< नहेम्या 2 >

1 अर्तहशश्त राजाच्या कारकिर्दीच्या विसाव्या वर्षी नीसान महिन्यात त्याने द्राक्षरस निवडला होता आणि मी द्राक्षरस घेतला आणि तो राजाला दिला. यापूर्वी मी कधी त्याच्या उपस्थितीत असताना उदास झालो नव्हतो.
अर्तक्षत्र राजा के बीसवें वर्ष के नीसान नामक महीने में, जब उसके सामने दाखमधु था, तब मैंने दाखमधु उठाकर राजा को दिया। इससे पहले मैं उसके सामने कभी उदास न हुआ था।
2 म्हणून राजाने मला विचारले, “तुझा चेहरा असा उदास का दिसतो? तू आजारी दिसत नाहीस. तू तर मनातून दु: खी दिसतोस.” मग मी फार घाबरलो.
तब राजा ने मुझसे पूछा, “तू तो रोगी नहीं है, फिर तेरा मुँह क्यों उतरा है? यह तो मन ही की उदासी होगी।” तब मैं अत्यन्त डर गया।
3 मी राजाला म्हणालो, “राजा चिरायु होवो! माझ्या पूर्वजांच्या जेथे कबरी आहेत ते नगर उद्ध्वस्त झाले आहे, नगराच्या वेशीसुध्दा आगीत भस्म झाल्या आहेत, तर माझा चेहरा उदास का होणार नाही?”
मैंने राजा से कहा, “राजा सदा जीवित रहे! जब वह नगर जिसमें मेरे पुरखाओं की कब्रें हैं, उजाड़ पड़ा है और उसके फाटक जले हुए हैं, तो मेरा मुँह क्यों न उतरे?”
4 यावर राजा मला म्हणाला, “तुझ्यासाठी मी काय करावे असे तुला वाटते?” मी स्वर्गातील देवाची प्रार्थना केली.
राजा ने मुझसे पूछा, “फिर तू क्या माँगता है?” तब मैंने स्वर्ग के परमेश्वर से प्रार्थना करके, राजा से कहा;
5 मग मी राजाला उत्तर दिले, “महाराजांची मर्जी असेल आणि आपल्या दासावर आपली कृपादृष्टी झाली असेल तर मला माझ्या पूर्वजांच्या कबरी जेथे आहेत त्या यहूदातील यरूशलेमास जाऊन नगराची पुन्हा बांधणी करण्यास पाठवा.”
“यदि राजा को भाए, और तू अपने दास से प्रसन्न हो, तो मुझे यहूदा और मेरे पुरखाओं की कब्रों के नगर को भेज, ताकि मैं उसे बनाऊँ।”
6 (राणीसुद्धा त्याच्याजवळच बसलेली होती) राजाने मला विचारले, “तुला या कामासाठी जाऊन यायला किती दिवस लागतील? तू परत केव्हा येशील?” राजा मला आनंदाने पाठविण्यास तयार झाला जेव्हा मी त्यास वेळ ठरवून दिली.
तब राजा ने जिसके पास रानी भी बैठी थी, मुझसे पूछा, “तू कितने दिन तक यात्रा में रहेगा? और कब लौटेगा?” अतः राजा मुझे भेजने को प्रसन्न हुआ; और मैंने उसके लिये एक समय नियुक्त किया।
7 मग मी राजाला असेही म्हणालो, “राजाची माझ्यावर मर्जी असेल तर माझी आणखी एक विनंती आहे. मी यहूदा देशी पोहचेपर्यंत नदीच्या पश्चिमेकडील प्रदेशातून जाऊ देण्याविषयी तेथल्या अधिकाऱ्यांच्या नावानिशी पत्रे द्यावीत.
