< स्तोत्रसंहिता 130 >

1 हे परमेश्वरा, मी तुला शोकसागरातून आरोळी मारीत आहे. 2 हे प्रभू, माझी वाणी ऐक; माझ्या विनवणीच्या वाणीकडे तुझे कान लक्षपूर्वक लागलेले असोत. 3 हे परमेश्वरा, तू जर अन्याय लक्षात ठेवशील तर, हे प्रभू, तुझ्यासमोर कोण उभा राहू शकेल? 4 पण त्यांनी तुझे भय धरावे, म्हणून तुझ्याजवळ क्षमा आहे. 5 मी परमेश्वराची वाट पाहतो, माझा आत्मा वाट पाहतो, आणि त्याच्या वचनावर मी आशा ठेवतो. 6 पहाटेची वाट पाहणाऱ्या पहारेकऱ्यापेक्षा माझा जीव प्रभूची अधिक वाट पाहतो. 7 हे इस्राएला, परमेश्वरावर आशा ठेव. कारण परमेश्वर दयाळू आहे, आणि त्याच्याजवळ विपुल उद्धार आहे. 8 तोच इस्राएलास त्यांच्या सर्व पापांपासून मुक्त करीन.

< स्तोत्रसंहिता 130 >