< नहूम 1 >

1 निनवे शहराविषयीची घोषणा. एल्कोशी नहूम याच्या दृष्टांताचे पुस्तक.
नीनवे के विषय में भारी वचन। एल्कोशवासी नहूम के दर्शन की पुस्तक।
2 परमेश्वर हा ईर्ष्यावान व सूड घेणारा देव आहे; परमेश्वर सूड घेणारा व क्रोधयुक्त देव आहे. परमेश्वर आपल्या विरोध्यांचा बदला घेतो आणि तो आपल्या शत्रूंसाठी क्रोध राखून ठेवतो.
यहोवा जलन रखनेवाला और बदला लेनेवाला परमेश्वर है; यहोवा बदला लेनेवाला और जलजलाहट करनेवाला है; यहोवा अपने द्रोहियों से बदला लेता है, और अपने शत्रुओं का पाप नहीं भूलता।
3 परमेश्वर रागवण्यास मंद आणि महापराक्रमी आहे; त्याच्या शत्रूंना तो निरापराध ठरवणार नाही. परमेश्वर झंझावातातून आणि वादळातून त्याचे मार्ग काढतो आणि मेघ त्याच्या चरणाची धूळ आहेत.
यहोवा विलम्ब से क्रोध करनेवाला और बड़ा शक्तिमान है; वह दोषी को किसी प्रकार निर्दोष न ठहराएगा। यहोवा बवंडर और आँधी में होकर चलता है, और बादल उसके पाँवों की धूल हैं।
4 तो समुद्राला दटावतो आणि त्यास कोरडा करतो; तो सर्व नद्या कोरड्या करतो. बाशान व कर्मेलसुद्धा गळून जातील; लबानोनाचा फुलवरा कोमेजून जातो.
उसके घुड़कने से महानद सूख जाते हैं, वह सब नदियों को सूखा देता है; बाशान और कर्मेल कुम्हलाते और लबानोन की हरियाली जाती रहती है।
5 त्याच्या उपस्थितीने पर्वत हलतात आणि टेकड्या वितळून जातात; त्याच्या उपस्थितीने पृथ्वी कोसळते, खरोखर हे जग आणि त्यामध्ये राहणारा प्रत्येक मनुष्य थरथरतो.
उसके स्पर्श से पहाड़ काँप उठते हैं और पहाड़ियाँ गल जाती हैं; उसके प्रताप से पृथ्वी वरन् सारा संसार अपने सब रहनेवालों समेत थरथरा उठता है।
6 त्याच्या क्रोधापुढे कोण उभा राहू शकेल? त्याच्या क्रोधाच्या संतापाचा कोण प्रतिकार करू शकेल? त्याचा क्रोध अग्नीप्रमाणे ओतलेला आहे आणि त्याच्यामुळे खडक फुटून जातात.
उसके क्रोध का सामना कौन कर सकता है? और जब उसका क्रोध भड़कता है, तब कौन ठहर सकता है? उसकी जलजलाहट आग के समान भड़क जाती है, और चट्टानें उसकी शक्ति से फट फटकर गिरती हैं।
7 परमेश्वर चांगला आहे, संकटसमयी तो शरणदुर्ग आहे आणि जे त्याच्या ठायी आश्रय घेतात त्यांना तो जाणतो.
यहोवा भला है; संकट के दिन में वह दृढ़ गढ़ ठहरता है, और अपने शरणागतों की सुधि रखता है।
8 पण तो त्याच्या शत्रूंचा पूर्णपणे महापुराने नाश करील; तो त्यांचा पाठलाग करून अंधारात उधळून लावील.
परन्तु वह उमड़ती हुई धारा से उसके स्थान का अन्त कर देगा, और अपने शत्रुओं को खदेड़कर अंधकार में भगा देगा।
9 तुम्ही लोक परमेश्वराविरुध्द काय योजना करत आहात? पण तो त्याचा पूर्ण अंत करील; दुसऱ्यांदा विपत्ती उठणारच नाही.
तुम यहोवा के विरुद्ध क्या कल्पना कर रहे हो? वह तुम्हारा अन्त कर देगा; विपत्ति दूसरी बार पड़ने न पाएगी।
10 १० ते गुंतागुंत झालेल्या काटेरी झुडपाप्रमाणे, आपल्या स्वत: च्या पिण्याने मस्त झालेले असले तरी ते वाळलेल्या धसकटाप्रमाणे भस्म होतील.
१०क्योंकि चाहे वे काँटों से उलझे हुए हों, और मदिरा के नशे में चूर भी हों, तो भी वे सूखी खूँटी की समान भस्म किए जाएँगे।
11 ११ जो परमेश्वराविरुध्द वाईट योजना करतो, दुष्कर्माला बढती देतो असा कोणी एक निनवेतून निघाला आहे.
११तुझ में से एक निकला है, जो यहोवा के विरुद्ध कल्पना करता और नीचता की युक्ति बाँधता है।
12 १२ परमेश्वराने जे काय म्हटले ते हेः जसे परमेश्वराने म्हटले, जरी ते त्यांच्या संपूर्ण बलाने आणि संख्येने पुष्कळ असले तरीसुद्धा ते छेदले जाऊन त्यांचे लोक नाहीसे होतील. परंतु तू यहूदा, जसे परमेश्वराने म्हटले; जरी मी तुला पीडले आहे तरी पुढे मी तुला पीडणार नाही.
१२यहोवा यह कहता है, “चाहे वे सब प्रकार से सामर्थी हों, और बहुत भी हों, तो भी पूरी रीति से काटे जाएँगे और शून्य हो जाएँगे। मैंने तुझे दुःख दिया है, परन्तु फिर न दूँगा।
13 १३ तर आता मी त्यांचे जोखड तुझ्यावरून मोडून काढीन व तुझी बंधने तोडून टाकीन.
१३क्योंकि अब मैं उसका जूआ तेरी गर्दन पर से उतारकर तोड़ डालूँगा, और तेरा बन्धन फाड़ डालूँगा।”
14 १४ आणि परमेश्वराने तुझ्याबद्दल आज्ञा दिली आहे की, निनवे, तुझे नाव धारण करणारे तुझ्या वंशातील कोणीही उरणार नाही. मी तुझ्या देवाच्या मंदिरातील कोरलेल्या मूर्ती व ओतीव मूर्ती छेदून टाकीन. मी तुझी कबर खोदून काढील, कारण तू दुष्ट आहेस.
१४यहोवा ने तेरे विषय में यह आज्ञा दी है “आगे को तेरा वंश न चले; मैं तेरे देवालयों में से ढली और गढ़ी हुई मूरतों को काट डालूँगा, मैं तेरे लिये कब्र खोदूँगा, क्योंकि तू नीच है।”
15 १५ पाहा, जो सुवार्ता आणतो, शांती जाहीर करतो! असा जो त्याचे पाय पर्वतांवर आहेत, यहूदा आपले सण साजरे कर, आपले नवस फेड, दुष्ट तुझ्यावर पुन्हा हल्ला करणार नाही, त्याचा समूळ उच्छेद झाला आहे.
१५देखो, पहाड़ों पर शुभ समाचार का सुनानेवाला और शान्ति का प्रचार करनेवाला आ रहा है! अब हे यहूदा, अपने पर्व मान, और अपनी मन्नतें पूरी कर, क्योंकि वह दुष्ट फिर कभी तेरे बीच में होकर न चलेगा, वह पूरी रीति से नष्ट हुआ है।

< नहूम 1 >