< स्तोत्रसंहिता 107 >

1 परमेश्वरास धन्यावाद द्या. कारण तो चांगला आहे. आणि त्याची कराराची विश्वसनियता सर्वकाळ टिकणारी आहे.
Wysławiajcie PANA, bo [jest] dobry, bo jego miłosierdzie [trwa] na wieki.
2 परमेश्वराने उद्धारलेले, ज्यांना खंडणी भरून त्याने शत्रूच्या अधिकारातून सोडवले आहे,
Niech [to] mówią odkupieni przez PANA, ci, których odkupił z ręki wroga;
3 त्याने त्यांना परक्या देशातून पूर्व व पश्चिम, उत्तर व दक्षिण या दिशातून एकवट केले आहे.
I zgromadził z ziem, ze wschodu i zachodu, z północy i południa.
4 ते रानात वैराण प्रदेशातील रस्त्याने भटकले; आणि त्यांना राहण्यास नगर सापडले नाही.
Błądzili po pustyni, po bezdrożnym pustkowiu, nie znajdując miasta, gdzie mogliby zamieszkać.
5 ते खूप भुकेले आणि तान्हेले होते; आणि ते थकव्याने मूर्च्छित झाले.
[Byli] głodni i spragnieni, aż omdlewała w nich dusza.
6 नंतर त्यांनी आपल्या संकटात परमेश्वरास हाक मारली, आणि त्याने त्यांना त्यांच्या विपत्तीतून सोडवले.
A gdy zawołali do PANA w swoim utrapieniu, uwolnił ich z ucisku;
7 त्याने त्यांना सरळ मार्गाने नेले यासाठी की, त्या नगरात त्यांना वस्त्ती करावी
I prowadził ich prostą drogą, aby doszli do miasta, w którym mogliby zamieszkać.
8 अहा, परमेश्वराच्या कराराची विश्वसनियता आणि आश्चर्यकारक गोष्टी त्याने मनुष्यजातीसाठी केल्या त्याबद्दल लोक त्याचा धन्यवाद करोत.
Niech wysławiają PANA [za] jego miłosierdzie i cudowne dzieła [wobec] synów ludzkich;
9 कारण त्याने तान्हेल्या जिवास तृप्त केले, आणि भुकेल्या जिवाला उत्तम पदार्थांनी भरले.
Bo napoił spragnioną duszę, a głodną duszę napełnił dobrami.
10 १० काही कैदी क्लेशाने आणि साखळ्यांनी जखडलेले असता; काळोखात आणि मरणाच्या छायेत बसले आहेत.
Siedzieli w ciemności i w cieniu śmierci, spętani nędzą i żelazem;
11 ११ त्यांनी देवाच्या वचनाविरुध्द बंड केले, आणि त्यांनी परात्पराचे शिक्षण नापसंत केले.
Bo buntowali się przeciw słowom Boga i pogardzili radą Najwyższego.
12 १२ त्यांने त्यांचे हृदय कष्टाद्वारे नम्र केले; ते अडखळून पडले आणि त्यांना मदत करायला तेथे कोणीही नव्हता.
Dlatego upokorzył ich serce trudem, upadli, a nie było nikogo, kto by im pomógł.
13 १३ तेव्हा त्यांनी आपल्या संकटात परमेश्वरास हाक मारली आणि त्याने त्यांना त्यांच्या क्लेशातून बाहेर आणले.
A [gdy] wołali do PANA w swoim utrapieniu, wybawił ich z ucisku;
14 १४ देवाने त्यांना अंधारातून आणि मरणाच्या छायेतून बाहेर आणले, आणि त्यांची बंधणे तोडली.
Wyprowadził ich z ciemności i z cienia śmierci, a ich pęta rozerwał.
15 १५ परमेश्वराच्या कराराची विश्वसनियता आणि त्याने मनुष्यजातीसाठी केलेल्या आश्चर्यकारक गोष्टीबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत.
Niech wysławiają PANA [za] jego miłosierdzie i za cudowne dzieła [wobec] synów ludzkich.
16 १६ कारण त्याने पितळेची दारे तोडली, आणि लोखंडाचे गज तोडून टाकले.
Bo skruszył bramy spiżowe i połamał żelazne rygle.
17 १७ आपल्या बंडखोरीच्या मार्गात ते मूर्ख होते, आणि आपल्या पापामुळे ते पीडिले होते.
Głupcy z powodu swej występnej drogi i nieprawości doznają utrapień.
18 १८ सर्व उत्तम अन्न खाण्याची इच्छा त्यांना होईना आणि ते मरणाच्या दाराजवळ ओढले गेले.
Ich dusza brzydzi się wszelkim pokarmem i zbliżają się do bram śmierci.
19 १९ तेव्हा त्यांनी आपल्या संकटात परमेश्वरास हाक मारली, आणि त्याने त्यांना क्लेशातून बाहेर आणले.
A gdy wołają do PANA w swoim utrapieniu, wybawia ich z udręczeń.
20 २० त्याने आपले वचन पाठवून त्यांना बरे केले, आणि त्याने त्यांच्या नाशापासून त्यांना सोडवले.
Posłał swoje słowo i uzdrowił ich, i wybawił ich z grobu.
21 २१ परमेश्वराच्या कराराची विश्वसनियता व त्याने मनुष्यजातीसाठी केलेल्या आश्चर्यकारक गोष्टींबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत.