फिर मैंने राजा से कहा, “यदि राजा को भाए, तो महानद के पार के अधिपतियों के लिये इस आशय की चिट्ठियाँ मुझे दी जाएँ कि जब तक मैं यहूदा को न पहुँचूँ, तब तक वे मुझे अपने-अपने देश में से होकर जाने दें।
8 प्रार्थनामंदिराच्या भोवतालच्या व नगराच्या भिंती आणि माझे घर यांच्यासाठी मला मजबूत लाकूड लागणार आहे. त्यासाठी राजाचा वनाधिकारी आसाफ याला पत्र द्यावे.” राजाने मला तशी पत्रे आणि मी मागितले ते सर्वकाही दिले. देवाची माझ्यावर कृपा असल्यामुळे राजाने हे दिले.
और सरकारी जंगल के रखवाले आसाप के लिये भी इस आशय की चिट्ठी मुझे दी जाए ताकि वह मुझे भवन से लगे हुए राजगढ़ की कड़ियों के लिये, और शहरपनाह के, और उस घर के लिये, जिसमें मैं जाकर रहूँगा, लकड़ी दे।” मेरे परमेश्वर की कृपादृष्टि मुझ पर थी, इसलिए राजा ने यह विनती स्वीकार कर ली।
9 मग मी नदीच्या पश्चिमेकडे असलेल्या, प्रदेशाच्या अधिकाऱ्यांकडे गेलो आणि त्यांना राजाने दिलेली पत्रे दिली. राजाने माझ्यासोबत सैन्यातले अधिकारी आणि घोडेस्वारही पाठवले होते.
तब मैंने महानद के पार के अधिपतियों के पास जाकर उन्हें राजा की चिट्ठियाँ दीं। राजा ने मेरे संग सेनापति और सवार भी भेजे थे।
10 १० होरोनी शहराचा सनबल्लट आणि अम्मोनी तोबीया यांना माझा बेत ऐकून माहीत होता, इस्राएलींच्या मदत शोधण्यासाठी कोणी एकजण आला आहे म्हणून ते खूप नाराज झाले.
१०यह सुनकर कि एक मनुष्य इस्राएलियों के कल्याण का उपाय करने को आया है, होरोनी सम्बल्लत और तोबियाह नामक कर्मचारी जो अम्मोनी था, उन दोनों को बहुत बुरा लगा।
11 ११ याकरिता मी यरूशलेमेला गेलो आणि तेथे तीन दिवस होतो.
११जब मैं यरूशलेम पहुँच गया, तब वहाँ तीन दिन रहा।
12 १२ मग मी रात्री उठलो, मी काहीजणांना घेऊन बाहेर पडलो. यरूशलेमसाठी काही करण्याचा जो विचार देवाने माझ्या मनात घातला होता त्याबद्दल मी कोणाला काही सांगितले नाही. मी ज्याच्यावर बसलो होतो तो सोडून माझ्याबरोबर कोणताही पशू नव्हता.
१२तब मैं थोड़े पुरुषों को लेकर रात को उठा; मैंने किसी को नहीं बताया कि मेरे परमेश्वर ने यरूशलेम के हित के लिये मेरे मन में क्या उपजाया था। अपनी सवारी के पशु को छोड़ कोई पशु मेरे संग न था।
13 १३ मी रात्री खोरे वेशीने बाहेर पडून अजगराच्या झऱ्याकडे, उकिरडा वेशीकडे जाऊन यरूशलेमची मोडलेली तटबंदीची भिंत आणि त्यातील आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली प्रवेशद्वारे यांची पाहाणी केली.
१३मैं रात को तराई के फाटक में होकर निकला और अजगर के सोते की ओर, और कूड़ा फाटक के पास गया, और यरूशलेम की टूटी पड़ी हुई शहरपनाह और जले फाटकों को देखा।
14 १४ मग कारंजाचे प्रवेशद्वार आणि राजाचा तलाव यांच्याकडे गेलो. पण माझा घोडा पलीकडे जाऊ शकेल इतकीही जागा नव्हती.
१४तब मैं आगे बढ़कर सोते के फाटक और राजा के कुण्ड के पास गया; परन्तु मेरी सवारी के पशु के लिये आगे जाने को स्थान न था।
15 १५ तेव्हा मी रात्री भिंतीची बारकाईने तपासणी करत खोऱ्यातून वेशीतून आत शिरलो आणि परत फिरलो.
