< स्तोत्रसंहिता 138 >

1 दाविदाचे स्तोत्र मी अगदी मनापासून तुझी उपकारस्तुती करीन; मी देवांसमोर तुझी स्तोत्रे गाईन.
大卫的诗。 我要一心称谢你, 在诸神面前歌颂你。
2 मी तुझ्या पवित्र मंदिराकडे नतमस्तक होऊन, तुझ्या कराराची विश्वासयोग्यता आणि तुझ्या सत्याबद्दल तुझ्या नावाची उपकारस्तुती करीन. तू आपल्या संपूर्ण नावापेक्षा आपल्या वचनाची थोरवी वाढविली आहेस.
我要向你的圣殿下拜, 为你的慈爱和诚实称赞你的名; 因你使你的话显为大, 过于你所应许的。
3 मी तुला हाक मारली त्याच दिवशी तू मला उत्तर दिलेस. तू मला उत्तेजन दिले आणि तेव्हा माझ्या जिवाला सामर्थ्य प्राप्त झाले.
我呼求的日子,你就应允我, 鼓励我,使我心里有能力。
4 हे परमेश्वरा, पृथ्वीवरचे सर्व राजे तुझी उपकारस्तुती करतील, कारण त्यांनी तुझ्या मुखातील शब्द ऐकले आहेत.
耶和华啊,地上的君王都要称谢你, 因他们听见了你口中的言语。
5 खरोखर, ते परमेश्वराच्या मार्गाविषयी गातील कारण परमेश्वराचा महिमा अगाध आहे.
他们要歌颂耶和华的作为, 因耶和华大有荣耀。
6 कारण परमेश्वर थोर आहे तरी तो दीनांकडे लक्ष देतो, पण गर्विष्ठाला दुरून ओळखतो.
耶和华虽高,仍看顾低微的人; 他却从远处看出骄傲的人。
7 जरी मी संकटांमध्ये चाललो तरी तू मला सुरक्षित ठेवतोस. माझ्या शत्रूंच्या क्रोधावर तू आपला हात चालवितोस; आणि तुझा उजवा हात माझे तारण करतो.
我虽行在患难中,你必将我救活; 我的仇敌发怒,你必伸手抵挡他们; 你的右手也必救我。
8 परमेश्वर माझ्याबरोबर शेवटपर्यंत आहे; हे परमेश्वरा, तुझी कराराची विश्वासयोग्यता सदासर्वकाळ आहे. तू आपल्या हातची कामे सोडून देऊ नकोस.
耶和华必成全关乎我的事; 耶和华啊,你的慈爱永远长存! 求你不要离弃你手所造的。

< स्तोत्रसंहिता 138 >