Niech wysławiają PANA [za] jego miłosierdzie i cudowne dzieła [wobec] synów ludzkich;
22 २२ ते त्यास आभाररुपी यज्ञ अर्पण करोत, आणि गाण्यात त्याची कृत्ये जाहीर करोत.
I niech składają ofiary dziękczynienia, i głoszą z radością jego dzieła.
23 २३ काही जहाजातून समुद्र प्रवास करतात, आणि महासागरापार व्यवसाय करतात.
Ci, którzy na statkach wyruszają w morze, handlujący na wielkich wodach;
24 २४ ते परमेश्वराची कृत्ये पाहतात, आणि त्याची अद्भुत कृत्ये समुद्रावर पाहतात.
Widzą dzieła PANA i jego cuda w głębinach.
25 २५ कारण तो आज्ञा करतो आणि वादळ उठवितो; तेव्हा समुद्र खवळतो.
Gdy daje rozkaz, powstaje wicher i podnoszą się fale morskie.
26 २६ लाटा आकाशापर्यंत वर पोहचतात, मग त्या खाली खोल तळाकडे जातात. मनुष्याचे धैर्य धोक्यामुळे गळून जाते.
Oni wstępują aż [do] nieba i zstępują w głębiny, tak że ich dusza mdleje w niebezpieczeństwie.
27 २७ ते मद्याप्यासारखे डुलतात आणि झोकांड्या खातात, आणि त्यांची बुद्धी गुंग होते.
Chwieją się i zataczają jak pijany, a cała ich mądrość zanika.
28 २८ तेव्हा ते आपल्या संकटात परमेश्वरास हाक मारतात, आणि तो त्यांना त्यांच्या क्लेशातून बाहेर आणून वाचवतो.
Gdy wołają do PANA w swoim utrapieniu, wybawia ich z udręczeń.
29 २९ तो वादळ शांत करतो, आणि लाटांना स्तब्ध करतो.
Zamienia burzę w ciszę, tak że uspokajają się jej fale.
30 ३० समुद्र शांत झाल्यामुळे ते आनंद करतात, तो त्यांना त्यांच्या इच्छित बंदरास आणतो.
Wtedy oni weselą się, że ucichły; i tak przyprowadza ich do upragnionego portu.
31 ३१ परमेश्वरास त्याच्या कराराची विश्वसनियता आणि त्याने मनुष्यजातीसाठी केलेल्या आश्चर्यकारक गोष्टींबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत.
Niech wysławiają PANA [za] jego miłosierdzie i cudowne dzieła [wobec] synów ludzkich.
32 ३२ लोकांच्या मंडळीत तो उंचविला जावो आणि वडिलांच्या सभेत त्याची स्तुती होवो.
Niech go wywyższają w zgromadzeniu ludu i w radzie starszych niech go chwalą.
33 ३३ तो नद्यांना रान करतो, पाण्याच्या झऱ्यांची कोरडी भूमी करतो,
Zamienia rzeki w pustynię, a źródła wód w suchą ziemię;
34 ३४ आणि फलदायी जमिनीची नापीक जमिन करतो. कारण तेथील राहणाऱ्या वाईट लोकांमुळे.
Ziemię urodzajną [zamienia] w jałową z powodu niegodziwości tych, którzy w niej mieszkają.
35 ३५ तो वाळवंटाचे पाण्याचे तळे करतो, आणि कोरडी भूमीतून पाण्याचे झरे करतो.
Pustynię zamienia w jezioro, a suchą ziemię w źródła wód.
36 ३६ तेथे भुकेल्यास वसवतो, आणि त्यामध्ये राहण्यासाठी नगर बांधतो.
I osadza tam głodnych, aby zakładali miasta do zamieszkania;
37 ३७ ते नगरे बांधतात त्यामध्ये शेते पेरतात, द्राक्षमळे लावतात, आणि विपुल पिके काढतात.
I obsiewali pole, sadzili winnice i zbierali obfity plon.
38 ३८ तो त्यास आशीर्वाद देतो आणि त्यांची खूप वाढ होते, तो त्यांच्या गुरांना कमी होऊ देत नाही.
Błogosławi im tak, że bardzo się rozmnażają, i nie zmniejsza [liczebności] ich bydła.
39 ३९ नंतर यातनामयी अरिष्ट आणि दुःख यांमुळे ते कमी होतात आणि नष्ट होतात.
Ale potem maleje ich liczba i upokorzeni są uciskiem, nędzą i utrapieniem;
40 ४० तो शत्रूंच्या अधिपतीवर अपमान ओततो, आणि त्यांना रस्ते नसलेल्या रानातून भटकायला लावतो.
On wylewa wzgardę na władców i sprawia, że błądzą po bezdrożach pustkowia.
41 ४१ पण तो गरजवंताना क्लेशापासून सुरक्षित ठेवतो, आणि त्यांच्या कुटुंबांची कळपासारखी काळजी घेतो.
Lecz podnosi nędznego z utrapienia i rozmnaża [jego] rodzinę jak stado.
42 ४२ सरळ मनाचे हे पाहतात आणि आनंदी होतात, आणि सर्व दुष्ट आपले तोंड बंद करतात.
Widząc to, prawi rozweselą się, a wszelka nieprawość zamknie swe usta.
43 ४३ जो कोणी ज्ञानी आहे त्याने ह्या गोष्टींकडे लक्ष द्यावे आणि परमेश्वराच्या कराराच्या विश्वसनीयतेच्या कृतीवर मनन करावे.
Kto jest tak mądry, aby tego upatrywał i rozumiał litość PANA?

< स्तोत्रसंहिता 107 >