१५तब मैं रात ही रात नाले से होकर शहरपनाह को देखता हुआ चढ़ गया; फिर घूमकर तराई के फाटक से भीतर आया, और इस प्रकार लौट आया।
16 १६ मी कोठे गेलो आणि मी काय केले हे अधिकाऱ्यांना माहित नव्हते आणि यहूदी, याजक, राजाचे कुटुंबीय, अधिकारी आणि जे बांधकामाचे काम करणार होते यांच्यापैकी कोणालाही मी काही बोललो नव्हतो.
१६और हाकिम न जानते थे कि मैं कहाँ गया और क्या करता था; वरन् मैंने तब तक न तो यहूदियों को कुछ बताया था और न याजकों और न रईसों और न हाकिमों और न दूसरे काम करनेवालों को।
17 १७ मग मी या सगळयांना म्हणालो, “इथे आपल्याला काय त्रास आहे तो तुम्ही पाहतच आहात. यरूशलेम उजाड आणि उद्ध्वस्त झाले आहे व त्याच्या वेशी आगीत जळून गेल्या आहेत. चला, आता आपण यरूशलेमची तटबंदी पुन्हा बांधू या, म्हणजे आपली आणखी अप्रतिष्ठा होणार नाही.”
१७तब मैंने उनसे कहा, “तुम तो आप देखते हो कि हम कैसी दुर्दशा में हैं, कि यरूशलेम उजाड़ पड़ा है और उसके फाटक जले हुए हैं। तो आओ, हम यरूशलेम की शहरपनाह को बनाएँ, कि भविष्य में हमारी नामधराई न रहे।”
18 १८ देवाची माझ्यावर कृपा असल्याचे व राजा माझ्याशी काय बोलला ते मी त्यांना सांगितले. तेव्हा ते म्हणाले, “आपण आताच उठू आणि बांधू!” म्हणून आम्ही या सत्कार्याला सुरुवात केली.
१८फिर मैंने उनको बताया, कि मेरे परमेश्वर की कृपादृष्टि मुझ पर कैसी हुई और राजा ने मुझसे क्या-क्या बातें कही थीं। तब उन्होंने कहा, “आओ हम कमर बाँधकर बनाने लगें।” और उन्होंने इस भले काम को करने के लिये हियाव बाँध लिया।
19 १९ पण आम्ही पुन्हा बांधकाम करत असल्याची खबर होरोनाचा सनबल्लट, अम्मोनी अधिकारी तोबीया आणि अरबी गेशेम यांना लागली तेव्हा त्यांनी अगदी नीच पातळीवर जाऊन आमचा उपहास केला. आणि ते म्हणाले, “हे काय करताय तुम्ही? राजाविरुध्द बंड करणार आहात का?”
१९यह सुनकर होरोनी सम्बल्लत और तोबियाह नामक कर्मचारी जो अम्मोनी था, और गेशेम नामक एक अरबी, हमें उपहास में उड़ाने लगे; और हमें तुच्छ जानकर कहने लगे, “यह तुम क्या काम करते हो। क्या तुम राजा के विरुद्ध बलवा करोगे?”
20 २० पण मी त्यांना असे म्हणालो “स्वर्गातील देवच आम्हास यश देईल. आम्ही देवाचे सेवक असून आम्ही हे नगर पुन्हा उभारू. पण यरूशलेमात तुमचा काहीएक अधिकार, वाटा व ऐतिहासीक हक्क नाही.”
२०तब मैंने उनको उत्तर देकर उनसे कहा, “स्वर्ग का परमेश्वर हमारा काम सफल करेगा, इसलिए हम उसके दास कमर बाँधकर बनाएँगे; परन्तु यरूशलेम में तुम्हारा न तो कोई भाग, न हक़ और न स्मारक है।”

< नहेम्या 2 >