< नहेम्या 7 >

1 तेव्हा तटबंदीचे काम पुरे झाले मग आम्ही वेशीवर दरवाजे बसवले. आणि द्वारपाल व गायक आणि लेवी यांची नेमणूक करण्यात आली. 2 यानंतर माझा भाऊ हनानी याला मी यरूशलेमचा अधिकार सोपवला. हनन्या नावाच्या दुसऱ्या एकाला गढीचा मुख्याधिकारी म्हणून निवडले. कारण तो अत्यंत प्रामाणिक होता आणि इतरांपेक्षा देवाबद्दल तो अधिक भय बाळगत असे. 3 आणि मी त्यांना म्हणालो, “सूर्य तापल्याशिवाय वेशीचे दरवाजे उघडू नयेत. द्वारपाल पहारा देत असताना, दरवाजे लावून त्यांना अडसर घाला. यरूशलेमामध्ये राहणाऱ्यांमधून पहारेकऱ्यांची निवड करा, त्यापैकी काहीजणांना नगराच्या रक्षणासाठी मोक्याच्या जागी ठेवा. आणि इतरांना आपापल्या घराजवळ पहारा करु द्या.” 4 आता नगर चांगले विस्तीर्ण आणि मोकळे होते. पण वस्ती अगदी कमी होती आणि घरे अजून पुन्हा बांधून काढली गेली नव्हती. 5 माझ्या देवाने सरदार, अधिकारी आणि लोक यांची वंशावळीप्रमाणे गणती करावी म्हणून एकत्र जमावे असे देवाने माझ्या मनात घातले. जे पहिल्याने वर आले त्यांच्या वंशावळयांची नावनिशी मला सापडली, आणि त्यामध्ये जे लिहिले होते ते हे. 6 बंदिवासातून परत आलेले या प्रांतातले लोक असे. बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने या लोकांस बाबेलला कैद करून नेले होते. हे लोक यरूशलेम आणि यहूदा येथे परतले. जो तो आपापल्या गावी गेला. 7 जरुब्बाबेल बरोबर परत आले ते लोक असे: येशूवा, नहेम्या, अजऱ्या, राम्या, नहमानी, मर्दखय, बिलशान, मिस्पेरेथ बिग्वई, नहूम आणि बाना. इस्राएलचे जे लोक परतले त्यांची नावे आणि संख्या पुढीलप्रमाणे: 8 परोशाचे वंशज दोन हजार एकशे बहात्तर, 9 शफाट्याचे वंशज तीनशे बहात्तर, 10 १० आरहचे वंशज सहाशें बावन्न. 11 ११ येशूवा आणि यवाब यांच्या वंशावळीतील पहथ-मवाबाचे वंशज दोन हजार आठशें अठरा, 12 १२ एलामाचे वंशज एक हजार दोनशे चौपन्न, 13 १३ जत्तूचे वंशज आठशे पंचेचाळीस, 14 १४ जक्काईचे वंशज सातशे साठ. 15 १५ बिन्नुईचे वंशज सहाशें अठ्ठेचाळीस, 16 १६ बेबाईचे वंशज सहाशें अठ्ठावीस 17 १७ अजगादचे वंशज दोन हजार तीनशे बावीस, 18 १८ अदोनीकामचे वंशज सहाशें सदुसष्ट. 19 १९ बिग्वईचे वंशज दोन हजार सदुसष्ट, 20 २० आदीनाचे वंशज सहाशें पंचावन्न, 21 २१ हिज्कीयाच्या कुटुंबातील आटेराचे वंशज अठ्याण्णव, 22 २२ हाशूमाचे वंशज तीनशे अठ्ठावीस. 23 २३ बेसाईचे वंशज तीनशे चोवीस, 24 २४ हारिफाचे वंशज एकशे बारा, 25 २५ गिबोनाचे वंशज पंचाण्णव, 26 २६ बेथलहेम आणि नटोफा येथील माणसे एकशे अठ्याऐंशी. 27 २७ अनाथोथाची माणसे एकशे अठ्ठावीस, 28 २८ बेथ-अजमावेथाची माणसे बेचाळीस, 29 २९ किर्याथ-यारीम, कफीरा व बैरोथयातली माणसे सातशे त्रेचाळीस, 30 ३० रामा आणि गिबातली माणसे सहाशे एकवीस. 31 ३१ मिखमाशाची माणसे एकशे बावीस, 32 ३२ बेथेल आणि आय येथली माणसे एकशे तेवीस, 33 ३३ दुसऱ्या नबोची माणसे बावन्न, 34 ३४ दुसऱ्या एलामाची माणसे एक हजार दोनशे चौपन्न. 35 ३५ हारीमाचे वंशज तीनशे वीस, 36 ३६ यरीहोचे वंशज तीनशे पंचेचाळीस, 37 ३७ लोद, हादीद व ओनो याचे वंशज सातशे एकवीस, 38 ३८ सनाहाचे वंशज तीन हजार नऊशें तीस. 39 ३९ याजक पुढीलप्रमाणे: येशूवाच्या घराण्यातली यदया याचे वंशज नऊशें त्र्याहत्तर 40 ४० इम्मेराचे वंशज एक हजार बावन्न, 41 ४१ पशहूराचे वंशज एक हजार दोनशे सत्तेचाळीस, 42 ४२ हारीमाचे वंशज एक हजार सतरा. 