< फिले. 1 >

1 पौल, ख्रिस्त येशूचा बंदिवान आणि भाऊ तीमथ्य यांच्याकडून; आमचा प्रिय आणि सोबतीचा कामकरी फिलेमोन ह्यास,
Pāvils, Tā Kunga Kristus Jēzus saistīts, un Timotejs, tas brālis, Filemonam, tam mīļotam un mūsu darba biedram,
2 आणि बहीण अफ्फिया हिला व अर्खिप आमचा सोबतीचा शिपाई यास व तुझ्या घरी जी ख्रिस्ती मंडळी आहे तिला,
Un Apijai, tai mīļotai, un Arhipam, mūsu cīnīšanās biedram, un tai Dieva draudzei tavā namā:
3 देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांजकडून तुम्हास कृपा व शांती असो.
Žēlastība lai ir jums un miers no Dieva, mūsu Tēva, un no Tā Kunga Jēzus Kristus.
4 मी आपल्या प्रार्थनांमध्ये सर्वदा तुझी आठवण करून, माझ्या देवाची उपकारस्तुती करतो;
Es savam Dievam pateicos allažiņ, tevi pieminēdams savās lūgšanās,
5 कारण प्रभू येशूवर तुझा जो विश्वास आहे आणि सर्व पवित्रजनांवर तुझी जी प्रीती आहे, त्यांविषयी मी ऐकले आहे.
Dzirdēdams par tavu mīlestību un ticību, kas tev ir uz To Kungu Jēzu un uz visiem svētiem,
6 आणि मी अशी प्रार्थना करतो की तुम्हामध्ये असलेल्या ख्रिस्त येशूतल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीचे पूर्ण ज्ञान झाल्याने तुझे विश्वासातील सहभागीपण कार्यकारी व्हावे.
Ka tā ticība, kas tev ir līdz ar mums, top spēcīga un tu atzīsti visu to labumu, kas mums ir iekš Kristus Jēzus.
7 कारण तुझ्या प्रीतीमुळे मला फार आनंद व सांत्वन झाले आहे कारण हे बंधू, तुझ्याकडून पवित्र जनांची अंतःकरणे समाधान पावली आहेत.
Jo mums ir liels prieks un iepriecināšana caur tavu mīlestību; jo caur tevi, brāli, tiem svētiem sirdis ir atspirdzinātas.
8 याकरिता जे योग्य ते तुला आज्ञा करून सांगण्याचे जरी मला ख्रिस्ताद्वारे पूर्ण धैर्य आहे.
Tāpēc, jebšu man liela drošība ir iekš Kristus tev pavēlēt to, kas pieklājās,
9 तरी प्रीतीस्तव विनंती करून सांगणे मला बरे वाटते. मी वृद्ध झालेला पौल आणि आता ख्रिस्त येशूसाठी बंदिवान.
Tad es tomēr labāki lūdzu no mīlestības, es tas vecais Pāvils, un tagad arī Jēzus Kristus saistīts, -
10 १० मी बंधनात असता ज्याला आध्यात्मिक जन्म दिला ते माझे लेकरू अनेसिम ह्याच्याविषयी तुला विनंती करतो.
Es tevi lūdzu par savu dēlu Onezimu, ko esmu dzemdinājis iekš savām saitēm,
11 ११ तो पूर्वी तुला निरुपयोगी होता पण आता, तुला व मला दोघांनाही उपयोगी आहे.
To, kas tev citkārt nebija derīgs, bet tagad tev un man ir labi derīgs, to es sūtu atpakaļ;
12 १२ म्हणून मी त्यास म्हणजे माझ्या जिवालाच, तुझ्याकडे परत पाठवले आहे.
Bet tu viņu, tas ir manu sirdi, pieņem.
13 १३ सुवार्तेमुळे मी बंधनात पडलो असता तुझ्याऐवजी त्याने माझी सेवा करावी म्हणून त्यास जवळ ठेवण्याचे माझ्या मनात होते.
