< स्तोत्रसंहिता 57 >

1 दाविदाचे स्तोत्र हे देवा, माझ्यावर दया कर, माझ्यावर दया कर, कारण माझा जीव ही संकटे टळून जाईपर्यंत तुझ्यात आश्रय घेतो. 2 मी परात्पर देवाकडे, जो देव माझ्यासाठी सर्वकाही करतो त्याचा मी धावा करीन. 3 तो स्वर्गातून मला मदत पाठवतो आणि मला वाचवतो, जेव्हा मनुष्य मला गिळून टाकण्याची इच्छा करतो तेव्हा तो त्यास धमकावतो; देव त्याच्या कराराची विश्वसनीयता आणि त्याचा विश्वासूपणा मला दाखवतो. 4 माझा जीव सिंहाच्यामध्ये पडला आहे; ज्यांचे दात भाले आणि बाण आहेत, आणि ज्यांची जीभ तलवारीसारखी धारदार आहे अशा लोकांमध्ये मला जबरदस्तीने रहावे लागत आहे. 5 हे देवा, तू आकाशापेक्षाही उंच हो; तुझा माहिमा सर्व पृथ्वीवर होवो. 6 त्यांनी माझ्या पावलांसाठी सापळा तयार केला आहे; माझा जीव वाकून गेला आहे; त्यांनी माझ्यासमोर खाच खणली आहे, परंतु ते स्वतःच त्यामध्ये पडले आहेत. 7 हे देवा, माझे हृदय स्थिर आहे, माझे हृदय स्थिर आहे; मी गाईन, होय, मी स्तुती गाईन. 8 हे माझ्या गौरवी जीवा, जागा हो; हे सतारी आणि वीणे, जागे व्हा; मी पहाटेला जागे करीन. 9 हे प्रभू, मी सर्व लोकांमध्ये तुला धन्यवाद देईन; मी सर्व राष्ट्रांमध्ये तुझी स्तवने गाईन. 10 १० कारण तुझ्या कराराची विश्वसनियता आकाशापर्यंत महान आहे आणि तुझा विश्वासूपणा ढगापर्यंत पोहचतो. 11 ११ हे देवा, तू आकाशाच्या वर उंचविला जावो; तुझा महिमा सर्व पृथ्वीवर उंच होवो.

< स्तोत्रसंहिता 57 >