< मत्तय 1 >

1 अब्राहामाचा पुत्र दावीद याचा पुत्र जो येशू ख्रिस्त याची वंशावळ.
The book of the generation of Jesus Christ, the son of David, the son of Abraham.
2 अब्राहामास इसहाक झाला, इसहाकास याकोब, याकोबास यहूदा व त्याचे भाऊ झाले.
Abraham begat Isaac; and Isaac begat Jacob; and Jacob begat Judah and his brothers;
3 यहूदास तामारेपासून पेरेस व जेरह झाले, पेरेसास हेस्रोन, हेस्रोनास अराम झाला.
And Judah begat Phares and Zara from Thamar; and Phares begat Esrom; and Esrom begat Aram;
4 अरामास अम्मीनादाब, अम्मीनादाबास नहशोन, नहशोनास सल्मोन,
and Aram begat Aminadab; and Aminadab begat Naasson; and Naasson begat Salmon;
5 सल्मोनास राहाबेपासून बवाज, बवाजास रूथपासून ओबेद, ओबेदास इशाय झाला.
and Salmon begat Booz of Rachab; and Booz begat Obed of Ruth; and Obed begat Jesse;
6 आणि इशायास दावीद राजा झाला. उरीयाच्या पत्नीपासून दावीदास शलमोन झाला.
and Jesse begat David the king; and David the king begat Solomon of her who was the wife of Uriah;
7 शलमोनास रहबाम, रहबामास अबीया, अबीयास आसा झाला.
and Solomon begat Roboam; and Roboam begat Abia; and Abia begat Asa;
8 आसास यहोशाफाट, यहोशाफाटास योराम आणि योरामास उज्जीया,
and Asa begat Josaphat; and Josaphat begat Joram; Joram begat Hozias;
9 उज्जीयास योथाम, योथामास आहाज, आहाजास हिज्कीया,
Hozias begat Joatham; and Joatham begat Achaz; Achaz begat Hezekiah;
10 १० हिज्कीयास मनश्शे, मनश्शेस आमोन, आमोनास योशीया,
and Hezekiah begat Manasses; and Manasses begat Amon; and Amon begat Josiah;
11 ११ आणि बाबेलास देशांतर झाले त्यावेळी योशीयास यखन्या व त्याचे भाऊ झाले.
and Josiah begat Jechonias and his brothers in the captivity of Babylon.
12 १२ बाबेलास देशांतर झाल्यानंतर यखन्यास शल्तीएल झाला, शल्तीएलास जरूब्बाबेल झाला.
And after the captivity of Babylon, Jechonias begat Salathiel; and Salathiel begat Zorababbel;
13 १३ जरूब्बाबेलास अबीहूद, अबीहूदास एल्याकीम, एल्याकीमास अज्जुर झाला.
Zorababbel begat Abiud; and Abiud begat Eliakim; and Eliakim begat Azor;
14 १४ अज्जुरास सादोक, सादोकास याखीम, याखीमास एलीहूद झाला.
and Azor begat Sadoc; and Sadoc begat Acheim; Acheim begat Eliud;
15 १५ एलीहूदास एलाजार झाला. एलाजारास मत्तान, मत्तानास याकोब,
and Eliud begat Eleazar; and Eleazar begat Matthan; and Matthan begat Jacob;
16 १६ याकोबास योसेफ झाला; जो मरीयेचा पती होता जिच्यापासून ख्रिस्त म्हटलेला येशू जन्मास आला.
and Jacob begat Joseph the husband of Mary, from whom Jesus, who is called Christ, was born.
17 १७ अशाप्रकारे अब्राहामापासून दावीदापर्यंत सर्व मिळून चौदा पिढ्या, दावीदापासून बाबेलास देशांतर होईपर्यंत चौदा पिढ्या आणि बाबेलास देशांतर झाल्यापासून ख्रिस्तापर्यंत चौदा पिढ्या.
Therefore all the generations from Abraham unto David are fourteen generations; from David unto the captivity of Babylon are fourteen generations; and from the captivity of Babylon unto Christ are fourteen generations.
18 १८ येशू ख्रिस्ताचा जन्म याप्रकारे झाला; त्याची आई मरीया हिची योसेफाशी मागणी झालेली होती, पण त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली.
The birth of Jesus Christ was thus: His mother Mary, having been betrothed to Joseph, before they came together, was found having gestation from the Holy Ghost.
19 १९ मरीयेचा पती योसेफ हा नीतिमान होता, परंतु समाजामध्ये तिचा अपमान होऊ नये अशी त्याची इच्छा होती, म्हणून त्याने गुप्तपणे तिच्यासोबतची मागणी मोडण्याचा निर्णय घेतला.
And Joseph her husband, being righteous and not wishing to expose her publicly, determined to send her away secretly.
20 २० तो या गोष्टींविषयी विचार करीत असता त्यास स्वप्नात प्रभूच्या दूताने दर्शन देऊन म्हटले; “योसेफा, दावीदाच्या पुत्रा, तू मरीयेला आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास घाबरू नकोस, कारण जो गर्भ तिच्या पोटी राहीला आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे.
And he meditating on these things, behold an angel of the Lord appeared unto him in a dream, saying; Joseph, son of David, do not fear to receive Mary thy wife; for that which is begotten in her is of the Holy Spirit;
21 २१ ती पुत्राला जन्म देईल आणि तू त्याचे नाव येशू ठेव, तो आपल्या लोकांस त्यांच्या पापांपासून तारील.”
she shall bring forth a son; and thou shalt call his name Jesus; for He will save His people from their sins.
22 २२ प्रभूने संदेष्ट्यांच्याद्वारे जे सांगितले होते ते परिपूर्ण व्हावे यासाठी हे सर्व झाले, ते असे,
And all this took place in order that the Word, having been spoken by the Lord through the prophet, might be fulfilled, saying;
23 २३ “पाहा कुमारी गर्भवती होईल व पुत्राला जन्म देईल, आणि त्यास इम्मानुएल हे नाव देतील.” या नावाचा अर्थ, “आम्हाबरोबर देव.”
Behold, the virgin shall have gestation and bring forth a son, and they will call his name Emmanuel, which is interpreted, God is with us.
24 २४ तेव्हा झोपेतून उठल्यावर प्रभूच्या दूताने आज्ञा दिली होती तसे योसेफाने केले, त्याने तिचा आपली पत्नी म्हणून स्वीकार केला.
And Joseph rising from sleep did as the angel of the Lord commanded him;
25 २५ तरी मुलाचा जन्म होईपर्यंत त्याने तिच्याशी सहवास ठेवला नाही; आणि त्याने त्याचे नाव येशू ठेवले.
and he took his wife to himself, and did not know her until she brought forth a son, and called his name Jesus.

< मत्तय 1 >