Es viņu pats pie sevis gribēju paturēt, lai tas tavā vietā man kalpotu iekš evaņģēlija saitēm;
14 १४ पण, तुझ्या संमतीशिवाय काही करणे मला बरे वाटले नाही, ह्यासाठी की, तुझा उपकार जुलमाने झाल्यासारखा नसावा तर खुशीने केलेला असावा.
Bet bez tavas ziņas es neko negribēju darīt, lai tava labdarīšana nebūtu kā piespiesta, bet no laba prāta.
15 १५ कदाचित तो तुझ्यापासून ह्यामुळेच काही वेळ वेगळा झाला असेल की, त्याने सर्वकाळासाठी तुझे व्हावे. (aiōnios g166)
Jo varbūt, ka viņš tāpēc mazu brīdi bijis atšķirts no tevis, lai tu viņu atdabūtu uz mūžību, (aiōnios g166)
16 १६ त्याने आजपासून केवळ दासच नव्हे तर दासापेक्षा श्रेष्ठ, म्हणजे प्रिय बंधू, असे व्हावे, मला तो विशेष प्रिय आहे आणि तुला तर तो देहदृष्ट्या व प्रभूच्या ठायी ह्याहून कितीतरी अधिक प्रिय असावा.
Ne vairs kā kalpu, bet vairāk nekā kalpu, kā mīļu brāli, īpaši man, bet cik vairāk tev gan pēc miesas, gan iekš Tā Kunga.
17 १७ म्हणून जर तू मला आपला भागीदार समजतोस, तर तो मीच आहे असे मानून त्याचा स्वीकार कर.
Tad nu, ja tu mani turi par (ticības)biedru, tad pieņem viņu tā kā mani.
18 १८ त्याने तुझे काही नुकसान केले असेल किंवा तो तुझे काही देणे लागत असेल तर ते माझ्या हिशोबी मांड.
Bet ja viņš tev netaisnību darījis, vai ir parādā, tad man to pielīdzini.
19 १९ मी पौल हे स्वहस्ते लिहित आहे; मी स्वतः त्याची फेड करीन. शिवाय तू स्वतःच माझे ऋण आहेस, पण याचा उल्लेख मी करीत नाही.
Es, Pāvils, to rakstu ar savu roku: es maksāšu; lai tev neteiktu, ka tu arī pats sevi man esi parādā.
20 २० हे बंधू, प्रभूच्या ठायी माझ्यावर एवढा उपकार कर; ख्रिस्ताच्या ठायी माझ्या जिवाला विश्रांती दे.
Tiešām, brāli, lai es no tevis ko mantoju iekš Tā Kunga, atspirdzini manu sirdi iekš Tā Kunga.
21 २१ तू हे मान्य करशील अशा भरवशाने मी तुला लिहिले आहे; आणि मी जाणतो की, तू माझ्या म्हणण्यापेक्षा अधिकही करशील.
Cerēdams, ka tu paklausīsi, es tev rakstu, un zinu, ka tu arī darīsi vairāk nekā es saku.
22 २२ शिवाय माझ्यासाठी राहण्याची व्यवस्था करून ठेव कारण तुमच्या प्रार्थनांमुळे माझे तुमच्याकडे येणे होईल अशी आशा मी करत आहे.
Turklāt sataisi man arī mājas vietu, jo es ceru, ka caur jūsu lūgšanām es jums tapšu atdots.
23 २३ ख्रिस्त येशूमध्ये माझा सहबंदिवान एपफ्रास, हा तुला नमस्कार पाठवत आहे;
Tevi sveicina, Epafra, mans cietuma biedrs iekš Kristus Jēzus,
24 २४ आणि तसेच माझे सहकारी मार्क, अरिस्तार्ख, देमास व लूक हे तुला नमस्कार सांगतात.
Marks, Aristarks, Demas, Lūkas, mani darba biedri.
25 २५ आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्या आत्म्यासोबत असो. आमेन.
Mūsu Kunga Jēzus Kristus žēlastība lai ir ar jūsu garu! Āmen.

< फिले. 1 >