43 ४३ लेवी: होदयाच्या कुळातली कदमीएलच्या घराण्यातील येशूवाचे वंशज चौऱ्याहत्तर 44 ४४ गाणारे: आसाफाचे वंशज एकशे अठ्ठेचाळीस, 45 ४५ द्वारपाल: शल्लूम, आटेर, तल्मोन, अक्कूब, हतीता, शोबाचे वंशज एकशे अडतीस. 46 ४६ हे मंदिराचे विशेष सेवेकरी: सीहा, हशूफा, तबायोथ, यांचे वंशज, 47 ४७ केरोस, सीया, पादोन 48 ४८ लबाना, हगाबा, सल्माई 49 ४९ हानान, गिद्देल, गहार. 50 ५० राया, रसीन, नकोदा 51 ५१ गज्जाम, उज्जा. पासेहा 52 ५२ बेसई, मऊनीम, नफूशेसीम. 53 ५३ बकबूक, हकूफ, हर्हूराचे 54 ५४ बसलीथ, महीद, हर्शा 55 ५५ बार्कोस, सीसरा, तामह 56 ५६ नसीहा आणि हतीफा 57 ५७ शलमोनच्या सेवकांचे वंशज: सोताई, सोफेरेथ, परीदा 58 ५८ याला, दार्कोन, गिद्देल 59 ५९ शफाट्या, हत्तील, पोखेरेथ-हस्सबाईम आणि आमोन. 60 ६० मंदिराचे सेवेकरी आणि शलमोनाच्या सेवकांचे वंशज मिळून तीनशे ब्याण्णव होते. 61 ६१ तेल-मेलह, तेल-हर्षा, करुब, अद्दोन व इम्मेर या गावांमधून काही लोक यरूशलेमेला आले होते पण आपली घराणी मूळ इस्राएलामधलीच आहेत हे त्यांना सिद्ध करून सांगता येत नव्हते. ते लोक असेः 62 ६२ दलाया, तोबीया आणि नकोदायांचे वंशज सहाशे बेचाळीस. 63 ६३ आणि याजकांपैकीः हबाया, हक्कोस, बर्जिल्ल्या (गिलादाच्या बर्जिल्याच्या कन्येशी लग्र करणाऱ्याची गणाना बर्जिल्ल्याच्या वंशजात होई). 64 ६४ काही असे होते की त्यांना आपल्या वंशावळीचा इतिहास शोधूनही सापडला नाही. म्हणून ते अशुद्ध ठरून त्यास याजकांच्या यादीतून काढून टाकले. 65 ६५ अत्यंत पवित्र अन्न या लोकांनी खाऊ नये अशी राज्यपालाने त्यांना आज्ञा दिली. ऊरीम व थुम्मीम घातलेल्या मुख्य याजकाने याबाबतीत देवाची अनुज्ञा घेईपर्यंत या अन्नातले काही खायचे नव्हते. 66 ६६ सर्व मंडळीतले मिळून एकंदर बेचाळीस हजार तीनशे साठ लोक होते. 67 ६७ यामध्ये त्यांच्या सात हजार तीनशे सदतीस स्त्री-पुरुष सेवक व दोनशे पंचेचाळीस गायक व गायिका होत्या. 68 ६८ त्यांच्याजवळ सातशे छत्तीस घोडे, दोनशे पंचेचाळीस खेचरे, 69 ६९ चारशे पस्तीस उंट आणि सहा हजार सातशे वीस गाढवे होती. 70 ७० घराण्यांच्या काही प्रमुखांनी या कामाला मदत म्हणून दान दिले. राज्यपालाने एक हजार दारिक सोने, पन्नास वाट्या, याजकांसाठी पाचशे तीस वस्त्रे दिली. 71 ७१ काही घराण्याच्या प्रमुखांनी कामाला सहाय्य म्हणून भांडाराला वीस हजार दारिक सोने आणि दोन हजार दोनशे माने रुपे देखील दिले. 72 ७२ इतर सर्व लोकांनी मिळून वीस हजार दारिक सोने, दोन हजार माने रुपे आणि याजकांसाठी सदुसष्ट वस्त्रे दिली. 73 ७३ अशाप्रकारे याजक, लेवीच्या घराण्यातील लोक, द्वारपाल, गायक आणि मंदिरातील सेवेकरी आपापल्या गावी स्थिरावले. इतर इस्राएल लोकही आपापल्या गावी स्थायिक झाले. आणि सातव्या महिन्यापर्यंत सर्व इस्राएल लोक स्वत: च्या गावांमध्ये स्थिरस्थावर झाले.

< नहेम्या 7 >