और मेरा 'अहद उसके साथ लातब्दील रहेगा।
29 २९ त्याचे वंश सर्वकाळ राहील, आणि त्याचे राजासन आकाशाप्रमाणे टिकेल.
मैं उसकी नसल को हमेशा तक क़ाईम रख्खूंगा, और उसके तख़्त को जब तक आसमानहै।
30 ३० जर त्याच्या वंशजांनी माझे नियम सोडले आणि माझ्या आदेशाचा आज्ञाभंग केला.
अगर उसके फ़र्ज़न्द मेरी शरी'अत को छोड़ दें, और मेरे अहकाम पर न चलें,
31 ३१ जर त्यांनी माझे नियम मोडले आणि माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत.
अगर वह मेरे क़ानून को तोड़ें, और मेरे फ़रमान को न मानें,
32 ३२ मग मी त्यांच्या बंडखोरांना काठीने, आणि त्यांच्या अपराधांना फटक्यांनी शिक्षा करीन.
तो मैं उनको छड़ी से ख़ता की, और कोड़ों से बदकारी की सज़ा दूँगा।
33 ३३ परंतु मी माझा विश्वासाचा करार त्यांच्यापासून काढून घेणार नाही; मी माझ्या वचनाशी निष्ठावान राहीन.
लेकिन मैं अपनी शफ़क़त उस पर से हटा न लूँगा, और अपनी वफ़ादारी को बेकार न होने न दूँगा।
34 ३४ मी माझा करार मोडणार नाही, किंवा माझ्या ओठांचे शब्द बदलणार नाही.
मैं अपने 'अहद को न तोडूँगा, और अपने मुँह की बात को न बदलूँगा।
35 ३५ एकदा सर्वांसाठी मी आपल्या पवित्रतेची शपथ वाहिली आहे, आणि मी दावीदाशी खोटे बोलणार नाही.
मैं एक बार अपनी पाकी की क़सम खा चुका हूँ मैं दाऊद से झूट न बोलूँगा।
36 ३६ त्याची संतती सर्वकाळ राहील, आणि त्याचे राजासन माझ्यासमोर सूर्याप्रमाणे कायम राहील.
उसकी नसल हमेशा क़ाईम रहेगी, और उसका तख़्त आफ़ताब की तरह मेरे सामने क़ाईम रहेगा।
37 ३७ ते चंद्राप्रमाणे सर्वकाळ टिकेल. आकाशात विश्वसनीय साक्षीदार आहेत.
वह हमेशा चाँद की तरह, और आसमान के सच्चे गवाह की तरह क़ाईम रहेगा। मिलाह
38 ३८ पण तरी तू आपल्या अभिषिक्तावर रागावलास, तू त्याचा त्याग केला, आणि नाकारलेस.
लेकिन तूने तो तर्क कर दिया और छोड़ दिया, तू अपने मम्सूह से नाराज़ हुआ है।
39 ३९ तू आपल्या सेवकाशी केलेला करार सोडून दिलास. तू त्याचा मुकुट भूमीवर फेकून भ्रष्ट केलास.
तूने अपने ख़ादिम के 'अहद को रद्द कर दिया, तूने उसके ताज को ख़ाक में मिला दिया।
40 ४० तू त्याच्या सर्व भिंती पाडून टाकल्यास. तू त्याचे सर्व किल्ले उध्वस्त केलेस.
तूने उसकी सब बाड़ों को तोड़ डाला, तूने उसके क़िलों' को खण्डर बना दिया।
41 ४१ सर्व येणारे जाणारे त्यास लुटतात. तो आपल्या शेजाऱ्यांच्या तिरस्काराचा विषय झाला आहे.
सब आने जाने वाले उसे लूटते हैं, वह अपने पड़ोसियों की मलामत का निशाना बन गया।
42 ४२ तू त्याच्या शत्रूंचा उजवा हात उंच केला आहे. तू त्याच्या सर्व शत्रूंना आनंदित केले आहेस.
तूने उसके मुख़ालिफ़ों के दहने हाथ को बुलन्द किया; तूने उसके सब दुश्मनों को ख़ुश किया।
43 ४३ तू त्यांच्या तलवारीची धार बोथट केली आहे. आणि युद्धात त्यास तू टिकाव धरू दिला नाहीस.
बल्कि तू उसकी तलवार की धार को मोड़ देता है, और लड़ाई में उसके पाँव को जमने नहीं दिया।
44 ४४ तू त्याच्या तेजस्वितेचा शेवट केला; तू त्याचे सिंहासन जमिनीवर खाली आणलेस.
तूने उसकी रौनक़ उड़ा दी, और उसका तख़्त ख़ाक में मिला दिया।
45 ४५ तू त्याच्या तारुण्याचे दिवस कमी केले आहेत. तू त्यास लज्जेने झाकले आहेस.
तूने उसकी जवानी के दिन घटा दिए, तूने उसे शर्मिन्दा कर दिया है। (सिलाह)
46 ४६ हे परमेश्वरा, किती वेळ? तू आपल्या स्वतःला सर्वकाळ लपविणार काय? तुझा राग अग्नीसारखा किती वेळ जळेल?
ऐ ख़ुदावन्द, कब तक? क्या तू हमेशा तक पोशीदा रहेगा? तेरे क़हर की आग कब तक भड़कती रहेगी?
47 ४७ माझे आयुष्य किती कमी आहे याविषयी विचार कर, तू सर्व मानव पुत्र निर्माण केलेस ते व्यर्थच काय?
याद रख मेरा क़याम ही क्या है, तूने कैसी बतालत के लिए कुल बनी आदम को पैदा किया।
48 ४८ कोण जिवंत राहिल आणि मरणार नाही किंवा कोण आपला जीव अधोलोकातून सोडवील? (Sheol h7585)
वह कौन सा आदमी है जो ज़िन्दा ही रहेगा और मौत को न देखेगा, और अपनी जान को पाताल के हाथ से बचा लेगा? (सिलाह) (Sheol h7585)
49 ४९ हे प्रभू, ज्या सत्यतेत तू दावीदाशी शपथ वाहिली, ती तुझी पूर्वीची विश्वासाच्या कराराची कृत्ये कोठे आहेत?
या रब्ब, तेरी वह पहली शफ़क़त क्या हुई, जिसके बारे में तूने दाऊद से अपनी वफ़ादारी की क़सम खाई थी?
50 ५० हे प्रभू, तुझ्या सेवकाविरूद्धची थट्टा होत आहे; आणि अनेक राष्ट्राकडून झालेला अपमान मी आपल्या हृदयात सहन करत आहे हे तू लक्षात आण.
या रब्ब, अपने बन्दों की रुस्वाई को याद कर; मैं तो सब ज़बरदस्त क़ौमों की ता'नाज़नी, अपने सीने में लिए फिरता हूँ।
51 ५१ हे परमेश्वरा, तुझे शत्रू जोराने अपमान करतात; ते तुझ्या अभिषिक्ताच्या पावलांची थट्टा करतात.
ऐ ख़ुदावन्द, तेरे दुश्मनों ने कैसे ता'ने मारे, तेरे मम्सूह के क़दम क़दम पर कैसी ता'नाज़नी की है।
52 ५२ परमेश्वरास सदासर्वकाळ धन्यवाद असो. आमेन आणि आमेन.
ख़ुदावन्द हमेशा से हमेशा तक मुबारक हो! आमीन सुम्मा आमीन।

< स्तोत्रसंहिता 89 >