< स्तोत्रसंहिता 1 >

1 आशीर्वादित आहे तो मनुष्य, जो दुष्टांच्या सल्ल्याने चालत नाही, किंवा पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही, आणि थट्टा करणाऱ्यांच्या सभेत बसत नाही.
Blago čovjeku koji ne slijedi savjeta opakih, ne staje na putu grešničkom i ne sjeda u zbor podrugljivaca,
2 परंतु परमेश्वराच्या शास्त्रात तो आनंद मानतो, आणि त्याच्या नियमशास्त्रावर तो रात्र व दिवस ध्यान लावतो.
već uživa u Zakonu Jahvinu, o Zakonu njegovu misli dan i noć.
3 तो पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या, आपल्या ऋतुत फळ देणाऱ्या, ज्याची पाने कधी कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा होईल व तो जे काही करेल ते साध्य होईल.
On je k'o stablo zasađeno pokraj voda tekućica što u svoje vrijeme plod donosi; lišće mu nikad ne vene, sve što radi dobrim urodi.
4 परंतु दुष्ट लोक असे नसतात, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे असतात.
Nisu takvi opaki, ne, nisu takvi! Oni su k'o pljeva što je vjetar raznosi.
5 म्हणून दुष्ट लोक न्यायात व पापी न्यायींच्या सभेत उभे राहावयाचे नाहीत.
Stoga se opaki neće održati na sudu, ni grešnici u zajednici pravednih.
6 कारण परमेश्वर न्यायींच्या मार्गाला मंजूरी देतो. परंतु दुष्टांचा मार्ग नष्ट होईल.
Jer Jahve zna put pravednih, a propast će put opakih.

< स्तोत्रसंहिता 1 >